.

म्युच्युअल फंड बद्दल संपूर्ण माहिती मराठीत | Complete information of mutual funds in Marathi

म्युच्युअल फंड म्हणजे काय?

What is mutual fund

खूप सार्‍या लोकांकडून पैसा गोळा करून त्याला योग्य ठिकाणी इन्वेस्ट करणे आणि त्या पैशांवर जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल याकडे लक्ष देणे म्हणजेच म्युचल फंड.(Mutula funds meaning in Marathi)


म्युच्युअल फंड म्हणजे कोणी एक व्यक्ती नसतो तर ती एक कंपनी असते. ही कंपनी अशा बऱ्याच लोकांकडून पैसे गोळा करते ज्यांना मार्केटचा अनुभव नाही किंवा गुंतवणुकीसाठी जो अभ्यास केला जातो त्यासाठी वेळ नाही.(Mutual fund information in marathi)

मग हे सर्व लोक म्युच्युअल फंड कंपनीकडे आपला पैसा देतात. या कंपनीकडे फंड मॅनेजर नावाचे एक पद असते. हा मॅनेजर व त्याचे सहकारी लोकांकडून गोळा केलेला पैसा कोठे इन्वेस्ट करायचा हे ठरवतात. यातील काही रक्कम स्टॉक मार्केटमध्ये इन्वेस्ट केली जाते, तर काही रक्कम गव्हर्मेंट सिक्युरिटीज, बॉण्ड यामध्ये इन्वेस्ट केली जाते.

आपली रक्कम इनवेस्ट करताना ती पूर्ण संशोधन करून इन्वेस्ट केली जाते. हे संशोधन करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपनीकडे उच्चशिक्षित लोकांची फौज असते त्यामुळे आपण इन्व्हेस्ट केलेला पैसा बुडण्याची शक्यता फारच कमी असते.(information about mutual funds in marathi)

कारण आपला पैसा अशाच ठिकाणी लावला जातो ज्या ठिकाणावरून त्याला जास्तीत जास्त परतावा मिळेल. अशा पद्धतीने एक पोर्टफोलिओ बनविला जातो. जर शेअर मार्केट मध्ये पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर प्रत्येक सेक्टरमधील आघाडीच्या कंपन्यांचे पूर्ण फंडामेंटल अनालिसिस केले जाते.(Mutual fund marathi meaning)

यामध्ये कंपनीच्या मागील कामगिरीचा विचार करून कंपनी आगामी काळात कशी कामगिरी करेल आणि त्यातून आपल्याला किती नफा मिळू शकतो याचा अंदाज बांधला जातो.(Mutual fund marathi book pdf)

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना आपल्याला फक्त आपले पैसे म्युच्युअल फंड कंपनी ला द्यायचे असतात. बाकीच्या गोष्टी या कंपनीकडून सांभाळल्या जातात. त्याबदल्यात कंपनीकडून फीस आकारली जाते.(Mutual fund marathi wikipiedia)

म्युच्युअल फंड चे बरेच प्रकार आहेत त्यापैकी आपल्यासाठी कोणता फंड योग्य आहे हे आपण पुढील लेखांमध्ये पाहणारच आहोत.(Mutual fund marathi word)

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे कितपत सुरक्षित आहे?

Is investment in mutual fund safe?
म्युचल फंड मधील गुंतवणुकीबाबत अजूनही बऱ्याच जणांच्या मनात शंका-कुशंका आहेत आणि त्यातील सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक सुरक्षित आहे का? (Is investment in mutual funds safe?)


तर या प्रश्नाचे उत्तर “होय” असे आहे.

ज्याप्रमाणे बँकेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचे काम RBI करते, टेलिकॉम कंपन्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम TRAI करते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड च्या प्रत्येक कारभारावर लक्ष ठेवण्याचे काम SEBI नावाची सरकारी संस्था करते.(SEBI meaning in marathi)

आतापर्यंत ही संस्था आपले काम चोख बजावत आलेली आहे. त्यामुळे म्युचल फंड मध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता जवळपास नाही. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनीला SEBI ची परवानगी घ्यावी लागते आणि SEBI च्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात. जी कंपनी या सर्व अटी पूर्ण करते त्याच कंपनीला सेबी कडून परवानगी दिली जाते.

म्युचल फंड च्या प्रत्येक गोष्टीवर SEBI चे बारीक लक्ष असते. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात.

पण तरीदेखील, एखाद्या म्युच्युअल फंड कंपनीविरुद्ध आपल्याला तक्रार करायची असेल तर आपण SEBI च्या वेबसाइटवरून तक्रार करू शकता. दोन्ही बाजूंच्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर SEBI आपला निर्णय देते आणि बऱ्याच वेळा तो गुंतवणूकदारांच्या हिताचा असतो. SEBI ने दिलेला निर्णय म्युच्युअल फंड कंपनी आणि गुंतवणूकदारांवर बंधनकारक असतो.(SBI mutual fund information in marathi)

थोडक्यात काय, तर म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते आणि मार्केटमधील सध्याच्या कोणत्याही पर्यायांपेक्षा जास्त परतावा देणारी ठरू शकते. जास्त अवधीसाठी जर विचार केला तर आपल्या गुंतवणुकीवर भविष्यात जबरदस्त परतावा मिळू शकतो त्यामुळे जर आपण गुंतवणुकीचा विचार करत असाल तर म्युच्युअल फंड त्या आघाडीवर सरस ठरतो.

म्युच्युअल फंड चे कोणकोणते प्रकार आहेत?

Type of Mutual funds

वरील चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते.(Types of mutual funds)


1 . इक्विटी (Equity) - या प्रकारात आपण म्युच्युअल फंड मध्ये जमा केलेली रक्कम स्टॉक मार्केटमध्ये लावली जाते म्हणजेच त्या रकमेतून विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले जातात. कोणत्या कंपनीचे किती शेअर्स घ्यायचे हा निर्णय सर्वस्वी फंड मॅनेजर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अवलंबून असतो. (Equity mutual fund information in marathi)

2 . डेट (Debt) - या प्रकारात सरकारी किंवा खासगी कंपनीच्या बॉण्ड मध्ये तसेच ट्रेझरी बिल्स, गव्हर्मेंट सिक्युरिटी यामध्ये गुंतवणूक केली जाते.(debt mutual fund information in marathi)

3 . हायब्रीड (Hybrid) - या प्रकारात इक्विटी(Equity) आणि डेट(Debt) या दोन्ही प्रकारात गुंतवणूक केली जाते.(Hybrid mutual fund information in marathi)

इक्विटी फंड चे काही उपप्रकार आहेत ते खाली दिल्या प्रमाणे.

1 . लार्ज कॅप फंड (Large cap funds) - लार्ज कॅप ला ब्लूचिप असेही म्हटले जाते. यामधील गुंतवणूक मोठ-मोठ्या या कंपन्यांमध्ये केली जाते ज्यांच्यामध्ये नुकसान होण्याचा धोका कमी असतो पण परतावा सुद्धा कमी मिळतो. (large cap fund information in marathi)

2 . मिड कॅप फंड (Mid cap fund) - यामधील गुंतवणूक लार्ज कॅप च्या तुलनेत जास्त धोकादायक असते पण यातून मिळणारा परतावा हा लार्ज कॅप पेक्षा चांगला असतो. यामध्ये अशा कंपन्या निवडल्या जातात यांची वाटचाल लार्ज कॅप कंपनी बनण्याकडे चाललेली असते.(midcap fund information in marathi)

3 . स्मॉल कॅप फंड (Small cap fund) - यामध्ये मिड कॅप च्या तुलनेत गुंतवणूक करणे जास्त धोकादायक मानले जाते पण यातून मिळणारा परतावा वरील दोन्ही प्रकारापेक्षा जास्त असतो.(small cap fund information in marathi)

4 . डायव्हर्सिफाईड फंड (Diversified fund) - यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या तिनही प्रकारात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे हा फंड जास्त सुरक्षित असतो आणि परतावा देखील चांगला मिळतो.(diversified fund information in marathi)

5 .थीमॅटिक फंड (Thematic fund) - यामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या कंपन्यांच्या शेअर्स मध्येच गुंतवणूक केली जाते. उदाहरणार्थ, फक्त भारतीय कंपन्या इत्यादी.(thematic fund information in marathi)

हायब्रीड फंड चे सुद्धा काही उपप्रकार आहेत ते खाली दिल्या प्रमाणे.(Hybrid mutual funds information in marathi)

1 . कन्जार्वेटिव्ह हायब्रीड फंड (Conservative Hybrid Fund) - या प्रकारात काही रक्कम इक्विटी फंडात गुंतवली जाते तर काही रक्कम डेट फंडात गुंतवली जाते यांचे प्रमाण सरासरी 20:80 अशा प्रमाणात असते.

2 . बॅलन्स हायब्रीड फंड (Balanced Hybrid Fund) - यामध्ये इक्विटी फंडात गुंतवलेली रक्कम आणि डेट फंडात गुंतवलेली रक्कम यांचे प्रमाण सरासरी 50:50 असते म्हणून याला बॅलन्स फंड म्हणतात.

3 . अग्रेसिव हायब्रीड फंड (Aggressive Hybrid Fund) - यामध्ये इक्विटी फंडात डेट फंडाच्या तुलनेत अधिक रक्कम गुंतवली जाते ज्यांचे प्रमाण साधारणतः 80:20 असे असू शकते.

डेट फंडचे काही उपप्रकार खाली दिल्याप्रमाणे आहेत.

1 . लिक्विड फंड (Liquid Fund) - यामध्ये फिक्स इन्कम सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक केली जाते जसे की, डिपॉझिट सर्टिफिकेट्स, ट्रेझरी बिल, कमर्शियल पेपर आणि इतर डेट फंड. या खंडातील गुंतवणुकीपासून आपल्याला फिक्स रिटन मिळतो आठ ते नऊ टक्‍क्‍यांच्या दरम्यान असू शकतो. लिक्विड फंड मध्ये लॉक इन पिरेड नसतो म्हणजेच आपण आपली गुंतवणूक कधीही काढून घेऊ शकता.(What is liquid funds in marathi)

2 . शॉर्ट टर्म फंड (Short Term Fund) - यामध्ये कमी कालावधीसाठी विविध प्रकारच्या फंडमध्ये गुंतवणूक केली जाते.(best short term funds)

3 . कॉर्पोरेट बॉण्ड फंड (Corporate Bond Fund) - यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॉण्ड मध्ये गुंतवणूक केली जाते. या कंपन्या सरकारी किंवा खाजगी असू शकतात.(best corporate bonds for investment)

4 . लॉन्ग टर्म फंड (Long Term Fund) - या प्रकारात जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली जाते ज्या पासून मिळणारे रिटन्स हे खूप जास्त असतात.(best long term mutual funds)


SIP आणि Lumpsum म्हणजे काय?

SIP and Lumpsum in mutual fund

कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे दोन प्रकार आहेत.

1 . SIP - (Systematic Investment Plan)
2 . Lumpsum

SIP म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम म्युचल फंड मध्ये जमा करणे. उदाहरणार्थ म्युचल फंड घेताना जर आपण पाच हजार रुपयांची SIP केली आणि एक तारीख निवडली तर प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तुमच्या अकाउंट मधून पाच हजार रुपये ऑटोमॅटिक म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये जमा होतील.(What is SIP in marathi)

याउलट, लंम्प सम (what is lumpsum in marathi) म्हणजे ज्या वेळी आपल्याकडे पैसे येतील तेव्हा ते म्युच्युअल फंड मध्ये भरणे. उदाहरणार्थ, जानेवारी महिन्यात आपल्याला दहा हजार रुपये मिळाले ते आपण म्युच्युअल फंड मध्ये भरले त्यानंतर मार्चमध्ये आपल्याला वीस हजार रुपये मिळाले ते आपण म्युच्युअल फंड मध्ये भरले म्हणजेच या प्रकारात कोणत्या वेळी किती पैसे म्युचल फंड मध्ये भरायचे याचे बंधन नसते.

SIP ही जास्त सुरक्षित मानली जाते कारण ज्यावेळी मार्केट खाली जाते त्यावेळी आपली इन्व्हेस्टमेंट ही एव्हरेज होत जाते आणि जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा या रकमेचा आपल्याला चांगला परतावा मिळतो पण यासाठी बऱ्याच वेळा मोठ्या कालावधीसाठी वाट पाहावी लागते.(SIP information in marathi)

जर मार्केट अपट्रेन्ड मध्ये असेल आणि आपण एक लाख रुपये लंम्प सम इक्विटी फंड मध्ये जमा केले तर आपल्याला थोड्याच कालावधीत चांगला नफा होऊ शकतो पण जर आपण पैसे भरल्यानंतर मार्केट खाली गेले तर आपल्याला नुकसान सुद्धा तेवढेच होऊ शकते म्हणून म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करताना SIP हा एक चांगला पर्याय मानला जातो.(Best mutual funds to invest)

इन्कम टॅक्स वाचविण्यासाठी कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करावी?

Tax saving mutual funds

इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS या फंडामध्ये गुंतवणूक केली जाते. ELSS चा फुल फॉर्म आहे Equity Linked Saving Scheme म्हणजेच इक्विटी शी संबंधित अशी योजना ज्यामध्ये आपण बचत करू शकता आणि काही व्यवसायांचे भागीदार सुद्धा होऊ शकता. बऱ्याच कंपन्यांचे ELSS फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत.(Best tax saving funds)

ELSS हा एक म्युच्युअल फंडचाच प्रकार आहे पण यात आणि बाकीच्या फंड मध्ये एक मुख्य फरक आहे आणि तो म्हणजे लॉक इन पिरेड. म्हणजेच जर या फंडांमध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला पुढील तीन वर्षे आपला पैसा काढून घेता येत नाही.(How to invest in ELSS)

ELSS आणि बाकीचे फंड यामध्ये असलेला दुसरा मुख्य फरक म्हणजे इन्कम टॅक्समध्ये सूट. जर आपण ELSS मध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला 80C अंतर्गत इन्कम टॅक्समध्ये सूट मिळते.

या फंड कडे शक्यतो तेच लोक वळतात ज्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत हवी आहे. कारण इतर लोकांना म्हणजेच ज्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत नको आहे त्यांच्यासाठी हा फंड योग्य नाही आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये असणारा लोक इन पिरेड.(Income tax relief funds)

हा एक इक्विटी फंड चा प्रकार असल्याने मार्केटच्या चढ-उताराचे धोके यात सुद्धा संभवतात. पण जर आपण यामध्ये एसआयपी (SIP) करत राहिला तर भविष्यामध्ये या फंड मधून चांगला परतावा मिळू शकतो.(mutual funds risks)

वेगवेगळ्या ELSS मधून मिळणारा परतावा हा वेगवेगळा असतो. ELSS फंड च्या मागील परताव्या नुसार भविष्यातील परताव्याचा अंदाज बांधला जातो.(How to redeem ELSS mutual funds)

आपण येईल ELSS मध्ये गुंतवलेला पैसा देशाच्या विकास कामांसाठी वापरला जातो त्यामुळे यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर सरकार कडून इन्कम टॅक्समध्ये सवलत दिली जाते आणि त्याच बरोबर तीन वर्षांचा लॉक इन पिरेड सुद्धा लावला जातो म्हणजे आपण गुंतवलेला पैसा सरकारला कमीत कमी तीन वर्षे तरी वापरता यावा.(Best mutual funds for long term)

ELSS फंड मध्ये गुंतवणूक करताना आपण SIP किंवा Lumpsum या दोन्ही प्रकारे करू शकता. SIP म्हणजे प्रत्येक महिन्याच्या एका ठराविक तारखेला एक ठराविक रक्कम आपल्याला भरायची असते याउलट Lumpsum म्हणजे आपल्याकडे जसे पैसे येतील तसे आपण या मध्ये भरू शकता. (Best mutual funds for short term)

या फंड मधून पैसे काढताना ज्या महिन्यात पैसे भरलेले आहेत तेथून पुढे छत्तीस महिने झाल्यानंतरच आपण पैसे काढू शकता. उदाहरणार्थ, जर आपण जानेवारी 2018 मध्ये काही रक्कम ELSS मध्ये भरली असेल तर ती रक्कम आपण जानेवारी 2021 नंतरच काढू शकता त्याच प्रमाणे जी रक्कम आपण फेब्रुवारी 2018 मध्ये भरलेली असेल ती रक्कम आपण फेब्रुवारी 2021 नंतर म्हणजेच 36 महिने पूर्ण झाल्यानंतरच काढू शकता.

जर यामध्ये आपण SIP केली असेल तर आपल्याला संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही. ज्या महिन्यांमध्ये भरलेल्या रकमेचे 36 महिने पूर्ण झालेले आहेत अशीच रक्कम आपण काढू शकता.

नॅव्ह (NAV) म्हणजे काय?

What is NAV in Mutual fund

NAV म्हणजे Net Asset Value. ज्यावेळी मॅच्युअल फंड किमतीच्या एकत्रित स्कीम मधून प्रत्येक आऊटस्टँडिंग युनिट वरील देनी (liabilities) वजा केली तर येणाऱ्या व्हॅल्यू ला NAV असे म्हटले जाते.(Mutual fund NAV meaning in marathi)


ज्याप्रमाणे स्टॉक ची साईज ही कॉन्टिटी मध्ये असते, फ्यूचर आणि ऑप्शन ची साइज ही लॉटमध्ये असते त्याच प्रमाणे म्युच्युअल फंड ची साईज ही NAV प्रति युनिट मध्ये मोजली जाते.(how NAV is calculated)

जर मागील वर्षी पाच हजार रुपयांमध्ये म्युचल फंड चे वीस युनिट मिळत असतील आणि आणि यावर्षी जर पाच हजार रुपयांमध्ये म्युच्युअल फंडाचे पंधरा युनिटी मिळत असतील तर आपल्या म्युचल फंड मध्ये चांगली वाढ झाली आहे असा त्याचा अर्थ होतो.

याउलट जर यावर्षी पाच हजार रुपयांमध्ये म्युच्युअल फंडाचे तीस युनिट मिळत असतील तर आपल्या मॅच्युअल फंड मध्ये चांगलीच पडझड झाली आहे आणि सध्या आपण तोट्यात आहात असा त्याचा अर्थ होतो.

पण यामध्ये फायद्याची गोष्ट अशी आहे की, जेव्हा मार्केटमध्ये मंदी असते तेव्हा आपल्याला म्युच्युअल फंडाचे जास्त युनिट मिळतात आणि जेव्हा मार्केट तेजी मध्ये जाते तेव्हा हेच युनिट विकून आपण चांगला पैसा कमावू शकता.(Mutual funds strategy)

म्युच्युअल फंड कसे खरेदी करावे?


म्युच्युअल फंड आपण दोन पद्धतीने खरेदी करू शकता यामध्ये एकतर आपण डायरेक्ट म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवर जाऊन डॉक्युमेंट भरून केवायसी करू शकता किंवा आपल्या ब्रोकर मार्फत म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करू शकता.(How to buy mutual funds in Marathi)

आज-काल बऱ्याचशा ब्रोकरणे म्युच्युअल फंड साठी एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे जेथे सर्व कंपन्यांचे सर्व प्रकारचे म्युच्युअल फंड आपण अगदी सहज पाहू शकता आणि खरेदी करू शकता. यामध्ये प्रत्येक म्युच्युअल फंडाने तो सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत कशी कामगिरी केलेली आहे हे पाहायला मिळते त्यानुसार कोणत्या म्युच्युअल फंड खरेदी करायचा याचा निर्णय घेण्यामध्ये आपल्याला मदत मिळते.

म्युच्युअल फंड खरेदी करण्याचे दोन प्रकार आहेत.

1 . रेगुलर प्लॅन (Regular plan)
2 . डायरेक्ट प्लॅन (Direct plan)

रेगुलर प्लॅनमध्ये आपण थर्ड पार्टी एजंट मार्फत म्युच्युअल फंड खरेदी करता जसे की Grow किंवा paytm.

रेगुलर प्लॅनमध्ये ज्या एजंट मार्फत आपण म्युच्युअल फंड खरेदी केलेला आहे त्या एजंट कडून आपल्याला मार्गदर्शन केले जाते जसे की कोणत्या फंडामध्ये किती पैसे टाकावेत, ते कधी काढून घ्यावेत, एका फंडातील पैसे दुसऱ्या फंडामध्ये कसे ट्रान्सफर करावेत इत्यादी. त्याबदल्यात आपल्या परताव्या मधील 1% ते 1.5% कमिशन एजंटला द्यावे लागते.

डायरेक्ट प्लॅनमध्ये आपण थेट कंपनीकडून म्युचल फंड विकत घेतो. यामध्ये कोणताही एजंट येत नाही. या प्रकारात आपल्याला कोणालाही कोणत्याही प्रकारचे कमिशन द्यावे लागत नाही पण म्युचल फंड संबंधीचे सर्व निर्णय आपल्याला स्वतःलाच घ्यावे लागतात. या प्रकारात आपल्याला कोणाकडून कोणत्याही प्रकारचा सल्ला दिला जात नाही.

जर आपले झिरोधा सारख्या ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट असेल तर आपण त्यांच्या कॉइन या प्लॅटफॉर्मवर सर्व कंपन्यांचे सर्व प्रकारचे म्युचल फंड थेट कंपनीकडून बाय करू शकता यामध्ये आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त चार्जेस किंवा कमिशन घेतले जात नाही पण वर्षाच्या शेवटी किरकोळ असे प्लॅटफॉर्म चार्जेस भरून आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्टमेंट चालू करू शकता.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?


Investment in mutual fund

1.म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना नेहमी जास्त कालावधीसाठी करावी म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेचा आपल्याला चांगला परतावा मिळतो.(mutual funds investment marathi)


2 . गुंतवणूक करताना नेहमी SIP ला प्राधान्य द्यावे ज्यामुळे आपली रिस्क कमी होऊन आपल्याला चांगला परतावा मिळतो.

3. ELSS सारखे फंड जर आपल्याला इनकम टॅक्स वाचवायचा असेल तरच घ्यावेत. गरज नसताना असे फंड घेऊ नयेत.

4 . आपली सर्व रक्कम कोणत्याही एकाच फंडामध्ये लावू नये त्याऐवजी ती वेगवेगळ्या फंडामध्ये विभागून लावावि.

5 . जर आपण म्युचल फंड गुंतवणुकीमध्ये अगदीच नवीन असाल तरच रेगुलर फंडाचा ऑप्शन निवडावा अन्यथा डायरेक्ट फंड त्यापेक्षा चांगला आहे कारण यामध्ये आपल्याला कमिशन द्यावे लागत नाही.

6 . आपण केलेली गुंतवणूक वरच्यावर तपासत राहा.

7 . ज्यावेळी मार्केट मध्ये खूप जास्त पडझड होते तो काळ म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.

8 . कर्ज काढून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नये.

9 . वारंवार एका म्युचल फंड मधील पैसे काढून ते दुसऱ्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणे टाळावे.

10 . किरकोळ प्रॉफिट नंतर लगेच पैसे काढून घेऊ नये. त्या पैशांना वाढण्यासाठी पुरेसा अवधी द्यावा.

ग्रोथ (Growth)आणि डिव्हिडंड (Dividend)म्युचल फंड मध्ये काय फरक आहे?

Difference between Growth and divident mutual funds

ज्यावेळी आपण ग्रोथ म्युच्युअल फंड घेता त्यावेळी या फंड मधून मिळणारे प्रॉफिट हे पुन्हा त्याच फंडांमध्ये इन्व्हेस्ट केले जाते.

याउलट, डिव्हिडंड फंडामधून मिळणारे प्रॉफिट एका ठराविक कालावधीनंतर गुंतवणूकदारांच्या खात्यामध्ये जमा केले जाते.

जर आपल्याला कमी किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर ग्रोथ हा पर्याय आपल्यासाठी सोयीस्कर आहे पण जर आपल्याला बऱ्याच मोठ्या अवधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर डिव्हीडंड हा पर्याय आपल्यासाठी चांगला आहे.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post