पावसाळा सुरु झाला कि विविध प्रकारच्या कीटकांचा उपद्रव वाढायला लागतो कारण पावसाळा हा बऱ्याच प्रकारच्या कीटकांचा प्रजनन काळ असतो. या मध्ये डासांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामधील काही विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे रोगराई पसरते. या लेखात आपण पाहणार आहोत डेंग्यू या आजाराविषयी. हा आजार का होतो? त्याचे कारण काय? लक्षणे कोणती? उपचार काय आहेत? चला जणू घेऊया.
डेंग्यू चा आजार कशामुळे होतो? (Dengue information in marathi)
पावसाळ्यामध्ये जागोजागी पाणी साठते आणि या साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. या मध्ये डासांची एक विशिष्ट प्रजाती आहे जिचे नाव आहे एडिस इजिप्ती.
हे डास साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात त्यात नारळाच्या करवंट्या, टायर, पाण्याच्या उघड्या टाक्या, कुलर या मधील स्वच्छ पाण्यात हे डास प्रामुख्याने अंडी घालतात. एडिस इजिप्ती नावाच्या डासाची मादी चावल्यामुळे डेंग्यूने हा रोग होऊ शकतो.
बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कि फक्त एकदा हा डास चावल्यावर डेंग्यू होतो का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. कारण आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता डेंग्यू च्या विषाणूंना विरोध करते पण हे डास जास्त संख्येने किंवा वारंवार चावले तर मात्र डेंग्यूने होण्याची शक्यता जास्त असते.
हे डास डेंगू संक्रमित व्यक्तीला चावल्यावर हा विषाणू डासांच्या शरीरात प्रवेश करतो आणि तेच डास नंतर निरोगी व्यक्तीला चावले तर त्या निरोगी व्यक्तीला सुद्धा डेंग्यू होऊ शकतो. अशा प्रकारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला मच्छरांद्वारे डेंग्यू ची लागण होते.
एडिस इजिप्ती नावाचा डास "टायगर मॉस्किटो" या नावाने सुद्धा ओळखला जातो. या डासाच्या शरीरावर वाघाप्रमाणे पांढरे पट्टे असल्यामुळे त्याला टायगर मॉस्किटो असे म्हणतात. इतर डासांच्या तुलनेत हा डास शक्यतो निडर असतो. तो सहसा घाबरत नाही. कितीही हाकलले तरी तो पुन्हा पुन्हा येऊन चावतोच.
जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये या डासांचा प्रादुर्भाव सर्वात जास्त असतो. या महिन्यांतील वातावरण त्यांच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी पोषक असते. डासांच्या बऱ्याच प्रजाती या रात्री चावत असल्यातरी हा डास मात्र दिवसा चावतो.
डेंग्यूच्या तापाची लक्षणे काय आहेत? (Dengue symptoms marathi)
यात प्रामुख्याने तीव्र ताप, थंडी वाजून येणे आणि घाम येणे अशी लक्षणे दिसून येतात पण वेगवेगळ्या रुग्णांनुसार हि लक्षणे थोड्या फार प्रमाणात वेगळी असू शकतात. सांधेदुखी आणि स्नायुदुखी ये हा आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे जे बऱ्याच रुग्णांमध्ये आढळून येतें याच बरोबर भूक न लागणे, मळमळ किंवा उलटी आल्याची भावना होणे किंवा उलट्या होणे हि लक्षणे जाणवतात. (dengue fever in marathi)
काही रुग्णांमध्ये पोटदुखीची समस्या उद्भवू शकते. काही रुग्णांच्या अंगावर लाल चट्टे सुद्धा आढळून येतात. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखी आढळून येते. त्याच डोळे किंवा डोळ्यांच्या मागील भागात तीव्र वेदना होतात कधी कधी डोळ्यांमध्ये रक्त सुद्धा उतरते.
डेंग्यूचे प्रकार कोणते? (Types of Dengue in Marathi)
लक्षणानुसार डेंग्यूची तीन प्रकारात विभागणी केली जाते.
१. क्लासिकल डेंग्यू - या प्रकारामध्ये आजाराची लक्षणे हि सौम्य प्रकारची असतात. ज्यामध्ये थोडाफार ताप येतो आणि डोके दुखते पण हा आजार लवकर बरा होतो.
२. DHF (Dengue Hemorrhagic Fever) - या प्रकारात प्रामुख्याने रुग्णास रक्तस्रावाची समस्या भेडसावते. हा रक्तस्त्राव प्रामुख्याने नाकावाटे किंवा उलटीद्वारे सुद्धा होऊ शकतो.
३. DSS (Dengue Shock Syndrome) - हा डेंग्यूचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. या प्रकारामध्ये वर दिलेली सगळी लक्षणे आढळतातच पण त्याच बरोबर जीव घाबरणे, मानसिक स्थिती बिघडणे, मानसिक धक्का बसने, फुफ्फुसात पाणी होणे इत्यादी लक्षणे आढळून येतात. हि लक्षणे जर तीव्र स्वरूपाची असतील तर रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो.
कसे केले जाते डेंग्यूचे निदान? (Diagnosis of Dengue in Marathi)
वरील लक्षणे जर रुग्णामध्ये आढळून आल्यास आपले डॉक्टर आपल्याला NS१ Antigen हि टेस्ट करायला सांगतात. पण कधी कधी रुग्ण पॉसिटीव्ह असताना सुद्द्धा हि टेस्ट नेगेटिव्ह येते. त्यामुळे सगळ्यात महत्वाची टेस्ट आहे ती प्लेटलेट्स काउन्ट ची. प्लेटलेट्स म्हणजे रक्तामधील पांढरे सूक्ष्म कण.
रक्तस्राव झाल्यावर रक्त गोठवण्याचं काम हे प्लेटलेट्स करतात. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. सर्वसाधारण माणसांमध्ये प्लेटलेट्स ची संख्या असते १५०००० पेक्षा जास्त.
हि संख्या साधारणतः एक लाखाच्या वर असेल तर तसा चिंतेचा विषय नसतो पण जर हि संख्या एक लाखाच्या खाली गेली तर त्यावर लगेच उपाय चालू करावे लागतात पण हा काउन्ट जर पन्नास हजाराखाली गेला तर मात्र रुग्णास ऍडमिट करावे लागते. जर प्लेटलेट्स ची संख्या वीस हजारांपर्यंत खाली घसरली तर बाहेरून या प्लेटलेस रुग्णास सलाईन वाटे द्याव्या लागतात कारण या अवस्थेत नाकातून, दातातून, उलटीवाटे, रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
याच बरोबर हिमोग्लोबीन ची तपासणी करणे सुद्धा महत्वाचे असते. रक्त जास्त पातळ किंवा घट्ट तर झाले नाही ना, याची सुद्धा तपासणी करणे आवश्यक असते.
काही रुग्णांमध्ये लक्षणे जरी जाणवत असली तरी सुरुवातीला टेस्ट हि नेगेटिव्ह येते. काही रुग्णांमध्ये ती साधारणतः ५ ते ७ दिवसानंतर पॉसिटीव्ह येते.
डेंग्यूचा इलाज कसा केला जातो? (dengue treatment in marathi)
डेंग्यूवर आतापर्यंत कोणताही इलाज अस्तित्वात नाही. जे उपचार केले जातात हे लक्षणांनुसार केले जातात. या मध्ये बरेच उपाय हे तापावर आणि प्लेटलेट्स चे काउन्ट वाढवण्यावर केले जातात. कधी कधी डेंग्यू बरोबर जर बॅक्टरीया इन्फेकशन असेल तर अँटिबायोटिक दिले जाते.
डेंग्यूच्या उपचारांमध्ये ताप उतरवणे हे सर्वात महत्वाचे असते. ताप जर जास्त दिवस अंगात राहिला तर त्याचे अनेक दुष्परिणाम जाणवतात.
बाजारामध्ये ताप उतरवण्यासाठी बऱ्याच प्रकारची औषधे उपलब्ध असली तरी डेंग्यूच्या रुग्णास ती औषधे देता येत नाहीत कारण त्यातील बऱ्याच औषधांमुळे प्लेटलेट्स आणखी कमी होण्याची शक्यता असते आणि रुग्णास रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते म्हणून डेंग्यू च्या रुग्णास फक्त "पॅरासिटामोल" हेच औषध दिले जाते.
जर आपणास डेंग्यूची लक्षणे जाणवत असतील तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावेत. जर स्वतः औषधउपचार केले तर चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. तापाचे प्रमाण जर जास्त असेल तर, कपाळावर मिठाच्या पाण्याचा पट्ट्या ठेवाव्यात किंवा संपूर्ण शरीर मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावे. यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील पाण्याच्या पातळीचा समतोल राखणे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. अशावेळी जास्तीत जास्त द्रव पदार्थांचे सेवन करून हि पातळी संतुलित राखावी लागते. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पाणी पिण्याची इच्छा होत नाही पण जर डिहायड्रेशन पासून
रुग्णास वाचवायचे असेल तर पाणी पिण्याचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. याच बरोबर मीठ, साखर पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून ते सुद्धा रुग्णास दिले जाऊ शकते.
बाजारात ORS नामक पावडर सुद्धा उपलब्ध आहे बऱ्याच जणांना हि पावडर आवडत नाही पण ती पिणे शरीरास हितकाराक आहे. हि पावडर विविध प्रकारच्या फ्लेव्हर्स मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. ORS घेणे जर आपणास शक्य नसेल तर आपण लिंबू पाण्यात थोडी साखर आणि थोडे मीठ घालून ते पिऊ शकता.
आपण नारळ पाणी किंवा विविध प्रकारच्या फळांचा ज्यूस सुद्धा घेऊ शकता ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन टिकून राहते.(dengue home treatment in marathi)
किवी आणि ड्रॅगनफ्रूट या फळांमुळे प्लेटलेट्स चा काउन्ट वाढण्यास मदत होते. या मध्ये सर्वात रामबाण उपाय आहे पपई ची पाने. पपईच्या पानांचा ज्यूस पिल्याने आणि पपई खाल्याने प्लेटलेट्स चा काउन्ट भराभर वाढतो असे आढळून आले आहे.
काय खावे काय खाऊ नये? (Dengue pathya in Marathi)
डेंग्यूच्या रुग्णास आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते त्यामुळे हलका आणि पाचक आहार हा डेंग्यूच्या रुग्णास लाभदायक आहे.
तेलकट आणि मसालेदार पदार्थ कटाक्षाने टाळावेत कारण त्यामुळे पोटामध्ये गॅस होऊन पचनाची समस्या उद्भवू शकते आणि पोटदुखी तीव्र होऊ शकते.
सर्व प्रकारची फळे, सर्वप्रकारच्या पालेभाज्या, चपाती, भात, सलाड, काकडी, गाजर इत्यादींचे अवश्य सेवन करावे.
तेलकट, मसालेदार, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, पित्त आणि गॅस वाढवणारे पदार्थ यापासून लांब राहावे.
रुग्णाची हालत जर गंभीर झाली तर काय करावे?
प्लेटलेट्स चा काउन्ट जर पन्नास हजाराखाली गेला असेल तर रुग्णास तात्काळ रुग्णालयात दाखल करावे. प्लेटलेट्स काउन्ट जर वीस हजारांच्या खाली गेला तर बाहेरून अतिरिक्त प्लेटलेट्स चढवाव्या लागतात.
कधी कधी रुग्णास श्वास घेण्यास सुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे ऑक्सिजन लावावा लागतो. रुग्णाची अवस्था जर जास्त बिकट असेल तर व्हेंटिलेटर सुद्धा ठेवावे लागते.
रुग्ण जर वयोवृद्ध असेल तर विशेष काळजी घ्यावी लागते. डेंग्यूच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये किंवा अंगावर काढू नये कारण आजार बळावला तर रुग्ण उपचारास प्रतिसाद देत नाही आणि रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.
डेंग्यूपासून वाचण्याचे उपाय काय आहेत? (dengue precautions in marathi)
जस आपण पाहिलं कि हा आजार डासांच्या चावण्यामुळे होते. जर आपण डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केली तर या आजाराला आपण रोखू शकतो. आपल्या आसपास चा परिसर स्वच्छ ठेवावा. पावसाळ्यात पाणी साठण्याच्या जागा, टायर, नारळाचा करवंट्या शोधून त्याची विल्हेवाट लावावी.
घराच्या आसपास छोटे खड्डे असतील तर ते तात्काळ बुजवावे , इमारतीच्या गच्चीवर पाणी साठू देऊ नये, पाण्याचा टाक्यांना झाकण जरून लावावे, कुलर मधील पाणी वेळच्या वेळी बदलावे किंवा औषधें बाजारात उपलब्ध आहेत जी डासांच्या अळ्याना मारतात असे औषध कुलर मधील पाण्यात टाकावे.
शकत्यो झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त असेल तर आपल्या भागातील महानगरपालिकेला कळवावे जेणेकरून धुराची फवारणी करून आपला परिसर मच्छर मुक्त केला जाईल. मच्छर पळवण्यासाठी बाजारात बरीच साधने उपलब्ध आहेत त्याचा सुद्धा वापर आपण करून शकता.
पण जर घरात लहान मुले असतील तर मच्छर अगरबत्ती किंवा तत्सम रासायनिक साधने टाळणे हितकारक ठरेल. शक्यतो अंगभर कपडे घालावेत ज्यामुळे शरीराचा बराच भाग झाकला जाईल. लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. (dengue symptoms in child in marathi)
डेंग्यू हा आजार पूर्णपणे बरा होतो त्यामुळे या आजाराला घाबरून जाऊ नये. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्यवेळी योग्य औषधोपचार केले तर हा आजार लवकर बरा होतो. डेंग्यूची लक्षणे अंगावर काढू नयेत किंवा घरच्या घरी उपचार करत बसू नये कारण असे करणे जीवावर बेतू शकते.
Post a Comment