.

राजेश खन्ना यांचा जीवन परिचय | Rajesh Khanna biography in Marathi, age, birthdate, death, movies, love affairs, wife, son, daughter, family, career, events, Rajesh Khanna wiki

राजेश खन्ना यांचे जीवन चरित्र मराठीत | Rajesh Khanna biography in Marathi

sample47

राजेश खन्ना

अभिनेता, 1942 - 2012

नाव -राजेश खन्ना


जन्म दिनांक - 29 डिसेंबर 1942


मृत्यू दिनांक - 18 जुलै 2012


मृत्यू समयी वय -69 वर्ष


पूर्वाश्रमीचे नाव - जतिन खन्ना


जन्म स्थान - अमृतसर पंजाब,(पारतंत्र्याच्या काळात)


ओळख -चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, राजकारणी


वडिलांचे नाव - लाला हिरानंद


आईचे नाव - चंद्रानी खन्ना


जीवनसाथी - डिम्पल कपाडिया


पुत्र - -


कन्या- ट्विन्कल खन्ना आणि रिंकि खन्ना


पुरस्कार - पद्मभूषण (2013)


निवासस्थान -आशीर्वाद बंगला , मुंबई, महाराष्ट्र


शिक्षण -K.C कॉलेज


 हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात क्वचितच कोणाला  एवढी  लोकप्रियता लाभली असेल. ते जिथे जात तिथे तरुणींची  गर्दी उसळत असे.  त्यांच्या गाडीवर साठलेली धूळ तरुणी आपल्या भांगात भरत असत.  कित्येक तरुणींनी तरूणींनी तर त्यांच्या फोटो बरोबर देखील लग्न केले.  काही लोकांनी तर त्यांची मंदिरे  बांधली.  अशी लोकप्रियता मिळविणारा नायक हिंदी चित्रपट सृष्टीत ना कधी झाला ना कधी होईल.  चला तर जाणून घेऊया हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक राजेश खन्ना यांचा जीवनप्रवास.


राजेश खन्ना यांचे सुरुवातीचे दिवस (Earlier days of Rajesh Khanna)

भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार हा किताब मिळविणारे राजेश खन्ना यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते जतिन खन्ना. जतिन  उर्फ  राजेश खन्ना यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 रोजी पंजाब मधील अमृतसर येथे झाला . जतीन खन्ना त्या काळी  काका या नावाने ओळखले जात होते.  


त्यांच्या वडिलांचे नाव होते लाला हिरानंद आणि आईचे नाव होते चंद्रानी खन्ना.  त्यांचे वडील लाला हिरानंद एम सी हायस्कूल मध्ये मुख्याध्यापकाची  नोकरी करत होते. ही शाळा   आता पाकिस्तान मध्ये येते. त्यानंतर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी त्यांना दत्तक घेतले त्यांची नावे आहेत चुन्नीलाल खन्ना आणि लीलावती खन्ना. 


त्यांचे नवीन आई-वडील हे रेल्वे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. ते सन 1935 मध्ये लाहोर हुन मुंबईला आले. सुरुवातीच्या काळात राजेश खन्ना सरस्वती निवास मध्ये राहत होते जे मुंबईच्या गिरगाव भागात आहे.  राजेश खन्ना यांनी आपले शालेय शिक्षण सेंट सेबॅस्टियन गॉन  हायस्कूल येथून पूर्ण केले. तेथे त्यांची ओळख रवी कपूर यांच्याबरोबर झाली. 


तेच रवी कपूर पुढे जाऊन हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र या नावाने प्रसिद्ध झाले.  कॉलेज जीवनापासूनच त्यांनी नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली होती.  कॉलेजमधील नाटकांच्या स्पर्धांमधून काही नाटकांसाठी त्यांना पारितोषिकेही मिळाली आहेत.  


1962 रोजी  राजेश खन्ना यांनी एका नाटकात जखमी सैनिकाची भूमिका निभावली.  नाटकाचे नाव होते अंधायुग त्यांच्या नाटकाने प्रभावित झालेल्या प्रमुख पाहुण्यांनी त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या या वाक्याने राजेश खन्ना यांचा आत्मविश्वास वाढला आणि चित्रपटात काम करण्याच्या त्यांच्या सुप्त इच्छेला एक नवीन ऊर्जा मिळाली.  मग काय आपल्या कॉलेजच्या  दिवसांमध्येच त्यांनी आपल्या मनाची तयारी केली आणि त्यांनी चित्रपट मिळवण्यासाठी  प्रयत्न सुरू केले.  


त्यानंतर त्यांनी पुण्याच्या नवरोसजी वाडिया महाविद्यालयात  पदवीसाठी प्रवेश मिळविला. तेथे दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर  त्यांनी मुंबई च्या के सी कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर त्यांच्या काकांनी त्यांचे नाव राजेश असे ठेवले. त्याकाळी राजेश खन्ना हे एक टॅलेंट हंट चा भाग होते. 


त्याकाळी काही दिग्दर्शक एकत्र येऊन टॅलेंट हंट नावाचा  कार्यक्रम राबवत होते ज्याच्या मध्ये राजेश खन्ना यांनी प्रथम स्थान मिळवले आणि त्यामुळे त्यांना बी आर चोप्रा, बिमल रॉय, नासिर हुसेन, जे ओम प्रकाश, मोहन सहगल यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकासमोर काम करण्याची संधी मिळाली. 


राजेश खन्ना यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात आखरी खत या चित्रपटाद्वारे सन 1966 साली केली ज्याचे दिग्दर्शन चेतन आनंद यांनी केले होते.  त्यानंतर त्यांना राज या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली जो रवींद्र दवे यांनी दिग्दर्शित केला होता.  त्यांचा आखरी खत हा चित्रपट भारतातर्फे बेस्ट फॉरेन लँग्वेज चित्रपटाच्या ऑस्कर साठी पाठविण्यात आला होता. 


राजेश खन्ना यांनी टॅलेंट हंट जिंकलेले असल्यामुळे मनोज कुमार यांच्या उपकार चित्रपटांमध्ये ते सह नायकाची भूमिका करू शकले नाहीत.  त्यानंतर ही भूमिका प्रेम चोप्रा यांना मिळाली. 


त्या काळी त्यांच्या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या मनावर जर प्रभाव पाडत होत्या आणि  त्यांच्या अभिनयाची देखील स्तुती होत होती परंतु त्यांचे  चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी करू शकत नव्हते. 


अभिनेता ते सुपरस्टार हा प्रवास (Rajesh Khanna actor to superstar journey)

 त्यानंतर प्रभावशाली दिग्दर्शक शक्ती सामंत यांनी त्यांना एक भूमिका देऊ केली जी ऐकल्यानंतर राजेश खन्ना यांनी तात्काळ नकार दिला आणि सांगितले की या चित्रपटात मुख्य भूमिका ही नायिकेची आहे यामध्ये मला फारसा वाव नाही.  शक्ती सामंत यांनी समजूत काढल्यानंतर राजेश खन्ना या चित्रपटांसाठी तयार झाले.  


या चित्रपटात त्यांनी असा अभिनय केला की  भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीला पहिला सुपरस्टार मिळाला.  या चित्रपटाचं नाव होतं  आराधना. 


राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी त्याकाळी खूपच गाजली.  त्यानंतर आशा पारेख आणि मुमताज यांच्या  यांच्याबरोबर त्यांची केमिस्ट्री चांगली जुळली.  त्यानंतर तनुजा आणि राजेश खन्ना या जोडीलाही लोकांनी चांगली दाद दिली खास करून चित्रपट मेरे जीवन साथी मध्ये. 


चाहत्यांचं प्रेम (Rajesh khannas fans)

त्यांनी चाहत्यांचं  ते प्रेम अनुभवलं जे आजपर्यंत कुठल्याही सुपरस्टार ने अनुभवलं नसेल. त्यांचे चाहते त्यांच्या गाडीचे  चुंबन घ्यायचे. जिथं त्यांची गाडी जायची, मुली ती धूळ आपल्या भांगात भरायच्या.  बराचश्या  मुलींनी राजेश खन्ना यांच्या फोटो बरोबर लग्न केले होते. 


सलग १५ हिट चित्रपटांचा विक्रम (Rajesh Khanna 15 solo hit movies record)

 राजेश खन्ना यांनी एकाच वेळी एकापाठोपाठ एक 15 सुपरहिट चित्रपट देऊन एक वेगळाच विक्रम प्रस्थापित केला जो आजही अबाधित आहे.  त्या काळच्या मोठमोठ्या अभिनेत्यांचे स्थान त्यांनी धोक्यात आणलं होतं.  ऋषिकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटामध्ये राजेश खन्ना यांनी अमिताभ बच्चन यांच्या जोडीने असा अभिनय केला की त्यांनी रसिकांना हसविले सुद्धा आणि रडविले सुद्धा. 


चित्रपट नमक हराम मधली त्यांची भूमिका अजरामर ठरली या  चित्रपटामध्ये त्यांचे सहायक अभिनेता होते अमिताभ बच्चन. 


राजेश खन्ना एक असे सुपरस्टार बनले  होते की मोठ्यात मोठा संगीत दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटांमध्ये संगीत देत होता.  उदाहरणच द्यायचे झाले तर एस  डी बर्मन, आर डी बर्मन लक्ष्मीकांत प्यारेलाल इत्यादी. 


त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत एवढा दबदबा निर्माण केला होता की त्या काळी असं म्हटलं जाऊ लागलं की ऊपर आका और नीचे काका. 


राजेश खन्ना  1970 ते 1987 या दशकातील सर्वात जास्त मानधन घेणारे कलाकार होते त्यानंतर त्यांचा हा वारसा अमिताभ बच्चन यांनी 1980 ते 1987 या दशकात चालविला.  


राजेश खन्ना यांचे प्रेम संबंध (Rajesh Khanna love affairs) 

1970 च्या आसपास राजेश खन्ना  हे त्या काळची प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजु महिन्द्रू  यांच्या प्रेमात पडले. त्यांचे संबंध सात वर्षांपर्यंत चालले पण त्यानंतर अंजू महेंद्रू यांनी आपली चित्रपट कारकीर्द थांबवावी असा राजेश खन्ना यांचा आग्रह होता आणि त्या वादातूनच त्यांच्या प्रेमसंबंधाची सांगता झालीअंजू महेंद्रू यांच्या म्हणण्यानुसार ब्रेक अप नंतर त्यांनी 17 वर्ष एकमेकांशी अजिबात संवाद साधला नाही.  


1980च्या दशकात टीना मुनीम या अभिनेत्रीबरोबर राजेश खन्ना यांचे प्रेम संबंध जुळले. टीना मुनीम या शालेय जीवनापासूनच राजेश खन्ना यांच्या चाहत्या होत्या. या दोघांनी 1981 ते 86 दरम्यान बर्‍याच चित्रपटात एकत्र अभिनय केला. 


राजेश खन्ना यांनी टीना मुनीम यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला कारण त्यावेळी त्यांना दोन मुली होत्या आणि त्यांच्यावर वाईट प्रभाव पडेल असे त्यांना वाटले. त्यानंतरही राजेश खन्ना आणि टीना मुनीम हे बऱ्याच वेळा पार्टीमध्ये एकत्र दिसून आले होते.


राजेश खन्ना यांचा विवाह (Rajesh Khanna marriage | Rajesh Khanna wedding) 

त्यानंतर राजेश खन्ना यांनी मार्च 1973 मध्ये डिंपल कपाडिया यांच्या बरोबर लग्न केले.  त्याकाळी त्यावेळी डिंपल कपाडिया या बॉबी चित्रपटांमधून आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात करीत होत्या.  


त्यांच्या लग्नानंतर  आठ महिन्यांनी बॉबी चित्रपट प्रदर्शित झाला आणि डिंपल कपाडिया यांनी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळविला.  राजेश खन्ना आणि डिंपल यांना दोन मुली आहेत एक नाव ट्विंकल खन्ना आणि दुसरीचे नाव रिंकी .


लग्नाच्या नात्यामध्ये दुरावा (Rajesh khanna divorse)

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया 1982 मध्ये  एकमेकांपासून वेगळे झाले पण त्यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. राजेश खन्ना यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकानुसार डिंपल कपाडिया या पुन्हा अभिनयाकडे वळण्यास उत्सुक होत्या परंतु त्यास राजेश खन्ना यांचा विरोध होता आणि त्याच वादातून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्या लग्नानंतर डिंपल यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम दिला.  कारण राजेश खन्ना यांच्या आई वडिलांची इच्छा होती कि तिने गृहिणी म्हणून राहावे. लग्नानंतर काही वर्षांनी  कपाडिया यांनी आपली चित्रपट कारकीर्द पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला पण राजेश खन्ना यांचा त्याला सक्त विरोध होता. त्यानंतर डिंपल कपाडिया या राजेश खन्ना पासून वेगळ्या झाल्या आणि आपल्या चित्रपट कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली.


डिंपल कपाडिया यांनी राजेश खन्ना यांच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा त्यांचा प्रचार केला. त्यांची आणि  डिंपल कपाडिया यांची मुख्य भूमिका असणारा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाचं नाव मोठा होतं जय शिवशंकर पण दुर्दैवाने फक्त एक ते दोन दिवस या चित्रपटाचं चित्रीकरण झालं त्यानंतर हा चित्रपट बंद करण्यात आला. .टीना मुनीम यांच्यानंतर राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रू यांच्याबरोबर आपले संबंध पुन्हा सुरू केले.


राजेश खन्ना यांच्या मुलींविषयी (About Rajesh khannas daughters)

राजेश खन्ना यांची मोठी मुलगी ट्विंकल यांनी सुद्धा बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.  तिने इंटेरिअर डेकोरेटर म्हणूनही काम पाहिलेले आहे.  त्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय कुमार यांच्याबरोबर विवाह केला.  राजेश खन्ना यांचे धाकटी मुलगी सुद्धा चित्रपटांमध्ये काम करत होती.  रिंकी यांनी लंडनमधील इन्व्हेस्टमेंट बँकर समीर सरण यांच्याशी विवाह केला. 


विचित्र दावा आणि कुटुंबियांकडून खंडन (Rajesh Khanna in live in relationship)

 17 जुलै 2012 रोजी अनिता अडवाणी नामक महिलेने असा दावा केला की ती राजेश खन्ना यांच्या बरोबर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती आणि तिने त्यांच्या कुटुंबीयांकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी दावा केला पण या दाव्याला त्यांच्या कुटुंबियांनी साफ नकार दिला. 


आपल्या संवाद फेकी ने आणि अभिनयाने राजेश खन्ना यांनी आपला असा ठसा उमटवला होता की मोठ्यातले मोठे  अभिनेते सुद्धा  त्यांची स्तुती करण्यात मागे नव्हते. 


राजकारणात प्रवेश (Rajesh Khanna in politics)

बॉक्स ऑफिस चढ-उतार राजेश खन्ना यांनी जवळून पाहिले आणि त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश करायचं ठरवलं.  


राजेश खन्ना दहाव्या लोकसभेचे खासदार सुद्धा होते.  1992 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर नवी दिल्ली येथून निवडून गेले होते. 1992 ते 1996 पर्यंत त्यांनी राजकारणात काम पाहिले पण राजकारणात ते जास्त काळ टिकू शकले नाहीत. 


 राजेश खन्ना यांनी टीव्हीवर सुद्धा काम केलं आहे आणि चित्रपटांमध्ये सुद्धा.  हेमामालिनी, शर्मिला टागोर, मुमताज, अशा कित्येक नावाजलेल्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी चित्रपटात काम केलं आहे. 


याना मिळालेले पुरस्कार (Rajesh Khanna Award) 

 राजेश खन्ना यांना आतापर्यंत तीन वेळा बेस्ट एक्टर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.  त्यानंतर त्यांना फिल्मफेअर लाइफ टाइम अचीव्हमेंट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  भारतीय टपाल खात्याने तीन मे 2013 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक पोस्टाचे तिकीट सुद्धा काढले.  मुंबईच्या गिरगाव भागात एका चौकाचे नाव देखील सुपरस्टार राजेश खन्ना चौक असे ठेवले गेले आहे.  त्यांच्या जीवनावर आधारित राजेश खन्ना द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियास फर्स्ट सुपरस्टार हे पुस्तक 2014 रोजी प्रदर्शित झाले त्याचे लेखक आहेत यासेर उस्मान.

 

राजेश खन्ना यांचा मृत्यू (Rajesh Khanna Death)

सन 2012 मध्ये तो दिवस आला जेव्हा त्यांचा आजार पण वाढत गेलं.  बराच वेळा त्यांना दवाखान्यात ऍडमिट केलं गेलं  आणि त्यानंतर 18 जुलै 2012 रोजी त्यांनी आपल्या आशीर्वाद बंगल्यात अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या अंतिम यात्रेत चित्रपटसृष्टीतील जवळपास प्रत्येकाने भाग घेतला.  त्यानंतर बरेच मोठे सिने तारे आणि तारका त्यांच्या आठवणींमध्ये अक्षरशा रडले. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post