.

ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ची संपूर्ण माहिती मराठीत | Complete information of trading and demat account in Marathi

ब्रोकर म्हणजे काय?


ब्रोकर या शब्दाचा अर्थ आहे दलाल म्हणजेच मध्यस्थ. ब्रोकर हा स्टॉक एक्सचेंज आणि गुंतवणूकदार यामध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडतो. जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करायचे असेल तर ते ब्रोकर शिवाय शक्य नाही.

जेव्हा आपण स्टॉक मार्केट मध्ये काम करण्याचा निर्णय घेता तेव्हा आपल्याला ब्रोकरकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट उघडावे लागते त्यानंतरच आपण स्टॉक खरेदी आणि विक्रीचे व्यवहार करू शकता.

गुंतवणूकदारांच्या खरेदी किंवा विक्रीच्या ऑर्डर एक्सचेंज पर्यंत पोहोचविण्याचे काम स्टॉक ब्रोकर करत असतात. त्याबदल्यात ते आपल्याकडून काही फी घेतात यालाच ब्रोकरेज असे म्हटले जाते.

वेगवेगळ्या ब्रोकरचे वेगवेगळे चार्जेस असतात. थोडक्यात काय, तर ब्रोकर म्हणजे स्टॉक एक्सचेंज आणि आपल्या मधील असा मध्यस्थ जो आपले खरेदीचे आणि विक्रीचे सर्व व्यवहार स्टॉक एक्सचेंज पर्यंत पोहोचविण्याचे काम करतो.

ब्रोकर चे कोणकोणते प्रकार आहेत?


ब्रोकर चे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.

1 . फुल सर्विस ब्रोकर
2 . डिस्काउंट ब्रोकर

फुल सर्विस ब्रोकर
फुल सर्विस ब्रोकर आपल्या कस्टमरला बऱ्याच सुविधा देत असतात जसे की,
1 . ऍडव्हायझरी म्हणजेच कोणता स्टॉप कधी खरेदी करावा आणि कधी विकावा या संदर्भातील टिप्स दिल्या जातात.
2 . खूप जास्त इंट्राडे आणि डिलिव्हरी मार्जिन दिले जाते.
3 . आपल्या सर्व समस्या सोडविण्यासाठी एक रिलेशनशिप मॅनेजर ची नेमणूक केली जाते.
4. आपण फोन करून सुद्धा आपले शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता.
5. आपल्याला IPO खरेदी संदर्भात मार्गदर्शन केले जाते.
6. काही फूल सर्विस ब्रोकर आपल्या कस्टमरला 3 इन 1 अकाउंट प्रोव्हाइड करतात म्हणजेच ज्या बँकेत आपले खाते असेल त्याच बँकेचे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट आपल्याला प्रोव्हाइड केले जाते ज्यामुळे पैसे ट्रान्सफर करणे खूपच सोपे होते.

पण वरील सर्व सुविधांच्या बदल्यात फुल सर्विस ब्रोकर कडून भरमसाठ ब्रोकरेज आणि इतर चार्जेस वसूल केले जातात जे बऱ्याच वेळा नवीन आणि सामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्याबाहेर असतात.

जर आपण प्रोफेशनल ट्रेडर्स असाल तर आपण फुल-सर्वीस ब्रोकरकडे अकाउंट ओपन करावे असा सल्ला दिला जातो पण जर आपण नवीन ट्रेडर असाल तर डिस्काउंट ब्रोकर आपल्यासाठी चांगला असू शकतो.

काही फुल-सर्वीस ब्रोकर ची उदाहरणे, ICICI Direct, Sharekhan, HDFC Securities इत्यादी.

डिस्काउंट ब्रोकर
1 . डिस्काउंट ब्रोकर हा फुल-सर्वीस ब्रोकर च्या तुलनेत कितीतरी स्वस्त असतो.
2 . तो आपल्या क्लायंटला खूप कमी किमतीमध्ये शेअर्स खरेदी आणि विक्री करण्याची मुभा देतो.
3 . डिस्काउंट ब्रोकर कडून आपल्याला कुठल्याही प्रकारचा खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला दिला जात नाही.
4 . यामध्ये आपल्याला समर्पित रिलेशनशिप मॅनेजर दिला जात नाही.
5 . फुल सर्विस ब्रोकर च्या तुलनेत काही किंवा बऱ्याच सर्विसेस कमी असू शकतात.
6 . याचे ब्रोकरेज चार्जेस कमी असल्यामुळे सामान्य गुंतवणूकदारां ची डिस्काउंट ब्रोकरला पहिली पसंती असते.

जर आपण मार्केट मध्ये नवीन असाल तर डिस्काउंट ब्रोकर कडेच अकाउंट ओपन करण्याचा सल्ला दिला जातो. भारतामधील काही डिस्काउंट ब्रोकर ची उदाहरणे Zerodha, Fyres, Upstox इत्यादी.

ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन करायला किती खर्च येतो?


आपण कोणत्या ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन करत आहात यानुसार हे चार्जेस बदलत जातात.

वाढत्या स्पर्धेमुळे बरेच ब्रोकर आपल्या कस्टमरला फ्री ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन करण्याची सुविधा देतात तर काही ब्रोकर यासाठी 300 ते 700 रुपयांपर्यंतचे चार्जेस घेतात.

जर आपण डिस्काउंट ब्रोकरकडे डिमॅट अकाउंट ओपन केले तर बऱ्याच वेळा ते फ्री मध्ये ओपन केले जाते पण हेच अकाउंट जर फुल-सर्वीस ब्रोकरकडे ओपन केले तर आपल्याकडून सातशे रुपयांपर्यंत चे चार्जेस घेतले जाऊ शकतात अर्थात हे चार्जेस सुद्धा आपण कोणत्या ब्रोकरकडे अकाउंट ओपन करता त्यावर अवलंबून आहेत.

ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर आपल्याला डिमॅट अकाउंट चे वार्षिक AMC चार्जेस द्यावे लागतात. हे चार्जेस तीनशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत असू शकतात. काही डिस्काउंट ब्रोकर हे AMC चार्जेस सुद्धा घेत नाहीत.

ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर प्रत्येक ट्रेड मागे आपल्याला ब्रोकरेज द्यावे लागते आणि ब्रोकर ची हीच मुख्य कमाई असते.

बरेच डिस्काउंट ब्रोकर आपल्याकडून प्रत्येक बाय ऑर्डर साठी वीस रुपये आणि प्रत्येक सेल ऑर्डर साठी वीस रुपये किंवा ट्रेडिंग अमाऊंट च्या 0.01% यापैकी जे कमी आहे तेवढे चार्जेस घेतले जातात.

फुल सर्विस ब्रोकर चे ब्रोकरेज चार्जेस 0.50 ते 0.75 पर्यंत असू शकतात जे डिस्काउंट ब्रोकर च्या तुलनेत किती तरी पटींनी जास्त आहेत.

ब्रोकरेज व्यतिरिक्त प्रत्येक ट्रेड वर आपल्याला काही गव्हर्मेंट टॅक्स पे करावे लागतात ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे STT म्हणजेच (Security Transaction Tax). याव्यतिरिक्त आणखीही काही प्रकारचे टॅक्स लावले जातात.

डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची गरज असते?

Documents to open demat account

आज-काल ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट हे ऑनलाइन उघडले जातात त्यासाठी आपल्याला कोणत्याही एजंटला भेटण्याची गरज नसते. खालील कागदपत्रांची पूर्तता करून आपण अगदी सहज ऑनलाईन डिमॅट अकाऊंट उघडू शकता.

1 . वैयक्तिक ओळखीचा पुरावा - यासाठी पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ज्या वर आपला फोटो आहे असे कोणतेही मान्यताप्राप्त ओळख पत्र वैयक्तिक ओळखीचा पुरावा म्हणून सादर केले जाऊ शकते.

2 . पत्त्याचा पुरावा(Address proof) - पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी कागदपत्रे ग्राह्य धरले जातात.

3 . इन्कम प्रूफ (Income Proof) - जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह अनेक कमॉडिटी सेक्शन चालू करायचे असतील तर आपल्याला इन्कम प्रूफ देण्याची गरज पडते. यामध्ये मागील तीन महिन्यांच्या पगाराची स्लिप किंवा फॉर्म 16, किंवा ITR भरलेली कॉपी इन्कम प्रूफ म्हणून दिली जाऊ शकते. जर आपला व्यवसाय असेल तर मागील सहा महिन्यांची बँक स्टेटमेंट आपल्याला इन्कम प्रूफ म्हणून द्यावी लागते.

4. व्हिडिओ KYC - यामध्ये व्हिडिओ कॉल द्वारे ऑनलाईन व्हेरिफिकेशन केले जाते यामध्ये आपल्या सहीचा कागद व्हेरिफिकेशन करणाऱ्याला व्हिडिओ कॉल मध्ये दाखवा लागतो. आपली सही ही आपल्या पॅन कार्ड वरील सही सारखीच असावी.

वरील सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात आपले डिमॅट अकाउंट ओपन झाल्याचा मेल आपल्या ब्रोकर कडून आपल्याला पाठवला जातो ज्यामध्ये आपले अकाऊंट चे लॉग इन डिटेल्स असतात याचा वापर करून आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्मला लॉग इन करू शकता आणि ट्रेडिंग चालू करू शकता.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post