.

इंट्राडे ट्रेडिंग ची संपूर्ण माहिती मराठीत | Complete information of intraday trading in Marathi

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय?

Intraday trading information in Marathi

स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक ट्रेड करण्याचे बरेच प्रकार आहेत जसे की स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग इत्यादी. आज आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ते पाहणार आहोत.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे आज खरेदी केलेला स्टॉक आजच विकणे. हा व्यवहार आपल्याला एका निर्धारित वेळेत करणे बंधनकारक आहे. म्हणजेच इंट्राडे इक्विटी मध्ये आपण जर 9:15 नंतर एखादा स्टॉक घेतला तर आपल्याला तो त्याच दिवशी 3:15 पर्यंत विकावा लागतो. जर आपण खरेदी केलेला स्टॉक 3:15 पर्यंत वाढला तर आपल्याला त्यामध्ये फायदा होतो पण हाच स्टॉक जर कमी झाला तर आपल्याला त्यामध्ये नुकसान होते.

इंट्राडे मध्ये जास्त किमतीला स्टॉक आधी जीविकून नंतर तो कमी किमतीला खरेदी करता येतो . पण हा व्यवहार सुद्धा 3:15 पर्यंत पूर्ण करावा लागतो. याला शॉर्ट सेलींग असे म्हटले जाते.

या प्रकारात आपण ब्रोकर कडून स्टॉक उधार घेतो आणि ते विकतो आणि त्याच दिवशी ते परत खरेदी करून ते ब्रोकरला देतो. स्टॉक जर आपण ठरवलेल्या दिशेने गेला तर विक्री आणि खरेदी यामधील अंतर हा आपला नफा असतो.

इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला फक्त एका ट्रेडिंग अकाउंट ची गरज असते. कारण यामध्ये आपण पोझिशन होल्ड करत नाही म्हणून यामध्ये डिमॅट अकाउंट ची गरज नसते. पण इंट्राडे पोझिशन जर आपण डिलिव्हरी मध्ये कन्व्हर्ट केली तर मात्र घेतलेले स्टॉक ठेवण्याकरिता आपल्याला डिमॅट अकाउंट ची गरज भासते.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये शक्यतो 1% ते 2% एवढेच प्रॉफिट टार्गेट केले जाते पण यामध्ये कॉन्टिटी खूप जास्त असते त्यामुळे जर मार्केट आपण ठरविलेल्या दिशेने गेले तर जास्त नफा होण्याची शक्यता असते.

उदाहरणार्थ, एखाद्या शेअरची प्राईज100 रुपये आहे. आणि आपण असे दहा शेअर इंट्राडे ट्रेडिंग साठी खरेदी केले म्हणजे त्यासाठी आपल्याला एकूण 1000 रुपये मोजावे लागतील. जर शेअरची किंमत 102 रुपये झाली तर आपल्याला 10X2 म्हणजेच 20 रुपयांचा फायदा होईल. यामध्ये आपण 2% चा फायदा झाला असे म्हणू शकतो म्हणजेच आता आपल्याकडे 1020 रुपये असतील. पण ही रक्कम म्हणजे पूर्ण नफा नव्हे कारण या रकमेवर आपल्याला ब्रोकरेज आणि गव्हर्मेंट टॅक्स द्यावा लागतो.

त्याचप्रमाणे, जर एखादा शेअर खाली जाईल असे आपल्याला वाटत असेल तर आपण त्याला इंट्रा डे साठी आधी विकू शकता आणि नंतर खरेदी सुद्धा करू शकता.

उदाहरणार्थ, एखाद्या शेअरची प्राईज 100 रुपये आहे आणि आपण असे 10 शेअर्स इंट्राडे मध्ये शॉर्ट सेलींग केले म्हणजे यासाठी आपल्याला 1000 रुपये मोजावे लागतील. जर शेअरची किंमत कमी होऊन 98 रुपये झाली तर आपण तो शेअर 98 रुपयांना खरेदी करून त्यामधून दोन रुपये प्रॉफिट कमावू शकतो. यामध्ये आपण आपल्याकडे नसलेले शेअर्स ब्रोकर कडून उधार घेतो ज्याची प्राईज 100 रुपये होती पण ज्यावेळी आपण ते ब्रोकरला परत देतो त्यावेळी आपण ते 98 रुपयांमध्ये खरेदी करून परत देतो तोम्हणजे या किमती मधला फरक हा आपला नफा असतो. अशाप्रकारे इंट्राडे मध्ये शॉर्ट सेलींग करून सुद्धा पैसे कमावता येतात.

जर माझ्या अकाऊंट मध्ये फक्त एक हजार रुपये असतील तर मी एक हजार रुपयांचे शेअर्स खरेदी करून त्यातून फक्त वीस रुपये प्रॉफिट मिळवितो. पण जर माझ्या अकाऊंट मध्ये जास्त पैसे असतील तर माझा प्रॉफिट हा किती तरी पटीने वाढतो. आपल्या अकाउंट मध्ये जर एक हजार रुपये असतील तर आपला ब्रोकर आपल्याला वीस हजार रुपये किंमतीचे शेअर्स म्हणजे आपल्या अकाउंट मध्ये असलेल्या रकमेच्या 20 पट रकमेचे शेअर्स खरेदी करण्याची परवानगी देतो. हे वरचे पैसे आपण ब्रोकर कडून उधार घेतो यालाच मार्जिन किंवा लिव्हरेज असे म्हटले जाते.

म्हणजे मी जर एक हजार रुपयांवर वीस रुपयांचा नफा कमवत असेल तर वीस हजार रुपयांवर मी चारशे रुपयांचा नफा कमवू शकतो आणि या अतिरिक्त रकमेवर ब्रोकर कडून कोणतेही व्याज लावले जात नाही.

अट फक्त एकच असते की आपण ही रक्कम मार्केट बंद होण्याआधी ब्रोकरला परत करणे गरजेचे असते. जरी आपण मार्केट बंद होताना आपली पोझिशन एक्झिट करायला विसरला तरी तुमच्या वतीने ब्रोकर ती पोझिशन एक्झिट करून आपले पैसे काढून घेतो. अशा पद्धतीने अकाउंट मध्ये फक्त एक हजार रुपये असताना सुद्धा ब्रोकर च्या मदतीने मी इंट्राडे मध्ये चारशे रुपये कमवू शकतो.

प्रत्येक ब्रोकर चे मार्जिन हे वेगवेगळे असते. काही ब्रोकर हे दहापट मार्जिन देतात तर काही ब्रोकर्स हे 30 पट सुद्धा मार्जिन देतात.

इंट्राडे ट्रेडिंग कसे केले जाते?


इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याकडे व्यवस्थित अशी एक ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे ट्रेडिंग स्ट्रॅटेजी नसेल आणि आपण मार्केटमध्ये अंधाधुंद ट्रेडिंग करत असाल तर इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही.

एका आकडेवारीनुसार जगामध्ये फक्त पाच टक्के लोक इंट्राडे ट्रेडिंग मधून नफा कमावतात बाकीचे 95 टक्के लोक हे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये नुकसान करतात. यामागे काय काय कारणे आहेत ते आपण पुढे पाहणार आहोतच.

इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी टेक्निकल चार्ट चा उपयोग केला जातो. टेक्निकल चार्ट मध्ये तयार होणाऱ्या कैंडल स्टिक पॅटर्न प्रमाणे किंवा चार्ट पॅटर्न प्रमाणे एक स्ट्रॅटजी तयार केली जाते. कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न म्हणजे चार्ट मध्ये तयार होणारे काही विशिष्ट आकार.

हे आकार तयार झाले की मार्केट वर किंवा खाली जाते. जर चार्टवर तयार होणाऱ्या एखाद्या आकारानंतर मार्केट वर गेले तर त्याला बुलिश पॅटर्न असे म्हटले जाते तर एखादा आकार तयार झाल्यानंतर जर मार्केट खाली गेले तर त्याला बियरिष पॅटर्न म्हटले जाते.

ज्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होते, त्याच प्रमाणे चार्टवर भुतकाळात तयार झालेले कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न हे वर्तमानात सुद्धा दिसून येतात.

जर एखाद्या पॅटर्न नंतर भूतकाळात मार्केट वर किंवा खाली गेले असेल तर त्या पॅटर्न नंतर वर्तमानात सुद्धा मार्केट त्याच दिशेने जाण्याची शक्यता असते कारण बरेच ट्रेडर्स आणि इन्वेस्टर असे पॅटर्न तयार होण्याची वाट पाहत असतात आणि जेव्हा जेव्हा हे पॅटर्न तयार होतात त्यानुसार ट्रेड घेतला जातो म्हणजेच असे पॅटन तयार झाल्यानंतर खरेदी किंवा विक्रीचा दबाव वाढून मार्केट वर किंवा खाली जाते.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाईम फ्रेम. इंट्राडे ट्रेडिंग चा कालावधी हा मर्यादित असतो त्यामुळे इंट्राडे मध्ये ट्रेडिंग करताना आपल्याला कमी टाईम फ्रेम मध्ये ट्रेडिंग करावे लागते. सामान्यपणे इंट्राडे मध्ये एक मिनिट ते तीस मिनिटां पर्यंत चा टाईम फ्रेम लावला जातो.

जर आपल्याला एक यशस्वी इंट्राडे ट्रेडर व्हायचे असेल तर आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजणे महत्त्वाचे आहे कारण मार्केट जर अपट्रेन्ड मध्ये असेल आणि आपण जर शॉर्ट सेल केले तर आपल्या नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

मार्केटचा ट्रेंड जाणून घेण्यासाठी काही इंडिकेटर्स चा किंवा ट्रेंड लाईन चा वापर केला जातो. यामध्ये मुविंग ऍव्हरेज हे आपल्याला मार्केटचा ट्रेंड जाण्यासाठी मदत करतात. मुविंग ऍव्हरेज मुळे एखाद्या स्टॉक चा ट्रेंड शॉर्ट टर्म, मेडियम टर्म किंवा लॉंग टर्म मध्ये काय आहे हे समजण्यास मदत होते.

उदाहरणार्थ जर आपण 9चा मुविंग ऍव्हरेज लावला तर तो आपल्याला मागच्या नऊ कॅण्डल चा अवरेज लाईन च्या स्वरूपात देतो. यावरून शॉर्ट टर्म मधील मार्केटचा ट्रेंड समजण्यास मदत होते. त्याच प्रमाणे 50चा मुविंग ऍव्हरेज आपल्याला मेडियम टर्म तर 200 चा मुविंग ऍव्हरेज आपल्याला लॉन्ग टर्म ट्रेंड जाण्यासाठी मदत करतात.

जर मार्केटचा ट्रेंड आपल्या लक्षात आला तर कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न वापरून आपण त्यामध्ये बाय किंवा सेल एन्ट्री घेऊ शकता. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टॉप लॉस.

स्टॉप लॉस लावल्याशिवाय इंट्राडे ट्रेडिंग कधीच करू नये. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये स्टॉक ची हालचाल खूपच जलद गतीने होत असते त्यामुळे जर आपण ठरवलेल्या दिशे विरुद्ध मार्केट गेले तर आपल्याला मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी स्टॉप लॉस लावणे गरजेचे आहे.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये साधारणपणे 1% ते 2% एवढेच प्रॉफिट टार्गेट केले जाते पण यामध्ये कॉन्टिटी ही जास्त असते त्यामुळे जर मार्केट आपल्या ठरवलेल्या दिशेने केले तर आपल्याला चांगला प्रॉफिट होण्याची शक्यता असते.

इंट्राडे मध्ये आपल्याला आपल्या ब्रोकर कडून मार्जिन सुद्धा मिळते. जर आपल्या अकाऊंटमध्ये एक लाख रुपये असतील तर आपण 20 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता हे आपण मागच्या लेखांमध्ये पाहिलेच आहे.

इंट्राडे ट्रेडिंग ही कोणत्याही मार्केट प्रकारात केली जाते म्हणजे इक्विटी, कमोडिटी, फ्युचर, ऑप्शन, करन्सी इत्यादी.

जर आपण एक बिगिनर असाल म्हणजेच जर आपण नुकतीच ट्रेडिंग ला सुरुवात केली असेल तर इंट्राडे ट्रेडिंग करू नये कारण यामध्ये इतर ट्रेडिंगच्या तुलनेत रिस्क जास्त असते. त्याऐवजी आपण स्विंग ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग पासून सुरुवात करावी आणि जसजसा मार्केटचा अनुभव येईल तसे इंट्राडे ट्रेडिंग कडे वळावे.

आपण प्रॅक्टिस साठी अगदी कमी कॉन्टिटी मध्ये इंट्राडे ट्रेडिंग करू शकता आणि आपला आत्मविश्वास वाढल्यानंतर आपण हळूहळू कॉन्टिटी वाढवू शकता.

इंट्राडे ट्रेडिंग साठी स्टॉक कसे निवडावे?


इंट्राडे ट्रेडिंग साठी स्टॉक निवडताना आपल्याला एक दिवस आधीच तयारी करावी लागते. यामध्ये जे स्टॉक स्ट्रॉंग अपट्रेन्ड किंवा डाउन ट्रेंड मध्ये आहेत असेच स्टॉक निवडावे लागतात.

इंट्रा डे साठी स्टॉक निवडताना तो व्होलाटाइल असणे गरजेचे असते म्हणजे त्यामधून आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकेल.

इंट्रा डे साठी स्टॉक निवडण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत पण त्यातील काही मोजक्या पद्धती आपण पाहणार आहोत.

1. व्हॅल्यू स्टॉक - व्हॅल्यू स्टॉक हे असे स्टॉक असतात ज्यांचे वोल्युम हे त्यांच्या किमतीच्या प्रमाणात वाढत असते. म्हणजेच जर स्टॉक ची किंमत वाढली किंवा वा कमी झाली तर वोल्युम सुद्धा वाढते. इंट्राडे ट्रेडर्स ची सर्वात पहिली पसंती ही व्हॅल्यू स्टॉकला असते.

व्हॅल्यू स्टोक काढण्यासाठी आपल्याला NSE India च्या खालील वेबसाईटवर जावे लागेल

https://www.nseindia.com/market-data/pre-open-market-cm-and-emerge-market

यामध्ये आठव्या नंबरचा कॉलम हा व्हॅल्यू चा कॉलम आहे. त्यावर क्लिक करून आपण हाय व्हॅल्यू स्टॉक इंट्रा डे साठी निवडू शकता. यामध्ये ज्याची व्हॅल्यू सर्वात जास्त तेच 10 स्टॉक इंट्रा डे साठी निवडावेत.

2.स्टॉक इन न्यूज - म्हणजे ज्या स्टॉक शी संबंधित काहीतरी चांगली किंवा वाईट न्यूज आहे असे स्टॉक आपण आपल्या लिस्टमध्ये सामाविष्ट करू शकता. जे स्टॉक न्यूज मध्ये आहेत ते जास्त व्होलाटाइल असतात आणि न्यूज नुसार ते कोणत्यातरी एकाच दिशेने जाण्याची शक्यता असते. म्हणजे न्यू जर चांगली असेल तर तो स्टॉक वरच जातो याउलट न्यूज जर वाईट असेल तर तो स्टॉक खाली येतो त्यामुळे यामध्ये चांगला प्रॉफिट कमावला जाऊ शकतो.

3. डेली कॅन्डल स्टिक किंवा चार्ट पॅटर्न - या प्रकारात डेली टाईम फ्रेम वर जर एखादा कॅन्डल स्टिक पॅटर्न तयार झाला असेल किंवा चार्ट पॅटर्न वर एखादा ब्रेक आऊट झालेला असेल तर असे स्टॉक दुसऱ्या दिवशी इंट्राडे मध्ये ट्रेड करण्यासाठी वापरले जातात.

उदाहरणार्थ, डेली टाईम फ्रेम मध्ये जर एखाद्या स्टॉक मध्ये बुलिश एंगलफिन्ग नावाचा पॅटर्न तयार झाला असेल तर दुसऱ्या दिवशी तो स्टॉक आपण इंट्राडे मध्ये खरेदी करण्यासाठी वापरू शकतो.

त्याच प्रमाणे जर एखाद्या स्टॉक ने ब्रेक आउट दिलेला असेल तर तोही स्टॉक आपण आपल्या लिस्टमध्ये समाविष्ट करू शकतो.

4.Open = high आणि open=low स्टॉक - ज्या स्टॉक मध्ये काहीतरी चांगली किंवा वाईट बातमी असते असे स्टॉक Open = high किंवा open=low असतात. म्हणजे जेथे ते ओपन होतात तेथूनच वर किंवा खाली जाऊ लागतात.

अशा प्रकारचे स्टॉक इंट्राडे मध्ये ट्रेड करण्यासाठी उत्तम मानले जातात. यासाठी मार्केट ओपन झाल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे वाट पाहणे गरजेचे आहे.

आणि जे स्टॉक तीस मिनिटानंतर सुद्धा Open = high किंवा open=low असतील त्या स्टॉक चा इंट्रा डे साठी विचार करावा.

असे स्टॉक मिळविण्यासाठी मोबाईल वर सुद्धा बऱ्याच प्रकारचे स्कॅनर उपलब्ध आहेत जसे की hi low scanner. याचा वापर करून आपण इंट्रा डे साठी चांगले स्टॉक निवडू शकता.

इंट्राडे ट्रेडिंग चे फायदे आणि तोटे कोणते?


सर्वात प्रथम आपण इंट्राडे ट्रेडिंग चे फायदे याविषयी जाणून घेऊया.

1. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याकडे जरी कमी रक्कम असेल तरीसुद्धा आपण ब्रोकर ने दिलेले मार्जिन वापरून जास्त रकमेचे ट्रेड करू शकता. यामध्ये ब्रोकर चे मार्जिन वापरल्याबद्दल आपल्याला कोणत्याही प्रकारची व्याज देण्याची गरज नाही.

2. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण रोजच्या रोज अमर्याद प्रॉफिट कमवू शकता. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण स्टॉप लॉस वापरत असल्याने आपले नुकसान हे कमीत कमी होते पण प्रॉफिट हे चांगले होते.

3. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला दिवसभर मार्केट पहात बसण्याची गरज नाही. सुरुवातीच्या एक ते दोन तासांमध्येच आपण आपले प्रॉफिट घेऊन बाहेर पडू शकता आणि राहिलेला वेळ इतर कामांसाठी वापरू शकता.

4. इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला आपला सध्याचा जॉब सोडण्याची गरज नाही कारण इंट्राडे ट्रेडिंग आपण पार्ट टाईम सुद्धा करू शकता.

5. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आज खरेदी केलेले स्टॉक आजच विकणे बंधनकारक असल्यामुळे आपले पैसे अडकून राहण्याची भीती नसते. तेच पैसे आपण दुसऱ्या दिवशी ट्रेडिंगसाठी वापरू शकता.

6. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे टेक्निकल चार्ट आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न शिकण्याची सुवर्णसंधी. असे बरेच पॅटर्न इंट्राडे मध्ये तयार होतात आणि त्यातील योग्य पॅटर्न निवडण्याचा कालांतराने आपल्या नजरेला सराव होतो.

7. इंट्राडे ट्रेडिंग केल्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची शिस्तबद्धता आणि संयम येतो.

आता इंट्राडे ट्रेडिंग चे तोटे जाणून घेऊया.

1. इंट्राडे ट्रेडिंग हे अडिक्टिव्ह असते म्हणजेच त्याचे व्यसन लागू शकते. ज्यांना असे व्यसन लागले आहे त्यांना ज्या दिवशी मार्केटला सुट्टी असते त्यादिवशी अजिबात चैन पडत नाही.

2. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जर आपले अंदाज चुकले तर आपल्याला मोठा लॉस होऊ शकतो.

3. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या नादात आपण ओव्हर ट्रेडिंग करतो त्यामुळे आपल्याला फायद्यापेक्षा नुकसान होण्याची जास्त शक्यता असते.

4. ओव्हर ट्रेडिंग केल्यामुळे आपल्याला भरमसाठ ब्रोकरेज आणि गव्हर्मेंट चार्जेस द्यावे लागतात त्यामुळे बऱ्याच वेळा आपण फायद्यात असून सुद्धा ब्रोकरेज आणि टॅक्स मुळे आपले नुकसान होते.

5. इंट्राडे पोझिशन जर आपण 3:15 पर्यंत क्लोज केली नाही तर ती पोझिशन ब्रोकर कडून क्लोज केली जाते आणि त्याबदल्यात भरमसाठ चार्जेस आकारले जातात.

6. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मोठमोठ्या ऑपरेटर्स कडून रचलेल्या सापळा मध्ये आपण अगदी आरामात अडकता आणि आपले बरेचसे स्टॉप लॉस हिट होतात.

7. इंट्राडे ट्रेडिंग मुळे आपल्या मनातील ताण तणाव वाढतो आणि त्यामुळे वेगवेगळे मानसिक विकार होण्याची शक्यता असते. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जर बराच लॉस झाला तर ट्रेडर कायमस्वरूपी नैराश्यात जाऊ शकतो आणि अनपेक्षित पावले उचलू शकतो.

8. इंट्राडे मध्ये बऱ्याच वेळा आपण मार्केट चालू झाल्यापासून ते मार्केट बंद होईपर्यंत चार्ट चे निरीक्षण करत असता त्यामुळे वेळेचा अपव्यय होतो.

इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये काय फरक आहे?


इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण आज घेतलेले स्टॉक आजच विकणे बंधनकारक असते पण डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण आपले स्टॉक कधीही विकू शकता.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण शॉर्ट सेल करून सुद्धा प्रॉफिट मिळू शकता परंतु डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपल्याला फक्त खरेदी करावी लागते त्यामध्ये शॉर्ट सेल करता येत नाही.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला ब्रोकरेज कडून मार्जिन मिळते पण डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये काही अपवाद वगळता आपल्याला मार्जिन दिले जात नाही त्यामुळे आपल्याकडे असलेली संपूर्ण रक्कम आपल्याला वापरावी लागते.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आज घेतलेला स्टॉक आजच विकणे बंधनकारक असल्यामुळे आपले पैसे अडकून राहत नाहीत. पण डिलिव्हरी मध्ये आपले पैसे अडकून राहू शकतात.

फक्त टेक्निकल एनालिसिस वापरून आपण इंट्राडे ट्रेडिंग करू शकता पण जर आपल्याला डिलिव्हरी घ्यायचे असेल तर आपल्याला फंडामेंटल अनालिसिस सुद्धा करावे लागते.

इंट्राडे ट्रेडिंग हे रिस्की ट्रेडिंग चा प्रकार आहे पण डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये इंट्राडे च्या तुलनेत रिस्क कमी असते.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपल्याला भरमसाठ ब्रोकरेज आणि गव्हर्मेंट चार्जेस द्यावे लागतात पण बऱ्याच वेळा डिलिव्हरी ही फ्री असते त्यावर कोणत्याही प्रकारचे ब्रोकरेज आकारले जात नाही किंवा इंट्राडे च्या तुलनेत खूपच कमी ब्रोकरेज आकारले जाते.

डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपल्याला ला डिव्हिडंड आणि बोनस शेअर सारखा लाभ मिळू शकतो पण इंट्राडे मध्ये हे लाभ मिळत नाहीत.

इंट्राडे ट्रेडिंग मध्ये लॉस होण्याची कारणे कोणती?


इंट्राडे मध्ये नुकसान होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे योग्य ज्ञानाचा अभाव. बऱ्याच वेळा अर्धवट ज्ञानावर आधारित ट्रेडिंग केले जाते ज्यामध्ये व्यवस्थित स्टॉप लॉस आणि टारगेट लावले जात नाही त्यामुळे इंट्राडे मध्ये लॉस होतो.

इन्ट्राडे मध्ये लॉस होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वारंवार स्ट्रॅटेजी बदलणे. बरेच वेळा एखादी स्ट्रॅटेजी फेल झाली तर आपण ती स्ट्रॅटेजी सोडून दुसऱ्या स्ट्रॅटेजी च्या मागे लागतो आणि ती फेल झाली की तिसऱ्या अशाप्रकारे कुठल्या स्ट्रॅटेजी मध्ये प्रवीण नसल्यामुळे इंट्राडे मध्ये आपला लॉस होतो.

इंट्राडे मध्ये लॉस होण्याचे आणखी एक कारण म्हणजे टीप प्रोव्हायडर. इंट्राडे ट्रेडिंग मध्ये कमी वेळेत निर्णय घ्यावे लागतात. जर आपण एखाद्या टिप वर अवलंबून असाल आणि या टीप आपल्यापर्यंत जरा उशिरा पोहोचल्या तर आपली एंट्री घेण्याची वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण वरच्या लेव्हलला खरेदी करता आणि ज्यावेळी मार्केट पूल बॅक मध्ये येते त्यावेळी आपण घाबरून आपली पोझिशन खाली करता त्यामुळे आपले नुकसान होते.

इंट्राडे मध्ये नुकसान होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे मनी मॅनेजमेंट न पाळणे. जर आपण मनी मॅनेजमेंट पाळले तर जरी मार्केट आपल्या विरुद्ध दिशेला गेले तरी आपण कमीतकमी लॉस मध्ये बाहेर पडतात पण जर आपण याच आशेवर राहिलात की मार्केट आपल्या इच्छित दिशेला जाईल तर आपले हमखास नुकसान होते.

शिस्तीचा अभाव हे एक इन्ट्राडे मध्ये लॉस होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. बऱ्याच वेळा इंट्राडे मध्ये रँडम ट्रेड घेतले जातात असेट ट्रेड घेताना कोणताही अभ्यास केला जात नाही. बऱ्याच वेळा असे ट्रेड हे ट्रेंड विरुद्ध घेतले जातात त्यामुळे लॉस होण्याची शक्यता जास्त असते.

भावनांवर नियंत्रण नसणे हे एक इन्ट्राडे मध्ये लॉस होण्याचे मोठे कारण आहे. जर कोणताही ट्रेड थोडासा आपल्या विरुद्ध दिशेने जायला लागला तर जास्त नुकसान होईल या भीतीने आपण तो विकून टाकतो त्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावे लागते.

ओव्हर ट्रेडिंग हेसुद्धा इंट्राडे मध्ये लॉस होण्याचे मुख्य कारण आहे. ओव्हर ट्रेडिंग मुळे आपण कमावलेला प्रॉफिट सुद्धा लॉस मध्ये परावर्तित होतो.

बराच वेळा आपल्याला आधीच्या ट्रेड मध्ये झालेले नुकसान आपण दुसऱ्या ट्रेड मध्ये भरून काढण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आपण ट्रेडिंग कॉन्टिटी वाढवितो आणि जर ट्रेड आपल्या विरुद्ध दिशेला गेला तर आपल्याला मोठे नुकसान सहन करावे लागते.

हे करा आणि हे करू नका.


हे करा -

जर आपण नवीन ट्रेडर असाल तर इंट्राडे ट्रेडिंग करण्याआधी पेपर ट्रेडिंग जरूर करावे. जर पेपर ट्रेडिंग मध्ये आपल्याला फायदा होऊ लागला तरच इंट्राडे ट्रेडिंग कडे वळावे.

1.आपल्या स्ट्रॅटेजी चे सर्व नियम तंतोतंत पाळावेत त्यामध्ये कुठलेही बदल करू नयेत.

2.लालची पणा आणि भीती हे कोणत्याही ट्रेडिंगचे सर्वात मोठे शत्रू आहेत त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवावे.

3.कोणत्याही टीप वर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचा अभ्यास स्वतः करावा.

4.टेक्निकल चार्ट चा वापर करताना कमीत कमी इंडिकेटर लावावेत.

5.जेवढ्या रकमेचे आपण नुकसान सहन करायला तयार आहे तेवढीच रक्कम ट्रेडिंगमध्ये गुंतवावी.

6.इंट्राडे ट्रेडिंग साठी स्टॉक सिलेक्शन हे एक दिवस आधीच करावे.

7.जास्तीत जास्त एक किंवा दोन ट्रेड करावेत.

8.फायदा झाल्यानंतर ट्रेडिंग टर्मिनल लगेच बंद करावा.

9.नेहमी लिक्विड स्टॉक मध्येच ट्रेड करावा.

10.स्टॉप लॉस जरूर वापरावा.

11.आपल्या स्ट्रॅटेजी नुसार योग्य सेटअप तयार होईपर्यंत वाट पहा.

हे करू नका -

1.कोणत्याही प्रकारच्या न्यूज वर किंवा अफवांवर विश्वास ठेवून ट्रेड करू नका.

2.वारंवार स्ट्रॅटेजी बदलू नका.

3.ओवर ट्रेडिंग टाळा.

4.एखाद्या दिवशी मार्केटचा अंदाज येत नसेल तर ट्रेडिंग करू नका.

5.रँडम ट्रेड घेऊ नका.

6.एखाद्या ट्रेडमध्ये लॉस झाला तर तो रिकव्हर करण्याच्या मागे लागू नका.

7.विना स्टॉपलॉस ट्रेडिंग करू नका.

8.कमी लिक्विड किंवा पेनी स्टॉक मध्ये ट्रेडिंग करू नका.

9.कोणाकडूनही टीप घेऊन ट्रेडिंग करू नका .

10.कर्ज काढून ट्रेडिंग करू नका.

11.कोणत्याही स्टॉक च्या प्रेमात पडू नका. जेथे संधी मिळेल तिथेच ट्रेड करा.

अप्पर सर्किट आणि लोवर सर्किट म्हणजे काय?


लोवर सर्किट - असे मानूया की आपल्याकडे ABC कंपनीचे काही शेअर्स आहेत. कोणत्यातरी कारणामुळे जर ABC कंपनीला नुकसान झाले तर आपण आणि आपल्या सारखे बरेचसे इन्वेस्टर त्या कंपनीचे शेअर्स विकण्यास सुरुवात करतात. अशावेळी जर सर्वच लोकांनी ABC कंपनीचे शेअर्स विकून टाकले तर त्या शेअरचा भाव एकाच दिवसात शून्य होईल. अशावेळी शेअर्समध्ये एका लिमिट मध्येच पडझड व्हावी म्हणून एक्सचेंज ने काही नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार जर एकाच वेळी बरेच लोक एखाद्या शेअर्सची विक्री करू लागले तर त्या शेअर मध्ये एका ठराविक मर्यादेपर्यंतच पडझड होते आणि त्या मर्यादेनंतर त्या शेअर्सची विक्री बंद होते. या मर्यादेला च लोवर सर्किट असे म्हटले जाते.

ज्या वेळी एखाद्या स्टॉक मध्ये लोवर सर्किट लागते त्यावेळी आपण तो स्टॉक विकू शकत नाही.

अप्पर सर्किट - ज्यावेळी एखाद्या कंपनीमध्ये काही चांगली न्यूज असेल तर सर्व इन्वेस्टर तो शेअर खरेदी करण्याच्या मागे लागतात. अशावेळी त्या शेअरचा भाव अवाजवी पद्धतीने वाढतो. या अवास्तव भाववाढीला आळा घालण्यासाठी एक्सचेंज मध्ये अप्पर सर्किट ची तरतूद आहे. अप्पर सर्किटमध्ये एखादा शेअर जर एखाद्या ठराविक पातळीपर्यंत गेला तर त्यामध्ये आपल्याला आणखी खरेदी करता येत नाही या खरेदीच्या मर्यादेला अप्पर सर्किट असे म्हटले जाते.

ज्या वेळी एखाद्या स्टॉक मध्ये अप्पर सर्किट लागते त्यावेळी आपण तो स्टॉक खरेदी करू शकत नाही.


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post