.

साने गुरुजी यांचा जीवन परिचय | Sane Guruji wiki Marathi | Sane Guruji biography in Marathi | Sane Guruji caste, wife, birthdate, suicide, death

साने गुरुजी यांचा जीवनपरिचय| Sane Guruji information in Marathi

sample47

साने गुरुजी

शिक्षक, स्वातंत्र सैनिक , 1899 - 1950

नाव - साने गुरुजी


जन्म दिनांक - २४ डिसेंबर १८९९


मृत्यू दिनांक -११ जून १९५० 


जन्म स्थान - पालगड,रत्नागिरी , महाराष्ट्र , भारत


ओळख -शिक्षक, स्वातंत्र सैनिका


वडिलांचे नाव - सदाशिवराव साने


आईचे नाव - यशोदाबाई साने


जीवनसाथी - -  


मुले - -


निवासस्थान -पालगड,रत्नागिरी 


शिक्षण - M.A

**
साने गुरुजी हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्यापुढे येते "श्यामची आई" (Shyamchi aai)नावाचे साने गुरुजी यांचे पुस्तक. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे पुस्तक वाचले असेल. श्याम वर त्याच्या आईने केलेल्या संस्कारांची महतीच या पुस्तकाच्या रूपाने देण्यात आलेली आहे. या लेखामध्ये आपण साने गुरुजी यांचा जीवनपट पाहणार आहोत.

साने गुरुजी यांचे सुरुवातीचे जीवन (Sane Guruji Initial Life)


साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर  1899 रोजी कोकणामधील  पालगड या छोट्याशा  गावी झाला. पालगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात येते.साने गुरुजी यांच्या जन्माच्या वेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते तेव्हा हा भाग बॉम्बे स्टेट मध्ये येत होता.  

साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते (Sane guruji full name). पण नंतर त्यांनी स्वीकारलेल्या शिक्षकी पेशा मुळे ते "साने गुरुजी" या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिवराव असे होते त्यांना भाऊराव असेसुद्धा संबोधले जायचे. त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई. सानेगुरुजी नेहमी म्हणायचे की आज मी जो काही आहे  तो माझ्यावर माझ्या आईने केलेल्या संस्कारांमुळेच. 

साने गुरुजी यांचे कुटुंब (Sane Guruji Family)


सदाशिवराव आणि यशोदाबाई  यांच्या पाच मुलांमध्ये साने गुरुजी यांचा तिसरा नंबर होता. त्यांना सर्वात मोठी एक बहीण  होती जिचे नाव चंद्रा असे होते. त्यांच्यापेक्षा एक मोठा गजू आणि दोन लहान भाऊ होते ज्यांची नावे अनुक्रमे पुरुषोत्तम आणि यशवंत अशी होती. त्यातील यशवंत हा लहान असतानाच तीव्र पोटदुखीने वारला होता. साने गुरुजी यांची आजी सुद्धा त्यांची बरोबरच राहत होती ती दुर्वांची आजी नावाने प्रसिद्ध होती. 

श्रीमंतीकडून गरिबीकडे झुकलेली आर्थिक परिस्थिती आणि यशोदाबाईचा मृत्यू (Sane Guruji's economical condition)



साने गुरुजी यांचे वडील  सदाशिवराव हे महसूल अधिकारी होते त्याकाळी हे पद खोत या नावाने ओळखले  जाई. त्याकाळी सरकारतर्फे शेतसारा वसूल करण्यासाठी खोताची  नेमणूक केली जाई.  मिळालेल्या शेत सार्‍या पैकी 25% रक्कम ही खोत  स्वतःकडे ठेवत असे आणि उरलेली रक्कम सरकार जमा करीत असे. 

त्यामुळे खोताचे घराणे हे एक श्रीमंत घराणे समजले जाईल. खोताचा  गावात  दबदबा असे.  खोताचे  हे पद त्यांच्याकडे परंपरागत चालत आले होते. साने गुरुजी यांच्या लहानपणी त्यांची परिस्थिती खूप चांगली  होती. पण सदाशिव रावांना गरीब शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने सारा वसूल करणे पटत नव्हते म्हणून त्यांनी  खोताचे  काम सोडले  आणि तिथून पुढे त्यांची परिस्थिती ढासळत गेली.

 कारण त्यानंतर त्यांच्याकडे उत्पन्नाचे साधन होते ते फक्त शेत जमिनीचा छोटासा तुकडा. त्यावरच ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते. सदाशिव रावांनी सावकाराकडून काढलेल्या कर्जाच्या बदल्यात नंतर त्यांच्या घरावर  जप्ती सुद्धा आली आणि आधीच बिकट असलेली त्यांची परिस्थिती नंतर आणखी खालावत  गेली. 

घरावर आलेल्या  जप्तीमुळे  हळव्या स्वभावाच्या यशोदाबाई यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि  त्यांनी अंथरूण धरले. अखेर  सन  1917 साली  यशोदा बाईंनी अखेरचा श्वास घेतला. 

साने गुरुजींना नेहमी वाटे की वेळीच जर औषध उपचार मिळाले असते तर आपली आई वाचली  असती पण घरच्या बिकट परिस्थितीमुळे उपचारांचा खर्च त्याकाळी त्यांना परवडणारा नव्हता. आपली आई मृत्युशय्येवर असताना साने गुरूजींना तिला भेटता आले नव्हते आणि याचे शल्य आयुष्यभर त्यांच्या मनात सलत राहिले.

साने गुरुजी यांचे शिक्षण (Sane Guruji's education)


साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण पालगड या गावी  झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना पुण्यामध्ये आपल्या मामाकडे पाठविण्यात आले. पण पुण्यात त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते दापोलीच्या मिशनरी स्कूलमध्ये राहू लागले. 

शाळेमध्ये असताना साने गुरुजी यांची गणना हुशार विद्यार्थ्यांमध्ये केली जायची. नेतृत्व गुण हा त्यांच्यामध्ये उपजतच होता त्याच बरोबर मराठी आणि संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. एक कवी म्हणून सुद्धा त्यांनी बराच नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या अनेक कविता आणि प्रार्थना आज सुद्धा बऱ्याच  शाळांमध्ये म्हटल्या जातात.

दापोलीच्या शाळेमध्ये शिकत असताना साने गुरुजी यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती आणखी खालावली आणि पुढचे शिक्षण घेणे त्यांना शक्य नव्हते. त्यांचा मोठा भाऊ गजू याने मुंबईमध्ये एक तात्पुरती नोकरी पत्करली होती आणि त्यातून मिळणाऱ्या पाच रुपयांपैकी दोन रुपये तो आपल्या कुटुंबीयांसाठी पाठवत होता. 

भावा प्रमाणेच आपण सुद्धा नोकरी करावे असे साने गुरुजी यांना वाटत होते. पण  पण साने गुरुजी यांना पुढे शिकवण्याची  सदाशिव रावांना इच्छा  होती त्यामुळे त्यांनी त्यांचे ऍडमिशन औंध येथील एका संस्थेमध्ये केले जिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण आणि शिक्षण दिले जात होते.

 साने गुरुजी यांना औंध मध्ये बऱ्याच कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले पण त्यांनी आपली शिकण्याची जिद्द सोडली नाही. त्याकाळी पुण्यामध्ये प्लेगची साथ सुरू झाली आणि खबरदारीचा उपाय म्हणून संस्थेतील सर्व मुलांना घरी पाठविण्यात आले त्यामुळे साने गुरुजींना नाईलाजाने पालगडला परत यावे लागले. 

एके दिवशी सदाशिवराव आणि यशोदाबाई यांचे संभाषण त्यांच्या कानावर आले ज्यामध्ये सदाशिव रावांनी आपल्या मुलाला असलेली शिक्षणाची आवड आणि त्याला पुढे शिकवण्याची त्यांची इच्छा बोलून  दाखविली. 

वडिलांची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने साने गुरुजी यांनी तात्काळ पुणे गाठले आणि नूतन मराठी विद्यालयात प्रवेश मिळविला. पुण्यात सुद्धा साने गुरुजींना अनेक अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जावे लागले कधी कधी तर त्यांना उपाशी झोपावे लागलें.   

बऱ्याच वेळा साधे पोटभर जेवण देखील त्यांना मिळत नव्हते. अशा परिस्थितीत सुद्धा साने गुरुजी यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले आणि 1918 साली मॅट्रिक चे प्रमाणपत्र मिळविले.त्यानंतर त्यांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळविला  जे त्याकाळी न्यू पूना कॉलेज या नावाने ओळखले जायचे. याच महाविद्यालयातून त्यांनी आपली बीए आणि  एमए  ची डिग्री मिळवली. मराठी आणि संस्कृत साहित्य हा त्यांचा विषय होता.

साने गुरुजी यांचे वडील सदाशिवराव हे लोकमान्य टिळकांचे खंदे समर्थक होते. एका चळवळीमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता  त्यानंतर मात्र त्यांनी राजकारणापासून स्वतःला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. 

साने गुरुजी यांच्या जीवनावर त्यांच्या आईचा मोठा प्रभाव होता. साने गुरुजी यांच्या वर त्यांच्या आईने चांगले संस्कार करून त्यांना एक उत्तम माणूस बनविले होते याचे वर्णन त्यांनी आपल्या श्यामची आई या पुस्तकात केले आहे. 

 इतर मुलांवर देखील चांगले संस्कार करता यावेत म्हणून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारण्याचा निर्णय घेतला.अमळनेर येथील प्रताप हायस्कूल मध्ये त्यांनी काही वर्ष सेवा केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहामध्ये वॉर्डन म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते.

साने गुरुजी यांचा शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा (Sane Guruji resigned from Job)


 सानेगुरुजी हे उपजतच एक वक्ता होते. आपल्या भाषणांनी  लोकांना मंत्रमुग्ध  करण्याची कला त्यांच्यामध्ये होती. शाळेमध्ये असताना त्यांनी "विद्यार्थी" नावाचे पहिले पुस्तक लिहिले जे विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय ठरले. त्यानं नंतर त्यांनी "साधना" नावाचा ग्रंथ सुद्धा लिहिला. साने गुरुजी हे विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय होते. सहा वर्षे शिक्षकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी आपले जीवन स्वातंत्र्य लढ्याला अर्पण करण्याचे ठरविले. 

देशांतर्गत चळवळीमंध्ये सहभाग आणि तुरुंगवास व लिखाण (Sane Guruji Imprisonment)


1930 साली  महात्मा गांधी यांनी दांडी यात्रेची  सुरुवात केली होती. साने गुरुजी यांच्या वर महात्मा गांधी यांच्या विचारांचा खूपच प्रभाव होता त्यामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि देशासाठी काही तरी करायचे ठरवले. 

त्यानंतर त्यांनी "सविनय कायदेभंग" चळवळीत भाग घेतला यामध्ये  जुलमी कायद्याच्या विरुद्ध वागायचे  अशी चळवळ  होती  त्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना पंधरा महिन्यांचा कारावास सुनावला जो त्यांनी धुळे येथील तुरुंगात भोगला. 

ज्या तुरुंगात साने गुरुजी यांना ठेवले होते, योगायोगाने विनोबा भावे देखील याच तुरुंगात होते.  तो  काळ होता 1932 चा. भगवद्गीतेच्या  अभ्यासावर विनोबा भावे यांचे प्रभुत्व होते त्यामुळे ते दर रविवारी सकाळी भगवद्गीतेवरील अध्याय कथन करीत असत.

 तुरुंगात असताना या गीता प्रवचनांचा सारांश साने गुरुजी यांनी लिहिला.  साने गुरुजी यांनी आपले बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच पूर्ण केले आहे. त्यांचे सुप्रसिद्ध कादंबरी श्यामची आई ही त्यांनी नाशिक येथील कारागृहात असताना  लिहिली होती. 

देशप्रेमाने झपाटलेल्या सानेगुरुजी  यांनी 1930 ते 1947 यादरम्यान विविध चळवळींमध्ये भाग घेतला त्यासाठी त्यांना तब्बल आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ही आठ वर्षे त्यांनी धुळे, नाशिक, त्रिचनापल्ली, येरवडा अशा विविध कारागृहात काढली. 

त्रिचनापल्ली येथील तुरुंगात असताना साने गुरुजी यांनी तमिळ आणि बंगाली भाषा शिकून घेतली. त्यांनी प्राचीन तमिळ महाकाव्य "कुरल" याचा मराठी अनुवाद सुद्धा केला आहे. नंतर त्यांनी एका फ्रेंच भाषेतील कादंबरीचा मराठी अनुवाद केला.

ती कादंबरी दुखी या नावाने प्रसिद्ध आहे. भारतीय भाषांचे महत्त्व त्यांनी ओळखले होते आणि अखंड भारतासाठी या सर्व भाषांचे एकत्र येणे गरजेचे होते म्हणजेच विविधतेत एकता ही काळाची गरज होती म्हणून त्यांनी आंतर भारती  नावाची चळवळ सुरू केली. 

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा प्रचार व प्रसार (Sane Guruji and congress party)


भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पाळेमुळे खेडेगावात विशेषतः खानदेशात रुजविण्यात साने गुरुजी यांचा मोलाचा वाटा होता. काँग्रेसच्या फैजपूर  अधिवेशनात  आयोजकांची भूमिका त्यांनी चोख  बजावली होती. 1936 मध्ये त्यांनी प्रचार सभांमध्ये सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता. 

1942 रोजी महात्मा गांधी यांनी चालू केलेल्या "चले जाव" या चळवळींमध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला आणि त्यासाठी त्यांना पंधरा महिन्यांचा कारावास सुद्धा भोगावा लागला. याच काळात ते  "मधु लिमये" यांसारख्या कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी "काँग्रेस" नावाचे साप्ताहिक सुद्धा काढले. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर माफी  व्हावी म्हणून त्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. याच दरम्यान त्यांनी राष्ट्र सेवा  दलाची स्थापना केली. 

हरिजनांच्या विठ्ठल मंदिरातील प्रवेशासाठी लढा 


आपल्या आई यशोदाबाई यांच्या शिकवणीमुळे साने गुरुजी यांनी समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा तसेच जातीय वाद व अस्पृश्यता यांना कायम विरोध केला. त्याकाळी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश करण्यास मनाई होती त्यासाठी साने गुरुजी ने लढा उभारला व संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. या मुद्द्यावर त्यांनी महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांना त्यात यश आले नाही मग मात्र त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला  आणि हरिजनांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळवून देण्यास ते यशस्वी ठरले. 

15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून समाजवादी पक्षाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली.पक्षात 

साने गुरुजी यांची  पुस्तके (Sane Guruji's books)


साने गुरुजी यांचे हिंदू  धर्म, मराठी संस्कृती आणि मराठी भाषा यावरून नितांत प्रेम होते हे त्यांच्या अनेक कवितांमधून आणि पुस्तकांमधून स्पष्ट होते. लहान मुलांचे मनोरंजन करणे आणि त्यांच्यावर संस्कार बिंबवणे हा त्यांचा आवडता छंद होता त्यातूनच एक नवीन संस्कारी पिढी उदयास येईल असा त्यांचा विश्वास होता.

 साने गुरुजी यांनी भारतीय संस्कृतीमधील अनेक महापुरुषांचे चरित्र देखील दिली आहेत त्याचप्रमाणे त्यांची अनेक पुस्तके आणि कवितासंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहेत त्यातीलच "मोरी" गाय हा त्यांचा एक गाजलेला कथासंग्रह. आई वडिलांच्या प्रेमावर साने गुरुजी यांनी "मोलकरीण" नावाची कादंबरी सुद्धा लिहिली नंतर त्यावर चित्रपट सुद्धा निघाला होता. 

साने गुरुजी यांनी लिहिलेली “ खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे”  प्रार्थना आजही बऱ्याच मराठी शाळांमधून म्हटली जाते. 

 भारतामधील प्रांतीयता ही भारताच्या  अखंड तत्वाला मारक ठरू शकते असे साने गुरुजींना नेहमी वाटत असे.  त्यामुळे प्रांतांमधील द्वेष नाहीसा होऊन बंधुभाव वाढीस लागावा म्हणून  त्यांनी लोकांना वेगवेगळ्या प्रांतांच्या भाषा शिकून  तेथील संस्कृती समजून घेण्यास प्रेरणा दिली. 

त्यासाठी त्यांनी आंतरभारती नावाच्या संस्थेची स्थापना केली. 
प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी सोय करावी ही आपली इच्छा त्यांनी एका साहित्य संमेलनात व्यक्त केली होती पण दुर्दैवाने अकाली निधनामुळे त्यांची ही इच्छा ही शेवटपर्यंत इच्छाच राहिली. 

साने गुरुजी यांची स्मारके 


साने गुरुजींची पुण्यात आणि कोकणात काही स्मारके आहेत. यातील रायगड जिल्ह्यातील वडघर मुद्रे या गावातील त्यांचे स्मारक प्रसिद्ध आहे. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था या  स्मारकाची देखभाल करते. 
पुण्यामध्ये दांडेकर पुलाजवळील दत्तवाडी येथे सुद्धा साने गुरुजी यांचे स्मारक आहे.पुण्यातील सर्वोत्कृष्ट सभागृहांत पैकी हे एक मानले जाते. 

साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची बरीच वर्षे आपल्या मूळ गावी पालगड येथे  काढली. साने गुरुजी यांची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी त्यांचे राहते घर राष्ट्राला अर्पण केले आहे ते आजही व्यवस्थित पद्धतीने जतन करून ठेवण्यात आले आहे. त्याची देखभाल साने गुरुजी राष्ट्रीय संस्था करत आहे. साने गुरुजी यांचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेत पूर्ण झाले ती शाळा आजही चालू आहे. 

साने गुरुजी यांनी कादंबऱ्या, नाट्यकथा साहित्य, कविता, अनुवाद, निबंध यांवर तब्बल ऐंशी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची ही पुस्तके वरदा प्रकाशनाने छत्तीस खंडात प्रकाशित केली आहेत. साधी सोपी भाषा आणि हृदयास स्पर्श करणारी शैली यामुळे साने गुरुजी   यांची सर्वच पुस्तके लोकप्रिय झाली. त्यातील श्यामची आई, मोरी गाय  आणि श्याम ही पुस्तके विशेषत्वाने  गाजली.

साने गुरुजी यांची आत्महत्या  (Sane Guruji's death | Sane Guruji's suicide)


स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये साने गुरुजी यांना भारतीय समाजातील  असमानता अस्वस्थ करत होती. त्यातच महात्मा गांधी यांच्या हत्येचा त्यांच्या हळव्या मनावर गंभीर परिणाम  झाला. त्याला प्रतिसाद म्हणून त्यांनी एकवीस दिवस निरंकार उपवास केला.  साने गुरुजी हे बऱ्याच कारणांसाठी अस्वस्थ होते. यातच त्यांना जवळचे असे कोणी उरले नव्हते. त्यांनी शेवटपर्यंत विवाह देखील केला न्हवता.(Sane Guruji wife). साने गुरुजी यांनी  11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली. (Sane Guruji cause of death) मृत्यू समयी त्यांचे वय ५० होते. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post