.

भरघोस नफा मिळवून देणारा घरगुती बिर्याणी बनवण्याचा व्यवसाय | Home made biryani business in Marathi

 

home made biryani business marathi


मित्रांनो, या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत असा एक सोपा आणि भन्नाट व्यवसाय जो आपले जीवन बदलून टाकू शकतो (life changing business in marathi). हा व्यवसाय आपण घर बसल्या करून महिन्याला लाखो रुपये कमाऊ शकता. 

माझ्या एका मित्राने सहा महिन्यांपूर्वी हा व्यवसाय सुरु केला होता आणि आता त्याने सहा महिन्यातच ९ लाख रुपयांची गाडी खरेदी केली आहे म्हणजेच या व्यवसायात किती नफा आहे हे आपल्याला समजले असेलच. (highly profitable business)

ज्या व्यवसायाबद्दल आपण बोलतोय तो व्यवसाय आहे घरगुती  बिर्याणी बनवण्याचा (Home made biryani business marathi). या व्यवसायाला प्रचंड अशी मागणी आहे. बरेच लोक हॉटेल मधली किंवा बाहेरची बिर्याणी पसंत करीत नाही कारण ती जास्त तेलकट असते आणि ती बनवण्यासाठी बऱ्याच वेळा हलक्या दर्जाचे तेल वापरले जाते. जे लोक आपल्या आरोग्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात ते घरगुती बिर्याणीच्या शोधात असतात आणि अशा लोकांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. 


बिर्याणी साठी स्वस्त कच्चा माल कुठे मिळेल? 

घरगुती बिर्याणी बनवण्यासाठी लागणार कच्चा माल म्हणजे तांदूळ (Biryani rice), चिकन (biryani chicken)आणि मसाले (Biryani masala). त्याच बरोबर आपण कोणते इंधन वापरणार ते सुद्धा महत्वाचे आहे. (fuel to make biryani) 

आपण या साठी गॅस किंवा कोळश्याचा वापर करू शकता. या मध्ये आम्ही आपल्याला कोळश्याचा वापर करण्याचा सल्ला देतो कारण तो गॅस पेक्षा थोडा स्वस्त  पडतो आणि कोळश्यावर बनवलेली बिर्याणी चवीला सुद्धा चांगली लागते. आपल्या घराजवळच्या वखारीतून आपण सहजपणे कोळसा मिळवू शकता. जर आपल्या घराजवळ वखार नसेल तर आपण ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या वेबसाइट वरून सुद्धा कोळसा मागवू शकता (order coal online). कोळश्या मध्ये कृत्रिम आणि नैसर्गिक असे दोन प्रकार उपलब्ध आहेत (Synthatic and natural coal). दोन्ही प्रकार चालू शकता पण शकतो नैसर्गिक कोळसा जर मिळत असेल तर त्यास प्राध्यान्य द्यावे. 

तांदूळ खरेदी करण्यासाठी आपण सुरुवातीला एखादा होलसेलर पकडू शकता किंवा आपल्या घराजवळ जर एखादा मॉल असेल तर तिथे सुद्धा तांदूळ स्वस्त मिळू शकतो (Biryani rice). बिर्याणी बनवण्यासाठी कोणताही तांदूळ वापरून चालत नाही. बिर्याणीसाठी आपल्याला खास तांदळाची निवड करावी लागते जो चांगला आणि स्वस्त असेल. बिर्याणीचा तांदूळ हा लांब आणि शिजवल्यावर जास्त चिकट होणारा नसावा. बिर्याणी बनवण्यासाठी जास्त करून जिरा सांबा या प्रकारचा तांदूळ सर्वात जास्त वापरला जातो. या व्यतिरिक्त बासमती, सोना मसुरी, पाटणा, दिल्ली आणि उल्ली या तांदळाचा सुद्धा वापर केला जातो. 

जसजसा आपला व्यवसाय वाढत जातो तसतसा आपण आंध्र, कर्नाटक या ठिकाणावरून सुद्धा चांगल्या प्रतीचा तांदूळ मागवू शकता.  

बिर्याणी मध्ये वापरले जाणारे चिकन हे ब्रॉयलर कोंबड्यांचे वापरले जाते. चिकन मध्ये बारामती ऍग्रो नावाचा एक ब्रँड आहे. या ब्रँड चे चिकन चवीला साध्या चिकन पेक्षा चांगले असते आणि किमतीमध्ये सुद्धा फारसा फरक नाही. 

मसाल्यांसाठी आपण रेडिमेड आणि घरगुती असे दोन्ही  प्रकारचे मसाले वापरू शकता. सुरुवातील आपण रेडिमेड मसाल्यांपासून सुरुवात करू शकता. कालांतराने आपण आपल्या आवडीनुसार मसाले कुटून घेऊ शकता. 

बिर्याणीसाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तेल. बिर्याणीसाठी हलक्या दर्जाचे पाम किंवा सरकी तेल कधीही वापरू नये. आपण इतर तेलाचा वापर करू शकता जसे सूर्यफूल, शेंगदाणा इत्यादी. 


बिर्याणी बनवायची कशी? (How to make chicken biryani?)

बिर्याणी बनवायला शिकणे अजिबात अवघड नाही. आजकाल youtube वर बिर्याणीच्या बऱ्याच रेसिपी उपलब्ध आहेत. आपण त्यामधील कोणतीही रेसिपी अगदी आरामात शिकू शकता. २-३ वेळा जर आपण प्रयत्न केला तर आपलयाला ते सहज जमते. (Biryani receipe marathi)

जर आपण online कोर्से मध्ये इंटरेस्टेड नसाल तर बऱ्याच ठिकाणी बिर्याणी रेसिपी चे कोर्सेस offline उपलब्ध आहेत. साधारणतः २ ते १० हजार रुपयांपर्यंत या कोर्सेस ची फी असते आणि त्याचा कालावधी एक आठवडा ते १ महिन्यापर्यंत असतो. आपण जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी आपली बिर्याणी चांगली बनत जाते. 

सुरुवातीला, जे आपल्याला  कोर्स मध्ये शिकवले आहे तशीच बिर्याणी बनवण्याचाच प्रयत्न करावा त्या मध्ये जास्त प्रयोग करत बसू नये नाहीतर आपलय बिर्याणीची गुणवत्ता बिघडू शकते. जसे जसे आपण या मध्ये प्राविण्य मिळवाल, तस तसे आपण नवीन प्रयोग करून आपला स्वतःचा एक ब्रँड निर्माण करू शकता . 


कोणत्या बिर्याणीच्या प्रकाराला जास्त मागणी आहे? (Types of biryani)

आजकाल बिर्याणीचे जवळ जवळ २६ प्रकार उपलब्ध आहेत जसे दम बिर्याणी (Chicke dum biryani), तंदूर बिर्याणी (Chicken tandoor biryani), फ्राय बिर्याणी (Chicken fry biryani), चिकन टिक्का बिर्याणी (Chickn tikka biryani), लखनवी बिर्याणी (Lakhnavi biryani), कोलकाता बिर्याणी (Kolkata biryani), पंजाबी बिर्याणी (punjabi biryani), सिंधी बिर्याणी(Sindhi biryani) इत्यादी पण या मध्ये चिकन दम बिर्याणी ला सर्वात जास्त मागणी आहे. 

आपल्या भागामध्ये कोणत्या बिर्याणी ला सर्वात जास्त मागणी आहे याचा सर्वे आपण केला पाहिजे आणि त्या नुसार बिर्याणीचे उत्पादन केले पाहिजे.  


बनवलेली बिर्याणी पॅक कशी करायची? (How to pack the chicken biryani?)

बिर्याणी पॅक करण्यासाठी मार्केट मध्ये कंटेनर मिळतात. ज्या मध्ये फुल्ल आणि हाल्फ अशा दोन साइझ उपलब्ध आहेत. हे कंटेनर आपण आपल्या जवळच्या दुकानातून किंवा मॉल मधून खरेदी करू शकता. असे कंटेनर online सुद्धा उपलब्ध आहेत. 


बनवलेली बिर्याणी विकायची कोठे? (Where to sell the home made biryani?)

बिर्याणी विकण्यासाठी आपल्याला  स्वीगी किंवा झोमॅटो सारख्या वेबसाइट वर रेजिस्ट्रेशन करावे लागते आणि ते खूप सोपे आहे. आपण आपल्या मोबाईल द्वारे सुद्धा या साईट वर रेजिस्ट्रेशन करू शकता. online फूड डिलिव्हरीच्या जेवढ्या वेबसाईट आहेत त्या सर्व वेबसाईट वर आपण रेजिस्ट्रेशन करावे. जर एखादा ग्राहक घरगुती बिर्याणीच्या शोधात असेल तर तो online ऑर्डर करेल आणि त्याचे नोटीफिएशन आपल्या मोबाइलवर येईल. त्यानंतर आपण बिर्याणी पॅक करून ठेवायची आहे. स्वीगी किंवा झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आपल्या घरी येऊन पार्सल घेईल आणि गिर्हाईकाला पोहचवण्याचं काम करेल. या मध्ये आपल्याला डिलिव्हरी ची झंझट बिलकुल नाही. 


आपल्या अकाउंट मध्ये पैसे कसे येतील? 

जेवढ्या बिर्याणी आपण विकत त्याचे पैसे आपल्या बँक खात्यात जमा केले जातात. या मध्ये स्वीगी आणि झोमॅटो सारख्या कंपन्या प्लॅटफॉर्म चार्जेस कापून राहिलेली अमाऊंट आपल्या बँक खात्यात जमा करतात. 


बिर्याणी विक्रीतून किती प्रॉफिट मिळते? (Income from biryani making business)

आपण एक बिर्याणी कंटेनर १२० ते १५० रुपयांपर्यंत विकू शकता. या मध्ये ३० ते ४०% मार्जिन आहे. वेगवेगळ्या बिर्याणी प्रकारानुसार त्याची किंमत बदलत जाते. जर आपला व्यवसाय वाढला तर यातून आपल्याला ५०% पर्यंत सुद्धा मार्जिन मिळू शकते. 


बिर्याणी व्यवसाय वाढवायचा कसा? 

सुरुवातील आपण हा व्यवसाय घरातून सुरु करावा आणि online ग्राहक टार्गेट करावेत. भविष्यात जर आपला बिझनेस वाढला तर आपण एखादे दुकान भाड्याने घेऊ शकता त्यामुळे आपल्याला online  आणि offline  असे दोन्ही पद्धतीचे ग्राहक मिळतील आणि आपला व्यवसाय वाढण्यास मदत होईल.


आपल्या कडून विचारले जाणारे काही प्रश्न

बिर्याणी व्यवसायातून चांगली कमाई  होते का? (Is biryani business profitable?)

होय, बिर्याणी व्यवसायातून खूप चांगली कमाई  होते पण आपण, गुणवत्तेवर भर दिला पाहिजे. साधारणतः ३० ते ५०% पर्यंत नफा आपण या व्यवसायातून मिळवू शकता.

मी एक गृहिणी आहे, मी हा व्यवसाय करू शकते का?

होय, आपण हा व्यवसाय करू शकता. या साठी रोजच्या कामांव्यतिरिक्त आपल्याला थोडा वेळ या व्यवसायासाठी देणे गरजेचे आहे. बिर्याणी बनवण्यासाठी आपण online आणि offline अश्या दोन्ही पद्धतीचे कोर्सेस करू शकता. online फूड डिलिव्हरी अँप च्या माध्यमातून आपण आपली बिर्याणी विकून चांगला नफा कमाऊ शकता. 



Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post