.

फॉरेक्स ट्रेडिंग ची संपूर्ण माहिती मराठीत | Complete information of forex trading in Marathi

फॉरेक्स म्हणजे काय?

Complete information of forex trading in Marathi


फॉरेक्स चा अर्थ होतो फॉरेन एक्सचेंज.

वेग वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या करन्सी ( चलन) असतात. उदाहरणार्थ, अमेरिकेची करन्सी आहे USD, त्याच प्रमाणे ऑस्ट्रेलियाची करन्सी आहे ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच AUD तसेच भारताची करन्सी आहे INR.

प्रत्येक देशाच्या करन्सीचा भाव हा त्या देशाच्या इकॉनोमी वर अवलंबून असतो म्हणजेच जगातील बाकीच्या देशांच्या तुलनेत तो देश किती प्रगत आहे त्यानुसार हा भाव ठरत असतो.

पण हा भाव कायमस्वरूपी सारखा नसतो त्यामध्ये चढ-उतार होत असतात. उदाहरणार्थ, जर आपण USD आणि AUD या दोन करन्सी चा विचार केला तर जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये एखादी चांगली घटना घडते किंवा त्या देशाची अर्थव्यवस्था सुधारते त्या त्या वेळी ऑस्ट्रेलियन डॉलरचा भाव हा USD पेक्षा वधारतो तसेच अमेरिकेमध्ये जर एखादी वाईट घटना घडली तर USD चा भाव AUD च्या तुलनेत खाली जातो.

फॉरेक्स मध्ये करन्सी मधील हे चढ उतार ट्रेड करून नफा कमावला जातो. फॉरेक्स मार्केट हे संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त ट्रेड केले जाणारे मार्केट आहे.

फोरेक्स मध्ये एका करन्सी ची दुसऱ्या करन्सी शी तुलना केली जात असल्यामुळे आणि त्यातील तफावत ट्रेड केली जात असल्यामुळे फोरेक्स ट्रेडिंग हे नेहमी पेअर मध्ये चालते जसे की USD-AUD, AUD-JPY, EUR-USD इत्यादी.

फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करण्याचे कोणकोणते फायदे आहेत?


फॉरेस्ट मध्ये आपण दोन प्लॅटफॉर्मवर ट्रेड करू शकता यापैकी एक म्हणजे आपला भारतीय ब्रोकर आपल्याला उपलब्ध करून देत असणारा करन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म. यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी खूपच मर्यादा आहेत आणि करन्सी पेअर्स सुद्धा मर्यादित आहेत त्याशिवाय हे मार्केट 5:30 ला बंद होते आणि त्यामध्ये लिक्विडिटी चा अभाव असतो.

दुसरा प्लॅटफॉर्म म्हणजे आंतरराष्ट्रीय फोरेक्स ब्रोकर चा प्लॅटफॉर्म. असे बरेच फोरेक्स ब्रोकर आहेत ज्यांच्याकडे आपण अकाउंट ओपन करून जगातील सर्व करन्सी पेअर्स मध्ये ट्रेडिंग करू शकता. या आर्टिकल मध्ये आपण आंतरराष्ट्रीय फोरेक्स ब्रोकर आणि त्याचे फायदे याविषयी चर्चा करणार आहोत.

1 . फोरेक्स मध्ये आपण 24तास ट्रेड करू शकता कारण हे मार्केट चोवीस तास आणि आठवड्याचे पाच दिवस चालते. आपण जर नवीन ट्रेडर असाल आणि आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजी टेस्ट करायच्या असतील तर फोरेक्स इतके चांगले ऑप्शन दुसरे नाही.

2 . फोरेक्स ब्रोकर कडे अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला डेमो अकाउंट आणि लाइव अकाउंट असे दोन प्रकारचे अकाउंट मिळतात. डेमो अकाउंट चा उपयोग आपल्या स्ट्रेटेजी टेस्ट करण्यासाठी आणि प्रॅक्टिस साठी केला जातो आणि जेव्हा आपल्याला मार्केट बद्दल पुरेसा आत्मविश्वास येतो तेव्हा आपण लाईव्ह अकाउंटचा वापर करून ट्रेडिंग करू शकता.

3. जर आपण प्रोफेशनल ट्रेडर्स असाल तर आपण आपल्या सोयीनुसार कधीही फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेड करून जास्तीत जास्त नफा मिळवू शकता. भारतीय मार्केटमध्ये ट्रेड करण्याला वेळेचे बंधन आहे पण फॉरेक्स मार्केट हे 24 तास ओपन असल्यामुळे आपण कधीही ट्रेड करून पैसे कमवू शकता.

4 . भारतीय मार्केटमध्ये ट्रेड करताना आपला ब्रोकर आपल्याकडून भरमसाठ ब्रोकरेज घेत असतो त्या व्यतिरिक्त आपल्याला STT किंवा असे आणखी काही प्रकारचे टॅक्स द्यावे लागतात. आपल्याला डिमॅट अकाउंट ची वार्षिक AMC सुद्धा द्यावे लागते त्याशिवाय आणखी बरेच हिडन चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. पण फॉरेक्स मध्ये ट्रेड करताना आपल्याला फक्त एक स्प्रेड द्यावा लागतो त्या व्यतिरिक्त कोणतेही चार्जेस आपल्याला द्यावे लागत नाहीत.

5 . इंडियन मार्केट मध्ये आपल्याला इंट्राडे वर जास्तीत जास्त मार्जिन हे 20 ते 30 पट मिळते पण हेच मार्जिन फोरेक्स ट्रेडिंग मध्ये 500 पट मिळते.

6. भारतीय इक्विटी मार्केटमध्ये आपण आपली सेल पोझिशन ओव्हर नाइट होल्ड करू शकत नाही पण फॉरेक्स मार्केटमध्ये आपण आपली सेल पोझिशन ओल्ड करू शकता.

7 . इक्विटी मध्ये काही ऑपरेटर्स एकत्र येऊन काही स्टॉक मध्ये म्यानिप्युलेशन करू शकतात म्हणजे स्ट्रोक च्या किमती कृत्रिमरित्या वाढवून रिटेल इन्वेस्टर ला आपल्याच जाळ्यात ओढू शकतात. फॉरेक्स मार्केट ची व्याप्ती ही खूप मोठी असल्यामुळे अशा गैरप्रकारांना वाव नसतो.

8 . फॉरेक्स मार्केट हे जगभरातून ट्रेड केले जात असल्यामुळे त्यामध्ये लिक्विडिटी चांगली असते.

9. फोरेक्स ट्रेडिंग चे प्लॅटफॉर्म हे खूपच ॲडव्हान्स आणि बऱ्याच पर्यायांनी युक्त असतात.

10 . फोरेक्स ब्रोकर कडे अकाउंट ओपन करणे हे तुलनेने खूपच सोपे असते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे फिजिकल डॉक्युमेंट मागितले जात नाही.

11. फॉरेस्ट मध्ये कॉपी ट्रेडिंग नावाचा एक प्रकार असतो म्हणजेच जो ट्रेडर फॉरेक्स मार्केटमध्ये चांगली कमाई करत आहे आपण त्याचे ट्रेड ऑटोमॅटिकली कॉपी करू शकता त्यासाठी आपल्याला फक्त थोडेसे कमिशन द्यावे लागते. ही सुविधा भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध नाही.

स्प्रेड म्हणजे काय?


जर आपण भारतीय स्टॉक मार्केट मध्ये ट्रेड केले तर आपल्याला ब्रोकरेज आणि इतर टॅक्स द्यावे लागतात पण फोरेक्स ट्रेडिंग मध्ये असे नाही. येथे ब्रोकरेज ऐवजी आपल्याला स्प्रेड द्यावा लागतो जी फोरेक्स ब्रोकर ची मुख्य कमाई असते.

फोरेक्स ब्रोकरने निर्धारित केलेला सेल रेट आणि बायर खरेदी करत असलेला रेट यांच्यामधील फरकाला स्प्रेड असे म्हटले जाते.

म्हणजेच ज्यावेळी आपण एखादा करन्सी पेअर खरेदी किंवा विक्री करतो तेव्हा तो आपल्याला निर्धारित किमतीपेक्षा थोड्या जास्त किमतीने खरेदी करावा लागतो या किमतीमधील फरकाला स्प्रेड असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या करन्सी पेअर ची किंमत 100 चालू आहे पण ज्यावेळी आपण खरेदी करतो त्यावेळी आपली ऑर्डर 105 एक्झिक्युट होते म्हणजेच आपल्याला पाच रुपयांचा स्प्रेड द्यावा लागतो.

प्रत्येक करन्सी पेयर चा स्प्रेड हा सारखा नसतो. करन्सी पेयर नुसार तो बदलत असतो. काही करन्सी पेअर मधला स्प्रेड हा खूप जास्त असतो ज्याला वाइडर स्प्रेड असे म्हणतात तर काही मधला खूप कमी असतो याला न्यारो स्प्रेड असे म्हणतात. हे आपण कोणत्या वेळी ट्रेड करत आहात यावरसुद्धा अवलंबून असते.

PIP म्हणजे काय?


ज्याप्रमाणे आपण पाहिले की वेगवेगळ्या करन्सी ची नावे वेगवेगळी असतात उदाहरणार्थ अमेरिकन करन्सी चे नाव USD आहे तर भारतीय करन्सी चे नाव INR असे आहे.

यांच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. जसे आपल्याला माहितीच आहे, कि करन्सी ही नेहमी जोडीने म्हणजेच पेअर मध्ये ट्रेड केली जाते. अशावेळी जर करन्सी वाढली तर हे सांगणे अवघड होते की करन्सी एका सेंट ने वाढली किंवा सात रुपयांनी वाढली.

यावर उपाय म्हणून जागतिक स्तरावर प्रत्येक करन्सी पेअर साठी एक युनिट बनवले गेले आहे ज्याला PIP असे म्हटले जाते. 1 PIP म्हणजे साधारणतः कोणत्याही करन्सी पेयर च्या चौथ्या डेसिमल पॉईंट मध्ये झालेली वाढ.

उदाहरणार्थ, GBP/USD नावाचा एक करन्सी पेअर आहे जो $1.35361 वरून $1.35371 वर गेला म्हणजेच चौथ्या डेसिमल पॉईंटच्या घरात एक ची वाढ झाली म्हणजेच हा करन्सी पेअर एक PIP ने वाढला असे आपण म्हणतो.

फॉरेक्स मार्केट कसे काम करते?


स्टॉक आणि कमोडिटी सारखे फॉरेक्स मार्केट हे एक्सचेंज वर काम करत नाही त्याऐवजी दोन पार्टीमध्ये डायरेक्ट व्यवहार होतो त्याला ओव्हर द काउंटर (OTC) असे म्हटले जाते.

फॉरेक्स मार्केट हे बँकांच्या जागतिक नेटवर्क वरून नियंत्रित केले जाते म्हणजेच फॉरेक्स मार्केट हे जगातील चार मुख्य ठिकाणांवरून नियंत्रित केले जाते ती चार ठिकाणे खालील प्रमाणे आहेत.

लंडन, न्यूयार्क, सिडनी, आणि टोकियो. या सर्व ठिकाणांचे टाईम झोन हे वेगवेगळे आहेत. म्हणजेच जेव्हा एखाद्या ऑपरेटरची वेळे संपते तेव्हा दुसऱ्या ऑपरेटरची वेळ सुरू होते म्हणूनच करन्सी मार्केट हे 24 तास ओपन असते. ओव्हर लॅप पिरेड मध्ये, म्हणजेच जेव्हा दोन्ही ऑपरेटर्स काही काळासाठी ओपन असतात तेव्हा या मध्ये जास्त लिक्विडिटी पाहायला मिळते.



फोरेक्स अकाउंट उघडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?


फोरेक्स अकाउंट ओपन करण्यासाठी आपल्याला फोरेक्स ब्रोकर ची गरज पडते. मार्केटमध्ये असे बरेचसे ब्रोकर आहेत ज्यांच्या मार्फत आपण फोरेक्स अकाउंट ओपन करू शकता.

पण आजकाल मार्केटमध्ये बरेचसे ब्रोकर हे फ्रॉड ब्रोकर आहेत ज्यांच्याकडे अकाउंट ओपन केले तर आपल्याला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो म्हणून फोरेक्स ब्रोकर निवडताना आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे. फोरेक्स ब्रोकर निवडताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा हे खाली देण्यात आलेले आहे.

1 . नामांकित ब्रोकर - फोरेक्स ब्रोकर कडे अकाउंट ओपन करताना तो जुना आणि भरवशाचा असला पाहिजे. जे जुने ब्रोकर आहेत त्यांनी मार्केटमध्ये आपले एक रेपुटेशन तयार केलेले आहे त्यामुळे शक्यतो हे ब्रोकर्स फ्रॉड नसतात आणि आपण त्यांच्याकडे अकाउंट ओपन करू शकतो त्याच प्रमाणे ते NFA आणि CFTC मेंबर असणे गरजेचे आहे.

2 . अकाउंट सुविधा - आपला फोरेक्स ब्रोकर इतर ब्रोकरच्या तुलनेत कोणत्या सुविधा देत आहे ते पाहणे महत्त्वाचे ठरते. काही ब्रोकर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बोनस सारख्या सुविधा देतात तर काही ब्रोकर्स हे भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुद्धा संधी देतात.

3 . कमिशन आणि स्प्रेड - प्रत्येक ब्रोकर चा स्प्रेड चा भाव हा वेगवेगळा असतो त्याचप्रमाणे काही ब्रोकर्स कमिशन सुद्धा घेतात. आपण जर मार्केट मध्ये नवीन असाल तर आपल्याला असा ब्रोकर निवडणे गरजेचे असते जो कमिशन घेत नाही आणि ज्याचे स्प्रेड चे भाव सुद्धा खूप कमी असतात. उदाहरणार्थ, XM, OctaFX इत्यादी.

4 . सुरुवातीचे डिपॉझिट - आपण जर नवीन ट्रेडर असाल तर आपण निश्चितच मार्केटमध्ये जास्त पैसे गुंतवणार नाही. सुरुवातीला जेवढे कमी पैसे गुंतवाल तेवढे आपल्यासाठी चांगले. प्रत्येक ब्रोकरणे आपण आपल्या अकाउंट मध्ये एकाच वेळी कमीत कमी किती रक्कम टाकली पाहिजे हे ठरवलेले असते. त्यापैकी जो ब्रोकर आपल्याला कमीत कमी रक्कम टाकण्याची परवानगी देईल असा ब्रोकर निवडणे गरजेचे ठरते. काही अकाउंट मध्ये आपण कमीत कमी पाच डॉलर एवढी रक्कम सुद्धा करू शकता तर काही अकाउंटमध्ये कमीत कमी पाच शे डॉलर भरणे गरजेचे असते.

5. पैसे भरण्याची आणि काढण्याची प्रोसिजर - ज्या प्रमाणे आपण आपल्या अकाउंट मध्ये पैसे टाकतो त्याच प्रमाणे ते काढून घेण्याची प्रोसिजर सुद्धा सोपी हवी. जर पैसे काढण्याची प्रोसिजर अत्यंत किचकट असेल तर तो ब्रोकर टाळलेला बरा.

6 . करन्सी पेअर - जो ब्रोकर आपल्याला जास्तीत जास्त करन्सी पेअर ऑफर करत असेल अशा ब्रोकरकडे अकाउंट काढणे हिताचे ठरते.

7. ट्रेडिंग प्लॅटफॉर्म - ट्रेडिंग प्लॅटफॉर्म हे वापरण्यास सुटसुटीत आणि सोयीस्कर हवेत शक्यतो वेब आणि डेस्कटॉप असे दोन्ही प्लॅटफॉर्म असतील तर उत्तम.

8 . कस्टमर सर्विस - फोरेक्स ट्रेडिंग मध्ये जर आपल्याला कुठलीही अडचण आली तर आपल्याला आपल्याबरोबर शी संपर्क साधून ती अडचण सोडवून घेण्याची गरज पडते अशावेळी आपला ब्रोकर आपल्याला किती तत्परतेने प्रतिसाद देतो हे महत्त्वाचे ठरते त्यामुळे ज्या ब्रोकर ची कस्टमर सर्व्हिस चांगली आहे अशा ब्रोकरकडे अकाउंट उघडणे फायद्याचे ठरते.



लॉट म्हणजे काय?


फॉरेक्स हे एका ठराविक अमाऊंट मध्ये ट्रेड केले जाते त्याला लॉट असे म्हणतात. म्हणजेच लॉट हे एक युनिट आहे ज्यामध्ये आपण केलेले व्यवहार मोजले जातात.

उदाहरणार्थ ज्यावेळी आपण अंडी खरेदी करता त्यावेळी आपण ती डझन मध्ये खरेदी करता म्हणजेच जर आपण बारा अंडी घेतली तर आपण एक डझन अंडी खरेदी केली असे म्हटले जाते त्याच प्रमाणे फोरेक्स मध्ये ठराविक कॉन्टिटी च्या ट्रेडला लॉट असे म्हणतात. करन्सी पेअर हे नेहमी लोट मध्ये ट्रेड केले जातात.

प्रत्येक लॉटची विभागणी ही त्या लॉटमध्ये किती युनिट ट्रेड केले जातात यानुसार ठरवली जाते.

स्टॅंडर्ड लॉटमध्ये 100000 युनिट ट्रेड केले जातात.
मिनी लॉटमध्ये 10000 युनिट ट्रेड केले जातात.
मायक्रो लॉटमध्ये 1000 युनिट ट्रेड केले जातात.
नॅनो लॉटमध्ये 100 युनिट ट्रेड केले जातात.

सर्वच ब्रोकर मायक्रो आणि नॅनो लॉटमध्ये ट्रेड करण्यास परवानगी देत नाहीत. आपण जर फोरेक्स ट्रेडिंग मध्ये नवीन असाल असाल तर जो ब्रोकर जेवढ्या कमी लॉटमध्ये ट्रेड करू देत असेल तेवढा तो ब्रोकर आपल्यासाठी चांगला.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post