.

अशोक सराफ यांचा जीवन परिचय | Ashok Saraf wiki Marathi | Ashok Saraf biography in Marathi | Birthdate, wife, son, career, accident

अशोक सराफ यांचा जीवनपरिचय| Ashok Saraf biography in Marathi

sample47

अशोक सराफ

अभिनेता , 1947 - *

नाव - अशोक सराफ


जन्म दिनांक - ४ जुन १९४७


जन्म स्थान - मुंबई , महाराष्ट्र , भारत


ओळख -चित्रपट अभिनेता


वडिलांचे नाव - उपलब्ध नाही 


आईचे नाव - उपलब्ध नाही


जीवनसाथी - निवेदिता जोशी सराफ


मुले - अनिकेत सराफ


निवासस्थान -मुंबई


शिक्षण - शेठ डी. जी. टी . हायस्कूल

आपल्या चेहर्या वरील विनोदी हावभावाच्या जोरावर आणि आपल्या परिपूर्ण अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीवर तब्बल चार  दशकांहून अधिक काळ विनोदी चित्रपट अभिनेते म्हणून जर कोणी राज्य केले असेल तर ते आहेत आपल्या सर्वांचे लाडके विनोदी अभिनेते अशोक सराफ. 

अशोक सराफ हे फक्त विनोदी अभिनेतेच नाहीत तर गंभीर भूमिका सुद्धा ते तितक्याच चोखपणे बजावतात आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्त्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. एक खटयाळ प्रियकर असो किंवा अगदी  वयोवृद्धाची भूमिका असो, आपल्या सगळ्याच भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. चला तर पाहूया या अष्टपैलू अभिनेत्याचा जीवन प्रवास. 


अशोक सराफ यांचे सुरुवातीचे जीवन (Ashok Saraf Initial days)


अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबई मध्ये झाला.(Ashok Saraf birthdate) त्या काळचे  हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव "अशोक" असे ठेवले गेले. तसे त्यांचे कुटुंब मूळचे बेळगावचे.(Ashok Saraf's village) दक्षिण मुंबई मधील चिखलवाडी या भागात ते लहानाचे मोठे झाले. 


मुंबईतील शेठ डी. जी. टी . हायस्कूल मधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.(Ashok Saraf Education) अगदी बाल वयापासूनच अशोक सराफ याना अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्यांनी बऱ्याच नाटकांमध्ये अभिनय केला होता. 


नाटक आणि मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश (Ashok Saraf film debut)


पुढे मोठे झाल्यावर वयाच्या अठराव्या वर्षी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांनी वि. स . खांडेकर यांच्या "ययाती" या नाटकामध्ये विदूषकाचे भूमिका साकारली.(Ashok Saraf's first role) अशा प्रकारे व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळात बऱ्याच संगीत नाटकांमधील त्यांच्या भूमीला सुद्धा अजरामर ठरल्या. त्यानंतर १९७१ साली प्रदर्शित झालेल्या "दोन्ही घरचा" पाहून या चित्रपटात त्यांना छोटीशी पण दमदार भूमिका करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.(Ashok Saraf in Marathi films)


 त्यानंतर त्यांना कधीच मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. फक्त मराठी नाटक आणि चित्रपटांपुरतेच मर्यादित न राहता त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 


अशोक सराफ यांची चित्रपट कारकीर्द (Ashok Saraf filmy career)


कालांतराने  त्यांची भेट झाली ती विनोदी अभिनेते "दादा कोंडके" (Ashok Saraf and Dada kondke) यांच्या बरोबर आणि या दोघांच्या अभिनयातून उभा राहिला एक अजरामर चित्रपट ज्याचं नाव होतं "पांडू हवालदार"(Pandu Hawaldar). अशोक सराफ यांची विनोदी अभिनेते म्हणून खरी कारकीर्द सुरु झाली ती या चित्रपटापासूनच.


 या चित्रपटामध्ये आपल्याला मिळालेल्या भूमिकेचे सोने केले आणि विनोदी अभिनेते (Ashok Saraf comedy actor)असा नाव लौकिक मिळवला त्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे.  १९७७ साली प्रदर्शित झालेल्या "राम राम गंगाराम" (Ram Ram Gangaram) या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर आणि प्रेक्षकांचं हृदयावर राज्य केले. 


अशोक सराफ यांची कारकीर्द ऐन भरात असताना त्यांना आणखी पुरस्कार मिळाला तो म्हणजे फिल्मफेअर.(Ashok Saraf filmfare) या पुरस्काराने त्यांच्या कारकिर्दीला एक नवी दिशा मिळाली. १९७८ साली प्रदर्शित झालेल्या "दामाद " या चित्रपटामधून त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले. 


त्यामधील त्यांचा अभिनय पाहून त्यांना अनेक हिंदी चित्रपट मिळाले. मग तो "अबोध" असो किंवा " I Love You" असो किंवा मग "करण अर्जुन" आपल्या जबरदस्त अभिनयाने त्यांनी  प्रेक्षकांची वाहवा मिळवली. "विनोदाचा बादशाह" अशी नवी उपाधी सुद्धा त्यांना याच काळात मिळाली. (Ashok Saraf in Hindi movies)


अशोक सराफ जर चित्रपटात असतील तर चित्रपट चालतोच असच समीकरण बनून गेले होते त्यामुळे बऱ्याच चित्रपटांची कथा हि अशोक सराफ याना डोळ्यापुढे ठेऊनच  लिहिली गेली होती. 


अशोक, लक्ष्या, महेश, आणि सचिन यांची जोडी (Ashok, Lakshya, Mahesh & Sachin)


फक्त विनोदी अभिनेता एवढीच आपली ओळख न ठेवता त्यांनी बऱ्याच चित्रपटांमधून गंभीर आणि खलनायकी भूमिका सुद्धा साकारल्या आहेत ज्याला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली त्यामुळे सर्व प्रकारच्या भूमिका करणारा अभिनेता अशी त्यांची आणखी एक ओळख निर्माण झाली. 


"माझी माणसं " आणि "आत्मविश्वास " या चित्रपटातील त्यांच्या भूमीका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. "वजीर" या चित्रपटामधील त्यांनी साकारलेली राजकारणी व्यक्तिमत्वाची भूमीका प्रेक्षकांची विशेष दाद मिळवून गेली. १९८० च्या दक्षकात त्यांची गाठ पडली ती विनोदाचा दुसरा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी. 


अशोक आणि लक्ष्याची जोडी मराठी चित्रपटाच्या इतिहासातील आजवरची सर्वात यशस्वी जोडी आहे. या जोडीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले ज्या मध्ये " धूम धडाका"(Dhoom Dhadaka) , " अशी हि बनवा बनवी"(Ashi hi banvabanvi) "एका पेक्षा एक" या सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल. 


"धूम धडाका " या चित्रपटातील थापाड्याची भूमिका प्रेक्षक या जन्मात तरी विसरणे शक्य नाही. "अशी हि बनवा बनवी" मधील धनंजय माने यांची भूमिका त्यांनी अजरामर केली. अशोक सराफ यांच्या अभिनयाला साथ मिळाली ती महेश कोठार (Mahesh Kothare) आणि सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) या सारख्या कसलेल्या अभिनेते आणि दिग्दर्शकांची. 


अशोक, सचिन, महेश आणि लक्ष्या या चौकडीने मराठी चित्रपट सृष्टीवर बराच काळ अधिराज्य केले. त्यातूनच जन्म झाला " नवरी मिळे नवऱ्याला", गम्मत जम्मत", आयत्या घरात घरोबा या सारख्या गाजलेल्या चित्रपटांचा. लक्ष्याच्या अकाली मृत्यूमुळे अशोक लक्ष्या या जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य प्रेक्षकांना लाभले नाही. गम्मत जम्मत या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला वर्षा  उसगावकर सारखी देखणी आणि जबरदस्त अभिनय क्षमता असणारी अभिनेत्री मिळून दिली. 


सन १९८७ - ८८ मध्ये तर यशाच्या उत्तुंग शिखरावर ते विराजमान झाले होते त्यातच "अशी हि बनवाबनवी" या चित्रपटाने तर त्यांची लोकप्रियता कित्येक पटींनी वाढली. या मराठमोळ्या अभिनेत्याने २००७ साली परदेशी रंगमंचाची चव सुद्धा चाखली ती "हे राम कार्डिओ ग्राम " या नाटकाच्या रूपाने.


 त्यांची लोकप्रियता एवढी होती कि "चौकट राजा" या चित्रपटावेळी स्मशान भूमीत शूटिंग चालू होते त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी स्मशान भूमीत सुद्धा जनसागर उसळला होता. चित्रपटांबरोबरच नाटकात काम करण्याची आपली आवड सुद्धा त्यांनी जिवंत ठेवली होती. "प्रेमा तुझा रंग कसा", "मनो मिलन", "हसत खेळत " या सारख्या नाटकांमध्ये त्यांनी रसिकांचे भरभरून प्रेम मिळवले. 


अशोक सराफ यांचा विवाह ( Ashok Saraf Marriage, Ashok Saraf's Son)


अशोक सराफ यांच्या बरोबर "धूम धडाका", "आमच्या सारखे आम्हीच", "फेका फेकी" आणि इतरही बऱ्याच चित्रपटामधे  काम करणाऱ्या देखण्या अभिनेत्री "निवेदिता जोशी" यांच्या बरोबर त्यांचे धागे जुळले. 


अशोक सराफ सारख्या दिग्गज अभिनेत्याने घातलेली लग्नाची मागणी निवेदिता जोशी यांनी अगदी आनंदात स्वीकारली आणि त्या निवेदिता सराफ झाल्या. (Ashok Saraf's wife)


१९९० साली त्यांनी गोव्यामधील एका मंदिरात कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केले.(Ashok Saraf's marriage place) या दोघांच्या वयांमध्ये असलेलं बरंच अंतर नंतरच्या आयुष्यात सुद्धा त्यांना कधी आडवं आलं नाही आणि निवेदिता यांनी अशोक मामांना  सर्व सुख दुःखात अगदी उत्तम साथ दिली. 


त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक नवीन फुल उमलले ते "अनिकेत" च्या रूपाने.(Ashok Saraf's son) आपल्या पत्नीच्या सहयोगाने त्यांनी निर्मिती मध्ये सुद्धा पाऊल  ठेवले आणि त्यातूनच जन्माला आलेला चित्रपट म्हणजे " एक डाव धोबी पछाड". 


त्यांचा मुलगा अनिकेत हा एका आचार्याचे  काम करतो. आई आणि वडील हे दोघेही अभिनेते असले तरी अनिकेत हा मात्र चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.  


अशोक सराफ याना मिळालेली पारितोषिके (Ashoks Saraf's awards)


चित्रपट आणि नाटकांबरोबरच, मालिकांमध्ये सुद्धा ते मागे न्हवते. "हम पांच" या सारख्या मालिकांमधून त्यांनी तब्बल पाच वर्ष प्रेक्षकांची निखळ करमणूक केली. आतापर्यंत त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर बऱ्याच पारितोषिकांवर आपलं  नाव कोरलेलं आहे. 


चित्रपटांमध्ये अखंड बडबड करीत धिंगाणा घालणाऱ्या अशोक सराफ यांचा मूळ  स्वभाव हा शांतच आहे. (Ashok Saraf's nature) जास्त कोणामध्ये मिसळणे त्यांना पसंत नाही म्हणूनच  फक्त मोजक्याच मित्र मैत्रीणींमध्ये त्यांची उठबस असते. 


अशोक रंजना यांचे प्रेम संबंध (Ashok Saraf Ranjana love affair)


"गोंधळात गोंधळ " आणि "गुपचूप" या सारख्या चित्रपटांमधून त्यांच्या आयुष्यात आल्या त्या रंजना देशमुख यांच्या सारख्या कसदार अभिनेत्री. या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. या जोडीचे काही चित्रपट पुढे खूपच गाजले आणि मराठी चित्रपट सृष्टीला मिळाली ती एक सुपरहिट जोडी अशोक रंजना यांची. पण या जोडीची ताटातूट झाली ती रंजना यांच्या अपघाताने ज्या मध्ये रंजना याना कायमचे  अपंगत्व आले. (Ranjana's accident)


या वेळी अशोक सराफ आणि रंजना या रिलेशनशिप मध्ये असल्याच्या चर्चाना ऊत आला होता. अशोक सराफ यांनी निवेदिता जोशी यांच्या बरोबर लग्न केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अशोक सराफ यांच्या गाडीला सुद्धा मुंबई पुणे एक्सप्रेस रस्त्यावर २०१२ साली तळेगाव नजीक भयानक अपघात झाला होता पण त्यातून ते थोडक्यात बचावले. (Ashok Saraf's Accident)


त्यांनी गायलेलं "नाकावरच्या रागाला औषध काय" हे गाणं  अजूनही बालचमूंमध्ये आवडीने ऐकले जाते. 


अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचा आढावा (Ashok Saraf's movies)


त्यांनी आता पर्यंत आपल्या कारकिर्दीत २५० पेक्षा जास्त चित्रपट,५ नाटकं आणि तब्बल ८ मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेली आहे. त्यातील १०० पेक्षा जास्त चित्रपट हे खूपच यशस्वी ठरले. त्यांच्या बऱ्याच यशस्वी चित्रपटांमध्ये विनोदी चित्रपटांचा समावेश आहे. अजूनही ते न थांबता अविरतपने काम करताना दिसतात. अशा या हरहुन्नरी अभिनेत्यास त्यांच्या पुढील कारकीर्दीस मराठीWiki कडून हार्दिक शुभेच्छा. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post