टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे काय?
बऱ्याच वेळा आपण पाहिले असेल की बिझनेस न्यूज चॅनल वर बरेच ॲनालिस्ट चार्ट पाहून सांगतात की एखाद्या स्टॉकची किंमत वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. हे सर्व अनुमान लावले जाते ते टेक्निकल ऍनालिसिस मुळे.
जर टेक्निकल चार्ट वर एखादा पॅटर्न भूतकाळ तयार झाला असेल आणि तिथून मार्केट वर किंवा खाली गेले असेल आणि वर्तमान काळात जर सेम पॅटर्न चार्ट वर आपल्याला दिसला तर तिथून सुद्धा मार्केट वर किंवा खाली जाण्याची शक्यता असते कारण बरेच लोक चार्ट वर असे पॅटर्न पाहून खरेदी किंवा विक्री करत असतात.
त्यामुळे जर बुलिश पॅटर्न तयार झाला तर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते आणि मार्केट येथून वर जाते याउलट चार्ट वर जर बेयरिश पॅटर्न तयार झाला तर विक्री करणाऱ्यांची संख्या वाढते आणि मार्केट तेथून वर जाते.
तर टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे, टेक्निकल चार्ट वर भूतकाळात तयार झालेले असे पॅटर्न शोधणे जेथून मार्केट वर किंवा खाली गेले आहे आणि तेच पॅटर्न जर वर्तमान काळात दिसले तर मार्केट खाली किंवा वर जाणार याचा अंदाज लावणे.
ज्याप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हटले जाते त्याच प्रमाणे भुतकाळात तयार झालेले चार्ट पॅटर्न वर्तमान काळात सुद्धा दिसून येतात आणि त्याप्रमाणे खरेदी किंवा विक्री केली जाते.
टेक्निकल ऍनालिसिस कसे केले जाते?
टेक्निकल ऍनालिसिस साठी आपल्याकडे चार्टिंग प्लॅटफॉर्म असणे आवश्यक आहे. आजकाल सर्व ब्रोकर्स आपल्या ग्राहकांना चार्टिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात याचा वापर करून आपण टेक्निकल ऍनालिसिस करू शकता.
चार्ट चे बरेच प्रकार आहेत जसे की कॅन्डल स्टिक चार्ट, लाईन चार्ट, हेईकन अशी, रेनको चार्ट इत्यादी.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये प्रामुख्याने कॅन्डल स्टिक चार्ट वापरला जातो. कारण त्यावरून प्राईज वाढणार किंवा कमी होणार याचे अनुमान लावणे सोपे जाते. याव्यतिरिक्त हेईकन अशी चार्ट सुद्धा लोकप्रिय आहे.
टेक्निकल चार्ट चा अभ्यास करताना प्रमुख्याने दोन प्रकारचे पॅटर्न पाहिले जातात.
कॅन्डल स्टिक पॅटर्न
चार्ट पॅटर्न
कॅन्डल स्टिक पॅटर्नमध्ये दोन किंवा अधिक कॅण्डल एकत्र येऊन एक प्रकारचे स्ट्रक्चर तयार होते. हे स्ट्रक्चर बुलिश किंवा बेयरिश असू शकते. जर बुलिश स्ट्रक्चर तयार झाले तर मार्केट वर जाते आणि बेयरिश स्ट्रक्चर तयार झाले तर मार्केट खाली येते.कॅन्डल स्टिक पॅटर्नची काही उदाहरणे खालील प्रमाणे.
बुलिश/बेयरिश एंगलफिंग, हॅमर, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, पिन बार, हरामी इत्यादी.
चार्ट पॅटर्नमध्ये बऱ्याच कॅन्डल्स एकत्र येऊन एक स्ट्रक्चर तयार होते. हे स्ट्रक्चर बुलिश किंवा बेयरिश असू शकते त्यानुसार मार्केट वर किंवा खाली जाते. चार्ट पॅटर्न ची काही उदाहरणे खालील प्रमाणे.
फ्लॅग पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, ट्रँगल पॅटर्न, कप आणि हॅन्डल पॅटर्न, राऊंडिंग बॉटम पॅटर्न, डबल टॉप, डबल बॉटम इत्यादी.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये बऱ्याच प्रकारचे इंडिकेटर सुद्धा वापरले जातात त्यावरून मार्केट वर जाणार का खाली जाणार याचा अंदाज बांधला जातो. काही लोकप्रिय इंडिकेटर खालील प्रमाणे.
मुविंग ऍव्हरेज, RSI, CCI, सुपर ट्रेंड इत्यादी.
थोडक्यात सांगायचे झाले तर, टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे भुतकाळात चार्ट वर तयार झालेले पॅटर्न जर वर्तमान काळात सुद्धा तयार झाले तर त्या पॅटर्न वरून मार्केट वर किंवा खाली जाणार याचा अंदाज बांधणे. टेक्निकल ऍनालिसिस हे फक्त टेक्निकल चार्ट पाहून केले जाते त्यामध्ये कंपनीचे फंडामेंटल बघितले जात नाही. टेक्निकल ऍनालिस्ट चा वापर करून आपण इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग आणि लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता.
कॅन्डल म्हणजे काय?
कोणत्याही मार्केटमध्ये टाईम फ्रेम प्रमाणे चार प्रकारच्या किमती पहायला मिळतात.ओपन, हाय, लो आणि क्लोज. जर आपण एका दिवसाची टाईम प्रेम घेतली असेल तर एका दिवसात प्राईज कुठे ओपन झाली, प्राइस ने किती हाय आणि लो बनवला आणि शेवटी ती कुठे क्लोज झाली याचे वर्णन असते. या प्राइस च्या हालचाली टेक्निकल चार्ट मध्ये कॅन्डल स्वरूपात दाखवल्या जातात.
प्राईज जर खाली ओपन होऊन वर क्लोज झाली तर हिरव्या रंगाची कँडल तयार होते आणि प्राईज जर वर ओपन होऊन होऊन खाली क्लोज झाली तर लाल रंगाची कँडल तयार होते.
कॅन्डल चा ओपन आणि क्लोज यामधील भागाला कॅण्डल ची बॉडी म्हटले जाते आणि जर लाल कॅण्डल चे उदाहरण घेतले तर ओपन आणि हाय यामधील भाग एका रेषेच्या स्वरूपात दर्शविला जातो त्याला वीक किंवा शॅडो असे म्हटले जाते.
थोडक्यात काय तर कॅण्डल म्हणजे प्राईस चा ओपन, हाय, लो आणि क्लोज यांची मिळून बनलेली एक दंडगोलाकार आकृती.
कॅन्डल स्टिक पॅटर्न कोण कोणते आहेत?
कॅन्डल स्टिक पॅटर्न हे एक किंवा अधिक कॅण्डल मिळून तयार होतात. या लेखामध्ये आपण सर्व कॅण्डल स्टिक पॅटर्न पाहणार आहोत.
1.हॅमर कॅण्डल - हा पॅटर्न केवळ एकाच कॅण्डल ने तयार होतो आणि तो डाऊन ट्रेंड च्या शेवटी पाहायला मिळतो. जर चार्ट वर हॅमर कॅण्डल दिसली तर त्याचा अर्थ होतो की डाऊन ट्रेंड आता संपलेला आहे आणि ट्रेंड बदलणार आहे.
हॅमर कँडल मध्ये बॉडी ही लहान असून ती वरच्या बाजूला तयार होते. खालच्या बाजूला तयार होणारी शॅडो ही बॉडीच्या च्या कमीतकमी दुप्पट असावी तरच तो एक चांगला हॅमर पॅटर्न मानला जातो.
एन्ट्री कुठे करावी?
जर हॅमर कँडल नंतर एखादी हिरवी कँडल तयार झाली तर त्या कॅन्डल च्या वर बाय एन्ट्री करावी.
2.बुलिश पिअर्सिंग पॅटर्न - हा पॅटर्न दोन कॅन्डल मिळून तयार होतो. सर्वसाधारणपणे बुलिश पिअर्सिंग पॅटर्न हा डाऊन ट्रेंड च्या शेवटी पाहायला मिळतो. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर ट्रेंड बदलण्याची शक्यता असते.
यामध्ये पहिली कॅण्डल लाल असते. त्यानंतर तयार होणारी हिरवी कॅण्डल ही गॅप डाऊन ओपन होते आणि लाल कॅण्डल ची जेवढी बॉडी आहे त्याच्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वर क्लोज होते.
बुलिश पिअर्सिंग पॅटर्न हा एक ट्रेंड बदलणारा महत्त्वाचा सिग्नल मानला जातो.
एन्ट्री कुठे करावी?
हिरव्या कॅन्डल च्या हाय च्यावर एन्ट्री करावी आणि त्याच कॅन्डल च्या लो च्या खाली स्टॉप लॉस लावावा.
3.बुलिश एंगलफिंग- हा डाऊन ट्रेंड नंतर तयार होणारा एक महत्त्वाचा पॅटर्न आहे. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर स्टॉक चा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते.
बुलिश एंगलफिंग मध्ये पहिली कॅण्डल लाल रंगाची असते. त्यानंतर तयार होणारी कॅण्डल हिरव्या रंगाची असते ज्याची बॉडी लाल रंगाच्या कॅण्डलच्या बॉडी पेक्षा मोठी असते आणि ती लाल रंगाच्या कॅण्डल ला पूर्णपणे गिळंकृत करते.
हा पॅटर्न ट्रेडर्स चा सर्वात आवडता पॅटर्न आहे.
एन्ट्री कुठे करावी?
हिरव्या कॅन्डल च्या हाय च्यावर एन्ट्री करावी आणि लाल कॅण्डल च्या लो च्या खाली स्टॉपलॉस लावावा.
4.मॉर्निंग स्टार-हा तीन कॅण्डल चा मिळून बनलेला एक कॅण्डल स्टिक पॅटर्न आहे. हा पॅटर्न डाऊन ट्रेंड च्या शेवटी पाहायला मिळतो आणि तेथून ट्रेंड बदलण्याची शक्यता असते.
यामध्ये पहिली कॅण्डल लाल रंगाची तयार होते त्यानंतर तयार होणारी कॅण्डल ही दोजी कॅण्डल असते आणि तिसरी कॅन्डल हिरव्या रंगाची असते. मधल्या दोजी कॅण्डल ची बॉडी ही उजव्या आणि डाव्या बाजूच्या कॅन्डल च्या बॉडी पेक्षा अलग असते.
एन्ट्री कुठे करावी?
तिसऱ्या हिरव्या कॅण्डल च्या हाय च्यावर इंट्री घ्यावी आणि मधल्या दोजी कॅण्डल च्या खाली स्टॉप लॉस ठेवावा.
5.थ्री व्हाईट सोल्जर्स - हा कॅन्डलस्टिक पॅटर्न हा ३ हिरव्या कॅण्डल चा मिळून बनलेला आहे. या मध्ये प्रत्येक कॅण्डल ची बॉडी हि मोठी असते आणि शॅडो हि कमी असते.
दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅण्डल चे ओपनिंग हे त्याच्या आधीच्या कॅण्डल च्या बॉडी मध्ये होते. डाउनट्रेंड नंतर जर हा कॅन्डलस्टिक पॅटर्न दिसला तर तेथून ट्रेंड बदलण्याची शक्यता असते.
एन्ट्री कुठे करावी?
तिसऱ्या हिरव्या कॅण्डल च्या हाय च्या वर एन्ट्री करावी आणि पहिल्या हिरव्या कॅण्डल च्या लो च्या खाली स्टोपलॉस ठेवावा.
6.बुलिश मारूबोझू - हा कॅन्डलस्टिक पॅटर्न हा फक्त एकाच कॅण्डल चा बनलेला असतो. या मधे शॅडो अजिबात नसते म्हणजेच जो ओपन आहे तोच हाय असतो आणि क्लोज आहे तोच लो असतो. हा पॅटर्न स्टॉक मधील खरेदी दारांची वाढती संख्या दाखवतो.
जर अप ट्रेंड मध्ये असा पॅटर्न दिसला तर तेथून आहे तो ट्रेंड कायम होण्याची शक्यता असते. जर आपण विक्रीच्या बाजूने असाल आणि जर मारूबोझू पॅटर्न दिसला तर तेथून आपण आपली पोसिशन बंद करू शकता.
एन्ट्री कुठे करावी?
मारूबोझू कॅण्डल फक्त ट्रेंड ची मजबुती दर्शवतात. त्यावर सामान्यपणे ट्रेड एन्ट्री घेतली जात नाही. पण जर अपट्रेन्ड मध्ये बुलिश मारूबोझू दिसला आणि त्याचे वोल्युम जर जास्त असतील तर कमी कालावधी साठी बाय एन्ट्री घेऊ शकता. स्टोपलॉस हा मारूबोझू कॅण्डल च्या खाली लावावा.
7.थ्री इंसाईड अप -हा कॅन्डलस्टिक पॅटर्न ३ कॅण्डल चा मिळून बनलेला असतो. हा शक्यतो डाउन ट्रेंड च्या शेवटी दिसून येतो. त्यानंतर ट्रेंड बदलण्याची शक्यता जास्त असते.
या मध्ये एका मोठ्या लाल कॅण्डल नंतर एक छोटी हिरवी कॅण्डल तयार होते जिची बॉडी हि आधीच्या लाल कॅण्डल च्या बॉडी पेक्षा कमी असते. त्या नंतर एक मोठी हिरवी कॅण्डल तयार होते जिचे क्लोजिंग हे आधीच्या दोन्ही कॅण्डल च्या वर असते.
एन्ट्री कुठे करावी?
तिसऱ्या हिरव्या कॅण्डल च्या हाय च्या वर एन्ट्री घेता येते आणि लाल कॅण्डल च्या लो च्या खाली स्टॉप लावला जातो.
8.बुलिश हरामी -हा कॅन्डलस्टिक पॅटर्न दोन कॅण्डल चा मिळून तयार होतो आणि जर तो डाउनट्रेंड नंतर तयार झाला तर तेथून मार्केट चा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते म्हणजेच अपट्रेन्ड चालू होण्याची शक्यता असते.
या मध्ये पहिली कॅण्डल हि लाल रंगाची आणि आकाराने मोठी तयार होते. त्यानंतर एक हिरव्या रंगाची तुलनेने छोटी कॅण्डल तयार होते जिची बॉडी हि लाल कॅण्डल च्या बॉडी ने व्यापून टाकलेली असते. याचाच अर्थ डाउन ट्रेंड नंतर गुंतवणूकदार मार्केट मध्ये परत आले आहेत आणि ते येथून मार्केट वर नेण्याची शक्यता आहे.
एन्ट्री कुठे करावी?
लाल कॅण्डल च्या हाय च्या वर एन्ट्री घ्यावी आणि त्याच कॅण्डल च्या लो च्या खाली स्टॉपलॉस ठेवावा.
9.ट्विझर बॉटम -हा एक बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे जो दोन कॅण्डल मिळून तयार होतो. हा दिसायला चिमट्या सारखा दिसतो म्हणून याला ट्विझर बॉटम असे म्हणतात. साधारणपणे हा पॅटर्न डाउन ट्रेंड च्या शेवटी पाहायला मिळतो आणि तेथून ट्रेंड बदलून तो अपट्रेन्ड मध्ये जातो. हा पॅटर्न सहजी सहजी पाहायला मिळत नाही पण जेंव्हा जेंव्हा तयार होतो तेव्हा मार्केट चा ट्रेंड बदलतो.
या प्रकारात दोन कॅण्डल चा लो हा सारखाच किंवा जवळ जवळ सारखा असतो. हा पॅटर्न जर सपोर्ट जवळ तयार झाला तर तो चालण्याची शक्यता खूपच वाढते.
एन्ट्री कुठे करावी?
या प्रकारात दोन कॅण्डल चा लो हा सारखाच किंवा जवळ जवळ सारखा असतो. हा पॅटर्न जर सपोर्ट जवळ तयार झाला तर तो चालण्याची शक्यता खूपच वाढते.
लाल आणि हिरव्या कॅण्डल चा बॉटम सारखाच असेल तर हिरव्या कॅण्डल च्या हाय च्या वर एन्ट्री घ्यावी आणि त्याच कॅण्डल च्या लो च्या खाली स्टोपलॉस लावावा.
10.इन्व्हर्टेड हॅमर -हि साधारण डाउन ट्रेंडच्या शेवटी तयार होते आणि तेथून मार्केट चा ट्रेंड बदलण्याची शक्यता असते. हा एकाच कॅण्डल ने बनलेला कॅन्डलस्टिक पॅटर्न असून याची बॉडी हि याच्या तळाशी असते आणि वरच्या बाजूला लांब शॅडो तयार होते जी बॉडी च्या कमीत कमी दुप्पट लांबीची असते.
एन्ट्री कुठे करावी?
इन्व्हर्टेड हॅमर तयार झाल्या नंतर पुढची कॅन्डल हिरव्या रंगाची असावी. त्या कॅण्डल च्या हाय च्या वर आपण खरेदी करू शकता. स्टॉप लॉस हा हॅमर कॅण्डल च्या लो च्या खाली लावावा.
11.थ्री आउटसाईड अप - हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तीन कॅण्डल चा मिळून तयार होतो. हा पॅटर्न जर डाउन ट्रेंड च्या शेवटी तयार झाला तर तेथून मार्केट चा ट्रेंड बदलतो आणि ते वर जाऊ लागते.
या प्रकारात बुलिश एंगलफिंग कॅण्डल पॅटर्न नंतर जर एखादी हिरवी कॅण्डल तयार झाली जिचे क्लोजिंग आधीच्या दोन्ही कॅण्डल च्या वरती असेल तर हा पॅटर्न कन्फर्म होतो.
एन्ट्री कुठे करावी?
थ्री आउटसाईड अप मध्ये आपण तिसऱ्या हिरव्या कॅण्डल च्या वरती एन्ट्री घेऊ शकता आणि तीन पैकी ज्या कॅण्डल चा लो सर्वात कमी असेल त्या कॅण्डल च्या लो च्या खाली स्टॉप लॉस लावू शकता.
12.ऑन नेक पॅटर्न -हा कॅन्डलस्टिक पॅटर्न डाउन ट्रेंड च्या शेवटी पाहायला मिळतो आणि त्या नंतर ट्रेंड मध्ये बदल होऊन तो वरच्या दिशेला जातो.
या प्रकारात पहिली कॅण्डल हि लाल तयार होते त्यानंतर तयार होणारी हिरवी कॅण्डल हि गॅप डाउन ओपन होऊन आधीच्या लाल कॅण्डल च्या क्लोजिंग जवळपास क्लोज होते. या मध्ये दोन्ही कॅण्डल च्या क्लोजिंग प्राईस सारख्याच असतात.
एन्ट्री कुठे करावी?
हा पॅटर्न ट्रेड करताना हिरव्या कॅण्डल नंतर आणखी एक हिरवी कॅण्डल तयार होण्याची वाट पाहावी आणि त्या कॅण्डल च्या हाय च्या वर खरेदीची एन्ट्री घ्यावी. तीन कॅण्डल पैकी ज्या कॅण्डल चा लो सर्वात कमी आहे त्या खाली स्टॉप लॉस ठेवावा.
13.हँगिंग मॅन - हा बीअरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे म्हणजेच जर अप ट्रेंड मधे जर हा पॅटर्न आढळून आला तर स्टॉक तेथून खाली जाण्याची शक्यता असते.
हा कॅन्डलस्टिक पॅटर्न फक्त एकाच कॅण्डल चा बनलेला आहे. या प्रकारात वरच्या बाजूला एक छोटी बॉडी आढळून येते ज्याची शॅडो बॉडी च्या जवळ जवळ दुप्पट असते. हा एक प्रचलित कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
हा बेरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे म्हणजेच जर अप ट्रेंड मधे जर हा पॅटर्न आढळून आला तर स्टॉक तेथून खाली जाण्याची शक्यता असते. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न फक्त एकाच कॅण्डल चा बनलेला आहे. या प्रकारात वरच्या बाजूला एक छोटी बॉडी आढळून येते ज्याची शॅडो बॉडी च्या जवळ जवळ दुप्पट असते. हा एक प्रचलित कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे.
एन्ट्री कुठे करावी?
हँगिंग मॅन पॅटर्न दिसल्यानंतर लगेचच ट्रेड घेण्याची घाई करू नये. हँगिंग मॅन नंतर जर एखादी लाल रंगाची कॅण्डल तयार झाली तर त्या खाली सेल एन्ट्री घेतली जाऊ शकते. स्टॉप लॉस हा हँगिंग मॅन च्या हाय च्या वर ठेवावा.
14.डार्क क्लाऊड कव्हर - हा अपट्रेन्ड नंतर आढळणारा आणि सर्वात अचूक असा कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा पॅटर्न तयार झाल्यानंतर अप ट्रेंड समाप्त होऊन डाउन ट्रेंड चालू होतो.
या प्रकारात बऱ्याच हिरव्या कॅण्डल नंतर एक लाल कॅण्डल तयार होते जी तिच्या आधीच्या हिरव्या कॅण्डल च्या हाय च्या वर ओपन होते आणि हिरव्या कॅण्डल च्या ५०% बॉडी च्या खाली क्लोज होते. हा एक सर्वात जास्त ट्रेड केला जाणार पॅटर्न आहे.
एन्ट्री कुठे करावी?
डार्क क्लाऊड कव्हर पॅटर्न तयार झाल्यानंतर लाल कॅण्डल चे वोल्युम पाहावे. जर ते हिरव्या कॅण्डल च्या वोल्युम पेक्षा जास्त असतील तर लाल कॅण्डल च्या खाली सेल एन्ट्री घेता येते आणि त्याच कॅण्डल च्या हाय च्या वर स्टॉप लॉस लावता येतो.
15.बीअरिश एंगलफिंग - जगभरातील ट्रेडर्स च्या आवडत्या पॅटर्न पैकी हा एक पॅटर्न. याची अचूकता इतर कोणत्याही कॅन्डलस्टिक पॅटर्न पेक्षा जास्त आहे.
हा पॅटर्न २ कॅण्डल चा मिळून तयार होतो. या मध्ये पहिली कॅण्डल हि हिरव्या रंगाची तयार होते पण त्यानंतर तयार होणारी लाल कॅण्डल आधीच्या हिरव्या कॅण्डल ला पूर्णपणे व्यापून टाकते. या मधे साधारणतः फक्त बॉडी व्यापली गेली पाहिजे. शॅडो किंवा वीक बाहेर असल्या तरी चालतात.
हा पॅटर्न अपट्रेन्ड नंतर आढळून येतो आणि त्या नंतर सेलर्स मार्केट मध्ये एन्ट्री करून मार्केट ला खाली घेऊन जातात.
एन्ट्री कुठे करावी?
या प्रकारात लाल कॅण्डल च्या खाली सेल एन्ट्री घेता येऊ शकते आणि त्याच कॅण्डल च्या वर स्टॉप लॉस लावला जातो.
16.इव्हनिंग स्टार - हा कॅन्डलिस्टक पॅटर्न तीन कॅण्डल पासून बनलेला असून अप ट्रेंड च्या शेवटी शेवटी तयार होतो. त्या नंतर मार्केट चा ट्रेंड बदलून ते खाली यायला सुरुवात होते. या मधे पहिली कॅण्डल हिरवी असते जी मार्केट मधील तेजी दाखवते त्यानंतर एक दोजी कॅण्डल तयार होते जी अनिर्णित अवस्था दाखवते साधारणपणे हि दोजी कॅण्डल गॅप अप ओपन होते.
त्यानंतर एक लाल कॅण्डल तयार होते जिची बॉडी हि आधीच्या हिरव्या कॅण्डल पेक्षा मोठी असते. इव्हनिंग स्टार हा एक पॉवरफुल पॅटर्न मानला जातो.
एन्ट्री कुठे करावी?
या प्रकारात सेल एन्ट्री घेताना शेवटच्या लाल कॅण्डल च्या लो खाली आपली सेल ऑर्डर लावावी आणि दोजी कॅण्डल च्या वरचा स्टॉप लॉस ठेवावा.
17.थ्री ब्लॅक क्रो - हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तीन कॅण्डल चा मिळून बनलेला असतो आणि अप ट्रेंड नंतर दिसून येतो. त्यानंतर सेलर्स मार्केट मध्ये एन्ट्री घेतात आणि मार्केट ला खाली घेऊन जातात म्हणजेच ट्रेंड मध्ये बदल होतो.
या मध्ये तीन मोठ्या लाल कॅण्डल तयार होतात ज्यांची बॉडी मोठी असते आणि शॅडो तुलनेत खूप कमी असते. दुसऱ्या आणि तिसऱ्या कॅण्डल ची ओपनिंग हि त्याच्या आधीच्या कॅण्डल च्या बॉडी मध्ये होते.
एन्ट्री कुठे करावी?
थ्री ब्लॅक क्रो कॅन्डलस्टिक पॅटर्न ट्रेड करताना तिसऱ्या कॅण्डल च्या खाली सेल एन्ट्री घ्यावी आणि पहिल्या लाल कॅण्डल च्या वर स्टॉप लॉस लावावा. या प्रकारात स्टॉप लॉस थोडा मोठा असतो त्यामुळे पोझिशन साईझिंग मध्ये बदल करून एन्ट्री घ्यावी.
18.बीअरिश मारूबोझू - हा कॅन्डलस्टिक पॅटर्न एकाच लाल कॅण्डल ने बनलेला असतो. या कॅण्डल ला कोठेही शॅडो नसते. हा पॅटर्न जर अपट्रेन्ड मध्ये दिसून आला तर तेथून ट्रेंड बदलण्याची शक्यता असते कारण हि कॅण्डल मार्केट मधील विक्रीचा दबाब दर्शवते.
ज्या वेळी मोठे इन्वेस्टर्स आपल्या पोझिशन सेल करतात त्या वेळी हा पॅटर्न दिसून येतो आणि रिटेल इन्वेस्टर्स त्यांना फॉलो करत असल्याने विक्रीचा दबाव आणखी वाढून मार्केट खाली येते.
एन्ट्री कुठे करावी?
अपट्रेन्ड मध्ये ज्या वेळी मार्केट ओव्हरबॉट कंडिशन मध्ये असते त्या वेळी जर बीअरिश मारूबोझू दिसून आला तर त्याखाली सेल ऑर्डर लावू शकता आणि त्याच कॅण्डल च्या वरती स्टोपलॉस ठेऊ शकता.
19.थ्री इंसाईड डाउन - तीन कॅण्डल पासून तयार होणार हा पॅटर्न अपट्रेन्ड समाप्त होऊन डाउन ट्रेंड चालू झाल्याची लक्षणे दाखवतो.
या प्रकारात अपट्रेन्ड मध्ये एक मोठी हिरवी कॅण्डल तयार होते त्या नंतर एक छोटी लाल कॅण्डल हिरव्या कॅण्डल च्या बॉडी च्या मध्ये तयार होऊन बेरिश हरामी पॅटर्न तयार होतो. त्यानंतर तयार होणारी तिसरी लाल कॅण्डल आधीच्या दोन्ही कॅण्डल च्या लो च्या खाली क्लोज होते आणि तेथून मार्केट खाली जाते.
एन्ट्री कुठे करावी?
थ्री इंसाईड डाउन पॅटर्न ट्रेड करताना तिसऱ्या लाल कॅण्डलच्या लो च्या खाली एन्ट्री घ्यावी आणि तीन पैकी जी सर्वात मोठी कॅण्डल असेल त्या कॅण्डल च्या हाय च्या वर स्टॉप लॉस लावावा.
20.बीअरिश हरामी हा कॅन्डलस्टिक पॅटर्न २ कॅण्डल मिळून तयार होतो. सर्वसाधारणपणे हा पॅटर्न अप ट्रेंड च्या शेवटी तयार होतो आणि तेथून मार्केट खाली येण्याची शक्यता असते.
या मध्ये सुरुवातीला मोठी हिरवी कॅण्डल तयार होते. त्या नंतर एक छोटी लाल कॅण्डल तयार होते जिची बॉडी हि आधीच्या हिरव्या कॅण्डल च्या आत मध्ये असते. याचा अर्थ अपट्रेन्ड आता संपलेला असून ज्यांनी लॉन्ग पोझिशन घेतल्या होत्या ते आता प्रॉफिट बुक करत आहेत आणि मार्केट मध्ये सेलर्स ची एन्ट्री होत आहे.
एन्ट्री कुठे करावी?
बेरिश हरामी पॅटर्न मध्ये जर एखाद्या लाल कॅण्डल ने पहिल्या हिरव्या कॅण्डल चा लो ब्रेक केला केला तर त्या कॅण्डल खाली सेल एन्ट्री घेऊ शकता आणि या पैकी जी सर्वात मोठी कॅण्डल असेल त्या कॅण्डल च्या हाय च्या वर स्टॉप लॉस लावला जाऊ शकतो.
21.शूटिंग स्टार - हा एक अचूक बीअरिश रेव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा अपट्रेन्ड च्या शेवटी तयार होतो आणि तेथून डाउन ट्रेंड चालू होतो. हा पॅटर्न फक्त एकाच कॅण्डल चा बनलेला आहे.
या मध्ये किंमत आधीच्या हिरव्या कॅण्डल च्या वर जाते पण नंतर सेलर विक्रीचा मारा करून तिला खाली ढकलतात त्या मुळे वरच्या बाजूला एक मोठी शॅडो तयार होते. शूटिंग स्टार मध्ये शॅडो हि कॅण्डल च्या बॉडी च्या कमीत कमी दुप्पट असली पाहिजे.
एन्ट्री कुठे करावी?
शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाल्यानंतर लगेच एन्ट्री न करता अजून एक लाल रंगाची कॅण्डल तयार होण्याची वाट पाहावी आणि त्या कॅण्डल च्या लो खाली सेल एन्ट्री लावली. शूटिंग स्टार च्या हाय च्या वर स्टॉप लॉस लावावा.
22.ट्विझर टॉप -हा अपट्रेन्ड च्या शेवटी आढळून येणार एक बीअरिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. इतर पॅटर्न च्या तुलनेत हा फारसा आढळून येत नाही पण जेंव्हा आढळतो तेव्हा तो अचूकपने काम करतो.
हा पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट चा ट्रेन्ड बदलून ते खाली जायला सुरुवात होते.
हा पॅटर्न दोन कॅण्डल चा मिळून तयार होतो ज्या मध्ये दोन्ही कॅण्डल चा हाय सारखाच असतो पण दुसऱ्या कॅण्डल ची बॉडी पहिल्या कॅण्डल च्या बॉडी पेक्षा मोठी असते.
एन्ट्री कुठे करावी?
ट्विझर टॉप मध्ये दुसऱ्या लाल कॅण्डल च्या लो च्या खाली एन्ट्री घेतली जाते आणि त्याच कॅण्डल च्या हाय च्या वर स्टॉप लॉस लावला जाऊ शकतो.
23.थ्री आऊटसाईड डाउन -हा कॅन्डलस्टिक पॅटर्न तीन कॅण्डल पासून तयार होतो. हा अपट्रेन्ड च्या शेवटी आढळून येतो आणि तेथून ट्रेंड बदलण्यास सुरुवात होते.
या प्रकारात सुरुवातीला एक हिरव्या रंगाची कॅण्डल तयार होते. त्यानंतर एक लाल रंगाची कॅण्डल तयार होऊन ती हिरव्या कॅण्डल च्या बॉडी ला पूर्णपणे व्यापून टाकते म्हणजेच बीअरिश एंगलफिंग पॅटर्न तयार होतो. त्यानंतर आणि एक लाल रंगाची कन्फर्मेशन कॅण्डल तयार होते जी आधीच्या दोन्ही कॅण्डल च्या लो च्या खाली क्लोज होते.
एन्ट्री कुठे करावी?
थ्री आऊटसाईड डाउन मध्ये शेवटच्या लाल कॅण्डल च्या लो खाली सेल एन्ट्री घेता येते आणि तीन पैकी ज्या कॅण्डल चा हाय सर्वात जास्त आहे त्या कॅण्डल च्या वर स्टॉप लॉस लावता येतो.
24.दोजी -हा एक सर्रास आढळून येणार आणि शक्यतो ट्रेंड बदलणारा पॅटर्न आहे. ज्या वेळी अपट्रेन्ड किंवा डाउनट्रेंड चा शेवट होण्याच्या मार्गावर असतो त्यावेळी दोजी कॅण्डल तयार होतात.
या मधे बायर आणि सेलर मध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे दोजी कॅण्डल ची ओपन प्राईस आणि क्लोज प्राईस हि सारखीच असते. हि एक अनिर्णित अवस्था मानली जाते.
एन्ट्री कुठे करावी?
जर आपण एखादा स्टॉक खरेदी केला असेल आणि चार्ट मध्ये जर दोजी कॅण्डल दिसू लागल्या तर विक्री करून बाहेर पडणे हिताचे ठरते कारण येथून ट्रेंड बदलण्याची शक्यता खूप जास्त असते.
दोजी कॅण्डल अपट्रेन्ड आणि डाउनट्रेंड दोन्ही मध्ये तयार होतात आणि ट्रेंड बदलण्याचे काम करतात.
25.स्पिनिंग टॉप - दोजी कॅण्डल प्रमाणेच स्पिनिंग टॉप हा मार्केट मधील अनिर्णित अवस्था दर्शवतो. या मध्ये बायर आणि सेलर हे दोन्ही संभ्रमावस्थेत असतात. स्पिनिंग टॉप नंतर शक्यतो आहे तोच ट्रेंड कायम राहतो.
या मध्ये कॅण्डल ची बॉडी हि दोजी कॅण्डल च्या बॉडी पेक्षा मोठी असते आणि दोन्ही बाजूला सामान शॅडो असते.
एन्ट्री कुठे करावी?
फक्त स्पिनिंग टॉप पाहून खरेदी किंवा विक्रीचे निर्णय घेता येत नाहीत. जर स्पिनिंग टॉप नंतर जर एखादी लाल किंवा हिरव्या रंगाची कॅण्डल तयार झाली तर मार्केट त्या दिशेने जाण्याची शक्यता असते.
पण जर सध्याचा ट्रेंड अप असेल तर मार्केट वर जाण्याची शक्यता जास्त असते.
26.फॉलिंग थ्री मेथड्स -हा एक ट्रेंड कायम करणारा पॅटर्न आहे. या प्रकारात सध्याच्या डाउन ट्रेंड मध्ये तात्पुरती स्थगिती येते पण आहे तोच ट्रेंड कायम राहतो.
हा कॅन्डलस्टिक पॅटर्न पाच कॅण्डल चा मिळून तयार होतो. या मध्ये सुरुवातील एक मोठी लाल रंगाची कॅण्डल तयार होते त्या नंतर तीन लहान लहान हिरव्या रंगाच्या कॅण्डल तयार होतात ज्यांची बॉडी हि आधीच्या लाल रंगाच्या कॅण्डल चा आतमध्येच असते.
त्या नंतर परत एक लाल रंगाची मोठी कॅण्डल तयार होते जी मागच्या चार कॅण्डल चा लो ब्रेक करून खाली क्लोज होते.
एन्ट्री कुठे करावी?
शेवटच्या लाल कॅण्डल नंतर सेल एन्ट्री घेता येऊ शकते आणि पहिल्या लाल कॅन्डल च्या हाय च्या वर स्टॉप लॉस लावला जातो.
27.रायसिंग थ्री मेथड्स - हा सुद्धा एक ट्रेंड कायम करणारा पॅटर्न आहे. या प्रकारात सध्याच्या अप ट्रेंड मध्ये तात्पुरती स्थगिती येते पण आहे तोच ट्रेंड कायम राहतो.
हा कॅन्डलस्टिक पॅटर्न पाच कॅण्डल चा मिळून तयार होतो. या मध्ये सुरुवातील एक मोठी हिरव्या रंगाची कॅण्डल तयार होते त्या नंतर तीन लहान लहान लाल रंगाच्या कॅण्डल तयार होतात ज्यांची बॉडी हि आधीच्या हिरव्या रंगाच्या कॅण्डल चा आतमध्येच असते.
त्या नंतर परत एक हिरव्या रंगाची मोठी कॅण्डल तयार होते जी मागच्या चार कॅण्डल चा हाय ब्रेक करून वर क्लोज होते.
एन्ट्री कुठे करावी?
शेवटच्या हिरव्या कॅण्डल नंतर बाय एन्ट्री घेता येऊ शकते आणि पहिल्या हिरव्या कॅन्डल च्या लो च्या खाली स्टॉप लॉस लावला जातो.
28.बुलिश तासूकी गॅप -हा एक अपट्रेन्ड कायम करणारा पॅटर्न आहे. या मध्ये सध्याच्या अपट्रेन्ड मध्ये तात्पुरती स्थिगिती येते पण त्यानंतर मात्र आहे तोच ट्रेंड कायम होतो.
हा पॅटर्न तीन कॅन्डलस्टिक चा मिळून तयार होतो यात पहिली कॅण्डल हिरव्या रंगाची तयार होते ज्याची बॉडी हि मोठी असते. दुसरी हिरवी कॅण्डल हि गॅप अप ओपन होते आणि ती सुद्धा आकाराने मोठी असते.
तिसरी कॅण्डल लाल रंगाची तयार होते आणि आधीच्या दोन कॅण्डल मधील गॅप भरून काढते. त्यानंतर खरेदीदार पुन्हा सक्रिय होऊन मार्केट ला वर घेऊन जातात.
एन्ट्री कुठे करावी?
जर शेवटच्या लाल कॅण्डल नंतर जर आणखी एक हिरवी कॅण्डल तयार झाली तर त्या कॅण्डल च्या वर बे एन्ट्री घेता येते आणि लाल कॅण्डल च्या खाली स्टॉप लॉस ठेवता येतो.
29.बीअरिश तासूकी गॅप -हा एक डाउनट्रेंड कायम करणारा पॅटर्न आहे. या मध्ये सध्याच्या डाउनट्रेंड मध्ये तात्पुरती स्थिगिती येते पण त्यानंतर मात्र आहे तोच ट्रेंड कायम होतो.
हा पॅटर्न तीन कॅन्डलस्टिक चा मिळून तयार होतो यात पहिली कॅण्डल लाल रंगाची तयार होते ज्याची बॉडी हि मोठी असते.
दुसरी लाल कॅण्डल हि गॅपडाउन ओपन होते आणि ती सुद्धा आकाराने मोठी असते. तिसरी कॅण्डल हिरव्या रंगाची तयार होते आणि आधीच्या दोन कॅण्डल मधील गॅप भरून काढते. त्यानंतर सेलर पुन्हा सक्रिय होऊन मार्केट ला खाली घेऊन जातात.
एन्ट्री कुठे करावी?
जर शेवटच्या हिरव्या कॅण्डल नंतर जर आणखी एक लाल कॅण्डल तयार झाली तर त्या कॅण्डल च्या खाली सेल एन्ट्री घेता येते आणि हिरव्या कॅण्डल च्या वर स्टोपलॉस ठेवता येतो.
चार्ट पॅटर्न म्हणजे काय?
या आकारांना चार्ट पॅटर्न म्हटले जाते. जर चार्ट पॅटर्न बुलिश असेल तर मार्केट वर जाते आणि चार्ट पॅटर्न बीअरिश असेल तर मार्केट खाली येते.
टेक्निकल एनालिसिस मध्ये चार्ट पॅटर्न ला अनन्य साधारण महत्व आहे. ज्या प्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होते त्याच प्रमाणे भूतकाळात तयार झालेले चार्ट पॅटर्न पुन्हा पुन्हा तयार होतात.
असे पॅटर्न पाहून बरेच लोक खरेदी किंवा विक्री करतात त्यामुळे मार्केट वर खरेदीचा किंवा विक्रीचा दबाव वाढून मार्केट वर किंवा खाली जाते. स्टॉक मार्केट मध्ये नफा कमावण्यासाठी अशा चार्ट पॅटर्न चा अभ्यास फायदेशीर ठरतो.
कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न आणि फंडामेंटल ऍनालिसिस यांची जर योग्य सांगड घातली तर मार्केट मध्ये नफा मिळण्याची शक्यता कितीतरी पटींनी वाढते.
पुढच्या लेखा मध्ये आपण सर्व चार्ट पॅटर्न बद्दल अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे. .
चार्ट पॅटर्न कोण कोणते आहेत?
1.पेंनंट पॅटर्न (Pennant Pattern)-पेंनंट म्हणजे बावटा (एक प्रकारचा झेंडा). ज्या वेळी मार्केट ट्रेंड मध्ये असते, त्या वेळी थोड्या कालावधीसाठी ट्रेंड थांबतो आणि मार्केट थोडेसे खाली येते याला कॉन्सॉलिडेशन फेज असे म्हटले जाते.
जसे मार्केट वर जाताना हायर लो बनवत वर जाते तसेच ते खाली येताना लोवर हाय बनवत खाली येते. खाली येणाऱ्या मार्केट चे जर हाय आणि लो पॉईंट जर जोडले तर त्याचा आकार पेंनंट प्रमाणे दिसतो म्हणून या पॅटर्न ला पेंनंट पॅटर्न असे म्हणतात.
ज्या वेळी मार्केट ट्रेंड मध्ये असते त्या वेळी वोल्युम ची संख्या जास्त असते पण कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये वोल्युम ची संख्या खूप कमी होते. कॉन्सॉलिडेशन फेज पूर्ण झाल्यानंतर मार्केट वरच्या दिशेने ब्रेक आऊट देते आणि वोल्युम ची संख्या परत वाढते.
एन्ट्री कुठे करावी?
पेंनंट पॅटर्न ची वरची ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर एन्ट्री घेऊ शकता आणि जवळच्या स्विंग लो खाली स्टोपलॉस लावू शकता.
2.कप विथ हॅन्डल पॅटर्न (Cup with handle pattern)-या प्रकारात अपट्रेन्ड नंतर मार्केट काही कालावधीसाठी एक रेंज मध्ये असते. सुरुवातीला ते हळूहळू खाली येऊ लागते आणि नंतर हळूहळू वर जाऊ लागते त्यामुळे एक गोलाकार आकार तयार होतो. त्यानंतर मार्केट परत थोडेसे खाली येते आणि जसा कप आणि त्याचा दांडा दिसतो त्या प्रमाणे आकार तयार होतो.
हा चार्ट पॅटर्न खूप कमी वेळा तयार होतो पण जेंव्हा जेंव्हा तयार होतो तेंव्हा मोठा नफा देऊन जातो.
एन्ट्री कुठे करावी?
वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जर कप आणि हॅन्डल ची वरची लाईन ब्रेक करून मार्केट वर गेले तर एन्ट्री घेऊ शकता. जवळच्या स्विंग खाली स्टॉप लॉस ठेवता येतो.
3.असेंडिंग ट्रँगल(Ascending Triangle)-हा एक बुलिश चार्ट पॅटर्न आहे आणि तो बुलिश ट्रेंड कायम करण्याचे काम करतो. ज्या वेळी मार्केट अपट्रेन्ड मध्ये असते त्या वेळी ते काही काळासाठी कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये येते.
या फेज मध्ये मार्केट जे हाय बनवते ते सारख्याच उंचीचे असतात पण जे लो बनतात ते हायर लो बनतात आणि वरच्या बाजूला एक निमुळता आकार तयार होतो. बऱ्याच वेळा या प्रकारात आहे तोच अप ट्रेंड कायम होतो पण कधी कधी जर खालची ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर ट्रेंड मध्ये बदल होऊन मार्केट खाली येऊ लागते.
एन्ट्री कुठे करावी?
असेंडिंग ट्रँगल मध्ये एन्ट्री करताना जेंव्हा कॉन्सॉलिडेशन फेज ची वरची ट्रेन्डलाईन ब्रेक होते तेंव्हा एन्ट्री करावी आणि जवळच्या स्विंग लो खाली स्टॉप लॉस लावावा.
4.ट्रिपल बॉटम -(Triple Bottom)-हा एक ट्रेंड बदलणारा चार्ट पॅटर्न आहे. ज्या वेळी मार्केट डाउन ट्रेंड मधे असते त्या वेळी ते एका ठिकाणी सपोर्ट घेऊन परत वर जाऊ लागते. थोडेसे वर गेल्यानंतर ते पुन्हा खाली येते आणि त्याच ठिकाणावरून परत वर जाऊ लागते ज्या ठिकाणावरून ते आधी वर गेले होते. त्यानंतर ते परत खाली येऊन पुन्हा त्याच ठिकाणावरून वर जाते या मुळे ट्रिपल बॉटम चार्ट पॅटर्न तयार होतो.
ट्रिपल बॉटम नंतर डाउन ट्रेंड समाप्त होऊन अपट्रेन्ड चालू होतो.
एन्ट्री कुठे करावी?
ज्या वेळी शेवटचा स्विंग हाय वरच्या बाजूने ब्रेक होतो त्यावेळी एन्ट्री घ्यावी आणि ट्रिपल बॉटम च्या खाली स्टॉप लॉस लावावा.
5. डिसेंडिंग ट्रँगल(Descending Triangle) - हा डाउनट्रेंड कायम करणारा एक बीअरिश चार्ट पॅटर्न आहे. ज्या वेळी मार्केट डाउन ट्रेंड मध्ये असते त्या वेळी ते काही काळासाठी कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये जाते म्हणजेच थोडेसे वर जाऊन स्विंग हाय आणि स्विंग लो बनवते.
जर हे स्विंग हाय आणि स्विंग लो ट्रेंड लाईन ने जोडले तर डिसेंडिंग ट्रँगल तयार होतो. या मध्ये लो हे सारखेच असतात पण हाय हे लोवर हाय तयार होतात आणि खालच्या बाजूला एक निमुळता आकार तयार होतो. ज्या वेळी खालच्या बाजूची ट्रेंड लाईन ब्रेक होते त्या वेळी मार्केट मधे एक मोठा डाउन फॉल येण्याची शक्यता असते.
एन्ट्री कुठे करावी?
कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये खालची ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर सेल एन्ट्री घेऊ शकता. जवळच्या स्विंग हाय च्या वर स्टॉप लॉस लावता येतो.
6.इन्व्हर्स हेड अँड शोल्डर (Inverse head and shoulder) - हा हेड अँड शोल्डर पॅटर्न उलट असल्यामुळे याला इन्व्हर्स हेड अँड शोल्डर असे म्हटले जाते. हा एक ट्रेंड बदलणारा चार्ट पॅटर्न आहे.
ज्यावेळी मार्केट डाउन ट्रेंड मध्ये असते त्या वेळी एक ठिकाणी सपोर्ट घेऊन ते थोडेसे वर जाते. त्यानंतर ते परत खाली येऊन आधीच्या स्विंग चा लो ब्रेक करते. परत ते एका ठिकाणी सपोर्ट घेऊन वर जाते आणि परत खाली येऊन अजून एक स्विंग तयार करते. या शेवटच्या स्विंग चा जर हाय ब्रेक झाला तर मार्केट वेगाने वरच्या दिशेने जाऊ लागते. हे सर्व स्विंग मिळून हेड आणि शोल्डर (डोके आणि खांदे) सारखा आकार तयार होतो. हा एक सर्वात प्रचलित असा पॅटर्न आहे.
एन्ट्री कुठे करावी?
शेवटचा स्विंग ज्या वेळी वरच्या दिशेने ब्रेक होतो त्या वेळी मार्केट मध्ये बाय एन्ट्री घेता येते आणि जवळच्या स्विंग लो खाली स्टॉप लॉस ठेवता येतो.
7. बुलिश सिमेट्रिक ट्रँगल(Bullish Symmetric Triangle) - हा चार्ट पॅटर्न ओळखण्यास अत्यंत सोपा असतो. हा एक ट्रेंड कायम करणारा पॅटर्न आहे. मार्केट मध्ये जर अपट्रेन्ड चालू असेल तर काही कालावधीसाठी मार्केट कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये जाते म्हणजेच थोडेसे खाली येते.
खाली येताना ते वरच्या बाजूने लोवर हाय बनवते आणि खालच्या बाजूने हायर लो बनवते. हे सर्व हाय आणि लो जर ट्रेन्डलाईन ने जोडले तर एक त्रिकोण तयार होतो यालाच सिमेट्रिक ट्रँगल असे म्हणतात.
एन्ट्री कुठे करावी?
सिमेट्रिक ट्रँगल ची वरच्या बाजूची ट्रेन्डलाईन जेंव्हा ब्रेक होते तेंव्हा एन्ट्री घेतली जाते आणि जवळच्या स्विंग लो खाली स्टॉप लॉस ठेवला जातो.
8. राऊंडिंग बॉटम(Rounding Bottom)- हा तुलनेने कमी वेळा आढळणारा पण भरपूर नफा मिळवून देणारा पॅटर्न आहे.
या प्रकारात स्टॉक वर्षानु वर्ष एकाच रेंज मध्ये असतो पण तो ज्या वेळी हि रेंज ब्रेक करतो त्यावेळी तो स्टॉक मल्टिबॅगर होण्याची शक्यता असते. कारण हा पॅटर्न पाहून बरेच ट्रेडर्स आणि मोठे मोठे इन्वेस्टर्स या मध्ये एन्ट्री करतात आणि स्टॉक ला वर घेऊन जातात.
हा पॅटर्न कप आणि हॅन्डल सारखाच आहे पण यात हॅन्डल नसतो. इंट्राडे मधे हा पॅटर्न ट्रेड करू नये.
एन्ट्री कुठे करावी?
राऊंडिंग बॉटम पॅटर्न ची वरची रेंज ब्रेक झाल्यावर बाय एन्ट्री घ्यावी आणि जवळच्या स्विंग लो खाली स्टोपलॉस लावला.
9.फ्लॅग पॅटर्न (Flag Pattern) -ट्रेडर्स मध्ये सर्वात लोकप्रिय असणाऱ्या पॅटर्न पैकी हा एक पॅटर्न आहे. हा एक ट्रेंड कायम करणारा पॅटर्न असून एका मोठया अपट्रेन्ड नंतर पाहायला मिळतो.
अपट्रेन्ड नंतर येणाऱ्या कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये मार्केट लोवर हाय आणि लोवर लो तयार करते. हे सर्व लो आणि हाय जोडले तर एक झेंड्या प्रमाणे आयत आकृती तयार होते आणि मागच्या अपट्रेन्ड मधल्या कॅण्डल्स मिळून या झेंड्याचा खांब तयार होतो. फ्लॅग पॅटर्न ब्रेक झाल्यानंतर जेवढी खांबाची लांबी आहे तेवढे टार्गेट मिळू शकते.
एन्ट्री कुठे करावी?
कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये वरच्या बाजूची ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर एन्ट्री करावी आणि जवळच्या स्विंग लो च्या खाली स्टॉप लॉस लावावा.
10.डबल टॉप (Double Top)-चार्ट पॅटर्न मध्ये हा सर्वात जास्त आढळून येणार पॅटर्न आहे. डबल टॉप चार्ट पॅटर्न हा बीअरिश रिव्हर्सल पॅटर्न म्हणून ओळखला जातो. हा पॅटर्न अपट्रेन्ड च्या शेवटी दिसून येतो आणि तेथून ट्रेंड मध्ये बदल होतो.
अपट्रेन्ड मध्ये एक कॉन्सॉलिडेशन फेज येऊन मार्केट थोडेसे खाली येते आणि नंतर पुन्हा वर जाऊ लागते. आधी ज्या ठिकाणावरून मार्केट खाली आले होते त्या ठिकाणी गेल्यानंतर ते परत खाली येऊ लागते आणि डबल टॉप चार्ट पॅटर्न तयार होतो.
एन्ट्री कुठे करावी?
या पॅटर्न मध्ये दोन ठिकाणी एन्ट्री घेता येते. दुसरा टॉप बनवून मार्केट जेंव्हा खाली येते तेंव्हा कॅण्डल चे लोवर लो फॉर्मशन पाहावे आणि त्या खाली एन्ट्री घ्यावी. हे लोवर लो फॉर्मशन एक हिरवी आणि एक लाल किंवा दोन्ही लाल कॅण्डल चे असू शकते. अशा एन्ट्री ला अर्ली एन्ट्री असे म्हटले जाते.
या उलट सेफ एन्ट्री मध्ये वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे ज्या वेळी स्विंग पॉईंट ब्रेक होतो त्या वेळी एन्ट्री घेतली जाते. या एन्ट्री मध्ये स्टॉप लॉस हिट होण्याचा धोका पहिल्या एन्ट्री च्या तुलनेने कमी असतो.
11.बीअरिश सिमेट्रिक ट्रँगल(Bearish Symmetric Triangle) -या प्रकारात आहे तोच डाउनट्रेंड कायम होतो. एका मोठया डाउनट्रेंड नंतर एक कॉन्सॉलिडिशन फेज येतो म्हणजेच मार्केट थोडेसे वर जाते. वर जाताना ते लोवर हाय आणि हायर लो स्विंग तयार करत जाते.
जर हे सारे स्विंग एकमेकाना जोडले तर बीअरिश सिमेट्रिक ट्रँगल तयार होतो.
एन्ट्री कुठे करावी?
कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये जर खालची ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर त्या खाली एन्ट्री घेता येते आणि जवळच्या स्विंग हाय च्या वर स्टोपलॉस ठेवता येतो.
12.फॉलिंग वेज(Falling Wedge) -हा एक बुलिश ट्रेंड कायम करणारा चार्ट पॅटर्न आहे. अपट्रेन्ड मध्ये मार्केट काही काळासाठी कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये जाते म्हणजेच थोडेसे खाली जाते. खाली जाताना ते लोवर हाय बनवत जाते. हे सर्व हाय जर एक ट्रेंड लाईन ने जोडले तर फॉ लिंग वेज हा पॅटर्न तयार होतो.
एन्ट्री कुठे करावी?
कॉन्सॉलिडेशन फेज मध्ये ज्यावेळी ट्रेन्डलाईन ब्रेक होते त्या वेळी बाय एन्ट्री घेता येते आणि जवळच्या स्विंग लो च्या खाली स्टॉप लॉस ठेवता येतो.
13.हेड अँड शोल्डर (Head and Shoulder) -हा एक सर्वात लोकप्रिय चार्ट पॅटर्न पैकी एक आहे. हा पॅटर्न अपट्रेन्ड च्या शेवटी पाहायला मिळतो आणि त्या नंतर मार्केट चा ट्रेंड बदलून ते खाली येऊ लागते.
अपट्रेन्ड मध्ये एका कॉन्सॉलिडेशन फेज नंतर मार्केट थोडे खाली येते. तेथून ते पुन्हा वर जाऊ लागते आणि आधीचा स्विंग पॉईंट ब्रेक करते. त्यानंतर ते पुन्हा खाली येऊन एक डबल बॉटम तयार करते आणि त्या नंतर दुसरा स्विंग तयार होऊन मार्केट खाली जाते.
एन्ट्री कुठे करावी?
ज्या वेळी डबल बॉटम ची सपोर्ट लाईन ब्रेक होते त्या वेळी एन्ट्री घ्यावी आणि जर एखादी कॅण्डल सपोर्ट लाईन च्या वर क्लोज झाली तर त्या कॅण्डल च्या वर स्टॉप लॉस लावावा.
टेक्निकल ऍनालिसिस का आणि कसे वापरावे?
स्टॉक च्या भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी दोन प्रकारचे ऍनालिसिस उपलब्ध आहेत.
१. टेक्निकल ऍनालिसिस
२. फंडामेंटल ऍनालिसिस
फंडामेंटल ऍनालिसिस बद्दल आपण पुढच्या लेखात सविस्तर पणे पाहणार आहोतच. या लेखात टेक्निकल अनालिसिस विषयी जाणून घेऊया.(Technical analysis in Marathi) टेक्निकल ऍनालिसिस मुळे भविष्यातील किमतीचा बऱ्यापैकी अचूक अंदाज बांधायला मदत मिळते. या मुळे ट्रेडर्स च्या मानसिकतेचा अंदाज येतो.
टेक्निकल ऍनालिसिस मध्ये आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न दोन्हीही वापरतो. चार्ट पॅटर्न पाहून स्टॉक च्या दूर च्या भविष्याचा अंदाज घेतला जातो तर कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून एन्ट्री घेतली जाते आणि स्टोपलॉस ठेवायला मदत मिळते. जर आपण स्विंग ट्रेडिंग किंवा पोसिशनल ट्रेडिंग करत असाल तर तर चार्ट पॅटर्न पाहणे आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकते आणि जर आपण इंट्राडे करत असाल तर आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून एन्ट्री घेऊ शकता. पण असा काही ठोस नियम नाही. आपण या पॅटर्न चा जेवढा अभ्यास करता तेवढेच आपण या मधे प्राविण्य मिळवता.
आपल्या पैकी बरेच जण फंडामेंटल अनालिसिस वापरून स्विंग ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करत असाल पण जर फंडामेंटल च्या जोडीला टेक्निकल अनालिसिस ची साथ मिळाली तर आपण अचूक एन्ट्री घेऊन आपले प्रॉफिट वाढवू शकता.
एखादी गोष्ट फंडांमेंटल अनालिसिस मधे जाहीर होण्यापूर्वी टेक्निकल चार्ट मध्ये त्याचे परिणाम आधीच दिसायला लागतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनी चा निकाल पुढच्या आठवड्यात आहे पण त्या कंपनी चा स्टॉक एक आठवडा आधीच वाढायला लागतो. हे का होते? हे होते ते इनसाईडर ट्रेडिंग मुळे. आता इनसाईडर ट्रेडिंग म्हणजे काय? आपल्या कंपनी ला एखाद्या तिमाहीत प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला हे कंपनी च्या मॅनॅजमेण्टला आणि प्रोमोटर्स ला आधीच माहित असते. त्या नुसार ते बराच पैसे त्या स्टॉक मध्ये गुंतवतात कारण जर निकाल जाहीर झाला तर स्टॉक वरच जाणार हे त्यांना आधीच माहिती असते. आणि म्हणून स्टॉक निकालाच्या आधीच वाढू लागतो. जेंव्हा निकाल जाहीर होतो तेंव्हा रिटेल इन्वेस्टर्स त्यात एन्ट्री करतात आणि मार्केट आणखी वर जाते. त्या नंतर हे इन साईडर ट्रेडिंग वाले आपला पैसे काढून प्रॉफिट बुक करतात आणि मार्केट खाली येऊ लागते. याचा फटका बसतो बिचार्या रिटेल इन्वेस्टर्स ना.
जर आपण टेक्निकल अनालिसिस केले तर स्टॉक ची वाढती किंमत आणि वाढते वोल्युम आपल्या सहज लक्षात येते. त्या नुसार स्टॉक च्या वाढत्या किमती मागील कारणांचा आपण अंदाज लावू शकता आणि योग्य वेळी एन्ट्री करून योग्य वेळी प्रॉफिट मधून बाहेर पडू शकता.
टेक्निकल ऍनालिसिस हि इतिहासाची पुनरावृत्ती असते. भूतकाळात जर एखादा पॅटर्न तयार झाला तर त्या नंतर लोकांची मानसिकता काय होती याचा अंदाज बांधला जातो. भूतकाळात जर एखाद्या ठराविक पॅटर्न नंतर मार्केट वर गेले असेल तर वर्तमान किंवा भविष्य काळात सुद्धा तो पॅटर्न तयार झाल्यानंतर मार्केट वर जाण्याची शक्यता जास्त असते. कारण बरेच लोक आणि मोठे इन्वेस्टर्स सुद्धा अशा पॅटर्न नंतरच एन्ट्री घेतात आणि त्यामुळे टेक्निकल ऍनालिसिस हे चालते.(Technical analysis of stocks in marathi)
टेक्निकल अनालिसिस वापरण्याआधी आपण या सर्व टेक्निकल पॅटर्न चे बॅक टेस्टिंग जरूर करून पाहावे आणि त्या नंतरच तो पॅटर्न वापरावा. आपल्याला सर्व च्या सर्व पॅटर्न मध्ये प्राविण्य मिळवण्याची गरज नाही. फक्त एक किंवा दोन पॅटर्न चा आपण व्यस्थित अभ्यास केला आणि त्यावरच लक्ष केंद्रित केले तर आपल्याला नफा होण्याची शक्यता वाढते.
टेक्निकल ऍनालिसिस फेल का होते?
टेक्निकल ऍनालिसिस चा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे न्युज. आपण कितीही चांगल्या पद्धतीने टेक्निकल ऍनालिसिस केले असेल पण जर एखादी बातमी जर त्या स्टॉक च्या विरुद्ध आली तर टेक्निकल अनालिसिस फेल होते.
टेक्निकल ऍनालिसिस फेल होण्या मागे दुसरे कारण म्हणजे द्विधा मनस्थिती. जर आपल्या कडे प्रॉपर स्ट्रॅटेजि नसेल तर एकाच ठिकाणी आपल्याला खरेदीच्या आणि विक्रीच्या दोन्ही संधी दिसतात. जर आपण अंदाजाने ट्रेड घेतला तर लॉस होण्याची शक्यता जास्त.
टेक्निकल ऍनालिसिस व्यस्थित शिकून सुद्धा मार्केट मध्ये लॉस बुक करणारे बरेच ट्रेडर्स आपण पाहतो. या मागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे धरसोड वृत्ती.
जर आपण एखाद्या स्ट्रॅटेजि चा अभ्यास केला आणि काही कारणामुळे जर ती स्ट्रॅटेजि सलग दोन तीन वेळा फेल झाली तर आपण ती स्ट्रॅटेजि सोडून देऊन दुसऱ्या स्ट्रॅटेजि च्या मागे लागतो. आणि दुसरी स्ट्रॅटेजि सुद्धा फेल झाली तर आपण ती सोडून तिसऱ्या स्ट्रॅटेजि कडे वळतो. म्हणजे एक ना धड अशी आपली अवस्था होऊन जाते आणि सगळे माहित असून सुद्धा आपण प्रॉफिट ऐवजी लॉस बुक करतो.
टेक्निकल ऍनालिसिस फेल होण्यामागे आणखी एक कारण म्हणजे पेनी स्टॉक मध्ये ट्रेडिंग. पेनी स्टॉक हे ऑपरेटर द्वारा नियंत्रित केले जातात.
ऑपरेटर म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत असे लोक किंवा संस्था. यातील काही लोक एकत्र येऊन एका ठराविक स्टॉक ला लक्ष करतात आणि त्या मध्ये खरेदी करायला सुरुवात करतात. खरेदी च्या दबावामुळे स्टॉक ची किंमत वर जाते आणि सामान्य इन्व्हेस्टर त्या स्टॉक कडे आकर्षित होतो.
मग अशा प्रकारे बरेच सामान्य इन्व्हेस्टर मिळून स्टॉक ला आणखी वर नेतात. एका ठराविक स्तरावर स्टॉक पोहोचल्या नंतर हे सर्व ऑपरेटर आपला पैसे काढून घ्यायला सुरुवात करतात आणि सामान्य खरेदीदारांना नुकसान सहन करावे लागते. अशा ऑपरेटर ने नियंत्रित केल्याला स्टॉक मध्ये टेक्निकल ऍनालिसिस चालत नाही.
या वर उपाय काय?
या वर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे शिस्त आणि नियमितता. आपण कुठल्या तरी एकाच स्ट्रॅटेजि चा व्यस्थित अभ्यास केला पाहिजे. कमीत कमी सहा महिने ती स्ट्रॅटेजि आपण कमी क्वांटिटी ने वापरली पाहिजे. प्रत्येक स्टॉक चे एन्ट्री आणि एक्सिट चे रोजच्या रोज रेकॉर्ड ठेवले पाहिजे. आणि त्या नंतर त्या स्ट्रॅटेजि मध्ये आपण प्राविण्य मिळवाल आणि मनी मॅनॅजमेण्ट चा वापर करून नेहमी प्रॉफिट मध्ये राहाल.
मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याच्या बऱ्याच स्ट्रॅटेजि आहेत पण सगळ्या स्ट्रॅटेजि सगळ्यांसाठी सुटेबल नसतात. आपण यातील बऱ्याच स्ट्रॅटेजि वापरून बघू शकता आणि जी स्ट्रॅटेजि वापरताना आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास वाटेल, ट्रेड घेताना भीती वाटणार नाही त्या स्ट्रॅटेजि वर आपण लक्ष केंद्रित करावे तिचा व्यस्थित अभ्यास करावा आणि बॅकटेस्टिंग सुद्धा करावे. फक्त एवढेच केले तरी आपल्या ट्रेडिंग मध्ये खूपच सुधारणा होईल.
मार्केट मधे बरेच लोक एकाच वेळी ट्रेड करत असतात. काही लोकांना वाटते मार्केट वर जाईल आणि काही लोकांना वाटते मार्केट खाली जाईल. त्या नुसार ते बाय किंवा सेल एन्ट्री घेत असतात. जर बायर चे प्रमाण जास्त असेल तर मार्केट वर जाते आणि सेलर ला नुकसान होते.
या उलट जर सेलर चे प्रमाण जास्त असेल तर मार्केट खाली जाते आणि बायर ला नुकसान होते. म्हणजेच एकाचे पैसे दुसऱ्याच्या खिशात असा हा व्यापार चालतो. शिस्तबद्ध पद्धतीने आणि मनी मॅनॅजमेण्ट चा वापर करून जर ट्रेडिंग केले तर आपण मार्केट मध्ये यशस्वी होऊ शकता.
Post a Comment