राधिका आपटे यांचा जीवन परिचय | Radhika Apte biography in Marathi
राधिका आपटे म्हटलं कि डोळ्यापुढे येते ती एक बिनधास्त मुलगी जी कॅमेऱ्या पुढे अजिबात लाजत नाही आणि म्हणूनच तिने चित्रपट सृष्टीतील या स्पर्धात्मक जगात आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. अभिनयात तर ती सरस आहेच पण ती काही बोल्ड दृश्ये सुद्धा बिनधास्त देते. तिचे पार्चड, हंटर सारखे चित्रपट आपण पहिले असतीलच. त्यावरून तिच्या बिनधास्त व्यक्तिमत्वाची आणि दिलखुलास अभिनयाची प्रचिती येते. चला तर जाणून घेऊया हिंदी/मराठी चित्रपट श्रुष्टीतील या बिनधास्त अभिनेत्री विषयी.
राधिका आपटे यांचे सुरुवातीचे जीवन (Radhika Apte initial life)
राधिका आपटे यांचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी तामिळनाडू मधील वेल्लोर येथे झाला.(Radhika Apte age) त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे आई वडील वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकि चा अभ्यास करत होते. त्यानंतर तिचे वडील डॉ. चारुदत्त आपटे पुणे येथील सह्याद्री रुग्णालयाचे न्यूरो सर्जन आणि चेअरमन झाले.
त्यानंतर तिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणिताची पदवी मिळवली. सुरुवातीला त्यांनी निंयमितपने शाळेत शिक्षण घेतले पण त्यानंतर त्यांनाही घरूनच शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला. त्यांच्या बरोबर त्यांच्या सोसायटी मधील त्यांचे आणखी चार मित्र सुद्धा होते.
मुंबईमध्ये जाण्याचा निर्णय आणि अप्रिय अनुभव
यात स्वतंत्र आणि मोकळेपणाचा अनुभव घेतल्यामुळे राधिका आपटे यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला. पुण्यात राहत असताना राधिका आपटे यांनी कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्याकडे आठ वर्षे प्रशिक्षण घेतले. याच काळात राधिका आपटे यांनी पुण्यातील थिएटरमध्ये अभिनय आणि नृत्य करण्यास सुरुवात केली पण नंतर चित्रपटात कारकीर्द सुरु करण्याच्या इच्छेमुळे त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबई मध्ये त्यांना बऱ्याच वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले त्यामुळे निराश झालेल्या राधिका आपटे यांनी आपल्या पुणे येथील निवासस्थानि परतण्याचा निर्णय घेतला. मुंबई मध्ये सुरुवातीला त्यांनी ८ ते १० हजार रुपयांच्या पगारावर थिएटर मध्ये नाट्य भूमिका करण्यास सुरुवात केली.
ती गोरेगाव मध्ये काही रूममेट बरोबर पेयिंग गेस्ट म्हणून राहत होती. या दरम्यान २००९ मध्ये राधिका आपटे यांनी “घो मला असला हवा ” नावाच्या त्यांच्या पहिल्या मराठी चित्रपटात काम केले. त्यानंतर शोर हा तिचा पहिला हिंदी चित्रपट आला, त्यानंतर तिने रक्तचरित्र, रक्तचरित्र २ आणि “I Am ” मध्ये अभिनय केला.
भावी पतीशी लंडन मध्ये ओळख (Radhika Apte husband)
पुण्यात परतल्यावर राधिका आपटे यांनी अचानक एका वर्षासाठी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला, जिथे तिने लंडनच्या ट्रिनिटी लॅबन कन्सर्वाटॉर ऑफ म्युझिक अँड डान्स मध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले.
त्यांच्या म्हणण्यानुसार लंडनमधील त्यांचा अनुभव हा जीवनात बदल घडवून आणणारा होता, कारण व्यावसायिकपणे काम करण्याच्या पूर्णपणे वेगळ्या आणि स्वतंत्र धोरणामुळे तिच्यातील कलाकारास वाव मिळत होता. तेथे त्यांची ओळख बेनेडिक्ट यांच्या बरोबर झाली आणि नंतर त्यांनी त्याला पुण्याला आणले.
तो नियमितपणे आपल्या कामासाठी मुंबईला जात होता तर राधिकाला पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे अनुभवामुळे मुंबईला परत जाण्याची इच्छा न्हवती. एक वर्षानंतर, तिने शेवटी शेवटी त्यांनी मनाची तयारी केली आणि मुंबईला जाण्यास सहमती दर्शविली. पण त्यांचा आताच मुंबई बद्दल अनुभव खूपच सुखद आणि सकारात्मक होता आणि त्यातलं आता एकटेपणाहि जाणवत न्हवता.
राधिका आपटे यांची चित्रपट कारकीर्द आणि लग्न (Radhika Apte husband)
राधिका आपटे यांनी आपली पहिली मुख्य भूमिका बंगाली सामाजिक नाटक अंतहीन मधे २००९ साली साकारली होती. 2015 मध्ये मध्ये प्रदर्शित झालेले त्यांचे तीन हिंदी चित्रपट बदलापूर, हंटर आणि मांझी - द माउंटन मॅन हे हे त्यांचे अभिनयाला वाव देणारे ठरले आणि या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांचे खूप कौतुक देखील झाले. (Radhika apte netflix)
२०१६ मध्ये त्यांची स्वतंत्र भूमिका असलेला चित्रपट फोबिया आणि पार्च्ड मधील प्रमुख भूमिकांनी त्यांना अधिक प्रशंसा मिळवून दिली. राधिका आपटे यांनी २०१८ साली तीन नेटफ्लिक्स प्रॉडक्शनमध्ये भूमिका साकारली होती - लस्ट स्टोरीज, एंथॉलॉजी फिल्म, सेक्रेड गेम्स, आणि भयपट मिनी मालिका घोल.(Radhika Apte ghoul) यातील भूमिकांसाठी तिला आंतरराष्ट्रीय एम्मी पुरस्कारासाठी नामांकित केले गेले.(Radhika Apte webseries)
स्वतंत्र चित्रपटात काम करण्याव्यतिरिक्त राधिका आपटे यांनी मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे, ज्यात तामिळ अॅक्शन फिल्म कबाली (2016), हिंदी चरित्रपट पॅड मॅन (2018) आणि हिंदी ब्लॅक कॉमेडी अंधाधुन (2018) यांचा समावेश आहे. त्यांचे हे सारे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले होते. सन २०१२ मध्ये राधिका आपटे यांनी लंडनस्थित संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले. (Radhika Apte husband)
देव पटेल यांच्या बरोबर देखील त्यांनी काम केले आहे. (Radhika Apte Dev Patel)
आप्टे यांनी दि स्लीपवॉकर्स या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते. स्लीपवॉकर्स बेस्ट मिडनाईट शॉर्ट कॅटेगरी अंतर्गत पाम स्प्रिंग्ज आंतरराष्ट्रीय शॉर्टफेस्ट 2020 मध्ये स्पर्धा घेत आहेत.
राधिका आपटे या सर्वात प्रथम वाह! लाईफ हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोट्याश्या भूमिकेत दिसल्या होत्या. 2005 रोजी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी जस्ट फॉर फन मध्ये देखील काम केले.
अनाहिता ओबेरॉय यांच्या 'बॉम्बे ब्लॅक' या नाटकातील त्यांचा अभिनय पाहून अभिनेते राहुल बोस यांनी त्यांचे नाव दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरी यांना सुचविले. अनिरुद्धा रॉय चौधरी त्यावेळी बंगाली चित्रपट अंतहीन मध्ये व्यस्त होते. त्यांच्याबरोबर अपर्णा सेन, शर्मिला टागोर आणि राहुल बोस हे सुद्धा काम करत होते. राधिका आपटे यांनी अंतहीन मध्ये ब्रिंदा रॉय मेनन या टीव्ही पत्रकाराची भूमिका योग्यरीत्या साकारली. (Radhika Apte series)
सन 2009 साली राधिका आपटे यांनी केबीसी प्रोडक्शनच्या 'घो मला असला हवा' या मराठी चित्रपटात भूमिका साकारली. या चित्रपटात त्यांच्याबरोबर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर हे देखील होते. या चित्रपटात राधिका आपटे यांनी सावित्री नावाच्या एका गावाकडील मुलीची भूमिका साकारली होती.
त्यानंतर त्यांनी भावे आणि सुकथनकर यांच्याबरोबर मोर देखणे जंगल मे मध्येही काम केले. त्यावर्षी त्यांनी जतिन वागळे यांच्या एक इंडियन माणूस आणि आकाश खुराणा यांच्या लाईफ ऑनलाईन, बंच ऑफ यंगस्टर वर्किंग इन बीपीओ या मध्ये काम केले. अमोल पालेकर समांतर या चित्रपटामध्ये देखील त्यांनी अभिनय केला आहे.
सन 2010 चाली त्यांनी मनीष प्रेमनाथ यांच्या या द वेटिंग रूम मध्ये काम केले. त्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या रक्त चरित्र आणि रक्तचरित्र 2 यामध्ये सुद्धा ती दिसली होती. लंडनहून परत आल्यानंतर राधिका आपटे यांना एका मोठ्या ब्लॉक बस्टर प्रॉडक्शनच्या हिंदी चित्रपटात भूमिकेची ऑफर देण्यात आली होती परंतु त्या चित्रपटात काम करण्यासाठी ती खूपच जाड आहे असे कारण देऊन ही भूमिका तिला नंतर नाकारण्यात आली.
२०११ मध्ये एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्स अंतर्गत ‘आय एम' आणि 'शोर इन द सिटी’ या चित्रपटात राधिका आपटे यांनी काम केले होते. सन २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला अण्णा हजारे यांच्या चळवळीद्वारे प्रेरित चित्रपट 'हा भारत माझा' मध्ये भावे-सुकथणकर या जोडीबरोबर तिने तिसऱ्यांदा काम केले.
सन २०१२ मध्ये तिचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. या मध्ये तुकाराम हा मराठी चित्रपट आणि धोनी हा तिचा पहिला तामिळ चित्रपट यांचा समावेश होता . नंतरच्या तिच्या अभिनयासाठी तिला सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी सिमा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.
सन २०१३ साली प्रदर्शित झालेला बंगाली चित्रपट रुपकथा नोय मध्ये देखील अभिनय केला होता. या मध्ये त्यांनी सानंद नावाच्या आयटी अभियंत्याची भूमिका साकारली, जी तीन वर्षांच्या मुलाची एकुलती आई आहे. सानंदाचा भूतकाळ भयानक होता, जो तिला त्रास देत होता.
राधिका आपटे यांच्या २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पोस्टकार्ड ,पेंडुलम,लिजेंड आणि वेत्री सेल्वान या बंगाली, तामिळ आणि तेलगू भाषांमधील चित्रपटांचा समावेश होता. त्यानंतर त्यांचा लई भारी हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. पेंडुलम, ज्याचे वर्णन आपटे यांनी "जादूई वास्तववादावर आधारित एक कथा जी आपल्याला समांतर वास्तविकतेच्या किंवा वास्तविक वास्तवांच्या एकाधिक थरांमधून नेते", असे केले होते.
या मध्ये, काम करणाऱ्या एक स्त्रीचे एका तरुणांबरोबरचे संबंध दाखवले गेले होते. तामिळ चित्रपट वेत्री सेल्वान या मध्ये त्यांनी वकीलाची भूमिका साकारली होती.लीजेंड आणि लई भारी हे त्यांचे चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी ठरले होते.
त्यांच्या लई भारी या चित्रपटाने तर पहिल्या आठवड्यातील बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आधीच विक्रम मोडला आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
२०१५ साली, पहिल्या आठ महिन्यांत प्रदर्शित झालेल्या सहा चित्रपटांमधील भूमिकांमुळे चित्रपटसृष्टीत त्यांचे नाव झाले. २०१५ च्या सुरुवातीलाच प्रदर्शित झालेल्या श्रीराम राघवनच्या बदलापूरमध्ये त्यांनी सहनायिकेची एक छोटीशी भूमीका केली होती त्यासाठी त्यांना सहा दिवस चित्रीकरण करावे लागले होते.
या चित्रपटातील त्यांची भूमिका छोटी असून देखील त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. बऱ्याच समालोचकांनी आणि समीक्षकारांनी तिचे कौतुक करताना सांगितले कि ती दिग्गज अभिनेत्रींच्या तोडीची आहे. विशेषत: रेडिफच्या राजा सेनने लिहिले की ती "सनसनाटी" आहे.
मल्याळम चित्रपट हराम आणि तेलगू चित्रपट लायन नंतर तिने हर्षवर्धन कुलकर्णी यांच्या हंटर या चित्रपटात भूमिका केली. बॉक्स ऑफिस वर जरी या चित्रपटाने संमिश्र यश आणि प्रतिक्रिया मिळवल्या असल्यातरी या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले. हंटर हा एक लैंगिक संबंधांवर आधारित विनोदी चित्रपट होता.
बदलापूर आणि हंटर यांनी व्यावसायिक यश संपादन केले. हंटर चित्रपटातील भूमिकेसाठी तिच्यावर काही प्रमाणात टीका सुद्धा झाली पण याच चित्रपटांमुळे तिची लोकप्रियता देखील वाढली. बॉलीवूड मध्ये खळबळ उडून देणारी कलाकार अशी तिची ओळख निर्माण होऊ लागली.
तिचा पुढचा चित्रपट होता तामिळ गँगस्टर-नाटक काबली, ज्यात तिला रजनीकांतची पत्नी म्हणून दाखविण्यात आले होते. हा चित्रपट रिलीज झाल्यावर तिच्या अभिनयाला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि चित्रपटाला तसेच या चित्रपटाने व्यावसायिक यश देखील मिळवले.
वादग्रस्त सिन (Radhika Aapte hot scene)
२३ सप्टेंबर २०१६ साली प्रदर्शित झालेल्या पार्च्ड चित्रपट राधिका आपटे यांनी बोल्ड भूमीका साकारली होती.(Radhika Apte parched) त्यांच्या या भूमिकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला.त्यांची मॅडली मधील भूमीका काही वादग्रस्त शॉट मुळे विशेष गाजली. (Radhika Apte MMS)
आपल्या काही चित्रपटांमध्ये ती बिकिनी वर सुद्धा दिसलेली आहे. (Radhika Apte bikini)
२०१८ मध्ये, राधिका आपटे यांनी अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांच्यासह आर. बाल्की यांच्या पॅड मॅनमध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट ट्विंकल खन्ना यांच्या 'द लिजेंड ऑफ लक्ष्मी प्रसाद' या पुस्तकातील एका लघु कथेवर आधारित होता.
या चित्रपटात राधिका आपटेंची भूमिका एका लाजाळू गृहिणीची होती जिचा नवरा (कुमार) कमी किमतीच्या सॅनिटरी नॅपकिनचा शोध लावत होता. एका वेगळ्या विषयावरील चित्रपट म्हणून या चित्रपटाने नावलौकिक मिळवला आणि राधिका यांच्या भूमिकेचे देखील कौतुक झाले.
नाटकातील अभिनय (Radhika Apte drama)
राधिका आपटे यांनी रंगमंचावर सुद्धा सक्रिय सहभाग घेतलेला आहे. हिंदी भाषेमधील अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. ती मोहित टाकळकर यांच्या आसक्त कलामंच या ग्रुप चा भाग आहे. तिने तू, पूर्णविराम, मात्र रात्र इत्यादी नाटकांमध्ये देखील अभिनय केला आहे. तिने कन्यादान नावाचे व्यावसायिक हिंदी नाटक आणि बॉम्बे ब्लॅक नावाचे इंग्लिश नाटक सुद्धा केलेले आहे. तिने गिरीश कर्नाड यांच्या बेक बीन्स ऑफ टोस्ट या नाटकावर आधारित भारतीय रूपांतर उणे पुरे शहर एक या नाटकात सुद्धा काम केले आहे. राधिका आपटे यांचा नाटकांमध्ये काम करण्यावर जास्त भर आहे.
राधिका आपटे यांचे लघुपट (Radhika Apte shortfilm)
राधिका आपटे यांनी दरम्यान आणि वक्रतुंड स्वाहा यांच्यासह अनेक लघुपटांमध्ये देखील काम केले आहे, दरम्यान मध्ये त्यांनी एक महाविद्यालयीन मुलगी एकता साकारली होती. त्या नंतर अनुराग कश्यप यांच्या लघुपटांमध्ये सुद्धा तिने काम केले आहे जे २०१२ रोजी युट्यूब वर प्रसारित करण्यात आले होते.
आपल्या वेगळ्या आणि वैशिष्ठपूर्ण अभिनयाच्या जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्रीला मराठी Wiki चा मानाचा मुजरा.
सन | चित्रपटाचे नाव | भूमिकेचे नाव | चित्रपटाची भाषा |
---|---|---|---|
2005 | वाह! लाईफ हो तो ऐसी | अंजली | हिंदी |
2009 | अंतहीन | ब्रिन्दा | बंगाली |
समांतर | रेवा | मराठी | |
घो मला असला हवा | सावित्री | मराठी | |
2010 | द वेटिंग रूम | टीना | हिंदी |
Post a Comment