.

अमिताभ बच्चन यांचा जीवन परिचय | Amitabh Bachchan information in Marathi, age, date of birth, movies, height, wife, son, brother, daughter, family, career, events, Amitabh Bachchan wiki

अमिताभ बच्चन यांचे जीवन चरित्र मराठीत | Amitabh Bachchan biography in Marathi

sample47

अमिताभ बच्चन

अभिनेता, 1942 - नाबाद

नाव - अमिताभ बच्चन


जन्म दिनांक - 11 ऑक्टोबर 1942


पूर्वाश्रमीचे नाव - इन्किलाब श्रीवास्तव


जन्म स्थान - अल्लाहाबाद (उत्तेर प्रदेश )


ओळख - अभिनेता, गायक, निर्देशक, टीवी शो होस्ट


कारकीर्द - 1969 - *


वडिलांचे नाव - हरिवंशराय बच्चन


आईचे नाव - तेजी बच्चन


जीवनसाथी - जया बच्चन


पुत्र - अभिषेक बच्चन


कन्या- श्वेता नंदा


पुरस्कार - दादासाहेब फालके पुरस्कार (२०१९), पद्मविभूषण (२०१५), पद्मभूषण (२००१), पद्मश्री


निवासस्थान - मुंबई, जलसा आणि प्रतीक्षा बंगला


शिक्षण - पदवी (आर्ट आणि विज्ञानं ),शेरवुड कॉलेज( नैनीताल),किरोरीमल कॉलेज (दिल्ली )


अमिताभ बच्चन एक असं नाव चे भारताचा सुपरस्टार म्हणून ओळखले जाते. जे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. आज आपण अमिताभ बच्चन यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत. 


 त्यांचे लहानपण, त्यांची शाळा, कॉलेज, शिक्षण, सिनेमा करियर, प्रेम संबंध आणि त्यांचं कुटुंब याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. अमिताभ बच्चन यांच्या जीवनाविषयी पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख कृपया पूर्ण वाचावा.

अमिताभ बच्चन कोण आहेत? (Amitabh bachchan wikipedia in Marathi)


अमिताभ बच्चन भारतीय चित्रपट सृष्ठीतील एक विख्यात सुपरस्टार कलाकार आहेत.  त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची  सुरुवात सात हिंदुस्तानी नावाच्या चित्रपटाने केली.  त्यानंतर त्यांनी बर्‍याच चित्रपटात काम केले पण 1973 साली  प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले.  

त्यानंतर त्यांचे दिवार, शोले असे बरेच चित्रपट गाजले १९८० च्या  दशकामध्ये ते खासदार पण होते. त्यांनी अमिताभ बच्चन कार्पोरेशन नावाची स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुद्धा  काढली होती पण त्यात त्यांना खूप नुकसान झाल्यामुळे ती बंद करावी लागली. 

त्यानंतर काही काळ ते चित्रपट जगतापासून दूर राहिले.  १९९७ मध्ये  प्रदर्शित झालेल्या मृत्युदाता या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट जगतात पुन्हा पदार्पण केले.  २००० साली  त्यांना कोन  बनेगा करोडपती या टीव्ही शोमध्ये निवेदन करण्याची संधी मिळाली ज्यामुळे त्यांचा पूर्ण जीवनच बदलून गेलं.  

त्यांच्याद्वारे निवेदित केला जाणारा कोण बनेगा करोडपती हा टीव्ही शो आजही भारतात लोकप्रिय आहे. 

 अमिताभ बच्चन यांच्या बद्दल थोडक्यात माहिती (Amitabh bachchan life story in Marathi)


अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये उत्तर प्रदेश मधल्या अलाहाबाद येथे झाला.  त्या वेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होतं.  जन्मावेळी त्यांचं नाव इंकीलाब श्रीवास्तव असे  होते.   सुरुवातीच्या काळात चित्रपट जगतात ते एक उदयोन्मुख अभिनेते  म्हणून ओळखले जायचे. 

 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले.  त्यानंतर सुपरहिट झालेल्या दिवार आणि शोले या चित्रपटांनी त्यांना यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले.  1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहेनशहा या चित्रपटाने चित्रपट सृष्टीत त्यांना एक नवीन नाव मिळाले आणि ते शहेनशहा या  नावाने ओळखले जाऊ लागले. 

 शहेनशहा या नावाच्या व्यतिरिक्त त्यांची आणखी ही काही लोकप्रिय नावे आहेत जसे की अँग्री यंग मॅन, बिग बी, महानायक इत्यादी.  त्यांनी जवळजवळ दोनशेच्यावर चित्रपटांमध्ये भूमिका बजावली आहे.  भारतीय चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांचे नाव खूपच आदराने घेतले जाते.  

त्यांनी जवळ जवळ पाच दशकाहून अधिक काळ चित्रपट जगतात आपले  योगदान दिले आहे.  त्यांची जबरदस्त संवादफेक आणि अभिनय यांच्या जोरावर ते भारतीय चित्रपट सृष्टी मध्ये सुपरस्टार होते. 

अमिताभ बच्चन यांना मिळालेले पुरस्कार (Amitabh Bachchan biography in Marathi)


1970 ते 1980  चे दशक अमिताभ बच्चन यांच्यासाठी सुवर्णकाळ होता.  या काळात त्यांनी खूप सारे सुपरहिट चित्रपट दिले.  या काळात अमिताभ बच्चन यांचा चित्रपट सृष्टीमध्ये दबदबा होता.   

अमिताभ बच्चन यांनी आपल्या जीवनामध्ये खूप सारे पुरस्कार जिंकलेले आहेत.  त्यामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण ,नॅशनल फिल्मफेअर सारख्या मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे .

फिल्मफेअर साठी तर ते 41 वेळा नामांकित झालेले आहेत.  कुठल्याही कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारासाठी एवढ्या वेळा नामांकित होण्याची हि सर्वात मोठी गोष्ट आहे. याशिवाय त्यांना फ्रान्स सरकारने सुद्धा पुरस्कार देऊन गौरवले आहे.  अभिनयाशिवाय त्यांनी प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केलेले आहे. 

 ते काही कालावधीसाठी चित्रपट दिग्दर्शक सुद्धा होते आणि टीव्ही शो मध्ये निवेदक सुद्धा होते. बॉलीवुड चित्रपट सृष्टी व्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांनी हॉलीवुड चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका बजावली आहे. The great gatsby या चित्रपट मध्ये त्यांनाही एका ज्यू माणसाची भूमिका  वटवली  होती.  

त्यांचा सगळ्यात जास्त लोकप्रिय शो कोण बनेगा करोडपती हा आहे जो त्यांनी 2000 सालापासून होस्ट  करण्यास सुरुवात केली आहे.  1980 च्या दशकात ते खासदार सुद्धा होते पण राजकारणात ते जास्त दिवस टिकू शकले नाहीत आणि परत चित्रपट सृष्टीकडे वळाले. 

अमिताभ बच्चन यांचे सुरुवातीचे दिवस आणि नावात बदल (Amitabh bachchan original name)


अमिताभ बच्चन यांचे पूर्वाश्रमीचे नाव इंकीलाब श्रीवास्तव होते पण त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांनी आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार त्यांचे नाव अमिताभ ठेवले.  

अमिताभ या नावाचा अर्थ असा होतो की कधीही न संपणारा प्रकाश.  अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे जातीपाती आणि धर्म मानत नव्हते त्यामुळे त्यांनी आपलं श्रीवास्तव हे आडनाव बदलून त्या ऐवजी ते बच्चन असं ठेवलं.  बच्चन या नावाचा अर्थ होतो  निरागस.  अगदी लहान मुलांसारखा.  

त्यानंतर हरिवंशराय श्रीवास्तव हे हरिवंशराय बच्चन याच नावाने प्रसिद्ध झाले.  अमिताभ बच्चन यांचं शाळेमधील नाव अमिताभ बच्चन असेच होते.  त्यानंतर त्याच नावाने ते लोकप्रिय झाले आणि त्यांनी त्याच नावाचा प्रयोग आपल्या येणाऱ्या आयुष्यातही केला आणि अजूनही करत आहेत.  

अमिताभ बच्चन हे शेरवुड कॉलेज चे विद्यार्थी होते.  हे कॉलेज नैनिताल मध्ये आहे.  त्यानंतर त्यांनी किरोडीमल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जे दिल्ली विद्यापीठाच्या अखत्यारित येते.  अमिताभ बच्चन यांना एक छोटा भाऊ सुद्धा आहे.  त्यांचे नाव आहे अजिताभ बच्चन.  

अजिताभ बच्चन हे अमिताभ बच्चन यांच्या पेक्षा पाच वर्षांनी छोटे आहेत.  अजिताभ बच्चन हे एक प्रसिद्ध व्यापारी आहेत.  अमिताभ बच्चन यांच्या भरभराटी मागे अजिताभ बच्चन यांचा महत्त्वाचा वाटा आहे.  अजिताभ बच्चन यांचं लग्न रमोला यांच्याशी झाले. रमोला यांनी अजितभा  बच्चन यांना व्यापार वाढवण्यासाठी खूप मदत केली.  अजिताभ  आणि रमोला यांना एक मुलगा आणि तीन मुली आहेत. 

अमिताभ बच्चन यांना चित्रपटात काम करण्याची प्रेरणा त्यांची आई तेजी बच्चन यांच्याकडून मिळाली. तेजी बच्चन या एक समाज सेविका होत्या.  त्यांनी अमिताभ यांना चित्रपटात काम करण्यासाठी उद्युक्त केले.  सन 2007 मध्ये तेजी बच्चन यांचे निधन झाले. 

अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब (Amitabh Bachchan family)


अमिताभ बच्चन यांनी 1973 मध्ये जया भादुरी यांच्याशी लग्न केले.  जया भादुरी या एक प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री आहेत आणि सध्या त्या राजकारणात सुद्धा सक्रिय आहेत.  लग्नानंतर त्यांनी दोन मुलांना जन्म दिला.  त्यापैकी एक अभिषेक बच्चन जो चित्रपट अभिनेता आहे आणि दुसरी श्वेता नंदा जी एक पत्रकार आहे.  

त्यांनी आधी मॉडलिंग चे काम सुद्धा केलेले आहे.  अभिषेक बच्चन यांनी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्याशी लग्न केले.  त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव आराध्या ठेवले गेले.  अमिताभ बच्चन यांच्या मुली विषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे.  

त्यांची मुलगी श्वेता नंदा यांनी प्रसिद्ध व्यापारी निखिल नंदा यांच्याशी लग्न केले.  निखिल  नंदा हे चित्रपट जगतातील प्रसिद्ध कपूर कुटुंब यांच्याशी संबंधित आहेत.  

श्वेता आणि निखिल यांना दोन मुले आहेत ज्यांची नावे आहेत नाविल आणि अगस्त्य.  अमिताभ बच्चन यांची  तशी खूप घरे  आहेत पण त्यांचे दोन बंगले खूपच प्रसिद्ध आहेत.  ज्यांची नावे आहेत जलसा आणि प्रतीक्षा जी मुंबई महाराष्ट्र मध्ये येतात. 

प्रेम संबंध (Amitabh Bachchan love affairs)


अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे.  त्यामुळे 1970 च्या दशकामध्ये त्यांच्यातील जवळीक खूपच वाढली होती.  

सत्तरच्या दशकामध्ये बॉलिवूडमध्ये या दोघांच्या नावाची खूपच चर्चा होत होती.  त्यातच त्या दोघांचं दोघांचे प्रेम संबंध असल्याच्या अफवा पसरत होत्या.  या अफवा साधारणतः 1970 ते 1980 ऐकायला मिळत होत्या. 

चित्रपट कारकीर्द (Amitabh Bachchan film career)


 अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात 1969 मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटाद्वारे केली.  या चित्रपटाचे दिग्दर्शन ख्वाजा अहमद अब्बास यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी त्याकाळचे   सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या बरोबर आनंद या चित्रपटात भूमिका साकारली . 

आनंद या चित्रपटासाठी साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर चा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला.  1971 मध्ये त्यांनी चित्रपट परवाना मध्ये एका प्रेमी तरुणाची  भूमिका साकारली  जी लोकांना खूपच आवडली. त्यानंतर 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या रेश्मा और शेरा या चित्रपटांमध्येहि  त्यांनी भूमिका केली होती.  

यादरम्यान त्यांनी गुड्डी या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती.  या चित्रपटात जया बच्चन या मुख्य अभिनेत्रींच्या भूमिकेत होत्या.  सुरुवातीच्या काळात त्यांचे बरेच चित्रपट अयशस्वी ठरले.  अभिनेत्री माला सिन्हा यांच्याबरोबर केलेला चित्रपट संजोग हा सुद्धा बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करू शकला नाही.  सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांना खूपच संघर्ष करावा लागला. 

 त्यावेळी त्यांचे वय जवळपास तीस वर्षांचे होते.  या काळात त्यांनी 12 प्लॉट आणि फक्त दोन हिट चित्रपट दिले.  ज्यामध्ये एक होता बॉम्बे टू गोवा आणि दुसरा होता आनंद.  पण आनंद या चित्रपटाच्या यशाचे श्रेय राजेश खन्ना यांना मिळाले होते.  दरम्यानच्या काळात सुप्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद यांनी त्यांच्यावर जंजीर या चित्रपटाची स्क्रिप्ट  लिहिली यामध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.  

1973 साले प्रदर्शित झालेल्या जंजीर या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले आणि एक वेगळी ओळख दिली.  या चित्रपटानंतर ते बॉलिवूडमध्ये अँग्री यंग मॅन या नावाने ओळखले जाऊ लागले.  जंजीर हा  एक गुन्हेगारीशी संबंधित ॲक्शन चित्रपट होता यासाठी त्यांना फिल्मफेअरचे  नामांकन सुद्धा मिळाले होते. त्यानंतर 1975 मध्ये प्रदर्शित झालेले दिवार आणि शोले हे त्यांचे चित्रपट ब्लॉक बस्टर ठरले. 

जंजीर या चित्रपटाने त्यांचे नशीब बदलले आणि ते हिंदी चित्रपटसृष्टीतील  सफल अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होऊ लागली.  त्यानंतर त्यांनी बरेच ऍक्शन चित्रपट केले ज्यामध्ये त्रिशूल, काला पत्थर, आणि शक्ती यांसारख्या  चित्रपटांचा समावेश आहे.  1973 मध्ये जया भादुरी बरोबर अमिताभ बच्चन खूप साऱ्या  चित्रपटांमध्ये दिसले होते आणि त्याच दरम्यान त्यांनी लग्न सुद्धा केले.  

त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांनी प्रदर्शित झालेला चित्रपट अभिमान बॉक्स ऑफिस वर र्‍यापैकी चालला.  त्यानंतर त्यांनी राजेश खन्ना यांच्या जोडीने नमक हराम या चित्रपटात भूमिका साकारली  आणि या चित्रपटाने त्यांना बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर चा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला.  

त्यानंतर त्यांनी मजबूर या चित्रपटात भूमिका साकारली पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. 

राजकारण (Amitabh Bachchan in politics)


अमिताभ बच्चन है 1994मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर अलाहाबाद मध्ये खासदार म्हणून निवडून गेले.  त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हेमवती नंदन बहुगुना यांचा विक्रमी मतांनी पराभव केला.  तीन वर्ष त्यांनी राजकारणात काम केले त्यानंतर 1988 मध्ये ते चित्रपट सृष्टीकडे परत वळले. 

 त्यानंतर त्यांनी शहेनशहा चित्रपटात मुख्य भूमिका साकारली. शहेनशहा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला पण  त्याच दरम्यान त्यांचे आणखी तीन चित्रपट जादूगर, तुफान आणि मै आजाद हु हे बॉक्स ऑफिसवरअयस्वी ठरले. 

1990 साली प्रदर्शित झालेल्या आज का अर्जुन या चित्रपटाने त्यांना पुन्हा यश मिळवून दिले. त्यानंतर  प्रदर्शित झालेल्या हम  या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश धिंगाणा घातला.  या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट एक्टर चा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. 

एबीसील कंपनीची स्थापना आणि त्यात त्यांना सोसावे लागलेले नुकसान (ABCL company losses)


1994 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट इन्सानियत नंतर त्यांनी पाच वर्षांचा मोठा ब्रेक घेतला. 1996 मध्ये त्यांनी एबीसील कार्पोरेशन नावाच्या कंपनीची स्थापना केली.  या कंपनीने तेरे मेरे सपने या चित्रपटाचे प्रदर्शन केले.  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी  यशस्वी झाला.  

त्यानंतर त्यांनी मृत्युदाता या चित्रपटातून पुन्हा पदार्पण केले पण हा चित्रपट पूर्णपणे अयशस्वी ठरला. 
त्यानंतर एबीसील कंपनी ला खूप मोठे नुकसान सोसावे लागले आणि शेवटी ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. 

 कोण बनेगा करोडपती होस्टिंग (Kaun Banega crorepati hosting)


सन 2020 मध्ये सन 2000 मध्ये अमिताभ बच्चन यांना लोकप्रिय टीव्ही शो कोण बनेगा करोडपती होस्ट करण्याची संधी मिळाली. हि  त्यांच्यासाठी एक आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट ठरली.  या  शोमुळे त्यांचे सर्व कर्ज  तर फिटलेच पण त्यांनी तेही परत मिळवले जे त्यांनी एबीसील कंपनीमध्ये गमावले होते. 

अमिताभ बच्चन आज सुद्धा तेवढेच स्फूर्तीदायक आणि एक्टिव आहेत जेवढे ते पहिले असायचे.  आजही त्यांच्या मध्ये तोच  जोश तीच  स्फूर्ती  पाहायला मिळते


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post