.

निळावंती एक गूढ ग्रंथ ! निळावंतीविषयी वाचलाच पाहिजे असा लेख | Nilavanti granth | Nilavanti Pustak | Nilavanti granth original | Nilavanti book

 

Nilavanti granth image



कोण होती निळावंती? काय आहे तिची कहाणी? दंतकथा कि हकीकत?(Nilavanti granth)

निळावंती हा एक गूढ असा संस्कृत ग्रंथ आहे. निळावंती ग्रंथमागची कथा खूपच  रंजक आहे.(Nilavanti book)  काही लोकांच्या मते ही एक दंतकथा (Nilavanti Myth) आहे पण काही लोक म्हणतात की ही एक सत्यकथा आहे आणि निळावंती ही पूर्वीच्या काळी खरोखरच अस्तित्वात होती. हा काळ होता तो साधारणतः सातशे वर्षांपूर्वीचा. शिवाजी महाराजांच्या गुप्तचर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक (Bahirji Naik) आणि आणखी काही गुप्तहेर मंडळींना हि विद्या अवगत होती याचा उल्लेख बाजींद (Bajind) या कादंबरीत आढळतो.  


असे म्हटले जाते की या पुस्तकात सांगितलेली विद्या जर कोणी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तो एक तर पूर्णपणे यशस्वी होतो नाहीतर पूर्णपणे वेडा होतो. या बाबतीत असेही  सांगितले गेले आहे की जर माणूस वेडा नाही झाला तरी  तो आपल्या कुटुंबातील व्यक्तींना गमाऊ शकतो म्हणून संसारी व्यक्तींना या ग्रंथमागे न लागण्याचा सल्ला दिला जातो. 


निळावंती  मध्ये दिलेले मंत्र जर सिद्ध झाले तर तुमच्यासाठी कोणती गोष्ट अशक्य  राहत नाही पण ही विद्या मिळवणे खूपच कठीण काम आहे.  योगी गुरूच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या पुस्तकातील विद्या आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला यश मिळू शकते आणि यामध्ये दिलेल्या  सार्‍या विद्या तुम्ही शिकू शकता. 


 हे जगातलं एकमेव पुस्तक आहे की यात दिलेले मंत्र जर तुम्ही सिद्ध केले तर तुम्ही जगावर सुद्धा राज्य करू शकता. पण  जर तुम्ही असे करण्यात यशस्वी झाला नाहीत  तर एक तर तुम्ही वेडे होऊ शकता किंवा तुमचा मृत्यू होऊ शकतो किंवा तुम्ही कायमस्वरूपी तंत्र मंत्राच्या मार्गावर जाऊ शकता.  


चला जाणून घेऊया निळावंती विषयी.  निळावंती कोण होती?  तिला ही विद्या कशी मिळाली? आणि तिने हे पुस्तक कसे  लिहिले चला जाणून घेऊया या बद्दल. 


निळावंती च्या लहानपणाबद्दल थोडी माहिती (Childhood of Nilavanti)

 जाणकारांच्या मते निळावंती ही एका खूपच श्रीमंत माणसाची  मुलगी होती आणि तिच्या माहेरची परिस्थिती खूपच चांगली होती.  निळावंती चा जन्म होतो तेव्हा तिच्या वडिलांना खूप सारे गुप्तधन मिळते आणि ते त्या गावचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होतात.  


निळावंती ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक कन्या.  तिला ना कुणी भाऊ होता ना कोणी बहीण.  त्यामुळे लहानपणापासूनच ती एकटी राहत असे.  आई वडील आपापल्या कामात व्यस्त असल्यामुळे तिच्याशी बोलायला, तिच्याबरोबर खेळायला कोणाला वेळच नव्हता.  


त्यामुळे निळावंती लहानपणी  एकटी राहत असे त्यामुळे ती  निसर्गातील झाडे पशुपक्षी यांनाच आपला मित्र मानत असे.  तिचा पूर्ण दिवस निसर्गाच्या सान्निध्यात जात होता. 


मुंगीचा आवाज आणि प्राण्यांच्या भाषेचे ज्ञान (Communication language of Ant and other animals)

 एक दिवस ती  आपल्या शेतामध्ये एका झाडाखाली बसली  होती.  अचानक तिला कसला तरी आवाज ऐकू येतो. जेव्हा ती आसपास पाहते तेव्हा तिथे कोणीच नसते. ती थोडीशी घाबरते. 


 त्यानंतर तिच्या असे लक्षात येते की दोन मुंग्या आपापसात  संभाषण करीत होत्या आणि त्या येणाऱ्या पावसाळ्यात आपल्या घराला पाण्यापासून कसं वाचवायचं या विषयांवर बोलत होत्या. 


 तिला क्षणभर स्वतःवर विश्वासच बसेना.  पण त्यानंतर ती सावरते  आणि तिच्या लक्षात येत की तिला  मुंग्यांची भाषा ऐकू येत आहे आणि समजत आहे. 


 जेव्हा ति मुंग्यां बरोबर बोलायला सुरुवात करते  तेव्हा मुंग्यां तिला असे काही मंत्र देतात ज्या मुळे तिला बऱ्याच इतर प्राण्यांच्या भाषा समजू लागतात. 


मुंगी  दिसायला जरी लहान असली तरी तिच्यात खूप  शक्ती असते .  मुंगीला  लक्ष्मीचा अवतार पण मानले जाते म्हणूनच म्हणतात की जर तुम्ही मुंग्यांना साखर टाकली  तर तुमची प्रगती  झाल्याशिवाय राहत नाही. 


गुप्त धनाची प्राप्ती (Hidden treasure)

 असो, आता बऱ्याच प्राण्यांकडून आणि पक्षांकडून तिला बऱ्याच गोष्टी समजू लागल्या.  मुंगूस सारखे प्राणी तिला गुप्ता धानाचे रस्ते दाखवत होते.  मुंगूस कुबेराचे वाहन मानले जाते आणि मुंगसाला गुप्त धनाबद्दल पूर्ण ज्ञान असते. असे म्हणतात कि मुंगुसाचे बीळ जर शेवटपर्यंत खोदले तर गुप्तधन सापडण्याची शक्यता असते आणि पूर्वीच्या काळी बऱ्याच लोकांना ते सापडलेले सुद्धा आहे.  त्यानंतर निळावंतीच्या च्या लग्नाचा योग जुळून येतो आणि तिचे लग्न होते. 


 लग्नानंतर निळावंती ला घ्यायला तिचे सासरे बैलगाडी बैलगाडीतून येतात.  जेव्हा ती आपल्या सासऱ्यांबरोबर माहेरून सासरी जात असते, तेव्हा रस्त्यात तिला मुंगसाची एक जोडी दिसते.  त्या जोडीमधील मादी मुंगुसाचा आवाज तिला ऐकू येतो.  


ती निळावंती ला सांगते कि माझा जोडीदार आंधळा आहे.  त्याला डोळे नाहीत आणि तो काही पाहू शकत नाही त्यामुळे कृपया माझी मदत कर.  निळावंतीला मुंगसाची  खूपच दया येते.  एव्हाना निळावंतीला   कुठल्या आजारावर कुठले  औषध लागू पडते याचे ज्ञान आलेले असते.  


त्यामुळे ती त्या मादी मुंगुसाला एक लाल फडके देते आणि ते नराच्या डोळ्यावर बांधण्यास सांगते . आणि काय चमत्कार! लाल फडके  बांधल्यानंतर त्या मुंगसाची गेलेली दृष्टी परत येते.  मुंगूस हा प्राणी खूपच कृतज्ञ असतो.  जर त्याला मदत केली तर तो त्याचे उपकार आयुष्यभर विसरत नाही.  एवढेच कशाला मुंगसाचे साधे तोंड पाहणे ही खूपच शुभ समजले जाते.  निळावंतीने केलेल्या मदतीची परतफेड मुंगसाची जोडी तिला गुप्तधनाचा पत्ता सांगून करतात. 

 

नाग आणि नागमणी 

त्यानंतर प्रवासात त्यांना एक म्हातारा माणूस भेटतो.  चालता चालता तो माणूस त्यांना साप आणि नागमणी यांची गोष्ट सांगतो.  तो तिला असे सांगतो की ज्याच्याकडे हा नागमणी असतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 


 हे ऐकताच निळावंती त्या मुंगसाच्या जोडीला बरोबर घेते  आणि नाग आणि नागमनी यांच्या शोधार्थ जंगलात निघते.  शोधता शोधता खूपच रात्र होते पण नंतर त्यांना  एक प्रकाश दिसतो. 


 जेव्हा ते या प्रकाशा  कडे जातात तेव्हा त्यांना असे दिसते की एक नाग  आपल्या मन्याच्या उजेडात भक्ष  शोधत आहे.  मुंगसाच्या  जोडीला ती त्या नागाला मारण्याची आज्ञा करते आणि नागमणी घेऊन तिथून निघते.  नागमणी प्राप्त झाल्यामुळे तिची शक्ती कितीतरी पटींनी वाढते. 


गुप्तधनाची चटक आणि प्रेत कुरतडणे 

 पण आता तिला गुप्तधनाची चटक लागलेली असते आणि ती जास्तीत जास्त धन  मिळवण्याचा प्रयत्न करत असते.  एके दिवशी मध्यरात्री निळावंती ला कोल्हे कुई  ऐकू येते.  


कोल्हेकुई म्हणजे कोल्याचे  ओरडणे.  दोन कोल्हे  आपापसात बोलत असतात की नदीमधून एक प्रेत वाहत येत आहे.  त्याच्या कमरेला एक लाल कापड बांधलेल आहे ज्याच्या मध्ये काही मोती आहेत.  


हे ऐकून निळावंती गुपचूप  सर्वांची नजर चुकवून त्या दिशेने जायला लागते.  याची चाहूल तिच्या नवऱ्याला लागते.  ही एवढ्या रात्रीचा कुठे जात आहे हे पाहायला तो तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो.  निळवंती नदीच्या त्या दिशेने जात असते तिथून ते प्रेत वाहत येत असते.  


ती त्या प्रेताला पकडते आणि त्याच्या कमरेला बांधलेले लाल फडके सोडवण्याचा प्रयत्न करते.  पण पाण्याने भिजल्यामुळे  त्याची गाठ  खूपच पक्की झालेली असते.  निळावंती ती सोडवण्याचा प्रयत्न करते पण ते तिला जमत नाही म्हणून ती ती गाठ दाताने सोडवण्याचा प्रयत्न करते.  


जेव्हा निळावंती चा पती हे सर्व पाहतो तेव्हा त्याला वाटते की ही एक विचित्र बाई आहे आणि ती प्रेत  कुरतडून खात आहे म्हणून तो तिला सोडून देतो.  


नवऱ्याने सोडून दिल्यावर निळावंती ची अवस्था 

त्यानंतर निळावंति पुन्हा आपल्या माहेरी येते आणि आपला सगळा वेळ झाडे,पशू, पक्षी यांच्याबरोबर घालवायला लागते.  आता तिने जवळपास सर्वच प्राण्यांच्या भाषा आत्मसात केलेल्या असतात.  


जेव्हा तिला  एखादे फळ खायची इच्छा होते तेव्हा ती माकडांना सांगत असे आणि माकडे ती  तीच्यासाठी आणून देत असत.  जेव्हा एखाद जंगली जनावर तिच्या आसपास येई, तेव्हा आकाशातले पक्षी तिला त्याची सूचना देत असत.  आता ती  पूर्णवेळ पशुपक्ष्यांनमध्येच राहायला लागते. आता  निसर्ग पशुपक्षी किडामुंगी याच तिच्या जीवनाचा  अविभाज्य भाग बनले होते. 


निळावंतीला पडलेले स्वप्न, निळावंती  ग्रंथ आणि तिचा मृत्यू  (Nilavanti's dream and death)

एके  दिवशी तिला असे स्वप्न पडते  की जी विद्या तिला माहित आहे तिचा वापर स्वतःपुरता न करता गरिबांसाठी पण करावा.  


पण नवऱ्याने सोडून दिल्यानंतर निळावंती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचते  आणि तिला माहित असते  की ती आता जास्त दिवस जिवंत राहणार नाही.  तेव्हा ति हे सारे मंत्र ही सारी विद्या लिहिण्याचा निर्णय घेते आणि हे सर्व मंत्र एका ताम्रपत्रावर  लिहून काढते.  जेव्हा हा ग्रंथ लिहून पूर्ण होतो  त्यानंतर तिचा अंत होतो.  


निळावंतीच्या मृत्यू नंतर... (After the death of Nilavanti)

जेव्हा हा ग्रंथ तिच्या  वडिलांना सापडतो आणि वाचल्यानंतर ते पूर्णपणे वेडे होतात. हा ग्रंथ जेव्हा एका साधूच्या  हातात पडतो  तेव्हा साधू यातील सर्व विद्या आत्मसात करतो आणि आपल्या शिष्यनाही  शिकवितो. 


 निळावंती ग्रंथ कसा वाचावा? (How to read Nilavanti Granth)

या पुस्तकांमध्ये हे मंत्र कसे सिद्ध करायचे हे सर्व सांगितले गेले आहेत पण याच्यामध्ये हेही सांगितले गेली आहे या विद्येचा दुरुपयोग केला तर त्याचे परिणाम वाईट होतील आणि ती व्यक्ती वेडी होईल त्यामुळे ज्यांना कोणाला ही विद्या आत्मसात करायची आहे त्यांनी एकदम निस्वार्थ भावनेने हे पुस्तक वाचले पाहिजे.(Nilavanti granth marathi online) 


 पण हे पुस्तक वाचणे एवढे सोपे नाही.  हे पुस्तक आपल्याला अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली वाचले पाहिजे.  हे पुस्तक एकट्याने वाचण्याचा प्रयत्न करू नये.  एकदा हे पुस्तक  वाचायला चालू केले तर ते मध्येच सोडता येत नाही आणि ते वाचून पूर्ण करावे लागते.  हे पुस्तक कधीही वाचता येत नाही. (Nilavanti granth read online) 


जेव्हा एखाद्या गरोदर बाईचा अंत होतो आणि तिच्या चितेला अग्नी दिला जातो त्या  चितेच्या अग्नीच्या प्रकाशात हे पुस्तक वाचावे लागते तरच यातील विद्या आत्मसात होतात. पुस्तकाच्या सुरुवातीलाच मुंग्यांची भाषा दिलेली आहे असे म्हणतात. 


 एकदाका जर तुम्ही ती आत्मसात केली तर तुम्हाला बाकीच्या प्राण्यांच्या भाषा सुद्धा अवगत होतात. हे पुस्तक एक आड  एक पान सोडून वाचावे.  जगात खूप कमी लोक असे आहेत ज्यांनी हे पुस्तक वाचून पूर्ण केले आहे कारण पुस्तक वाचणारा एक तर वेडा होतो किंवा हा त्याचा मृत्यू होतो. 


निळावंती ग्रंथ कोठे मिळेल? (Where can we get Nilavanti granth?)

 निळावंतीने  स्वतःच्या हाताने लिहिला ग्रंथ आता कुठे आहे याबद्दल कोणाला फारशी कल्पना नाही. हा ग्रंथ कोणत्या शतकात लिहिला गेला या बद्दलही कोणाला फारशी कल्पना नाही.  पण काही लोक त्यांच्याकडे ओरिजनल ग्रंथ असल्याचा दावा करतात (Original Nilavanti granth price).  ज्यांना ही विद्या शिकायची आहे ते त्या ग्रंथाची  वाटेल तेवढी किंमत द्यायला तयार आहेत. (Nilavanti book) 


कोल्हापूरच्या एका शंभर वर्षांपेक्षा जुने लायब्ररीमध्ये हे पुस्तक पाहिले गेल्याचा दावा केला जातो(Nilavanti granth Marathi). आतापर्यंत  बर्‍याच जणांनी हे पुस्तक शोधण्याचा प्रयत्न केला आहे आणि बरेच लोक अजूनही प्रयत्न करीत आहेत.  हे पुस्तक म्हणजे एक अंधश्रद्धा आहे किंवा सत्यकथा याबद्दल कोणालाच फारसे काही माहीत नाही. 


जर कोणाला ही विद्या शिकायची असेल तर आधी त्या बद्दल पूर्ण माहिती घ्यावी.  दिवाळीच्या दिवशी दारावर येणाऱ्या पिंगळ्यांना याबद्दल बऱ्यापैकी माहिती असते.  कारण हे ज्ञान त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेले असते.  त्यांच्या कडव्यांमध्ये निळावंती चा उल्लेख आवर्जून केला जातो. (Nilavanti granth book) 


योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली जर हे पुस्तक वाचले तर तुम्हाला हे यामध्ये सफलता मिळू शकते.  आजकाल इंटरनेटच्या युगात निळावंती च्या नावावर खूप सारी  नकली पुस्तके विकली जात आहेत त्यांना घेऊन काही फायदा नाही.  यामध्ये ग्रंथाबद्दल बद्दल अत्यंत तोटकी माहिती दिली आहे.  बरेच जण निळावंती ग्रंथाची  pdf आहे का त्याची विचारणा करत असतात पण त्याची pdf अस्तित्वात नाही.(Nilavanti granth pdf)


खरा निळावंती ग्रंथ कसा ओळखावा? (How to identify original Nilavanti granth?)

निळावंती चा खरा ग्रंथ कसा ओळखावा याबद्दल काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे.  जर आपल्याला असा ग्रंथ मिळाला तर तो  उघडताच वारे वाहायला लागतात.  हे पुस्तक उघडल्यानंतर शेवटच्या पानावर ची शेवटची ओळ वाचावी असे म्हणतात. 


त्यानंतर जर आपले  डोके जड झाले आणि आपल्याला खूपच झोप यायला लागली तर समजावे की ते पुस्तक ओरिजनल आहे.  ओरिजनल पुस्तक हातात येताच ते आपला प्रभाव दाखवते.  


तर हि आहे निळावंती ची कहाणी.


निळावंती हे पुस्तक ऍमेझॉन वर खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


Disclaimer 

हा लेख फक्त मनोरंजनासाठी आहे. या लेखाचा उद्धेश अंधश्रद्धा पसरवणे हा मुळीच नाही. निळावंती ग्रंथाबद्दल जी माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे त्याचा सारांश या लेखात देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. या लेखात दिलेल्या माहितीचा जर कोणी मनोरंजना व्यतिरिक्त वापर केला तर मराठी Wiki त्यास जबाबदार नाही. कोणतेही पाऊल उचलताना ते स्वतःच्या जबाबदारीवर उचलावे. धन्यवाद 


3 Comments

  1. माझ्या आजोबानी हे पुस्तक पहिले आहे. ते एका बाई कडे होते. रात्रीच्या वेळी ती ते पुस्तक वाचत असे. पण नंतर ती पूर्ण वेडी झाली आणि तिने स्वतःला जाळून घेतले.

    ReplyDelete
    Replies
    1. ti normal bai nhavti....ti ek shapit yakshini hoti

      Delete
  2. Mala ya pustakachi khup garaj aahe...he pustak konakade asel tar please mala sanga....mi paise dyayla tayar aahe.

    ReplyDelete

Post a Comment

Post a Comment

Previous Post Next Post