.

कोरोना विषाणूची लक्षणे | Symptoms of Corona virus in Marathi | Corona day wise symptoms | Type of Corona virus

 कोरोना व्हायरसची लागण  झाल्यानंतर रुग्णांमध्ये प्रामुख्याने कोणती लक्षणे दिसून येतात? (Symptoms of Corona in Marathi)

Corona Virus Marathiwiki.org


कोरोना विषाणू ने जगभरात हाहाकार माजवलेला आहे. त्यातच कोरोना विषाणूची दुसरी लाट हि पहिल्या लाटेपेक्षा तीव्र आहे. या लाटेमधे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचाच धोका जास्त आहे. पण संशोधनांती असे दिसून आले आहे कि कोरोना ची लक्षणे सध्या पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहेत आणि त्याची तीव्रता वयोगटानुसार वेगवेगळी आहे. असे असले तरी काही लक्षणे हि सारखीच आहेत आणि रुग्णाचे वय, प्रतिकार शक्ती, या नुसार त्याची तीव्रता कमी अधिक प्रमाणात जाणवते. चला तर जाणून घेऊ कोरोना विषाणू ची लक्षणे काय आहेत ते. 


खोकला - खोकला हा तसा आपल्या साठी सामान्य आजार आहे. पण ऋतुमानातील बदलामुळे होणारा खोकला आणि कोरोना विषाणू मुळे होणार खोकला यात खूप फरक आहे. कोरोना विषाणू मुळे येणारी खोकल्याची उबळ हि सामान्य खोकल्या  पेक्षा जास्त वेळ टिकते. कधी कधी हि उबळ एक तासा पर्यंत सुद्धा असू शकते . जर आपल्याला अशी खोकल्याची उबळ दिवसातून ३ ते ४ वेळा येत असेल तर आपल्याला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. 


ताप - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शरीराचे तापमान वाढते यालाच आपण ताप येणे असे म्हणतो. हे कोरोना संसर्गाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. शरीराचे तापमान हे रुग्णांमध्ये ३७. ८ C किंवा १००. ४ F पेक्षा जास्त असते. रुग्णाच्या प्रतिकार शक्तीनुसार त्याची तीव्रता कमी जास्त दिसून येते. 


चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे - कोरोना संसर्गामुळे रुग्णाच्या चव आणि वास घेण्याच्या क्षमतेमध्ये बदल होतो. बरेच रुग्ण हे सर्व पदार्थांची चव हि एकसारखी आणि थोडीशी खारट असल्याची तक्रार करतात. तसेच वास घेण्याच्या क्षमतेवर सुद्धा परिणाम दिसून येतो. 


थकवा - तापाबरोबरच अशक्तपणा किंवा थकवा जाणवणे हि सुद्धा कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येतात. हा थकवा हा नेहमीच्या थकव्यापेक्षा वेगळा असतो आणि बरा  व्हायला बराच काळ लागू शकतो त्या मुळे शरीराचे कमीत कमी नुकसान व्हावे या साठी पौष्टिक आणि संतुलित आहार महत्वाचा ठरतो. 


श्वास घेण्यास त्रास - हे सुद्धा कोरोना विषाणूचे एक महत्वाचे लक्षण आहे. कोरोना विषाणू फुफ्फुसांच्या पेशींवर आघात याकरतात आणि त्यांची क्षमता कमी करतात त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार रुग्णांद्वारे केली जाते.


संशोधनानुसार, कोरोना विषाणू हा आपले रूप बदलत असतो ज्याला आपण व्हेरिएंट असे म्हणतो. वेग वेगळ्या व्हेरिएंट ची लक्षणे वेग वेगळी असू शकतात. कोरोनाच्या  बदललेल्या व्हेरिएंट मध्ये काही लक्षणे हि जुन्या व्हेरिएंट च्या तुलनेत प्रखरतेने जाणवतात जसे थकवा किंवा अशक्तपणा, खोकल्याची उबळ, घसा  खवखवणं, हातापायांच्या   किंवा शरीराच्या सर्व भागांच्या स्नायू मध्ये वेदना होणे इत्यादी. 


वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळ्यास ती अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि लवकरात लवकरात कोरोनाची चाचणी करून घेणे आवक्श्यक आहे. जेवढ्या लवकर रोगाचे निदान होते तेवढ्या लवकर औषध उपचार  सुरु करता येतात आणि त्या मुळे रुग्ण  लवकर बरा  होण्याची शक्यता वाढते. 


कोरोनाची चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल प्राप्त होई पर्यंत जनसंपर्क टाळावा कारण एक कोरोना बाधित व्यक्ती अनेकांना बाधित करू शकतो त्या मुळे आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच विलगीकरणात राहणे किंवा दवाखान्यात ऍडमिट होणे. 


जर आपण आपल्या कुटुंबीयांबरोबर राहत असाल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी सुद्धा कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे आणि शक्यतो बाहेर जाणे किंवा जनसंपर्क टाळावा. 


कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्यास काय करावे?


जागतिक आरोग्य संघटने नुसार, कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यापासून लक्षणे दिसून येईपर्यंत काही दिवसांचा कालावधी लागतो. हा कालावधी व्यक्ती परत्वे वेग वेगळा असू शकतो पण सरासरी ५ दिवस ते जास्तीत जास्त १४ दिवसांपर्यंत हा कालावधी असू शकतो. 


जर आपली कोरोना चाचणी सकारात्मक आली तर, घाबरून जाऊ नये कारण योग्यवेळी आणि योग्य औषध उपचारांमुळे कोरोना पूर्णपणे बरा होऊ शकतो. अश्यावेळी आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबातील सदस्य यांनी विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. कृपया घराबाहेर पडू नये कारण त्या मुळे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील औषध उपचार करावेत. कृपया आपणच आपले डॉक्टर होऊन घरगुती उपचार करत बसू नये. 


कोरोना विषाणूच्या  संसर्गामुळे प्रतिकार शक्ती कमी होते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे सुद्धा घेऊ शकता तसेच शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थांचे सेवन करणे आणि पुरेसा आराम करणे गरजेचे आहे. 


कोरोना किंवा कोविड-१९ ची लक्षणे सर्वां मध्ये वेगवेगळी का आढळतात?

कोरोनाची लक्षणे वेगवेगळी आढळण्यामागे वेगवेगळी करणे आहेत. सर्व लोकांची प्रतिकार शक्ती वेगळी असते. त्यामुळे सर्वांमध्ये कोरोनाची सारखीच लक्षणे आढळत नाही परंतु काही लक्षणे हि सामान्यपणे सर्वांमध्ये आढळतात जसे ताप, खोकला, चव आणि गंध न जाणवणे इत्यादी. कोरोना विषाणू मुळे  काहीजणांच्या पचन संस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे जुलाब आणि मळमळ किंवा पोटदुखी सारखी लक्षणे जाणवू शकतात. वयोमानानुसार या लक्षणांची तीव्रता कमीजास्त असू शकते. 


कोरोना किंवा कोविड-१९ लक्षणांचे प्रकार? (Type of corona symptoms)

 • तीव्र डोकेदुखी, वास आणि चव जाणे, स्नायूंचे दुखणे, तीव्र खोकल्याची उबळ, घास दुखणे आणि खवखवणे, छातीत दुखणे किंवा छाती भरून आल्यासारखे वाटणे. या प्रकारात ताप येत नाही पण बाकी लक्षणे जाणवतात. 

 • या प्रकारात, ताप येणे, डोके दुखणे, वास आणि चव जाणे, खोकला, घास दुखणे किंवा खवखवणे, भूक न लागणे हि लक्षणे जाणवतात. 

 • या प्रकारात पचन संस्थेवर परिणाम होतो त्यामुळे जुलाब लागणे, पोटात दुखणे, आतड्यांचे दुखणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांमध्ये बऱ्याच रुग्णांमध्ये ताप आणि खोकला आढळून येत नाही. 

 • या प्रकारात खूप थकवा जाणवतो. त्याचबरोबर डोके दुखणे, ताप, घास दुखणे, छातीत दुखणे, खूप अशक्तपणा हि लक्षणे जाणवतात. जर ताप असेल तर अशक्तपणाची तीव्रता जास्त असते. बऱ्याच रुग्णांमध्ये खोकला आढळून येत नाही. 

 • या प्रकारात, मानसिक गोंधळाची स्थिती निर्माण होते त्याच बरोबर ताप, डोकेदुखी, अंगदुखी, स्नायुदुखी इत्यादी लक्षणे दिसून येतात. 

 • हा प्रकार शक्यतो लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. या मध्ये उलट्या आणि जुलाब, ताप अशक्तपणा, पोटात कळ  येणे अशी लक्षणे दिसू शकतात. या प्रकारात शक्यतो खोकला आढळत नाही. 

प्रत्येक सर्दी आणि खोकला हि कोरोनाची लक्षणे असू शकतात का?

सर्दी आणि खोकल्याची लक्षणे हि फ्लू या प्रकारात मोडतात. हि लक्षणे कोविड-१९ या आजाराशी मिळती जुळती आहेत. सामान्य सर्दी खोकला आणि कोविड ची काही लक्षणे सारखी असू शकतात पण जसे चव आणि गंध यांची क्षमता कमी होणे, तीव्र खोकल्याची उबळ इत्यादी लक्षणे कोविड  ची असू शकतात त्यामुळे योग्यवेळी चाचणी करून घेणे आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करणे फायदेशीर ठरते. 

लहान किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाची कोणती लक्षणे आढळतात? (Symptoms of Corona in Children)

संशोधनाप्रमाणे, आतापर्यंत कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये कमी दिसून येत होता पण आता या विषाणूत बदल झाल्यामुळे लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये सुद्धा हा आजार झपाट्याने वाढू लागला आहे. तसेच या आजाराची लक्षणे सुद्धा पहिल्या पेक्षा वेगळी दिसून येत आहेत. चला पाहूया लहान मुलांमध्ये या विषाणू ची कोणती लक्षणे आढळत आहेत. 

 • जुलाब - लहान मुलांमध्ये आढळणारे कोरोना विषाणूचे हे एक प्रमुख लक्षण आहे. 
 • उलट्या - बऱ्याच लहानमुलांना जुलाबरोबरच उलट्या सुद्धा होत आहेत. 
 • डोकेदुखी - डोकेदुखी हे जवळपास सर्वांमध्ये आढळणारे एक सामान्य लक्षण आहे. 
 • ताप - लहान मुलांमध्ये कमी जास्त प्रमाणात ताप आढळून येत आहे. 
 • अंगावर पुरळ - काही जाण्याच्या अंगावर पुरळ येत आहेत. 
 • शुद्ध हरपणे - हि लक्षणे सुद्धा काही मुलांमध्ये आढळून आली आहेत. 
 • कोविड टोज  - हातापायाच्या नखांना निळसर पणा येणे हे लक्षण सुद्धा लहान मुलांमध्ये आढळून येत आहे. 

 कोविड चाचणी सकारात्मक आल्यानंतर काय करावे आणि काय करून नये?

जर तुमची कोविड चाचणी सकारात्मक आली तर घाबरून जाऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घ्यावा. जर कोविड ची लक्षणे सौम्य असतील तर तुमचे डॉक्टर तुम्हाला घरी राहूनच औषध उपचार घेण्याचा सल्ला देऊ शकतात पण जर लक्षणे तीव्र स्वरूपाची असतील तर ते तुम्हाला दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला मिळू शकतो.  

जर आपण घरीच औषध उपचार घेत असाल तर, कोविड  पॉसिटीव्ह  व्यक्तीने घरातील इतर सदस्यांपासून दूर राहणे गरजेचे आहे. शक्य असल्यास रुग्णाने पुढील १४ दिवस वेगळ्या  खोलीत राहावे. रुग्णाच्या कुटुंबीयांनी देखील विलगीकरणात राहवे आणि बाहेर जाणे टाळावे. 

जर तुमची कोविड  चाचणी सकारात्मक आली तर, तुमचा अहवाल तुमच्या लॅब द्वारे आरोग्य यंत्रणेला पण जातो आणि आरोग्य यंत्रणेद्वारे तुम्हाला फोन देखील केला जातो. आपण आरोग्य यंत्रणेला जास्तीत जास्त सहकार्य करणे गरजेचे आहे. कृपया कोणतिही माहिती लपऊन ठेऊ नये. 

कोविडच्या सौम्य लक्षणांमध्ये डॉक्टर शक्यतो पॅरासिटामोल सारखे ताप नियंत्रक औषध देतात. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांबरोबरच भरपूर पाणी आणि द्रव पदार्थांच सेवन करणे महत्वाचे आहे. तसेच भरपूर आराम केल्याने शरीराची झीज भरून यायला मदत मिळते आणि तुम्हाला लवकर बरे वाटू लागते. कोविड  रुग्णाने पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. 

कोविड  ची लक्षणे सर्व रुग्णांमध्ये सारखी आढळून येत नाहीत. जर तुम्हाला मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत असतील तर आपल्याला हॉस्पिटल मध्ये भरती केले जाऊ शकते. 

कोविडच्या सौम्य लक्षणांमध्ये डॉक्टर शक्यतो पॅरासिटामोल सारखे ताप नियंत्रक औषध देतात. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांबरोबरच भरपूर पाणी आणि द्रव पदार्थांच सेवन करणे महत्वाचे आहे. तसेच भरपूर आराम केल्याने शरीराची झीज भरून यायला मदत मिळते आणि तुम्हाला लवकर बरे वाटू लागते. कोविड  रुग्णाने पौष्टिक आहार घेणे महत्वाचे आहे त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. 

कोविड  ची लक्षणे सर्व रुग्णांमध्ये सारखी आढळून येत नाहीत. जर तुम्हाला मध्यम किंवा तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवत असतील तर आपल्याला हॉस्पिटल मध्ये भरती केले जाऊ शकते. 

रुग्णालयात केव्हा जावे?

भारतामध्ये लोकांची प्रतिकार शक्ती परदेशातील लोकांच्या तुलनेत चांगली आहे त्यामुळे भारतामध्ये कोविड  हा आजार बरा होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोना विषाणू बाधित बरेच लोक हे ताप  नियंत्रक औषध घेऊन बरे झाले आहेत. पण काही रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे खूपच तीव्र आढळतात. जसे कि श्वास घेण्यास त्रास होणे, प्रमाणाबाहेर अशक्तपणा, शरीरातील ऑक्सिजन ची पातळी खूपच कमी होणे इत्यादी. अशा परिस्थितीत तात्काळ रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये  म्युकस किंवा कफ  साठायला सुरुवात होते. अशावेळी डॉक्टर रुग्णाच्या छातीचा एक्स - रे काढून किती कफ साठला आहे ते पाहतात आणि त्यानुसार पुढील उपचारांचा सल्ला देतात.  या मध्ये रुग्णाला अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो किंवा व्हेंटिलेटर वर ठेवले जाते. 

श्वास घेण्यास त्रास होत असेल तर कोठे संपर्क साधावा?

भारत सरकारने कोविड  साठी एक स्वतंत्र हेल्पलाईन यंत्रणा सुरु केली आहे. जर आपल्यामध्ये कोविड  ची तीव्र लक्षणे दिसून येत असतील तर आपण मदतीसाठी खालील राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक डायल करू शकता. 

राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक - ०११२३९७८०४६  किंवा १०७५

आय सी यू  म्हणजे नेमके काय? आय सी यू मध्ये नेमके काय केले जाते?

आय सी यू हि एक कृत्रिम जीवन प्रणाली आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी हि एक जीवन दायिनी आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये रुग्णाच्या फुफ्फुसांची क्षमता खूपच कमी होते त्यामुळे रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो. आय सी यू मध्ये रुग्णास प्राणवायूचा पुरवठा मास्क द्वारे केला जातो. गंभीर रुग्णांमध्ये प्राणवायूची नळी  हि नाकावाटे थेट  घालून प्राणवायू   फुफ्फुसांपर्यंत पोहोचवला जातो. 

कोरोना विषाणूचा संसर्ग कसा होतो?

आतापर्यंतच्या संशोधनातून कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव हा, सर्दी खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या छोट्या थेंबांमधून होतो. जर आपण या थेंबांच्या थेट संपर्कात आला तर आपल्याला हि कोरोना चा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू शक्यतो नाक, तोंड आणि डोळ्यातून शरीरात प्रवेश करतो म्हणून विनाकारण डोळ्याला किंवा चेहऱ्याला स्पर्श करणे टाळले पाहिजे.  नवीन संशोधनानुसार हा विषाणू आता हवेतून सुद्धा पसरू लागला आहे त्यामुळे रुग्ण संख्या हि झपाट्याने वाढत आहे. 

कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?

कोरोना विषाणूचा संसर्ग हा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होतो. बाधित व्यक्ती च्या सर्दी किंवा खोकल्यावाटे निघणाऱ्या सूक्ष्म थेंबांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा कोरोनाचा संसर्ग होतो. खालील तत्वांचे पालन केल्यास कोरोना विषाणूंच्या संसर्गाला आपण रोखू शकतो. 

 • जनसंपर्क टाळावा 
 • कोणत्याही आजाराने ग्रसित व्यक्तींच्या जास्त जवळचा संपर्क टाळावा. 
 • घराबाहेर पडताना मास्क नियमित वापरावा. 
 • बाहेरून घरात आल्यावर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. 
 • विनाकारण आपला चेहरा, डोळे, नाक, तोंड याना स्पर्श करू नये. 
 • शक्य असल्यास सानिटीझर चा वापर करावा. 
 • सार्वजनिक ठिकाणी जिण्याचे कठडे, रेलिंग, दुकानांचे काउंटर याना विनाकारण स्पर्श करू नये. 
 • आपले हात धुवावे. 

कोणत्या व्यक्तींना कोरोनाचा धोका जास्त असतो?

प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती कोरोनाला लवकर बळी पडतात. अश्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त असते. या मध्ये खालील लोकांचा समावेश होतो. 

 • प्रतिकार शक्ती कमी असणारे लोक 
 • वृद्ध 
 • मधुमेही 
 • दम्याचे विकार असणारे रुग्ण 
 • हृदयरोगी 
 • पूर्वीपासूनच विविध प्रकारचे विकार असणारे लोक 

अश्या लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जर आपण वरील विकारांनी बाधित असाल आणि आपल्या मध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत असतील तर ताबडतोब रुग्णालयाशी संपर्क साधावा म्हणजे लवकरात लवकर औषध उपचार चालू करता येतील. 

कोरोना आणि लसीकरण 

सध्या विविध कंपन्यांच्या लस बाजारात उपलब्ध आहेत आणि त्या जवळपास सर्व सुरक्षित आहेत त्यामुळे लस  जरूर घ्यावी कारण सध्या तरी कोरोनापासून सुरक्षित राहण्याचा लस  हाच एकमेव पर्याय आहे त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सर्वानी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. जर आपल्याला आधीपासूनच काही आजार असतील जसे मधुमेह ,हृदयरोग, उच्च रक्तदाब, दमा तरीसुद्धा आपण लस  घेऊ शकता. गरोदर स्त्रियांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लस  घेणे गरजेचे आहे. लहान मुलांना लसीकरणातून सध्यातरी वगळण्यात आले आहे पण भविष्यात विचार विनिमय करून त्यावर सुद्धा निर्णय घेतला जाईल. 

Disclaimer:-

या लेखात देण्यात आलेली माहिती हि फक्त सामान्यज्ञानासाठी दिलेली आहे. कोणत्या आजारावर कोणते  औषध घ्यावे याचा सल्ला मराठी Wiki कधीही देत नाही . कोणत्याही रोगावर उपचार घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. या लेखामध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार जर कोणी परस्पर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याविना  औषधे घेत असेल तर झालेल्या नुकसानीस मराठी Wiki जबाबदार नाही याची नोंद घ्यावी. आजारा बद्दल अधिक माहिती आणि उपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा . 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post