.

वांगाच्या डागांवर घरगुती उपाय । वांगाचे डाग मी कसे घालवले?। How did I treat my Melasma | Melasma treatment in Marathi

 

Vang Melasma

मित्रानो आपल्या पैकी बऱ्याच जणांमध्ये असा गैरसमज असतो कि वांगाचे  डाग (Melasma meaning in Marathi) हे लवकर जात नाहीत किंवा बऱ्याच वेळा ते अनुवांशिक असतात किंवा थायरॉईड सारख्या विकारांनी हॉर्मोन्स चे संतुलन बिघडून हे डाग चेहऱ्यावर येतात. कारण कोणतेही असो, हे डाग जातात. अगदी १००% टक्के जातात . फक्त सहा महिन्यांसाठी आपण आपली जीवनशैली बदलून वांगाचे  डाग कायमस्वरूपी घालवू शकता आणि बऱ्याच लोकांनी ते घालवलेले सुद्धा आहेत. चला तर पाहूया माझा या बाबतीत काय अनुभव आहे. (Melasma treatment in Marathi)


मी ३८ वर्षांचा पुरुष आहे. मी एका IT  कंपनी मध्ये संगणक अभियंता आहे. माझा वर्ण गोरा आहे. साधारण ७ ते ८ वर्षांपूर्वी माझ्या गालावर आणि डोळ्यांभोवती तपकिरी काळपट रंगाचे डाग दिसू लागले. हळू हळू ते गडद होऊ लागले. हे वांगाचेच डाग आहेत हे मी ओळखले कारण माझ्या आईला सुद्धा असेच डाग २० वर्षांपासून आहेत.(Melasma symptoms in Marathi)


 या डागांमुळे माझ्या दिसण्यात बदल दिसू लागला. बरेच जण मला विचारू लागले कि हे कसले डाग आहेत? माझा आत्मविश्वास कमी होऊ लागला. मी आरशासमोर तासंतास हे डाग न्याहाळत असे. मी इंटरनेटवर यासाठी काही उपाय आहेत का ते शोधू लागलो. मला बरेच उपाय मिळाले. सुरुवातीला मी घरगुती उपाय करून बघितले. 


जसे बेसनपीठ लावणे, जायफळ उगाळून लावणे, दूध आणि हळद लावणे, लिंबाच्या सालीने त्वचा घासणे इत्यादी. बरेच दिवस हे घरगुती उपाय केल्यावर सुद्धा माझे डाग कमी होत न्हवते. या डागांसाठी बाजारात  विविध प्रकारच्या क्रीम उपलब्ध आहेत मी त्या वापरायच्या ठरवले. (Melasma treatment in Marathi)


या क्रीम वापरल्यानंतर माझे डाग निघून जातील असा मला विश्वास होता. मी जवळ जवळ वर्षभर नामांकित कंपनी चे क्रीम वापरले पण वर्षभरानंतर ते कमी होण्याऐवजी अधिकच गडद दिसू लागले. मी या डागांच्या बाबतीत खूपच जास्त काळजीत होतो. बऱ्याच प्रकारच्या उपायांनी सुद्धा डाग कमी होण्याची चिन्हे न्हवती. (Melasma in Marathi)


या डागांसाठी मला बऱ्याच जणांनी बरेच सल्ले दिले आणि मी तसे करून बघितले सुद्धा पण त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी मला एका डॉक्टर मित्राने असे सांगितले कि वांगचे डाग हे शरीरातील हार्मोन्स मध्ये बदल झाल्यामुळे येतात आणि कोणत्याही बाह्य उपचारांनी ते जाणे शक्य नाही. (Melasma causes in Marathi)


मला त्याचे म्हणणे अगदी तंतोतंत पटले कारण हे डाग कमी करण्यासाठी जवळपास सगळे उपाय मी करून बसलो होतो. जेव्हा जेव्हा मी डाग आरशात बघत असे तेव्हा मला खूपच वाईट वाटत असे. हळू हळू ते डाग वाढून माझा जवळपास अर्धा चेहरा त्या डागांनी व्यापला गेला आणि मी आणखीच निराश झालो. 


शेवटी मी या डागांवर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा ठरवले. त्यांनी मला तीन महिन्यांचा गोळ्यांचा कोर्से आणि त्वचेवर लावण्यासाठी काही क्रीम सांगितले. आतातरी डाग जातील असा मला मनोमन विश्वास वाटू लागला आणि अगदी उत्साहाने मी औषधउपचार घेण्यास सुरुवात केली. 


रोज न चुकता मी डॉक्टरांनी दिलेले क्रीम लावत असे आणि गोळ्या पण घेत असे. बघता बघता तीन महिन्यांचा कोर्से पूर्ण सुद्धा झाला पण डागांमध्ये काहीच फरक पडला नाही. डॉक्टरांनी क्रीम बदलू दिले. ते सुद्धा जवळ पास दोन महिने वापरले पण फरक काहीच नाही. तेव्हा मला माझ्या डॉक्टर मित्राचे बोलणे आठवले आणि या डागांवर काहीच उपचार नाही असे मला पण वाटू लागले.


 मी इंटरनेट वाचले होते कि प्लास्टिक सर्जरी करून बऱ्याच हिरो आणि हेरॉईनने असे डाग घालवले आहेत. पण फक्त डागांसाठी एवढा खर्च करणे मला योग्य वाटत न्हवते. शेवटी मी या डागांवर उपाय करणे सोडून दिले. पण मनात या डागांबद्दल खंत होतीच आणि मनोमन असे वाटत सुद्धा होते कि मला यावर नक्कीच उपाय सापडेल.(Vangache dag)


 अधून मधून मी इंटरनेट वर या डागांबद्दल वाचत असे. बऱ्याच लेखांमध्ये असेच दिले होते कि हार्मोन्स मधील बदलामुळे हे डाग येतात आणि लवकर जात नाहीत. हे डाग शक्यतो बाळंतीण स्त्रियांना जास्त येतात कारण गरोदरपणात हॉर्मोन्स मध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात. पण मी तर पुरुष आहे तरीसुद्धा हे डाग मला का? असा विचार मी करत असे. या डागांबद्दल सारखा विचार करून मला स्वप्ने सुद्धा तशीच पडू लागली. 


एक दिवस मी एक फोरम वाचत होतो आणि एका ब्रिटिश महिलेने हे डाग घरच्या घरी घालवल्याचा दावा केला होता. माझी उत्सुकता वाढली आणि मी तो लेख पूर्ण वाचून काढला आणि माझ्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला. 


हे डाग घालवण्यासाठी त्या महिलेने आपल्या जीवनशैलीत बदल केला होता आणि त्यामुळे त्या महिलेचे वांगाचे डाग तर गेलेच पण अनेक छोटे मोठे आजार सुद्धा बरे झाले. या डागांचा संबंध थेट आपल्या पचन संस्थेशी आहे असे हि महिला म्हणते. (Cause of melasma in Marathi)


जर आपण आपली पचनशक्ती सुधारली तर बिघडलेले हॉर्मोन्स चे संतुलन पुन्हा ठीक होण्यास मदत होते आणि त्या मुळे  हे डाग १००% नाहीसे होतात ते हि अवघ्या सहा महिन्यात. त्या नुसार मी तिने  दिलेले उपाय करत गेलो. मी सुद्धा माझी जीवनशैली काही प्रमाणात बदलली आणि काय आश्चर्य! मलासुद्धा तेच अनुभव यायला सुरुवात झाली जे त्या महिलेला आले होते. 


या महिलेचं अनुभवानुसार, हे डाग यायला तेंव्हाच सुरुवात होते जेव्हा आपले वजन वाढू लागते किंबहुना वाढलेले वजन हेच  हॉर्मोन्स च्या स्रावामध्ये बाधा निर्माण करतात आणि त्याचे संतुलन बिघडते. त्यामुळे वजन कमी करणे हे खूपच महत्वाचे आहे. 


आपले वजन जर आपल्या उंचीच्या प्रमाणात ठेवले तर आपल्या बऱ्याच समस्या कमी होतात आणि याचा पुरेपूर अनुभव मी घेतला आहे. ज्या वेळी मी हा लेख वाचला  तेव्हा माझे वजन ८० किलोच्या आसपास होते. जे माझ्या उंचीनुसार बरेच जास्त होते. माझ्या उंची नुसार ते ६५ किलोपर्यंत असायला पाहिजे होते. 


मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्या महिलेच्या सांगण्यानुसार फक्त वजन कमी करून नाही तर योग्य पद्धतीने वजन कमी केल्यामुळे हे डाग नाहीसे होतात. तिच्या सांगण्यानुसार ज्यांनी ज्यांनी हा उपाय केला त्यांचे सुद्धा वांगाचे  डाग कायम स्वरूपी नाहीसे झाले. चला तर मग हे काय उपाय आहेत लगेच बघूया.


१. चालण्याचा व्यायाम - सकाळी उठल्यानंतर मी एक तास चालण्याचा व्यायाम सुरु केला आहे तो चप्पल न घालता . हा व्यायाम मी रोज न चुकता करतो. अनवाणी चालण्यामुळे पायाच्या तळव्यामधील बरेच पॉईंट्स दाबले जातात ज्यामुळे सुद्धा हॉर्मोन्स चे बिघडलेले संतुलन ठीक होण्यास मदत होते. चालण्यामुळे वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते तसेच दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा मिळते. आळस नाहीसा होतो आणि माणूस चपळ होतो. 


२. लिंबूपाणी - मी सकाळचा चहा बंद करून त्याऐवजी लिंबू पाणी घेण्याची सवय लावून घेतली आहे. एक ग्लास गरम पाण्यात अर्धे लिंबू पिळून मी ते चहा पिल्यासारखे घोट घोट पितो अर्थात यात साखर अजिबात नसते. लिंबूपाण्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत तसेच अतिरिक्त चरबी सुद्धा वितळते. सकाळी उपाशीपोटी लिंबूपाणी घेतल्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती मिळते. 


३. दुपारचा आहार - तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण वजन वाढण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे आपण खातो ते धान्य. त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि सर्व प्रकारच्या धान्यांचा समावेश होतो. त्यामध्ये गहू आणि तांदूळ हे वजन वाढवण्यास सर्वात जास्त कारणीभूत आहेत. आणि वाढलेले वजन हे बऱ्याच रोगांना आमंत्रण देणार ठरते म्हणून मी आहारातून गहू आणि तांदूळ हद्दपार केलाय. रोज दुपारी मी फक्त ज्वारीची किंवा भाजरीची भाकरी खातो कारण ज्वारी किंवा बाजरी मध्ये गव्हापेक्षा कमी कॅलरी असतात. बेकरी मधील पदार्थ, पॅकेट मधील पदार्थ, बिस्किटे आणि सर्व प्रकारचे गोड पदार्थ मी पूर्णपणे वर्ज केले आहेत. 


४. पाणी - सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. मी थंड पाणी पिण्याचे सोडून दिले आहे आहे त्याऐवजी मी गरम पाणी पितो. जेंव्हा जेंव्हा तहान लागते तेव्हा मी फक्त गरम पाणी पितो. गरम पाणी आपली पचनक्रिया सुधारण्यात महत्वाची भूमीका बजावते. खासकरून जेवण झाल्यानंतर अवश्य गरम पाणी प्यावे त्यामुळे अन्न सहज पचण्यास मदत होते. मला असणारा पित्ताचा त्रास गरम पाण्यामुळे पूर्णपणे नाहीसा झाला. बऱ्याच जणांचे थायरॉईड चे प्रॉब्लेम सुद्धा गरम पाण्यामुळे कायमस्वरूपी बरे झाले आहेत. माझी पचनशक्ती खूपच मजबूत झाली आहे जे मला प्रकर्षाने जाणवते. 


५. रात्रीचा आहार - अजून एक महत्वाची पण थोडीशी कठीण गोष्ट म्हणजे रात्रीच्या जेवण्यात बदल. मी रात्री फक्त भिजवलेल्या डाळी , मोड आलेली कच्ची मटकी, कच्चा कोबी, काकडी, गाजर आणि त्या जोडीला एखादे फळ खातो. सुरुवातीला कठीण जाते पण नंतर सवय होते. या मुळे  तुमची पचनसंस्था पूर्णपणे साफ आणि स्वच्छ होण्यास मदत होते जे हॉर्मोन्स च्या संतुलनात महत्वाची भूमिका बजावते. वरील पदार्थामधून भरपूर प्रोटीन मिळते पण कॅलरी कमी मिळत असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. फळे आणि गाजरापासून शरीराची व्हिटॅमिन्स ची गरज पूर्ण होते. 


६. आवळा जूस - तुम्ही घरच्या घरी ताज्या आवळ्याचा जूस बनवू शकता आणि ते शक्य नसेल तर बाजारातून मिळणारा तयार ज्यूस सुद्धा आणि शकता. जेंव्हा जेंव्हा तुम्ही गरम पाणी प्याल, त्यामध्ये हा ज्यूस घालून पिऊ शकता. आवळ्याचे बरेच फायदे आहेत. आवळ्यामुळे बऱ्याच प्रकारचे त्वचारोग बरे होण्यास मदत होते. डोळ्यांची टाकत वाढते. केसांसाठी तर आवळा अमृतासमान आहे. त्याने केसांचे आयुष्य वाढते आणि लवकर टक्कल सुद्धा पडत नाही. त्यामुळे आवळा पिण्याची सवय लावून घ्या. मी एक महिन्यात २ लिटर आवळा ज्यूस फस्त  करतो. 


वरील उपायांनी माझे वांगाचे  डाग १००% गेले आहेत. बरेच जण मला डाग कसे काय गेले हे आश्चर्याने विचारत  आहेत . मला आधी वाटायचे कि वांगाचे डाग हे अनुवांशिक असतात आणि ते जात नाहीत पण मी ते यशस्वी पद्धतीने घालवलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी वरील उपाय केले त्यांचे सुद्धा डाग जवळपास गेले आहेत आणि ते सुद्धा अवघ्या ६ महिन्यात. 

वांगाचे  डाग घालवण्यासाठी बाह्यउपचारांवर अजिबात वेळ आणि पैसे वाया घालवू नका फक्त वजन कमी करा आणि आपली पचनसंस्था वरील उपायांनी मजबूत करा आणि गोड पदार्थ हे पूर्णपणे वर्ज करा फक्त सहा महिन्यांसाठी . हे उपाय जर केले तर वांगाचे डाग जायला वेळ लागत नाही. 

२ -३ महिन्याच आपल्याला जाणवायला लागते कि डागांचा रंग हळू हळू फिका होत आहे. वांगाचे डाग घालवण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे जो मी स्वतः अनुभवलेला आहे. कृपया हा अनुभव आपल्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करा आणि त्यांना सुद्धा मदत करा. 


या संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते कंमेंट विभाग नक्की विचार. मला त्यांची उत्तरे द्यायला नक्की आवडेल. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post