.

वर्षा उसगावकर यांचा जीवन परिचय | Varsha Usgaonkar wiki Marathi | Varsh Usgaonkar biography in Marathi | Age, education, caste, love affairs, husband, career, sisters, family

वर्षा उसगावकर यांचा जीवनपरिचय| Varsha Usgaonkar biography in Marathi

sample47

वर्षा उसगावकर

अभिनेत्री , 1968 - *

नाव - वर्षा उसगावकर


जन्म दिनांक - २८ फेब्रुवारी १९६८


जन्म स्थान - गोवा , भारत


ओळख -अभिनेत्री


वडिलांचे नाव - A.K.S.उसगावकर


आईचे नाव - उपलब्ध नाही


जीवनसाथी - अजय शर्मा  


मुले - -


निवासस्थान -मुंबई 


शिक्षण - B.Com,गोवा युनिव्हर्सिटी

**

गोरापान वर्ण, घारे डोळे, दिलखेचक अदा आणि मराठी चित्रपट सृष्टीतील काही  देखण्या अभिनेत्रींमध्ये स्थान  मिळविणारी  तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य  करणारी गोव्याची मुलगी म्हणजेच वर्षा उसगावकर. चला तर पाहूया वर्षा उसगावकर यांचा जीवनपट.

वर्षा उसगावकर यांचे सुरुवातीचे जीवन (Varsh Usgaonkar early life)


वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोवा येथे झाला.(Varsha Usgaonkar age) त्यांना उषा,तोषा आणि मनीषा(Manisha Usgaonkar) नावाच्या तीन बहिणी सुद्धा आहेत. (Varsha Usgaonkar family)

गोवा केंद्रशासित प्रदेश असताना त्यांचे वडील हे एक सभापती होते. ते A .K .S उसगावकर या नावाने प्रसिद्ध होते. गोवा सरकार मध्ये मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. घरचं वातावरण राजकारणी असणाऱ्या वर्षाला मात्र चित्रपट सृष्टीची जबरदस्त आवड होती. 

त्यांच्या दूरदूरच्या देखील कोणत्या  नातेवाईकाचा चित्रपटसृष्टीशी काडीचाही संबंध नव्हता. त्यांच्या आजोबांची चित्रपट अभिनेता होण्याची इच्छा होती पण ती अपूर्ण राहिली त्यामुळे वर्षाची आई त्यांना नेहमी म्हणायची की  त्यांची इच्छा तू पूर्ण करत आहेस. लहानपणापासूनच वर्षाने अभिनेत्री होण्याचा चंग बांधला होता. 

वर्षा उसगावकर यांचे शिक्षण (Varsha Usgaonkar Education)


वर्षा ज्या वेळेस दहावी  उत्तीर्ण झाली तेव्हा पुण्यास  जाऊन एक्टिंग कोर्स करण्याचे तिने ठरविले पण तोपर्यंत पुण्यातील बरेचसे एक्टिंग कोर्स बंद झाले होते. तिच्या घरच्यांच्या सल्ल्यामुळे तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचे ठरविले. 

गोवा युनिव्हर्सिटी मधून वर्षा वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. कॉलेजमध्ये असताना देखील ती सतत आपल्या चित्रपटात काम करण्याच्या इच्छां विषयी विचार करत असे. ती बरेच चित्रपट पाहत असे तसेच तिला गाण्याची सुद्धा खूपच आवड होती. तिला नृत्याची सुद्धा आवड असल्यामुळे तिने कथक शिकणे सुरू केले. 

एक अभिनेत्री होण्यासाठी ज्या ज्या  गोष्टी लागतात त्या सर्व तिने आत्मसात करायला सुरुवात केली. 

वर्षा उसगावकर यांचा मराठी नाट्य सृष्टी मध्ये प्रवेश (Entry in Drama)


वर्षाच्या वडिलांचे दामू केंकरे (Damu Kenkre) हे चांगले मित्र होते. दामू केंकरे हे नाटक क्षेत्रातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व. गोवा कला अकादमी ची पूर्ण डिझाईन दामू केंकरे यांनीच केली आहे. तेथे ते डायरेक्टर होते. सध्या ते या जगात नाहीत पण वर्षाचा मराठी नाटकांमध्ये प्रवेश हा त्यांच्या मुळेच शक्य झाला. 

दामू केंकरे यांच्या कृपेनेच वर्षाने पहिले नाटक मिळविले ते "कार्टी प्रेमात पडली". त्यानंतर  वर्षाने आचार्य अत्रे लिखित "ब्रह्मचारी" नावाच्या नाटकात सुद्धा दमदार अभिनय केला. या नाटकातील अभिनयामुळे वर्षा चांगलीच प्रकाश झोतात आली. 

गम्मत जम्मत या चित्रपटाची ऑफर (Gammat Jammat offer)


1987 च्या दरम्यान सचिन पिळगावकर आपल्या गंमत जंमत या चित्रपटासाठी मुख्य नायिकेच्या शोधात होते.  हा चित्रपट हा विनोदी धाटणीचा होता.  त्यामध्ये  सचिन, अशोक सराफ सारखे कसलेले अभिनेते असल्यामुळे त्यांना हीरोइन सुद्धा तितकीच दमदार हवी होती.  

वर्षाचे नाटक पाहून गेलेल्या सचिन पिळगावकर यांचा दोनच दिवसात वर्षाला फोन आला आणि त्यांनी चक्क तिला ऑफर दिली ती "गंमत जंमत" या चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीच्या  भूमिकेची. सुरुवातीला कोणीतरी मस्करी करत असेल असे तिला वाटले पण नंतर खात्री पटल्यानंतर तिने या भूमिकेसाठी आनंदाने होकार दिला. 

गंमत जंमत या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर बरेच रेकॉर्ड मोहित काढले आणि हा चित्रपट सुपर डुपर यशस्वी ठरला. त्यानंतर वर्षाने मागे वळून कधीच पाहिले नाही. तिला एका पेक्षा एक सरस चित्रपट मिळत गेले. हमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब(Saglikade bombabomb),सवत माझी लाडकी, एक होता विदूषक,  लपंडाव,अफलातून  हि तिच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे. 

आतापर्यंत 60 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सुदैवाने तिला मिळालेले बरेच चित्रपट हे  नायिकाप्रधान होते आणि त्यांनी तिच्या यशस्वी  कारकिर्दीची घडी बसवली. दुनियादारी या चित्रपटांमध्ये वर्षा उसगावकर यांनी साकारलेले राणीमा यांची भूमिका ही विशेष दाद मिळवून गेली. 

वर्षाने मराठी चित्रपटात अनेक अभिनेत्यांसोबत जरी भूमिका केल्या असल्या तरी तिची जोडी जमली होती ती फक्त अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतच.

वर्षाचा हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश (Varsha's entry in Hindi films)


वर्षाने मराठीबरोबरच हिंदी चित्रपटात सुद्धा काम  केलं आहे. 1993 साली प्रदर्शित झालेल्या इंसानियत के देवता या चित्रपटांमधून  वर्षाने आपल्या हिंदी चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.  

त्यानंतर तिने बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले ज्यामध्ये घर आया मेरा परदेसी, पथरीला रास्ता यां सारख्या चित्रपटांचा उल्लेख करता येईल.सन 2005 मध्ये मंगल पांडे या चित्रपटांमधून सुद्धा ती झळकली होती. 

 जिज्ञासा चित्रपटांमध्ये तिने आईची भूमिका सुद्धा केली होती. तसेच काही हिंदी चित्रपटांमध्ये सह नायिकेची भूमिका सुद्धा निभावली आहे. हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये ती वंडर गर्ल या नावाने  ओळखली जायची. हनिमून या चित्रपटांमध्ये प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर  यांच्याबरोबर त्यांनी साकारलेली भूमिका ही विशेष लक्षवेधी ठरली होती. 

वर्षाची छोट्या पडद्या वरील कामगिरी (Varsha Usgaonkar as a TV actress)


मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही तिने लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. सन 1988 मध्ये तुफान गाजलेल्या महाभारत या मालिकेत अभिमन्यू ची पत्नी  उत्तरा ही भूमिका त्यांनी चांगली  साकारली होती. या भूमिकेमुळे वर्षाला बऱ्याच हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या. 

पण वर्षाचे बरेच  हिंदी चित्रपट हे बॉक्स ऑफिस वर फारशी कमाई करू शकले नाहीत. 1994  मध्ये आलेल्या चंद्रकांता मालिकेमध्ये वर्षाने रुपमती ही भूमिका केली होती. त्यानंतर अलविदा डार्लिंग, तनहा , आणि अनहोनी   या मालिकांमध्ये सुद्धा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली होती. 

वर्षाची सर्वात गाजलेली टीव्ही मालिका होती 1999 मध्ये सुरू झालेली झाशीची राणी. दूरदर्शन वरील या मालिकेमध्ये वर्षाने झाशीच्या  राणीची  मुख्य भूमिका साकारली होती. ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती आणि छोट्या पडद्यावर वर्षा चा प्रभाव वाढू लागला.  

मूळच्या कोकणी असलेल्या वर्षा उसगावकर यांचा "रुपम तुझे  लता पिकसेम"  हा कोकणी गाण्यांचा अल्बम सुद्धा प्रसिद्ध आहे. "सुख म्हणजे काय असतं" या मालिकेतून त्यांनी नुकतेच  छोट्या पडद्यावर पुनर्पदार्पण केले आहे. 

वर्षा उसगावकर यांचा विवाह (Varsha Usgaonkar marriage)


वर्षा उसगावकर यांचा विवाह मुंबई येथे 5 मार्च 2000 रोजी अजय शर्मा(Ajay Shankar Varsha Usgaonkar) यांच्यासोबत झाला आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे ते सुपुत्र आहेत. बऱ्याच पार्ट्यांमध्ये हे दोघे जोडीने दिसून येतात.(Varsha Usgaonkar Husband) वर्षा उसगावकर याना मुले आहेत किंवा नाही याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. (Varsha Usgaonkar kids)

वर्ष उसगावकर यांचे उत्पन्न (Varsha Usgaonkar's networth)


वर्षा उसगावकर यांचा गोव्यात खूप मोठा बंगला आहे तसेच सरासरी दोन ते तीन कोटी रुपये त्यांचे उत्पन्न आहे. 
मुंबई मध्ये सुद्धा त्यांचे घर आहे. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post