.

IPO बद्दल संपूर्ण माहिती मराठीत | Complete information of IPO in Marathi

IPO म्हणजे काय?

What is IPO?

IPO चा अर्थ होतो Initial Public Offer. ज्याप्रमाणे आपण मागील लेखात पाहिले की कुठल्याही कंपनीला विस्तारासाठी पैशांची आवश्यकता असते.

हे पैसे गोळा करण्याचे दोन मार्ग आहेत एक तर कंपनी बँकेकडून कर्ज घेते किंवा लोकांकडून पैसा गोळा करते. बँकेकडून घेतलेल्या कर्जावर कंपनीला व्याज द्यावे लागते म्हणजेच हा पर्याय कंपन्यांसाठी खर्चिक असतो आणि यावर उपाय म्हणजे लोकांकडून पैसे गोळा करणे. त्या बदल्यात लोकांना कंपनीची भागीदारी दिली जाते. ही भागीदारी शेअर्सच्या स्वरूपात असते.

लोकांकडून गोळा केलेल्या पैशांवर कंपनीला कोणत्याही प्रकारचे व्याज द्यावे लागत नाही.जर कंपनीने भविष्यात प्रगती केली तर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होते आणि त्याचा फायदा लोकांना होतो म्हणजेच कंपनीची भांडवलाची गरज पूर्ण होतेच पण त्या शिवाय कंपनीचे शेअर्स मधून लोकांना सुद्धा नफा होतो.

कुठलीही कंपनी सुरुवातीला ज्यावेळेस आपले शेअर्स विक्रीस काढते त्यावेळी ते प्रायमरी मार्केटमध्ये विकले जातात म्हणजेच कंपनी आपले शेअर्स थेट ग्राहकांना विकते यामध्ये कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ नसतो. या उलट सेकंडरी मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंज मध्यस्थांचे काम करतात.

ज्यावेळी एखादी कंपनी स्टॉक मार्केटमध्ये समाविष्ट होते त्यावेळी ती आपले शेअर्स प्रायमरी मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवते. हे शेअर्स आपण आपल्या ब्रोकर मार्फत किंवा बँकेमार्फत खरेदी करू शकता त्यासाठी आपल्याकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.

स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळी एखादी कंपनी आपला आयपीओ लॉन्च करते त्यावेळी आपल्या ब्रोकर कडून आपल्याला त्याची आगाऊ सूचना दिली जाते. हा आयपीओ खरेदी करण्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. त्यामध्ये आपल्याला हे शेअर्स लॉटमध्ये खरेदी करायचे असतात.

साधारणतः चौदा ते पंधरा हजार रुपयांमध्ये जेवढे शेअर येतील त्यांचा एक लॉट बनवला जातो. खरेदी करण्यासाठी आपण कितीही लॉटमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये ज्या किंमतीला आपल्याला आय पी ओ घ्यायचा आहे ती किंमत आपण देऊ शकता किंवा सध्याच्या बाजारभावाप्रमाणे तो खरेदी करू शकता.

ज्यावेळी साठी मागणी करता त्यावेळी आपल्याला प्रत्येक लॉट ची रक्कम ही आगाऊ भरावी लागते. जर आपल्याला त्या कंपनीचा आयपीओ मिळाला तर आपल्याला तसे सूचित करण्यात येते आणि काही दिवसानंतर तो आयपीओ आपल्या डिमॅट अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जातो त्यानंतर आपण तो सेकंडरी मार्केटमध्ये विकू शकता.

जर काही कारणास्तव आपल्याला आयपीओ मिळाला नाही तर आपण भरलेली रक्कम आपल्याला पूर्णपणे परत केली जाते.

आयपीओ घेण्याचा फायदा असा आहे की आपण हे शेअर्स डायरेक्ट कंपन्यांकडून विकत घेत असता त्या मुळे सुरुवातीला त्याची किंमत खूप कमी असते हेच शेअर्स नंतर सेकंडरी मार्केटमध्ये विकून आपण चांगले पैसे कमवू शकता.

आयपीओ कसा खरेदी केला जातो?


आयपीओ खरेदी करण्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत पण या उदाहरणांमध्ये आपण झिरोधा(Zerodha) या ब्रोकर कडून आयपीओ कसा विकत घ्यावा हे पाहूया.

1 . जर आपले झिरोधामध्ये अकाउंट असेल तर सर्वात प्रथम आपल्याला खालील वेबसाईटवर जावे लागते. या वेबसाईटवर आपण आपल्या KITE आयडीने लॉग इन करू शकता.

https://console.zerodha.com/dashboard

2 . वेबसाइट ओपन झाल्यानंतर त्यावर “ पोर्टफोलिओ” नावाचा टॅब शोधावा. त्यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉप डाउन लिस्टमध्ये आपल्याला IPOs नावाचा आणखी एक पर्याय मिळतो त्यावर क्लिक करावे.

 

IPO


3. आता आपल्यापुढे खालील प्रमाणे पेज ओपन होते. यामध्ये असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे.

 

how to buy IPO

Start Date - या तारखेला आयपीओ प्रायमरी मार्केटमध्ये उपलब्ध होतो.

End Date - या तारखे नंतर आपण प्रायमरी मार्केटमध्ये आयपीओ खरेदी करू शकत नाही.
Price Range - यामध्ये जी प्राइस रेंज दिलेली असते त्यामधील कुठल्याही रकमेला आयपीओ ओपन होऊ शकतो म्हणजेच त्या भावामध्ये तो आपल्याला मिळू शकतो.
Minimum Quantity - आयपीओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी किती कॉन्टिटी मध्ये तो खरेदी केला पाहिजे हे दिलेले असते. आपण त्या पटीतच कॉन्टिटी खरेदी करू शकता.

4 . या उदाहरणांमध्ये आपण “ CARTRADE” नावाच्या आयपीओ साठी बोली लावणार आहोत. ज्यावेळी आपण “Apply” या बटन वर क्लिक करता त्यावेळी खालील पेज ओपन होते.

 

how to purchase IPO

सर्वात प्रथम आपण आपला UPI ID सेट करावा. जर आपल्याकडे UPI ID नसेल तर आपण नेट बँकिंग चा पर्याय सुद्धा निवडू शकता. या उदाहरणांमध्ये आपण UPI ID चा वापर करणार आहोत.


त्यानंतर आपल्याला तीन प्रकारात बोली लावता येते. आपण तीन वेगवेगळ्या किमती लावू शकता म्हणजेच या किमतीला IPO ओपन होईल त्या किमतीला तो आपल्याला मिळू शकेल.

यामध्ये मी “कट ऑफ” हे ऑप्शन निवडले आहे याचा अर्थ मी जास्तीत जास्त किमतीला खरेदी करण्यास तयार आहे. या ऑप्शन मुळे मला IPO मिळण्याची शक्यता वाढते.

त्यानंतर मला टर्म आणि कंडीशन चे ऑप्शन सिलेक्ट करावे लागते.

आणि शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून मी आयपीओ साठी नंबर लावू शकतो.

5 . सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर साधारणतः खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे मेसेज आपल्या स्क्रीनवर येतो.

 

IPO buying process

6 . त्यानंतर काही वेळाने आपल्या UPI एप्लीकेशन वर एक रिक्वेस्ट येते ती स्वीकारून आपण आयपीओ साठी पैसे भरू शकता.


7 . जर आपल्याला आयपीओ मिळाला नाही तर त्याच UPI ID वर आपण भरलेले पैसे परत मिळतात.

8 . जेव्हा आपण स्टेटस वर क्लिक करता तेव्हा आपल्या आयपीओ संबंधी सर्व माहिती आपल्याला मिळू शकते.

 

Buy IPO on Zerodha

9 . जर आपल्याला आयपीओ मिळाला तर आपल्या ब्रोकर द्वारे आपल्याला सूचित केले जाते. त्यानंतर काही दिवसांनी तो आय पी ओ सेकंडरी मार्केट मध्ये लिस्ट होतो आणि जर आपल्याला तो विकायचा असेल तर सेकंडरी मार्केट मध्ये आपण तो विकू शकता.




IPO घेताना हे करा आणि हे करू नका?

Thing to keep in mind while buying IPO

हे करा -


1 . कोणतेही कंपनीचा आयपीओ घेण्यापूर्वी त्या कंपनीच्या फंडामेंटल विषयी पूर्ण माहिती घ्यावी.
2 . कंपनी कोणत्या सेक्टर मधली आहे आणि त्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांची सध्याची कामगिरी कशी आहे हे आयपीओ घेण्यापूर्वी जरूर पहावे.
3. जर एखाद्या चांगल्या कंपनीचा आयपीओ रिलीज झाला तर आपली विनिंग प्रोबॅबिलिटी वाढविण्यासाठी एकापेक्षा जास्त अकाउंट वरून त्यासाठी अप्लाय करावे.
4 . आयपीओ मध्ये गुंतवणूक करतेवेळी रिस्क फॅक्टर चा जरूर विचार करावा कारण सगळेच आयपीओ चांगला परतावा देतील असे नाही.

हे करू नका -

1 . आला आयपीओ की घे, असे अजिबात करू नका कारण सगळ्याच आयपीओ मधून आपल्याला प्रॉफिट मिळण्याची शक्यता नसते.
2 . ज्या कंपनीचा आयपीओ आहे त्या कंपनी विषयी माहिती घेतल्याशिवाय त्यात गुंतवणूक करू नका.
3 . कर्ज काढून आयपीओ घेऊ नका.
4 . आयपीओ मिळाल्यानंतर थोड्याशा प्रॉफिट नंतर तो लगेच विकू नका कारण त्यामुळे येणारे मोठे प्रॉफिट आपण मिस करू शकता.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post