.

थायरॉईड ची लक्षणे मराठीत | symptoms of thyroid in Marathi | Hypothyrodism in Marathi | Hypder thyrodism in Marathi

 

symptoms of thyroid in Marathi


थायरॉईड ची लक्षणे मराठीत  | symptoms of thyroid in Marathi 

काय तुम्हाला जाणवलं की गेल्या काही दिवसांपासून तुमचं वजन वाढत आहे? तुम्हाला काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही? आपण पहिल्यापेक्षा जास्त आळशी झाला आहात? आपलं पूर्ण शरीर फुगलं  आहे?  


जर अशी लक्षणे दिसत असतील सावधान !  आपण सुद्धा थायराइड डिसऑर्डर या रोगाचे शिकार असू शकता.  तर चला जाणून घेऊया थायरॉईड म्हणजे काय?  थायरॉईड किती प्रकारचे असतात?  थायरॉईड होण्यामागे कोणकोणती कारणे असतात?  थायरॉइडच्या  रोग्याने काय काय खाल्ले पाहिजे आणि काय नाही हे आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 


थायरॉईड म्हणजे नेमकं काय?

आपल्याला माहीतच आहे की आपल्या  शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात ज्याला इंग्रजीमध्ये (gland)  असं म्हटलं जातं.  आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्रंथी जी गळ्याच्या खालच्या भागांमध्ये असते.  थायरॉईड ग्रंथीमधून  एक प्रकारचं हार्मोन स्त्रवत असतं ज्याचं नाव आहे T3 आणि T4 .

 

थायरॉईड हार्मोन्सच (Thyroid hormone)आपल्या शरीरात काय महत्त्व आहे?

T3 आणि T4 हार्मोन्स आपल्या शरीराच्या मेटाबोलिजम प्रक्रियेला नियंत्रित करतात.  आता ही मेटॅबॉलिझम प्रक्रिया आहे तरी काय?  आपल्या शरीरात उर्जा नियंत्रित करण्यासाठी एक प्रणाली कार्यरत असते त्या प्रणालीलाच मेटाबोलिजम असे म्हटले जाते.  शरीराच्या कुठल्या अवयवाला किती ऊर्जेचा पुरवठा करायचा हे या प्रणालीवर अवलंबून असते. 


T3 आणि T4 हार्मोन शरीरामध्ये आणखीही वेगवेगळे कार्य करतात. 


या व्यतिरिक्त TSH नावाचं एक हार्मोन असतं जे पिच्युटरी ग्रंथी मधून स्त्रवत असतं जे T3  आणि T4  नियंत्रित करते. 


थायरॉईड किती प्रकारचे असतात? (Types of thyroid in Marathi)

 थायरॉईडचे मुख्य दोन प्रकार आहेत.

1. हायपोथायरॉईडीझम (Hypothyrodism)

2. हाइपरथायरॉईडीझम (Hyperthyrodism)

चला तर जाणून घेऊया हायपोथायरॉईडीझम बद्दल.


 हायपोथायरॉईडीझम आहे तरी काय?  (Hypothyrodism in Marathi)

जस आपण पाहिलं हायपोथायरॉईडीझम मध्ये T3 आणि  T4 ची मात्रा कमी होते पण TSH ची मात्रा वाढते.  जेव्हा आपण थायरॉईड साठी टेस्ट करतो तेव्हा त्यामध्ये TSH ची  मात्रा प्रामुख्याने तपासली जाते.  जर तर ची मात्रा विशिष्ठ मर्यादे  बाहेर वाढली असेल तर आपल्याला हायपोथायरॉईडीझम आहे असे निदान केले जाते. 


चला जाणून घेऊया हायपोथायरॉईडीझम होतो तरी कशामुळे? (Cause behind hypothyrodism in Marathi)

 हायपोथायरॉईडीझम मुख्यतः आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो.  भारतामध्ये 2005 च्या आधी मिठामध्ये आयोडीन येत नव्हते आणि भारतामध्ये बऱ्याच लोकांना संतुलित आहार सुद्धा मिळत नव्हता जेणेकरून हा रोग खूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळायचा.  


मुख्यता आदिवासी भागात या रोगाचे प्रमाण फारच जास्त होते. मात्र या नंतर सरकारने सर्व मीठ बनवणार्‍या कंपन्यांना मिठा मध्येच आयोडीन मिसळण्याची सूचना दिली.  त्यामुळे आता जे  मीठ बाजारात  उपलब्ध आहे त्या मिठामध्ये आयोडीन असते आणि त्या मुळे हा रोग बऱ्यापैकी नियंत्रणात आलेला आहे. 


 हायपोथायरॉईडीझम चे दुसरे मुख्य कारण आहे औषधे.  काही औषधे अशी आहेत की ज्यामुळे T3 आणि  T4 हार्मोनची  मात्रा कमी होते आणि हायपोथायरॉईडीझम चा  धोका वाढतो. 


 याच्या मध्ये आणखी एक कारण असे  आहे की,  जर आपली थायरॉईडची किंवा थायरॉईड ग्रंथीच्या आसपासच्या भागाची जर शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा थायरॉईड ग्रंथी चा काही भाग काढून टाकण्यात आलेला असेल तरीही आपण हायपोथायरॉईडीझम या रोगाचे  शिकार होऊ शकता. 


कधी कधी एखाद्या सर्जरीनंतर रेडिएशन थेरपी केली जाते.  रेडिएशन थेरपी मुळे सुद्धा हार्मोनचे संतुलन बिघडते आणि त्यामुळे सुद्धा हायपोथायरॉईडीझम चा  धोका उद्भवू शकतो. 


 हायपोथायरॉईडीझम हा रोग जास्त करून महिलांमध्ये आढळतो पण सध्या पुरुषांमध्ये सुद्धा या रोगाचे प्रमाण लक्षणीय आहे. 


हायपोथायरॉईडीझम ची लक्षणे काय काय असतात? (Symptoms of hypothyrodism in Marathi)

 चला तर जाणून घेऊया हायपोथायरॉईडीझमचि  काय लक्षणे आहेत.  हायपोथायरॉईडीझम च्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने 

  • भूक कमी किंवा अजिबात न लागणे 
  • अचानक आणि खूप वजन वाढणे 
  • शरीरावर सूज येणे 
  • चिडचिड होणे 
  • केस गळणे 
  • प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे 
  • जास्त थंडी वाजणे 
  • बद्धकोष्टता 
  • हृदयाची गती कमी होणे 
  • स्मरणशक्ती कमी होणे 
  • अनियमित मासिक पाळी 

इत्यादी लक्षणे दिसून येतात.  जर योग्य वेळी योग्य उपचार केले नाहीत तर फुप्फुसांमध्ये पाणी होण्यासारखा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो म्हणून थायरॉईडवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. 


थायरॉईड आहे किंवा नाही हे कसे ओळखतात? (How to dignose thyroid in Marathi)

 तुम्हाला थायरॉईड आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी तुमच्या रक्ताची तपासणी करावी लागते व दिलेल्या लक्षणांपैकी काही किंवा सर्व लक्षणे जर तुमच्या मध्ये आढळली  तर तुमचे डॉक्टर तुम्हाला थायराइड टेस्ट करण्याचा सल्ला देतात. 


यामध्ये मुख्यत्वे T3 , T4  आणि TSH हे चेक केले जाते  त्यामुळे पूर्ण तपासणीला थायरॉईड प्रोफाइल टेस्ट असे म्हणतात.  कधीकधी TPO टेस्ट करण्याचा पण सल्ला दिला जातो.  जर आपल्या रिपोर्टमध्ये TSH  एका विशिष्ट मर्यादेबाहेर वाढलेले असेल आणि T3 , T4 जर कमी झाले असेल तर आपल्याला हायपोथायरॉईडीझम आहे असे निदान केले जाते. 

हायपोथायरॉईडीझम वर काय इलाज आहे? (Treatment of Hypothyrodism in Marathi)

 हायपोथायरॉईडीझम च्या रोग्यांना डॉक्टर नेहमी Levothyroxine  नावाचं औषध घेण्याचा सल्ला देतात हे औषध वेगवेगळ्या प्रकारच्या नावांनी मार्केटमध्ये उपलब्ध आहे.  


पण या औषधाची मात्रा किती घ्यायची, त्याचे प्रमाण किती, हे आपल्या डॉक्टरांना विचारून ठरवावे.  औषध चालू केल्यानंतर काही दिवसातच थायरॉईड ची लक्षणे कमी कमी होत जातात आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. 


जे  औषध आपल्याला सुचवलेला आहे त्याची मात्रा निश्चित करण्यासाठी तुम्हाला साधारणतः दर तीन महिन्यांनी थायरॉइडची टेस्ट करावी लागते त्यानुसार थायरॉईडची मात्रा वाढवायची का कमी करायची  हे ठरवण्यास तुमच्या डॉक्टरांना मदत मिळते. 


काय थायरॉइडचा औषधे आयुष्यभर घ्यावा लागतात? (Thyroid medicinese in Marathi)

 पहिल्यांदा आपण पाहूया की औषधांच्या स्वरूपात आपल्याला थायरॉइड हार्मोन देण्यात येते.  शरीरामध्ये त्याची गरज असते पण काही कारणास्तव थायरॉईड ग्रंथी मधून ते न स्रवल्यामुळे  आपल्याला ते बाहेरून घेण्याची गरज पडते.  


ज्याप्रमाणे जिम मध्ये जाणारा व्यक्ती बाहेरून सप्लीमेंट घेतो त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा हे हार्मोन बाहेरून घ्यावे लागते.  त्यामुळे आपण याकडे औषधाच्या रूपात न बघता सप्लीमेंट च्या रूपात पाहावे.  साधारणतः  हे औषध आयुष्यभर घ्यावे लागते पण काही वेळेस जर थायरॉईड ग्रंथी व्यस्थित काम करायला लागल्या तर ते बंद करण्याचा सल्ला देखील दिला जातो. औषध बंद करताना ते एकदम बंद न करता त्याची मात्र कमी कमी करत ते बंद करावे लागते. 


हायपोथायरॉईडीझमचं औषध कधी घ्यावं? (Timing to take medicine Marathi)

हायपोथायरॉईडीझम चं  औषध जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी घेतला तर ते जास्त फायदेशीर ठरतं.  त्यानंतर एक तासाने आपण नाश्ता करू शकता.  


जर आपली कोणती दुसरी औषध चालू असतील जस की  ब्लडप्रेशर किंवा डायबिटीस तर आपण नाष्ट्यानंतर ती घेऊ शकता.  पण जर कुठल्या कारणास्तव आपण औषध घेण्याचे विसरलात तर मग त्यादिवशी आपण औषध घेणं टाळलं पाहिजे.  त्याऐवजी दुसऱ्या दिवशी आपण डबल डोस घेऊ शकता.  


म्हणजेच जर आपण रोज एक गोळी घेत असाल तर दुसऱ्या दिवशी दोन गोळ्या घेऊ शकता.  कधीकधी थायरॉइडचा रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांची लक्षणे पण दिसतात पण ही औषधे कधीही एकत्र घेऊ नयेत.  थायरॉईडची औषधे आणि बाकी आजारांची औषधे यामध्ये किमान एक तासाचे अंतर जरूर राखावे. 


हाइपरथायरॉईडीझम म्हणजे काय? (Hyperthyrodism in Marathi)

 हाइपरथायरॉईडीझम ची लक्षणे हायपोथायरॉईडीझम च्या लक्षणांच्या अगदी विरुद्ध असतात.  हायपरथायरॉईडीझम मध्ये T3 आणि T4 यांची मात्रा वाढते पण तसे  ची मात्रा कमी होते. 


 हाइपरथायरॉईडीझम होण्यामागे काय कारण असते? (Cause behind hyperthyrodism in Marathi)

 हाइपरथायरॉईडीझम हा अनुवंशिक ही असू शकतो.  जर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला  हाइपरथायरॉईडीझम असेल तर आपल्याला तो  होण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यात जर आपण स्त्री असाल तर ही शक्यता आणखी वाढते. 


दुसरे एक कारण म्हणजे जर आपल्याला आधी हायपोथायरॉईडीझम असेल आणि त्याच्या औषधांचा डोस जर जास्त झाला तरीसुद्धा आपण हाइपरथायरॉईडीझमने  ग्रासले जाऊ शकता. 


 हायपर थायरॉईड ची लक्षणे काय काय आहेत? (Symptoms of hyper thyroidsm in Marathi)

 हायपर थायरॉईड ची लक्षणे साधारणतः हायपोथायरॉईड च्या  लक्षणांच्या अगदी विरुद्ध असतात.  जसे की,

  •  जास्त भूक लागणे 
  • जास्त घाम येणे 
  • अंगामध्ये जास्त उष्णता वाढणे 
  • वजन कमी होणे 
  • चंचलता वाढणे 
  • शरीर थर थर कापणे 
  • हृदयाचे  ठोके वाढणे 
  • जुलाब 
  • उच्च रक्तदाब 
  • भीती वाटणे 

इत्यादी लक्षणे आढळून येतात.  


हायपरथायरॉईड चा इलाज कसा केला जातो? (Treatment of hyperthyrodism in Marathi)

 हा आजार बरा करण्यासाठी आपले डॉक्टर आपल्याला काही औषधे घेण्याचा सल्ला देतात जर हायपरथायरॉईडीझम ची समस्या जास्त असेल तर आपल्याला रेडिओॲक्टिव्ह आयोडीन चा डोस दिला जातो ज्यामुळे थायरॉईड ग्रंथी आकुंचन पावतात आणि त्यामुळे t3 आणि t4 ची मात्रा कमी होते. 


जर हा त्रास खूपच जास्त असेल तर डॉक्टर आपल्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.  


हायपरथायरॉईडीझम चा मध्ये काय खावे आणि काय खाऊ नये? (Hyperthyrodism pathya)

 जर आपल्याला हायपरथायरॉईडीझम असेल तर आपण आयोडिनयुक्त पदार्थ खूप कमी किंवा पूर्ण बंद केले पाहिजेत.  कारण त्यामुळे t3 आणि t4 यांची मात्रा वाढू शकते. 


यामध्ये आयोडीनयुक्त मिठा बरोबरच समुद्रातील मासे आणि समुद्रातील अन्य जलचर यांचा समावेश आहे.  कारण या प्राण्यांमध्ये आयोडीन ची मात्रा जास्त प्रमाणात आढळते. 


Disclaimer:-

या लेखात देण्यात आलेली माहिती हि फक्त सामान्यज्ञानासाठी दिलेली आहे. कोणत्या आजारावर कोणते  औषध घ्यावे याचा सल्ला मराठी Wiki कधीही देत नाही . कोणत्याही रोगावर उपचार घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. या लेखामध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार जर कोणी परस्पर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याविना  औषधे घेत असेल तर झालेल्या नुकसानीस मराठी Wiki जबाबदार नाही याची नोंद घ्यावी. आजारा बद्दल अधिक माहिती आणि उपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा . 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post