.

मराठी अभिनेत्री रंजना यांचा जीवन परिचय | Marathi actress Ranjana Deshmukh biography in Marathi, age, date of birth, accident, death, funeral, family, husband, love affairs, Ranjana Deshmukh wiki

रंजना देशमुख यांचे जीवन चरित्र मराठीत | Marathi actress Ranjana Deshmukh biography in Marathi

sample47

रंजना देशमुख

मराठी चित्रपट अभिनेत्री, 1955 - 2000

नाव - रंजना देशमुख


जन्म दिनांक - 23 जुलै 1955


मृत्यू दिनांक - 03 मार्च 2000


जन्म स्थान - मुंबई, महाराष्ट्र


ओळख - मराठी चित्रपट अभिनेत्री


कारकीर्द - 1960 - 2000


वडिलांचे नाव - गोवर्धन देशमुख


आईचे नाव - वत्सला देशमुख


पुरस्कार - महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार


निवासस्थान - मुंबई


शिक्षण - परेल इंग्लिश हाई स्कूल


 रंजना देशमुख किंवा फक्त रंजना. हे नाव ऐकताच आपल्याला आठवतात काही गाजलेले चित्रपट जसे कि अरे संसार संसार, मुंबई चा फौजदार, सुशीला इत्यादी. रंजना देशमुख मराठी चित्रपट सृष्ठीत फक्त रंजना या नावानेच प्रसिद्ध होत्या. चला तर त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. 


रंजना देशमुख यांचा अल्प परिचय (Ranjana Deshmukh introduction in Marathi)

साधं  भोळं रूपं , गोरा रंग,  डौलदार बांधा, धारदार नाक,  गालावरचा असलेला मोहक तीळ आणि नजरेतील तीक्ष्णता, या निसर्गाकडून लाभलेल्या वैशिष्ट्यांच्या जोरावर नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अगदी थोड्याच कालावधीत रसिकांना आपलंस  करण्याऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना देशमुख. 


 रंजना देशमुख यांचा जन्म 23 जुलै 1955 रोजी मुंबईमध्ये झाला.  त्यांच्या वडिलांचे नाव गोवर्धन. ते सुद्धा रंगमंचावरील अभिनेते होते. गुजराती रंगमंचावर बालगंधर्व अशी त्यांची विशेष ओळख होती.  त्यांच्या आईचे नाव वत्सला देशमुख त्या सुद्धा कलावंत होत्या. (Ranjana Deshmukh family). वत्सला बाईंनी साकारलेली पिंजरा या चित्रपटातील संध्याच्या मोठ्या बहिणीची भूमिका आपल्या स्मरणात असेलच.


आई वत्सला देशमुख आणि वडील यांचा घटस्फोट झाला आणि रंजना आणि त्यांचा  भाऊ लहान भाऊ आपल्या मावशीकडे म्हणजेच अभिनेत्री संध्या कडे राहू लागले. संध्या या त्यावेळी हिंदी चित्रपटश्रुष्टीत एक नामांकित अभिनेत्री होत्या.  रंजना यांनी परेल इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं.  


रंजना यांच्या आईचा म्हणजेच वत्सलाबाईंचा यांचा त्यांच्या अभिनयाच्या क्षेत्रामध्ये कारकीर्द घडविण्यास विरोध होता.  त्यामुळे रंजना यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच दावर इन्स्टिट्यूटमधून सेक्रेटरी, ब्युटी पार्लर, बेकिंग, केटरिंग अशा विविध पदव्या मिळवल्या पण त्याच बरोबरीने रुईया महाविद्यालयातून तत्वज्ञान आणि साहित्य या विषयातील पदवी ही मिळविली. 


 रंजना देशमुख चित्रपट कारकीर्द (Ranjana Deshmukh film career)


तसं पाहायला गेला तर रंजना यांची अभिनय कारकीर्द अगदी बालवयातच सुरू झाली ती म्हणजे हरिश्चंद्र तारामती या चित्रपटातून आणि तेही वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी.  त्यानंतर त्यांनी लडकी सह्याद्री कि या  हिंदी  चित्रपटात अभिनय केला.  रंजना यांनी चित्रपट सृष्टीचा अनुभव अगदी जवळून घेतला असला तरी तरुणपणी आपण अभिनेत्री होऊ असे त्यांना कधीच वाटले न्हवते. 


त्यांना अभिनयाची संधी मिळाली ती व्ही  शांताराम यांच्यामुळे.  चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील भूमिकेसाठी वि शांताराम यांनी रंजना यांना विचारलं आणि चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. 


 या चित्रपटातील रंजना यांच्या छोट्या पण जबरदस्त भूमिकेमुळे त्यांना शांताराम यांनी आपल्या झुंज या पुढील चित्रपटात  नायिकेची भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी ग्रामीण  शाळेतील शिक्षकांची भूमिका सक्षम पणे साकारली.   खरतर या भूमिकेतील त्यांची  अभिनय कला पाहूनच त्यांना पुढे अनेकानेक चित्रपट मिळाले. 


त्यानंतर त्यांचा मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट म्हणजे असला नवरा नको ग बाई जो ३१ डिसेंबर १९७६ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात एक खेडवळ माणसाची भूमिका करणाऱ्या राजा गोसावी यांच्या बरोबर त्यांनी केलेली सुशिक्षित तरुणांची भूमिका खूपच गाजली. 


 रंजना यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी जर कुठल्या चित्रपटाने मिळाली  असेल तर तो चित्रपट म्हणजेच चानी.  एका कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट.   यातील चानी ची व्यक्तिरेखा रंजना यांनी तंतोतंत साकारली. मराठी स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांच्या मिलनातून जन्माला आलेली आणि म्हणुनच तात्कालीन समाजाकडून नाकारले गेलेले स्त्री रंजना यांनी हुबेहूब  रंगवली.  


सुशिक्षित संवेदनशील शाळा शिक्षक ते खुनी  स्त्री अशा दोन टोकांमधील प्रवास साकारणारी  सुशीला या चित्रपटातील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. रंजना यांच्या अभिनयाचा खरा कस जर लागला असेल तर तो अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिका साकारताना.  


कुलदीप पवार या अभिनेत्याचा बरोबर त्यांची या चित्रपटातील भूमिका वैशिष्ट्यपूर्ण होती.  नववधू म्हणून नव्याने घरात आलेली, शेतकरी नवऱ्याबरोबर हालाखीचे जीवनही आनंदात व्यतीत करणारी  गृहिणी, नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलांसाठी हिमतीने उभी राहणारी आई, आणि वृद्ध झाल्यावर अगदी  सुना  आल्यावर सुद्धा  घराचे अभंगत्व टिकविण्यासाठी धडपडणारी ससु असा वयपरत्वे बदलत जाणारा स्त्रीचा प्रवास एकाच चित्रपटातून उलगडून दाखवणाऱ्या रंजना यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. 


त्यांची विशेष  भूमिका म्हणून आपल्याला  मुंबईचा फौजदार या चित्रपटातील भूमिकेकडे पाहावे लागेल.  ग्रामीण खेडवळ ते  शहरी सुशिक्षित स्त्री यातील विरोधाभास रंजना यांनी अगदी समर्थपणे साकारला. या चित्रपटातून त्यांच्या दमदार अभिनयाची कल्पना येते. 


रंजना यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले पण त्यांची खरी जोडी जमली असेल तर ती अशोक सराफ यांच्या बरोबर.  अशोक सराफ यांच्याबरोबर अभिनय केलेले रंजना यांचे सुशीला, गोंधळात गोंधळ, गुपचुप गुपचुप, बहुरूपी, बिन कामाचा नवरा, खिचडी हे चित्रपट विशेष गाजले. 


 या दोघ्यांच्या रूपाने  चित्रपट सृष्टीला अशोक रंजना या नावाची एक नवी कलावंत जोडी लाभली.  पण या जोडीचे आणखी चित्रपट पाहण्याचे भाग्य मात्र रसिकांना लाभले नाही.  


रंजना देशमुख प्रेम संबंधांविषयी चर्चा  (Ranjana Deshmukh love affairs)


अभिनेता अशोक सराफ आणि ऐंशीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंजना देशमुख यांनी  एक डाव भुताचा, बिन कामाचा नवरा, गोंधळात गोंधळ असे अनेक हिट चित्रपट साकारले.(Ranjana Deshmukh and Ashok saraf movies) रंजनाची अशोक सराफ यांच्या सोबत ऑन स्क्रिन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती.(Ranjana Deshmukh and Ashok Saraf)  


रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा रंगली होती.(Ranjana Ashok saraf love story)  एवढेच नाही तर या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याचाही  बोललं जात होतं.(Ranjana love life)  या चर्चा शेवटपर्यंत चर्चा ठरल्या.  त्याला निमित्त ठरला तो रंजना चा अपघात. सारं काही सुरळीत सुरु असताना 1987 मध्ये झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोर ला जाताना एका अपघातात रंजनाला कायमचा अपंगत्व आलं आणि  रंजनाच्या फिल्मी करिअरला कायमचा पूर्णविराम लागला. 


 या अपघातातून रंजना शेवटपर्यंत सावरू शकली नाही. अपघातानंतर अशोक सराफ हे रंजना च्या आयुष्यातून कायमची निघून गेले.  अशोक सराफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली जगासमोर कधीच दिली नाही पण अपघातानंतर च्या एका नाटकातून रंजना यांनी आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. 


 हे नाटक रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं.  फक्त एकदाच या मराठी नाटकातून रंजना यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं होतं.व्हील चेअर  वर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आलं ज्या मध्ये त्यांनी अखेरची  भूमिका केली होती. 


अशोक सराफ यांनी निवेदिता यांच्यासोबत विवाह केला आणि या प्रकरणाला पूर्णविराम लागला.  त्यानंतर रंजना यांनी शेवट पर्यंत लग्न केले नाही.( Ranjan Deshmukh marriage | Ranjana Deshmukh Husband)


आज रंजना आपल्या सोबत नाही पण तिच्या आठवणी कायम आपल्या सोबत असतील. 

 रंजना देशमुख यांचा अपघात (Ranjana Deshmukh Accident)


वी शांताराम यांच्या झुंजार या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जात असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी त्यांच्या बरोबर इतर सहकलाकार सुद्धा होते. या अपघातात बाकी कोणाला काही विशेष इजा झाली नाही पण  रंजना याना आपले दोन्ही पाय गमवावे लागले.  


या अपघातात अपंग झालेल्या रंजना यांना चित्रपटसृष्टीतून कायमचा निवृत्त व्हावं लागलं.  अभिनयाला आपले दैवत मानणाऱ्या रंजना यांनी 1993 मध्ये व्हीलचेअरवर बसून  फक्त एकदाच या नाटकांमधून आपल्या अभिनयाची झलक पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवली. 


एक व्हील चेअर वरील तरुणीला तिचा प्रियकर सोडून जातो हा या नाटकाचा विषय होता. या नाटकाचे एकूण 38 प्रयोग झाले पण हे नाटक पण जास्त प्रभाव पडू शकले नाही. हे नाटक रंजना यांच्या स्वतःच्या जीवनाशी निगडित होते असे म्हटले जाते.  


ग्रामीण सुशिक्षित बंडखोर स्त्री साकारताना रंजना  जेवढ्या समरस होतो तेवढ्याच  त्या निरागस भाव व्यक्त करताना समरस होतं.  इतकेच नाही तर तमाशाच्या फडावर नाचताना सुद्धा त्या अगदी बेभान व्हायच्या यातूनच अभिनयाकडे पाहण्याची त्यांची प्रगल्भ दृष्टी अधोरेखित होत जाते आणि म्हणूनच आजही त्यांचं नाव चित्रपटसृष्टीत आदरानं आणि मानाने घेतलं जातं. 


रंजना देशमुख यांचा मृत्यू  (Ranjana Deshmukh Death | Ranjana Deshmukh funeral)


रंजना देशमुख यांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Ranjana Deshmukh death reason) त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच परेल मुंबई येथे झाला.(Ranjan Deshmukh died)  मृत्युसमयी त्यांचे वय अवघे 45 वर्षांचे होते. (Ranjana Deshmukh age) त्यांच्या मागे आई  वत्सला देशमुख, मावशी संध्या ज्या हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि शांताराम यांच्या पत्नी आहेत. दर वर्षी त्यांच्या पुण्यतिथी दिवशी झी टॉकीज कडून त्यांचे काही गाजलेले चित्रपट प्रदर्शित करण्यात येतात राज्य सरकारने त्यांच्या स्मरणार्थ एक पुरस्कार सुद्धा जाहीर केलेला आहे


 रंजना देशमुख यांचे चित्रपट (Ranjana Deshmukh Movies)
अरे संसार संसार दैवत खिचडी
असला नवरा नको ग बाई देवघर लक्ष्मी
बिन कामाचा नवरा एक डाव भुताचा लक्ष्मीची पाऊले
बहुरूपी गल्ली ते दिल्ली मर्दानी
बायको असावी अशी गोंधळात गोंधळ मुंबईचा फौजदार
भालू गुपचूप गुपचूप सगेसोयरे
भुजंग हळद कुंकू सासु वरचढ जावई
चंदनाची चोळी अंग अंग जाळी ये मराठीचे नगरी सासुरवाशीन
चानी जखमी वाघीण सावित्री
झुंज झुंजार सुशीला
केला इशारा जाता जाता

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post