.

पैशांचा पाऊस पडेल फक्त हे उपाय करून पहा | how to attract money in Marathi | paisa kamavnyache upay

 

how to attract money

आपण आपल्या आसपास असे बरेचसे लोक पाहतो की ज्यांच्या  जवळ खूप सारा पैसा आहे. आणि आश्चर्यचकित  करणारी गोष्ट म्हणजे  यातील बरेचसे लोक कधीही देवपूजा करीत नाहीत, कोणतेही नियम पाळत नाहीत तरीसुद्धा त्यांच्याकडे एवढा पैसा  कसा काय येतो?  बऱ्याच श्रीमंत लोकांच्या घरी जर आपण गेलात तर त्यांच्या देवघरात अक्षरशः धूळ साठलेली असते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की मी तर खूप देव देव करतो,  रोज नित्य नियमाने पूजा सुद्धा करतो तरी देखील माझ्याकडे पैसा का येत नाही?  माझे जीवन का सुधारत नाही?  का मी नशिबाला दोष देत राहतो? अगदी काबाडकष्ट करून सुद्धा माझ्याकडे पुरेसा पैसा का येत नाही?  आलाच तर तो का टिकत नाही? लक्ष्मी आमच्यावर नाराज तर नाही ना? याउलट जे लोक कधीही देवपूजा करीत नाहीत ते एवढे श्रीमंत कसे काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की फक्त देवपूजा केल्याने पैसा येत नाही मग मी देवपूजा करणे बंद करावे काय?  चला या सर्व प्रश्नांची उत्तरं या लेखांमध्ये जाणून घेऊया. 

मित्रांनो या जन्मामधील आपली अवस्था हे आपल्या पूर्वकर्माचे फळ असते.  जर मागच्या जन्मात किंवा या जन्मात आपण चांगली कामे केली असतील,  कोणालाही त्रास दिला नसेल,  लोकांची मदत केली असेल,  दानधर्म केले असतील तर देवपूजा न करता सुद्धा आपल्याला त्याचे चांगले फळ मिळते. 

पण मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट ही पैसा नसून समाधान ही आहे. समाजात आपण असे बरेच लोक पाहतो ज्यांच्याकडे बराच पैसा आहे पण समाधान मात्र अजिबात नाही.  घरामध्ये सतत काही ना काही  वादविवाद चालू आहेत, आरोग्याच्या बऱ्याच समस्या आहेत,  आजारपणामुळे पथ्य पाळावे लागते त्यामुळे आवडीचे पदार्थ खाता येत नाहीत,  घरी गाडी आहे पण कुठे जाता येत नाही अशी एक ना अनेक उदाहरणे सुद्धा आपल्याला आसपास दिसून येतात.  मग यावर उपाय काय?  यावर उपाय म्हणजे कष्ट आणि भक्ती यांचं योग्य संतुलन.  हे संतुलन जर आपल्याला जमलं तर आपल्या जवळ पैसा आल्याशिवाय राहत नाही. 

 आपल्याकडे पैसा न येण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे आपली  ग्रहदशा म्हणजेच ग्रहांची अवस्था. आपल्या कुंडली मधील ग्रहांची अवस्था ही आपल्या मागील जन्माच्या कर्मानुसार असते आणि त्यानुसार आपल्याला त्याचे फळ देखील मिळते.  उदाहरणच जर द्यायचे झाले तर काही लोकांच्या  नशिबी सतत कष्ट येते  आणि कष्ट करून  देखील त्यांची परिस्थिती सुधारत नाही.  त्यांच्याकडे पैसा येत नाही. असे लोक साडेसाती किंवा मंगळ दोषाने ग्रासलेले असतात. याउलट काही लोकांच्या नशिबी राजयोग लिहिलेला असतो.  अगदी कमी कष्टात देखील त्यांना भरभरून मिळते. आयुष्यात काय करावे आणि काय करू नये याची प्रेरणा त्यांना आपोआपच मिळते. 

 आपल्या धर्मशास्त्रात असे बरेचसे उपाय दिलेले आहेत जे केल्याने आपली परिस्थिती सुधारते.  आपला आत्मविश्वास वाढू लागतो.  आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचा नवीन संचार होतो.  आपली बुद्धी आणि ज्ञान वाढते ज्याच्या जोरावर आपण पैसे कमवू शकता. . चला तर पाहूया असे कोणते उपाय आहेत जे आपले जीवन बदलू शकतात. 

#सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्र. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे थोतांड वाटत असेल.  आपल्यापैकी बरेच जण याला फक्त बिजनेस असे सुद्धा  संबोधित असतील  पण मित्रांनो हे  थोतांड किंवा कोणतीही अंधश्रद्धा नाही  कारण ज्या गोष्टींमध्ये तथ्य नाही ती गोष्ट जास्त दिवस चालत नाही.  आपण आपल्या आसपास अशी अनेक उदाहरणे ऐकत आलो आहोत की वास्तुशास्त्राचे पालन केल्यामुळे एखाद्या कुटुंबाची प्रगती झाली, कौटुंबिक विवाद संपले  आणि भाग्य बदलू लागले.  बऱ्याच लोकांनी या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यामुळे वास्तु विशारद या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे.  जर आपल्या घरामध्ये सतत भांडणे आणि कलह अनुभवात असाल,  नवरा बायको मध्ये कायम वितुष्ट  असेल,  घरातील कर्त्या पुरुषाला बरीचशी  व्यसने असतील,  आपली मुले अभ्यासात मागे पडत असतील,  घरामध्ये पैसा येत नसेल,  आलाच तरी तो टिकत नसेल  आणि या प्रकारचे अनुभव जर आपल्याला येत असतील तर आपण वास्तुविशारदाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. 

#दुसरा उपाय म्हणजे, आपण आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची बसलेल्या अवस्थेतली मूर्ती जरूर  ठेवावी.  बऱ्याच देवघरांमध्ये आपण पाहतो की लक्ष्मी मातेचा एक तर फोटो असतो किंवा उभ्या अवस्थेतील पितळी मूर्ती असते  पण या गोष्टींचा आपल्याला विशेष लाभ होत नाही.  धर्मशास्त्रानुसार मूर्ती पूजेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे फोटोची पूजा करण्यापेक्षा नेहमी मूर्ती पूजेला प्राधान्य द्यावे. धनवृद्धी करण्यासाठी लक्ष्मी मातेची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती ठेवणे अनिवार्य आहे. जर आपली परिस्थिती असेल तर आपण अंगठ्याच्या आकाराची लक्ष्मी मातेची चांदीची मूर्ती आपल्या देवघरात ठेवा यामुळे लक्ष्मी मातेची लवकरात लवकर कृपा प्राप्त होते. चांदी हा धातू पैशांना आकर्षित करण्याचे काम करतो त्यामुळे चांदीची मूर्ती विशेष फलदायी आहे. या मूर्तीचे रोज भक्तिभावाने पूजा केल्याने एक महिन्याच्या आतच याची परिणाम आपल्याला दिसून यायला लागतात उत्पन्नाच्या अनेक वाटा आपल्यापुढे प्रशस्त होतात.  ज्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायात जास्त पैसा आहे ती नोकरी किंवा व्यवसाय करण्याची अंतः प्रेरणा आपल्याला लक्ष्मी मातेच्या कृपेने मिळते  आणि आपली परिस्थिती सुधारू लागते.  गरीबी दूर झाल्यामुळे घरातील वाद आणि  कलह कमी होतात आणि आपण समाधानाचा अनुभव घेऊ लागता.

दर मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण आपले देवघर स्वच्छ करून  लक्ष्मी मातेची आरती जरूर करावी. आपली क्षमता असेल तर उपवास करून मातेला पाच फळांचा नैवेद्य आणि धूपबत्ती करावे ज्यामुळे मातेची कृपा सदैव आपल्यावर राहील.

# आणखी एक अचूक उपाय म्हणजे गणपती बाप्पांची पूजा. गणपती हे बुद्धी ज्ञान आणि मांगल्याचे प्रतीक आहे. अपार धन देणारी देवता म्हणून सुद्धा गणपतीला ओळखले जाते. रोज गणपतीची आराधना केल्याने आपल्या बुद्धी आणि ज्ञानात वृद्धी होऊन  आपली परिस्थिती बदलू लागते  आणि आपल्याकडे धन येऊ लागते.  जर आपल्या कुंडलीमध्ये बुध ग्रह खराब असेल तर आपल्याला व्यापारात अनेक अडचणी येतात. आपला व्यापार चालत नाही,  आर्थिक नुकसान सहन करावे लागते,  स्टॉक मार्केट,  लॉटरी सट्टा  यासारख्या गोष्टींमध्ये आपल्याला पैसे गमवावे लागतात, नोकरीमध्ये  प्रगती होत नाही,  आत्मविश्वास नेहमीच कमी राहतो,  लोकांशी बोलण्याचा संकोच वाटतो, लाजाळू प्रवृत्ती वाढते आणि जीवनामधील प्रगती खुंटते.   यावर उपाय म्हणजे आपला बुध ग्रह मजबूत करणे. रोज नित्य नियमाने गणेशाची आराधना केल्याने आपला बुध ग्रह हळूहळू मजबूत होऊ लागतो आणि अल्पावधीतच त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. 

यासाठी दर बुधवारी आपल्याला गणपतीच्या मंदिरात जाऊन गणपतीची भक्ती भावे पूजा  करायची आहे. सोबत आपण नैवेद्य आणि दक्षिणा जरूर न्यावी. आपल्या कुवतीनुसार दानधर्म करावे. पुजाऱ्याला दानपेटीतील फक्त एक रुपयाचे नाणे मागावे.  हे नाणे आपल्या देवघरात ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी.  या नाण्याची आणि सुपारीची रोज भक्ती भावाने पूजा करावी.  हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य हळूहळू कमी होऊ लागते आणि आपले आयुष्यच बदलू लागते.  नवीन लोकांच्या गाठीभेटी होतात आणि पैसा कमावण्याचे नवीन मार्ग उपलब्ध होतात.  मुलाधार चक्राची शुद्धी होऊन कामुकता कमी होते आणि प्रगती होऊ लागते. कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाचे नाव घेऊन केल्याने ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. 

#मंत्रांमध्ये अपारशक्ती असते हे तर आपल्याला ठाऊक असेलच त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये  मंत्रोच्चाराला अनन्य साधारण महत्त्व आहे.  प्रत्येक मंत्राचे विशेष महत्त्व आहे.  ब्रह्मांडामध्ये अनेक प्रकारच्या ऊर्जा उपलब्ध असतात.  त्यातील काही ऊर्जा आपल्याला आरोग्य प्रदान करतात तर काही ऊर्जा धनसंपत्ती प्रदान करतात,  काही ऊर्जेमुळे आपला भक्ती भाव वाढीस लागतो.  वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्रामुळे वेगवेगळ्या ऊर्जा आकर्षित होतात आणि आपल्याला त्याचा परिणाम दिसू लागतो.  मंत्रांचा एका मागोमाग एक यथाशक्ती जप केल्याने आपल्याला त्या ऊर्जेपर्यंत पोहोचता येते.  चला तर जाणून घेऊया असे कोणते मंत्र आहेत ज्यामुळे आपण धन ऊर्जा आकर्षित करू शकता. 

 यामध्ये सर्वात पहिला मंत्र आहे श्रीम ब्रझी.  हा लक्ष्मी मातेचा एक चमत्कारी मंत्र आहे.  या मंत्राचा नियमित  जप केल्याने  आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्याला अचानक धन लाभ होऊ शकतो.  आपण वेगवेगळ्या मार्गांनी धन आकर्षित करू शकता.  हा खूपच चमत्कारी आणि सिद्ध मंत्र आहे.  लाखो लोकांना या  मंत्राची प्रचिती  आलेली आहे. आपण कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या मंत्राचा मानसिक जप सुरू करू शकता. 

दुसरा मंत्र आहे  ओम गं गणपतये नमः.  या मंत्राचा रोज जप केल्याने गणेशाची कृपा प्राप्त होते आणि  पैसा कमावण्याचे वेगवेगळे पर्याय आपल्याला सुचतात.  आपले प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पडते.  विद्यार्थ्यांना विद्या अर्जित करण्यात अडथळे येत नाहीत. कुंडली मधील खराब बुध ग्रहाची शांती होते  त्यामुळे व्यापारामध्ये प्रगती होऊन पैसा मिळण्यास सुरुवात होते. 


तिसरा मंत्र आहे ओम शुं शुक्राय नमः. शुक्र ग्रहाचा हा मंत्र खूपच प्रभावशाली आहे.  या मंत्राचा जप केल्याने शुक्र ग्रहाबरोबरच माता लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्त होते. . शुक्र ग्रह हा भोग, विलास, वैभव, संपन्नता, ऐशो आराम यांचे प्रतीक आहे.  या मंत्रामुळे आपली जीवनशैली सुधारू लागते. आपल्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची सुखे येऊ लागतात.  बऱ्याच मार्गाने आपल्याकडे पैसा येऊ लागतो. आपले व्यक्तिमत्व आकर्षित होऊ लागते. आपण जर पुरुष असाल तर बऱ्याच स्त्रियांना आकर्षित करू शकता किंवा आपण जर स्त्री असाल तर बरेच पुरुष आपल्याकडे आकर्षित होतात. या मंत्राच्या नित्यजापाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आपण राजयोग अनुभवू  लागता.

या उपायांना कष्टाची जोड जरूर द्या

 बरेच लोक म्हणतात की माझ्याकडे पैसा नाही म्हणून मी काहीही करू शकत नाही पण पैसा म्हणतो की तू काहीतरी कर मगच मी तुझ्याकडे येईल. तर सांगण्याचा उद्देश एवढाच की वरील उपायांना कष्टांची जोड जरूर हवी नाहीतर हे सर्व उपाय निष्प्रभ आहेत.  काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावे लागते.  वरील उपायांनी कष्ट करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते,  नवनवीन कल्पना सुचतात पण त्या कल्पना जर आपण प्रत्यक्षात उतरवल्या नाहीत तर आपली परिस्थिती सुधारत नाही. वरील उपाय केल्याने आपल्या कार्यामध्ये अडथळे येत नाहीत आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आणि ज्या माणसाकडे आत्मविश्वास असतो त्या माणसाला जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. 

लक्ष्मी मातेची चांदीची बसलेल्या अवस्थेतील मूर्ती ऍमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा




Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post