मांडूळ आणि गुप्तधन: हा साप एक कोटी रुपयांना का विकला जातो?
वर्तमानपत्रात आज काल आपण बऱ्याच वेळा वाचतो कि मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणार्यांना पोलिसांनी पकडले. जगभरात सापाच्या एवढ्या प्रजाती असताना फक्त मांडुळाचीच तस्करी का केली जाते? काय आहे या मागचं रहस्य? का आहे या सापाची किंमत कोट्यवधी मध्ये?
या सापाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असण्याची बरीच कारणे आहेत. यामधील बहुतांश कारणे हि अंधश्रद्धेशी निगडित आहेत. हि अंधश्रद्धा फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही तर युरोप आणि अमेरिका सारख्या प्रगत देशांमधून सुद्धा या सापाला मोठी मागणी आहे.
आता बऱ्याच जणांना पडणारा प्रश्न असेल कि जर अमेरिका आणि आणि युरोप मध्ये जर साप पाळायला सरकारची परवानगी मिळते तर ते या सापाची उत्पत्ती का करत नाहीत? आणि या मागचं कारण म्हणजे या देशातील थंड हवामान. मांडूळ जातीचा साप हा उष्णकटिबंधात आढळतो त्यामुळे थंड हवामानात तो तग धरू शकत नाही आणि जरी जगलाचं तरी त्याची फारशी वाढ होत नाही.
जगभरातून मागणी असलेल्या या सापाची किंमत कमीत कमी तीन किलो किंवा त्याहून जास्त असावी लागते तरच त्याला कोट्यवधींची किंमत मिळते. प्रत्येक मांडूळ साप हा तीन किलोपर्यंत वाढत नाही. तीन किलोपर्यंत वाढणारे मांडूळ हे खूपच दुर्मिळ असतात. भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या देशांमधील हवामान मांडूळ या सापाला खूपच पोषक आहे त्यामुळे ३ किलोपर्यंत वाढणारा मांडूळ फक्त याच देशात सापडतो आणि त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. भारतामध्ये हा साप आढळण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. (Mandul place)
या सापाबद्दल जनसामान्यांमध्ये बरेच गैरसमज आहेत. बऱ्याच जणांना वाटते कि या सापाला दोन तोंडे असतात. तो सहा महिने एक बाजूचे तोंड वापरतो आणि सहा महिने दुसऱ्या बाजूचे तोंड वापरतो. पण खरे सांगायचे तर या सापाला एकाच तोंड असते. त्याचा शेपटीकडील भाग हा त्याचा तोंडाच्याच जाडीचा असल्याने बऱ्याच जणांना मांडुळाला दोन तोंडे असल्याचा भास होतो. तसेच तो चालताना सुद्धा एकाच दिशेने चालतो. मांडूळ या सापाला इंग्लिश मध्ये sand boa म्हणतात तर हिंदी मध्ये याला दो मुहा साप म्हणतात. (Mandul in English | Mandul in Hindi). मांडूळ तस्करांमध्ये हा साप डबल इंजिन म्हणून प्रसिद्ध आहे. (Mandul Double engine)
मांडुळासाठी लोक कोट्यवधी रुपये मोजायला का तयार होतात? (Mandul snake price | Mandul Snake cost)
खालील अंधश्रेद्धेमुळे मांडूळ या सापाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मोठी मागणी आहे.
१. पैशांचा पाऊस - कमीत कमी ३ किलोपर्यंत वाढलेल्या मांडुळावर जर तांत्रिक प्रयोग केले तर पैशांचा पाऊस पडतो अशी समजूत आहे. मध्यंतरी भारतीय अर्थव्यस्थेमध्ये झालेला खोट्या नोटांचा शिरकाव हि त्याचीच प्रचिती आहे असे बऱ्याच जणांना वाटते. जर हि तांत्रिक विद्या यशस्वी झाली तर मोजता येणार नाहीत एवढे पैसे मिळतात त्यामुळे धनाढ्य लोक भरपूर पैसे कमावण्याचा लालसेपोटी या मांडुळासाठी कोट्यवधी रुपये मोजायला तयार होतात. असे तंत्र मंत्र करणारे बाबा आणि बुवा याना या अंधश्रेद्धेमुळे चांगले दिवस आले आहेत. हे विधी शक्यतो पौर्णिमा किंवा अमावसेच्या रात्री केले जातात. हे विधी मानवी वस्तीपासून दूर असलेल्या घरांमध्ये किंवा फार्महाउस वर केले जातात कारण या विधी साठी मोठमोठ्याने मंत्रांचा जाप करावा लागतो. विधी पूर्ण झाल्यानंतर मांडुळाचा बळी दिला जातो. शिरच्छेद केल्यानंतर सुद्धा हा साप बराच वेळ जिवंत राहतो. तो जोपर्यंत जिवंत असतो तो पर्यंत पैशांचा पाऊस पडतो अशी समजूत आहे. तीन किलोपेक्षा कमी वजन असलेला मांडूळ शिरच्छेद केल्यानंतर जास्त काळ जगू शकत नाही म्हणून त्याने जास्त वेळ जगावे आणि जास्तीत जास्त पैशांचा पाऊस पडावा या साठी ३ किलो वजनाच्या मांडुळाला मागणी आहे.
२. सोने बनवण्यासाठी वापर - पूर्ण वाढ झालेल्या मांडूळ या सापाच्या शरीरात एक प्रकारचे रसायन सापडते. या रसायनांमध्ये जर आणखी काही रसायने मिसळली तर त्या पासून शुद्ध सोन्याची निर्मिती केली जाऊ शकते असा काही जणांचा दावा आहे. हा खूपच गुप्त असा फॉर्मुला आहे. मांडूळाच्या शरीरात मिळणाऱ्या रसायनांमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या जंगली वनस्पतींचा रस आणि विशिष्ट प्रकारची माती मिसळली जाते. हि माती वाळवंटी प्रदेशात आढळून येते. हे मिश्रण बऱ्याच वेळ पर्यंत गरम केले जाते. मांडुळाचा आकार जेवढा मोठा तेवढेच त्यापासून मिळणाऱ्या सोन्याचे प्रमाण जास्त. या सोन्याच्या हव्यासापोटी मांडुळाची तस्करी केली जाते.
३. अदृश्य होण्यासाठी वापर - मांडूळाच्या शरीरातील हाडे हि या विद्येसाठी वापरली जातात. मंत्रांच्या साहाय्याने ती सिद्ध केली जातात. अशी सिद्ध झालेली हाडे जर कोणी हारा प्रमाणे गळ्यात घातली तर तो माणूस अदृश्य होतो असा समज आहे. अनेक महाकठीण तांत्रिक विद्यांपैकी हि एक विद्या आहे. ती सिद्ध होण्यासाठी कमीत कमी ५ वर्षांचा अवधी लागतो. या कालावधी मध्ये विशिष्ट मंत्रांचे कोट्यवधी जाप होणे आवश्यक असते. याचे नियम खूपच काठीन आहेत. पूर्वीच्या काळी बरेच जण या विद्येमध्ये पारंगत होते. पण जसा जसा काळ बदलला तसा तसा हि विद्या जाणणारा माणूस मिळणे दुरापास्त झाले आहे.
४. यौव्वन शक्ती वाढविण्यासाठी - पाश्च्यात्य देशांमध्ये मांडूळापासून एक प्रकारचे औषध बनवले जाते जे आपली मर्दानी शक्ती कितीतरी पटीने वाढवते. या औषधामुळे अगदी सत्तर वर्षाचा मनुष्य सुद्धा पंचवीस वर्षांच्या तरुणांप्रमाणे समागम करू शकतो. युरोप, अमेरिका सारख्या देशामधे बरेच वृद्ध एकटे राहतात. त्यांच्याकडे आयुष्यभर कमावलेली अफाट संपत्ती असते. यौन संबंध ठेवण्याच्या लालसेपोटी ते या औषंधाना मागेल ती किंमत देण्यास तयार असतात. अशा प्रकारचे औषध बनवण्यात चीन हा अग्रेसर आहे. त्याच प्रमाणे युरोप आणि अमेरिके मध्ये सुद्धा मांडूळापासून असे औषध बनवले जाते. भारतामध्ये या सापाच्या तस्करीवर बंदी असली तरी चोरून जहाजावाटे याची तस्करी चालते कारण चांगल्या गुणवत्तेचा मांडूळ हा फक्त भारतातच आढळतो.
५. एड्स वरील औषध - मांडूळाच्या शरीरामध्ये मिळणाऱ्या काही रसायनांमुळे एड्स नावाचा आजार बरा होतो अशी एक अंधश्रद्धा आहे. ज्यांना हा आजार झाला आहे ते या मांडुळासाठी बरेच पैसे मोजयला तयार असतात. मांडूळाच्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे रसायन काढले जाते आणि त्याचे औषध बनवले जाते. या औषधाने एड्स सारखा महाभयंकर आजार कायमस्वरूपी बरा होतो असा समाज आहे. एड्स च्या रुग्णाला हा साप खाण्यास सुद्धा दिला जातो. जगभरात बरेच जण मांडुळामुळे एड्स बरा झाल्याचा दावा करतात. या मध्ये जर सत्यता असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून या वर संशोधन होणे गरजेचे आहे.
६. चिरतरुण राहण्याच रहस्य - हा साप खाल्याने सर्व आजार तर बरे होतातच, पण त्याच बरोबर वाढत्या वयाचे शरीरावर होणारे परिणाम सुद्धा थोपवले जातात असा एक समज आहे . मनुष्यास चिरतरुण ठेवण्याचा मांडूळाच्या या गुणामुळे श्रीमंत महिलावर्गातून यास मोठी मागणी आहे. जगभर बऱ्याच देशांमध्ये सापाचे सेवन केले जाते पण मांडूळामध्ये आढळणारे गुणधर्म इतर सापांमध्ये आढळत नाहीत. मुस्लिम राष्ट्रांमध्ये साप खाणे हे धर्माच्या विरुद्ध मानले जाते.
७. अलौकिक शक्ती - या सापावर तंत्र मंत्राचा प्रयोग करून जर त्यास खाल्ले तर अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात अशी एक अंधश्रद्धा आहे त्यामुळे प्रयोग करून बघण्याच्या हेतूने बरेच धनाढ्य लोक या सापाला खरेदी करण्यास तयार असतात.
८. गुप्तधन मिळवण्यासाठी - धनाची देवता कुबेराचा दूत म्हणून या सापाकडे पहिले जाते. भारतामध्ये या सापाचे दर्शन सुद्धा शुभ मानले जाते. हा साप पूर्वजांनी लपवून ठेवलेले गुप्तधन मिळवून देतो अशी समजूत आहे. हा साप जर घरात ठेवला तर तो त्या धनापर्यंत चा मार्ग दाखवतो कारण याला गुप्तधनाचा वास येतो असे म्हणतात. जेथे धन पुरले आहे त्या जागेपर्यंत तो बीळ बनवतो. हे बीळ जर खोदत गेले तर गुप्त धनापर्यंत पोहोचता येते. हे बीळ खोदत असताना जर नाग निघाला तर त्या धनाचे रक्षक नाग आहेत असे समजले जाते आणि हे धन मिळवणे कठीण होऊन जाते. दुसऱ्या तंत्र विद्यांच्या मदतीने नागांना हुसकावून हे गुप्तधन मिळवले जाते.
Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती हि इंटरनेट वरून गोळा करण्यात आली आहे. मराठीwiki कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांचे समर्थन कधीच करत नाही. हा लेख फक्त मनोरंजनासाठी वाचण्यात यावा असा सल्ला आम्ही आपणास देतो. भारतामध्ये मांडुळाची तस्करी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्यासाठी कारावास होऊ शकतो. या लेखाचा जर कोणी गैरवापर केला तर त्यास मराठीWiki जबाबदार नाही.
he khara aahe ka?
ReplyDeletePost a Comment