.

अश्विनी भावे यांचा जीवन परिचय | Ashwini Bhave wiki Marathi | Ashwini Bhave biography in Marathi | Age, Marriage, children, Husband, love affairs, Career

अश्विनी भावे यांचा जीवनपरिचय| Ashwini Bhave biography in Marathi

sample47

अश्विनी भावे

अभिनेत्री , 1972 - *

नाव - अश्विनी भावे


जन्म दिनांक - ७ मे १९७२


जन्म स्थान - मुंबई, महाराष्ट्र


ओळख -अभिनेत्री


वडिलांचे नाव - उपलब्ध नाही


आईचे नाव - उपलब्ध नाही


जीवनसाथी - किशोर बोपर्डीकर  


मुले - साची (मुलगी) आणि मुलगा (नाव उपलब्ध नाही)


निवासस्थान -मुंबई 


शिक्षण - फिलॉसॉफी ची पदवी, मुंबई,रुपारेल कॉलेज

**
अश्विनी भावे किंवा फक्त अश्विनी. तिच्या सौंदर्याने तिने बऱ्याच चित्रपट रसिकांना घायाळ केले होते. तिची अभिनयक्षमता उच्च कोटीची आहे. एका मराठी मुलीने हिंदी चित्रपटाच्या शिखरावर विराजमान होण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला होता पण त्या प्रयत्नांना नशिबाची  साथ नव्हती त्यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. आज जरी मराठी चित्रपट सृष्टी मधील यशस्वी अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना होत असली तरी त्यांच्या प्रतिभेला साजेसे यश त्यांना मिळविता आले नाही. चला पाहूया अश्विनी भावे या महत्त्वाकांक्षी अभिनेत्रीचा जीवन प्रवास. 

अश्विनी भावे यांचे सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण (Ashwini Bhave earliy life | Ashwini Bhave education)


अश्विनी भावे यांचा जन्म   7 मे मे 1972 रोजी  मुंबई महाराष्ट्र येथे एका कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे  बारावीपर्यंतचे शिक्षण मुंबई मधील साधना विद्यालय येथे झाले. मुंबई मधील रुपारेल कॉलेज मधून त्यांनी आपली फिलॉसॉफी ची पदवी संपादन केली.  त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथून चलचित्र आणि दूरचित्रवाणी संबंधित पदविका पूर्ण केली. 

दरम्यान  त्यांनी मराठी नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती . नाटकांमध्ये काम करून त्यांनी आपली अभिनय क्षमता पूर्णपणे विकसित करून  घेतली आणि नंतर त्या छोट्या पडद्याकडे  वळाल्या. "अंतरिक्ष" नावाच्या विज्ञान विषयक मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 

या मालिकेतील त्यांची भूमिका खूपच लक्षवेधी ठरली. त्यानंतर त्यांनी "युगपुरुष" नावाच्या मालिकेमध्ये काम केले. या मालिकेच्या यशानंतर त्यांना अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 

अश्विनी भावे यांचा चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश (Ashwini Bhave film debut)


1986 साली प्रदर्शित झालेल्या "शाबास सुनबाई" या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची मुहूर्तमेढ रोवली. अश्विनी भावे यांनी आतापर्यंत बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत आपण त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली ती 1988 साली  प्रदर्शित झालेल्या "अशी ही बनवाबनवी" या चित्रपटामुळे.

 या चित्रपटामध्ये अश्विनी भावे यांनी अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांबरोबर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. हा चित्रपट एक विनोदी चित्रपट म्हणून चांगलाच गाजला होता. 1997 साली  प्रसिद्ध झालेल्या सरकारनामा या चित्रपटा मुळे त्या पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. 

अश्विनी भावे यांना मराठी  चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स येऊ लागल्या आणि त्यामागे कारण होते त्यांचा माधुरी दीक्षित या प्रसिद्ध अभिनेत्री सोबतचा मिळता जुळता चेहरा. नव्वदच्या दशकामध्ये माधुरी खूपच व्यस्त अभिनेत्री होती त्यामुळे तिला इतर निर्मात्यांना तारखा देणे शक्य नव्हते म्हणून बरेच निर्माते हे नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. 

बऱ्याच जणांना अश्विनी भावे यांचा चेहरा माधुरी दीक्षित यांच्या  चेहऱ्याशी  मिळताजुळता वाटत होता. कदाचित हेच कारण होते की हिंदी चित्रपट सृष्टी मधून त्यांना हिंदी चित्रपटांसाठी  ऑफर्स येऊ लागल्या. त्यांनी हिंदी, मराठी आणि कन्नड चित्रपटात सुद्धा भूमिका साकारल्या आहेत. 

अश्विनी भावे यांचा हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रवेश 


अश्विनी भावे यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले ते 1991 साली  रिलीज झालेल्या हिना फिल्म द्वारे. हिना फिल्म साठी त्याकाळच्या दिग्गज अभिनेत्रींना विचारण्यात आले होते  पण रोल खूपच छोटा असल्यामुळे त्यांनी तो नाकारला  याच दरम्यान या चित्रपटाचे निर्माते राज कपूर यांचे सुद्धा निधन झाले आणि या  चित्रपटाची जबाबदारी त्यांच्या तीन मुलांवर आली. 

हिना चित्रपटात काम करण्याचा अश्विनी  भावे यांचा निर्णय  योग्य ठरला आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर भरपूर कमाई केली. "हिना" हा चित्रपट त्याकाळच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक.
या चित्रपटातील गाजलेले गाणे "देर ना हो जाए कही देर ना हो जाए" हे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते जे आजही रसिकांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही. 

हिना चित्रपटाच्या यशानंतर अश्विनी भावे यांचे बॉलीवूड मध्ये बरेच नाव झाले. त्यामुळे त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांची अक्षरशः रीघ लागली. बॉलीवूड च्या बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये अश्विनी भावे यांनी आपला अभिनय साकारला आहे त्यात प्रामुख्याने हनिमून,सैनिक, परंपरा या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांनी आतापर्यंत 40 हून अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. 

अश्विनी भावे यांच्या कारकिर्दीला ग्रहण 


अश्विनी भावे यांच्या कारकिर्दीला ग्रहण लागले ते त्यांनी "परंपरा" या चित्रपटात साकारलेल्या आमिर खान आणि सैफ अली खान यांच्या आईच्या भूमिकेमुळे. ज्या वयात अभिनेत्री या भूमिकेसाठी त्यांना ऑफर्स येत होत्या त्या वयात त्यांनी चक्क आपल्या वयाच्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका करून सर्व सिनेरसिकांना आश्चर्याचा धक्का दिला आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. 

त्यांची बदललेली प्रतिमा त्यांना शेवटपर्यंत सुधारता आली नाही. त्यानंतर त्यांना फक्त सहाय्यक अभिनेत्रीच्या ऑफर्स येऊ लागल्या ज्यामुळे त्यांची प्रतिमा आणखीनच खालावली कारण या भूमिका नंतर जनता त्यांना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत स्वीकारण्यास तयार नव्हती. 

त्यानंतर रिलीज झालेले त्यांचे दो कैदी, कायदा कानून, चिता,चौराहा  यासारखे चित्रपट बॉक्स ऑफिस वर  दणकून आपटले. 
अश्विनी भावे यांनी साईन  केलेल्या  बऱ्याचशा चित्रपटांची  निर्मिती झालीच नाही किंवा काही चित्रपट मधूनच बंद पडले त्यामुळे त्यांचा बराच वेळ आणि मेहनत वाया गेली. 

1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बंधन" या चित्रपटाद्वारे त्यांना  पुनरागमनाची संधी चालून आली होती. या चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या बहिणीची भूमिका निभावली होती. या चित्रपटाने सुद्धा त्यांचा बराच वेळ वाया घालविला. 1995 साली  चालू झाले या चित्रपटाचे शूटिंग तब्बल तीन वर्षे चालले. 

अश्विनी भावे प्रेमसंबंध आणि लग्न (Ashwini Bhave love affairs | Ashwini Bhave marriage)


या चित्रपटाच्या दरम्यान त्यांची ओळख झाली ती व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या "किशोर  बोपर्डीकर" यांच्याशी. अगदी अपघाताने झालेल्या या ओळखीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही.  बंधन  चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 लग्नानंतर आपल्या चित्रपट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचे अश्विनी भावे यांनी आधीच ठरविले होते त्यानुसार लग्नानंतर त्या चित्रपटांपासून दूर राहू लागल्या आणि अमेरिकेत आपल्या पतीबरोबर स्थायिक झाल्या. अश्विनी  भावे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.  मुलीचे नाव साची असे आहे. 

अश्विनी भावे यांचे पुनरागमन 


 बराच  काळ   चित्रपटांपासून दूर राहिलेल्या अश्विनी भावे यांनी 2007 रोजी स्वतःची निर्मिती असलेल्या कदाचित या चित्रपटाद्वारे पुन्हा पदार्पण करण्याचा प्रयत्न केला पण या चित्रपटाच्या अपयशामुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

अश्विनी भावे या मराठी चित्रपट सृष्टीत अजूनही थोड्या फार सक्रिय असल्या तरी हिंदी चित्रपट सृष्टीला त्यांनी कधीच रामराम ठोकला आहे. त्यांनी आता आपले सर्व  लक्ष मुलांच्या संगोपनावर केंद्रित केले आहे. कधी मुंबई तर कधी अमेरिका अश्या त्यांच्या वाऱ्या चालूच आहेत. 

माधुरी दिक्षीत चे आणि तिचे चांगले संबंध आहेत. अमेरिकेत सुद्धा त्या भेटत असतात आणि माधुरीच्या बहिणीचे घर सुद्धा अश्विनीच्या घराच्या जवळच आहे. आज बऱ्याच नवनवीन तरुणींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्ठी काबीज केल्यामुळे अश्विनी भावें याना या क्षेत्रात पुन्हा पदार्पणाच्या संधी कमीच आहेत. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post