.

कमोडिटी ट्रेडिंग ची संपूर्ण माहिती मराठीत | Complete information of commodity trading in Marathi

कमोडिटी म्हणजे काय?

What is commodity?

कमोडिटी चा साधा सोपा अर्थ आहे आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू. अशा वस्तूंपैकी काही वस्तूंचे कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग केले जाते.

कमोडीटी चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

1 . ॲग्री कमोडिटी - शेती माला विषयी संबंधित कमोडिटी
2 . नोन अग्री कमोडिटी - शेती मालाशी संबंधित नसणाऱ्या कमोडिटी.

कमोडिटी मार्केटमध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या कमोडिटी चे ट्रेडिंग केले जाते.

1 . ॲग्री कमोडिटीज (Agri Commodities) - कापूस, इलायची, काळी मिरी, सोयाबीन, साखर, एरंड, मका,बार्ली इत्यादी. 2 . बेस मेटल्स - झिंक, कोपर, ॲल्युमिनियम, लेड, निकेल.
3 . मौल्यवान धातू - सोने, चांदी
4 . एनर्जी - क्रूड ऑइल, नॅचरल गॅस

कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे?

How to trade in commodity

कमोडिटी ट्रेडिंग हे इक्विटी ट्रेडिंग पेक्षा वेगळी असते. कमोडिटी ट्रेडिंग चा एक्सचेंज सुद्धा वेगळा असतो. ज्याप्रमाणे इक्विटी ट्रेडिंग हे NSE किंवा BSE वर केले जाते त्याचप्रमाणे कमोडिटी ट्रेडिंग हे MCX (Multi Commodity Exchange) वर केले जाते.

कमोडिटी ट्रेडिंग साठी आपल्याला कमोडिटी अकाउंट ची गरज भासते. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या ब्रोकर कडून आपण कमोडिटी अकाउंट ओपन करू शकता.

कमोडिटी अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला खालील कागदपत्रांची आवश्यकता असते

1 . आधार कार्ड
2 . पॅन कार्ड
3 . मागील तीन महिन्यांच्या सॅलरी स्लिप किंवा
4 . सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट
5 . KYC
या कागदपत्रांची पूर्तता केल्यास आपल्या ब्रोकर कडून आपली ऑनलाईन केवायसी केली जाते. यामध्ये आपली सही असलेला कागद आपल्याला कॅमेरा पुढे दाखवायचा असतो. केवायसी पूर्ण झाल्यानंतर साधारणतः एक ते दोन दिवसांमध्ये आपले कमोडिटी अकाउंट ओपन केले जाते. अकाउंट ओपन झाल्यानंतर आपल्या बँक अकाउंट मधून कमोडिटी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करणे गरजेचे असते त्यानंतर आपण ट्रेडिंग करू शकता.

कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी ब्रोकर कडून आपल्याला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. जर आपण टेक्निकल ऍनालिसिस वापरत असाल तर चार्ट चा वापर करून आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे आपण खरेदी किंवा विक्री करू शकता.

कमोडिटी मध्ये आप अकाउंट ओपन करण्यासाठी वेगवेगळ्या ब्रोकर कडून वेगवेगळे चार्जेस आकारले जातात यामध्ये वार्षिक AMC चार्जेस सुद्धा लावले जातात या सर्वांची माहिती ब्रोकरच्या वेबसाईटवर आपल्याला मिळू शकते.

कमोडिटी मध्ये कसे ट्रेडिंग केले जाते?

How to trade in commodity?

कमोडिटी हा फ्युचर ट्रेडिंग चा एक प्रकार आहे त्यामुळे कमोडिटी मध्ये लॉट मध्ये ट्रेडिंग केले जाते. वेगवेगळ्या कमोडीटी साठी वेगवेगळी लॉट साइज असते. लॉट साइज नुसार कमोडिटी चे मायक्रो आणि मिनी असे उपप्रकार पाडले जातात.

उदाहरणार्थ ॲल्युमिनियम हा रेगुलर कमोडिटी चा प्रकार आहे पण मिनी ॲल्युमिनियम चा उपप्रकार आहे ज्यामध्ये मिनी लॉटमध्ये ट्रेडिंग केले जाते त्याच प्रमाणे सिल्वर हा रेगुलर कमोडिटी चा प्रकार आहे पण सिल्वर मायक्रा हा सिल्वर चा उपप्रकार आहे ज्यामध्ये मायक्रो लॉट मध्ये ट्रेडिंग केले जाते.

कमोडिटी ट्रेडिंग साठी दोन एक्सचेंज उपलब्ध आहेत ज्यामध्ये पहिला आहे MCX जो जास्त लोकप्रिय आहे आणि दुसरा आहे NCDEX.

कमोडिटी ट्रेडिंग हा फ्यूचर आणि ऑप्शन ट्रेडिंग एक प्रकार असल्यामुळे यामध्ये आपल्याला लॉटमध्ये खरेदी किंवा विक्री करावी लागते. तसेच यामध्ये आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकता अथवा आपली खरेदीची किंवा विक्री ची पोझिशन ओव्हर नाइट होल्ड सुद्धा करू शकता.

कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करताना ब्रोकर कडून आपल्याला मार्जिन सुद्धा दिले जाते. वेगवेगळे ब्रोकर हे वेगवेगळ्या प्रमाणात मार्जिन देतात. पण सरासरी दहा पट मार्जिन हे ब्रोकर कडून दिले जाते.

कमोडिटी मार्केट हे सकाळी 9:00 वाजता ओपन होते आणि रात्री 11:30 वाजता बंद होते. यामध्ये सर्व नॉन एग्री कमोडिटी चे व्यवहार केले जाऊ शकतात. अग्री कमोडिटीचे व्यवहार सकाळी 9:00 ते 5:00 या वेळेत केले जातात.

कमोडिटी चे व्यवहार हे संपूर्ण जगा मधून केले जात असल्यामुळे हे मार्केट इक्विटी मार्केट पेक्षा मोठे आहे आणि ज्याप्रमाणे इक्विटी मार्केटमध्ये मनिपुलेशन चालते त्याप्रमाणे कमोडिटी मार्केटमध्ये ते शक्य नाही.

आपण जर कमोडिटी ट्रेडिंग मध्ये नवीन असाल तर आपल्याला मायक्रो लॉट पासून ट्रेडिंग सुरू करण्याचा सल्ला देण्यात येतो आणि जसजसे आपला अनुभव वाढत जातो त्याप्रमाणे आपण मेगा लॉट वर शिफ्ट होऊ शकता.

कमोडीटी मध्ये एक रुपयांची वाढ झाली तर किती फायदा आणि नुकसान होते?


 

Commodity trading profit loss chart

वेगवेगळ्या कमोडीटी मध्ये लॉट साइज नुसार एक रुपयांची वाढ किंवा घट झाली तर खालील प्रमाणे फायदा किंवा नुकसान होऊ शकते.

वरील उदाहरणात क्रूड ऑइल ची लॉट साइज 100 आहे म्हणजेच क्रूड ऑइल मध्ये एक रुपयाची वाढ झाली तर आपल्याला शंभर रुपयांचा फायदा होतो किंवा एक रुपयांची घट झाली तर शंभर रुपयांचे नुकसान होते.

नॅचरल गॅस ची लोट साइज 1250 आहे म्हणजेच नॅचरल गॅस मध्ये एक रुपयाची वाढ झाली तर आपल्याला 1250 रुपये फायदा होतो.

सिल्वर मध्ये तीन लोट साइज दिलेल्या आहेत त्यानुसार,

सिल्वर ची लॉट साइज 30 आहे म्हणजेच सिल्वर जर एक रुपयांनी वाढला तर आपल्याला 30 रुपयांचा फायदा होतो.

सिल्वर मिनीची लॉट साइज 5 आहे म्हणजेच सिल्वर मध्ये जर एक रुपयांची वाढ झाली तर सिल्वर मिनी मध्ये आपल्याला पाच रुपयांचा फायदा होतो.

त्याच प्रमाणे, सिल्वर मायक्रा ची लॉट साइज एक आहे म्हणजेच सिल्वर मध्ये एक रुपयांची वाढ झाल्यानंतर आपल्याला 1 रुपये प्रॉफिट होतो.

थोडक्यात काय तर, कमोडिटी मध्ये एक रुपयांची वाढ झाल्यानंतर जेवढी त्या कमोडिटी ची लॉट साइज असेल तेवढा आपल्याला फायदा होतो किंवा एक रुपयांची घट झाल्यानंतर जेवढी त्या कमोडिटी ची लॉट साइज असेल तेवढे नुकसान होते.

MCX इन्व्हेंटरी म्हणजे काय?

What is inventory in MCX?

इन्व्हेंटरी म्हणजे साठवून ठेवण्याची क्षमता. प्रत्येक कमोडिटी ही वस्तू असल्यामुळे तिची साठवणुकीची क्षमता असते. या क्षमतेची संबंधित जो डेटा जाहीर केला जातो त्यालाच MCX इन्व्हेंटरी डेटा असे म्हटले जाते.

या आकड्यांचा वापर करून कोणत्याही कमोडिटी च्या किमतीमध्ये नजीकच्या भविष्यात वाढ होणार आहे किंवा घट याचा अंदाज बांधला जातो.

काही इन्व्हेंटरी चे आकडे हे रोज जाहीर होत असतात तर काही इन्व्हेंटरी चे आकडे हे आठवड्यातून एकदा जाहीर होत असतात.

जसे की काही धातु यांच्या इन्व्हेंटरी चे आकडे रोजच्या रोज जाहीर होतात पण क्रुड ओईल च्या इन्व्हेंटरी चे आकडे आठवड्यातून एकदा बुधवारी जाहीर होतात. ज्यावेळी इन्व्हेंटरी जाहीर होते त्यावेळी त्या कमोडिटी मध्ये जबरदस्त चढ किंवा उतार पाहायला मिळतो. बरेच ट्रेडर्स हे फक्त इन्व्हेंटरी च्या आकड्यांनुसार ट्रेड करत असतात.

कोणताहि व्यापार हात डिमांड आणि सप्लाय वर अवलंबून असतो. डिमांड म्हणजे मागणी आणि सप्लाय म्हणजे पुरवठा. ज्यावेळी एखाद्या वस्तूचे उत्पन्न जास्त होते आणि त्यानुसार त्याला तेवढी मागणी नसते त्यावेळी त्या वस्तूच्या किंमती कमी होतात याउलट ज्या वस्तूचे उत्पादन कमी होते पण त्या वस्तूला खूप मागणी असते त्यावेळी त्या वस्तूची किंमत वाढते. इन्व्हेंटरी चे पण काहीसे असेच आहे.

येथे आपण क्रूड ऑईलचे उदाहरण पाहूया.
जर क्रूड ऑईलची साठवणूक क्षमता जर 100 मानलि, आणि इन्व्हेंटरीच्या आकडेवारी नुसार त्यामध्ये दहाची वाढ झाली म्हणजेच साठवणूक क्षमता 110 झाली. याचा अर्थ पुरवठा वाढला पण मागणीमध्ये वाढ झाली नाही त्यामुळे क्रूड ऑइल च्या किमती खाली येणार हे निश्चित.

याच उलट, जर इन्व्हेंटरी डेटा 90 आला म्हणजेच क्रूड ऑइल चा पुरवठा कमी झालेला आहे पण त्या तुलनेत मागणी कमी झालेली नाही त्यामुळे क्रुड ऑईल चे भाव वाढणार हे नक्की.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post