.

टायफॉईड या आजाराची लक्षणे | Typhoid symptoms in Marathi | Typhoid cause, symptoms, treatment in Marathi | Typhoid meaning in Marathi

 

Typhoid Symptoms in Marathi

 काय आहे टायफॉईड? (What is Typhoid? information in Marathi)

टायफॉईड एक जंतुजन्य आजार आहे जो Salmonella Typhi नामक जिवाणूमुळे होतो. टायफॉईड ला इंटेरिक फिवर असे सुद्धा म्हणतात. या जिवाणूंचा आकार लोखंडी रॉड प्रमाणे दंडगोलाकार असतो. विशेष म्हणजे हा जिवाणू फक्त माणसांमध्येच हानिकारक आहे. इतर प्राणी आणि पक्षी  यांच्या मध्ये तो आढळून येत नाही. 


या जिवाणूंचे  दोन प्रकार आहेत.


१. टायफॉईड - बहुतांश लोकांमध्ये याच प्रकारचा टायफॉईड आढळतो. याची लक्षणे तीव्र असतात. 

२. पॅराटायफॉईड - हा खूपच कमी लोकांमध्ये आढळतो. याची लक्षणे तुलनेने सौम्य असतात. 


शरीरात प्रवेश केल्यानांतर हा जिवाणू मानवी पेशींच्या आतमध्ये राहतो त्यामुळे हा जास्त हानिकारक आहे आणि त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती सुद्धा या जिवाणूविरुद्ध लढण्यास असमर्थ ठरते. सुरुवातीला टायफॉईड चा जिवाणू मानवी आतड्यात राहतो. हा कालावधी साधारण १ ते ३ आठवड्यांपर्यंत असू शकतो नंतर हळू हळू तो रक्तात प्रवेश करतो आणि संपूर्ण शरीरभर पसरतो त्यानंतर टायफॉईड ची लक्षणे जाणवू लागतात.(tified in marathi)


 या आजाराचे नाव टायफॉईड का पडले? (story behind typhoid)

ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये टायफॉईड जिवाणू सर्वप्रथम आढळले त्या व्यक्तीचे नाव टायफॉईड मेरी असे होते म्हणून या आजाराचे नामकरण सुद्धा टायफॉईड असे करण्यात आले (त्या नंतर हे नाव कोणीही ठेवले नसेल हा भाग वेगळा). 


टायफॉईड का होतो? (Cause of Typhoid in Marathi)

टायफॉईड हा आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होतो. टायफॉईड बाधित व्यक्ती च्या मल, मुत्राच्या संपर्कात जर एखादी निरोगी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीस सुद्धा टायफॉईड होण्याची शक्यता असते म्हणून जेवण्या पूर्वी किंवा बाहेरून आल्यावर आपले हात आणि पाय स्वच्छ धुणे गरजेचे आहे. 


अस्वच्छतेमुळे होणार हा आजार आहे त्यामुळे पिण्यासाठी वापरणारे पाणी हे स्वच्छ असल्याची खात्री करून घ्यावी. स्वयंपाकासाठी सुद्धा स्वच्छ पाणी वापरावे. अन्न व्यस्थित शिजवावे म्हणजे या आजारापासून आपण दूर राहू शकाल. शौचावरून आल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. (tified meaning in marathi)


टायफॉईड या आजाराची लक्षणे काय आहेत? (Symptoms of Typhoid in Marathi)

टायफॉईड या आजारात प्रामुख्याने तीव्र ताप येतो. टायफॉईड  चा ताप हा इतर तापांपेक्षा थोडा वेगळा असतो. हा क्रमा क्रमाने वाढत जातो आणि शेवटी अचानक कमी होतो म्हणून त्याला step ladder असेही म्हणतात. हा ताप साधारणतः ३८ ते ४० डिग्री पर्यंत असू शकतो. त्याचप्रमाणे शरीरावर, पोटावर आणि छातीवर लाल चट्टे दिसू लागतात हे सुद्धा या आजाराचे लक्षण आहे. पण सर्वच रुग्णांमध्ये हे चट्टे दिसतीलच असे नाही. टायफॉईड च्या रुग्णांना पोटदुखी आणि जुलाब चालू होतात.(tified symptoms in marathi )


कधी कधी उलट्या देखील होतात. डोकेदुखी हे सुद्धा या आजारामध्ये आढळणारे एक मुख्य लक्षण आहे. या आजारामध्ये भूक लागत नाही आणि बरेच दिवस जर अन्न व्यवस्थित पोटात गेले नाही तर अशक्तपणा येऊ शकतो.  जुलाबावाटे रक्त येणे हे सुद्धा टायफॉईड मध्ये आढळून येणारे एक लक्षण आहे कारण हे जंतू आतड्याला पोखरतात आणि त्यातून रक्तस्त्राव चालू होतो जो जुलाबावाटे बाहेर येतो. हे लक्षण शक्यतो आजार बळावलेल्या रुग्णांमध्येच आढळून येते. (typhoid fever in marathi)


टायफॉईड या रोगाचे निदान कसे केले जाते? (widal test meaning in marathi)

या आजाराचे निदान करण्यासाठी आपल्या शरीरातुन रक्त, लघवी, मल आणि कधी कधी बोन मॅरो (हाडांमधील रक्त) यांचा नमुना घेतला जातो. या नमुन्यांमध्ये जर Salmonella Typhi हा जिवाणू आढळला तर रुग्ण टायफॉईड ग्रस्त आहे असे निदान केले जाते. कधी कधी लक्षणे जाणवत असली तरी या चाचण्या नकारात्मक येऊ शकतात त्यासाठी ठराविक अंतराने चाचण्या करणे गरजेचे असते. या चाचण्यांमध्ये Widal test हि सर्वात जास्त केली जाणारी चाचणी आहे. या व्यतिरिक्त typhidot सारख्या चाचण्या सुद्धा केल्या जातात. 


टायफॉईड चा उपचार कसा केला जातो? (Typhoid treatment in Marathi)

टायफॉईड मध्ये साधारणतः  ciprofloxacin सारख्या प्रतिजैविकांचा वापर केला जातो (ऍन्टीबीओटीक) कारण प्रतिजैविकांमुळे हा आजार लवकर आटोक्यात येतो. जर हा आजार आवाक्याबाहेर गेला आणि मलाद्वारे रक्तस्त्राव होऊ लागला तर डॉक्टर शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात त्याच बरोबर काही उच्च गुणवत्तेची औषधे सुद्धा दिली जातात. 


टायफॉईड च्या रुग्णांनी काय खावे आणि काय टाळावे? (Typhoid pathya)

टायफॉईड च्या रुग्णांनी हलका आणि सात्विक आहार घ्यावा. तेलकट, मसालेदार पदार्थ , मैद्याचे पदार्थ, पॅकिंग फूड, कटाक्षाने टाळावे. उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. साधे जेवण म्हणजेच भात, भाजी, चपाती किंवा भाकरी असे जेवण घ्यावे. त्याच बरोबर फळे सुद्धा खाऊ शकता पण ती स्वच्छ धुवून घ्यावीत.


टायफॉईड पासून स्वतःच संरक्षण कसं  करावं? (How to avoid typhoid in Marathi)

टायफॉईड हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे होणार आजार आहे म्हणून पिण्याचे पाणी हे स्वच्छ असणे गरजेचे आहे. शक्य असल्यास पिण्याच्या पाण्याचा फिल्टर लावावा. जर शक्य नसेल तर उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी आणि स्वैयंपाकासाठी वापरावे. 


फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावात. भाज्या व्यस्थित शिजवाव्यात. 

नदी किंवा ओढ्याजवळ शौचास बसू नये कारण वाहत्या पाण्यामार्फत हा जिवाणू पसरण्याची शक्यता असते. 


बाहेरून आल्यावर आणि जेवणापूर्वी तसेच शौचावरून आल्यावर आपले हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवावेत. बाजारात उघड्यावर मिळणारे पदार्थ खाणे टाळावे.  


टायफॉईड हा  एक सामान्य आजार आहे. योग्य वेळी निदान आणि योग्य उपचारांनी हा आजार पूर्णपणे बरा होता. प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. योग्य काळजी घेतली तर हा आजार आपण टाळू शकता. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post