.

उद्धव ठाकरे यांचा जीवन परिचय | Uddhav Thackeray biography in Marathi, age, birthdate, wife, son, politics, family, relatives, Uddhav Thackeray wiki Marathi

उद्धव ठाकरे यांचा जीवन परिचय | Uddhav Thackeray Information in Marathi

Uddhav Thackeray biography in Marathi

उद्धव ठाकरे

राजकारणी , 1960 - *

नाव - उद्धव ठाकरे


जन्म दिनांक - 27 जुलै 1960


जन्म स्थान - बॉम्बे (सध्या मुंबई)


ओळख - राजकारणी


वडिलांचे नाव - बाळासाहेब ठाकरे


आईचे नाव - मीनाताई ठाकरे


जीवनसाथी - रश्मी ठाकरे


बंधू - बिंदुमाधव ठाकरे आणि जयदेव ठाकरे


पुत्र - आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे


निवासस्थान - मातोश्री, मुंबई


शिक्षण - कला शाखेची पदवी, जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबईजन्म, शालेय आणि महाविद्यालयीन जीवन (Uddhav Thackeray age)

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी मुंबई येथे झाला (Uddhav Thackeray Birthday).  त्याकाळी मुंबईला बॉम्बे असे संबोधले जायचे.  उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या तीन पुत्रांपैकी सर्वांत लहान पुत्र. 


त्यांच्या सर्वात मोठ्या भावाचं नाव बिंदुमाधव ठाकरे त्यानंतर जयदेव ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा नंबर लागतो. सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरे यांचा स्वभाव शांत आहे. उद्धव ठाकरे यांनी बालमोहन विद्यामंदिर येथून शालेय शिक्षण घेतले. त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांचे शिक्षण सुद्धा याच शाळेतून झाले आहे. 


त्यानंतर त्यांनी जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट येथून कला शाखेची पदवी मिळवली.(Uddhav Thackeray Education)  त्यामध्ये फोटोग्राफी हा त्यांचा मुख्य विषय होता. त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरी येथे  2004 साली आपल्या फोटोंचे प्रदर्शन सुद्धा भरावले होते.  त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांचे फोटो या प्रदर्शनात समाविष्ट केले होते. (Uddhav Thackeray photography) 


त्यांची फोटोग्राफी वर दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित केली आहेत ज्यांची नावे अनुक्रमे महाराष्ट्र देश आणि पहावा विठ्ठल अशी आहेत. 


उद्धव ठाकरे यांच्या विवाह आणि कुटुंबाविषयी (Uddhav Thackeray family)

उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबं विषयी जरा बोलायचे झाले तर उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्याशी लग्न केले. (Uddhav Thackeray wife) उद्धव आणि रश्मी यांना दोन मुले आहेत त्यापैकी एक आदित्य ठाकरे आणि दुसरा तेजस ठाकरे.  रश्मी ठाकरे या दैनिक सामना आणि मार्मिकच्या संपादिका आहेत.  


रश्मी ठाकरे यांच्या वडिलांचे नाव माधव पाटणकर त्यांचा स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि ते मध्यमवर्गीय कुटुंबातून आहेत.  रश्मी ठाकरे या मूळच्या  या डोंबिवलीच्या.  त्यांनी मुलुंडच्या  वाजे महाविद्यालयातून आपली वाणिज्य शाखेची पदवी घेतलेली आहे.  1987 साली  त्यांनी एलआयसी मध्ये कॉन्ट्रॅक्ट एम्पलोयी म्हणून नोकरी मिळविली.  त्यानंतर त्यांची राज ठाकरे यांची बहिण जयवंती  यांच्याबरोबर ओळख झाली आणि त्या उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आल्या.  


त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये विवाह केला.  ठाकरे यांचा मोठा मुलगा आदित्य ठाकरे हा युवा सेनेचा अध्यक्ष आहे आणि ठाकरे मंत्रिमंडळात तो पर्यटनमंत्री सुद्धा आहे.  त्यांचा धाकटा मुलगा तेजस ठाकरे हा वन्यजीव संशोधक आहे. (Uddhav Thackeray Son). उद्धव ठाकरे याना दोन्ही मुलेच  आहेत कन्या नाही. (Uddhav Thackery Daughter)


उद्धव ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश (Uddhav Thackeray constituency)

आपले सर्व छंद बाजूला ठेवून राजकारण करावं किंवा शिवसेना चालवावी असे त्यांना कधीच वाटले नाही.  राजकारणातील त्यांचा प्रवेश हा त्यांचा नाईलाज समजला जातो कारण त्यांना मनापासून यामध्ये रस नव्हता पण आई मीनाताई ठाकरे यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी 1994 पासून  राजकारण करायला सुरुवात केली. 


 मीनाताई ठाकरे यांना असं वाटत होता की त्यांचा कमीत कमी एक मुलगा तरी बाळासाहेबांचा वारस व्हावा आणि त्यांना त्यांच्या कार्यात साथ द्यावी.  जयदेव ठाकरे आणि बाळ ठाकरे यांचे संबंध काही विशेष चांगले नव्हते त्यामुळे 1994 साले मीनाताई ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकारण  प्रवेशासंदर्भात बोलणी केली आणि त्यांना शिवसेनेच्या प्रत्येक  कार्यक्रमात हजेरी लावण्याचा आदेश दिला.  


आईच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यास सुरवात केली.  त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापले होते.  राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विद्यार्थी सेनेने नागपूर मध्ये एक मोर्चा काढला होता.  त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भाग घेतला.  त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे एकदम शांत होते. 


 जसजसा उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यक्रमात रस घ्यायला सुरुवात केला तसे तसे राज ठाकरे यांचे महत्त्व कमी होऊ लागलं.  त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सुद्धा कळून चुकलं की पार्टीमध्ये पक्षामध्ये जर आपलं नाव करायचा असेल तर हीच  चांगली संधी आहे.  त्यावेळी ते पक्षांतर्गत कामांमध्ये व्यस्त राहायला लागले.  बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्याकडे कामासंदर्भात पाठविण्यास सुरुवात केली. 


उद्धव ठाकरे यांचा वाढत प्रभाव (Uddhav Thackeray News)

कार्यकर्त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना आपल्या कार्यक्रमांमध्ये बोलण्यास सुरुवात केली उद्धव ठाकरे यांनी आपल्या  पहिल्या राजकारणाची झलक दाखवली ती  1997 सालच्या बीएमसी च्या निवडणुकीत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून मनमानी झाल्यामुळे राज ठाकरे थोडे बाजूला फेकले गेले.  


राज ठाकरे यांच्या बऱ्याच लोकांना तिकीट दिले गेले नाही यावरून राज ठाकरे एवढे नाराज झाले की त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली नाराजी उघडउघड व्यक्त केली आणि याच कारणासाठी साठी राज ठाकरे  यांची बाळासाहेब ठाकरे यांनी कानउघडणी केली होती.  


बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस त्यांना असं सुनावलं  होतं की आतल्या गोष्टी यातच राहिल्या पाहिजेत  त्या चव्हाट्यावर येता कामा नये. 


राज ठाकरे यांची नाराजी 

 उद्धव ठाकरे आता राजकारणात सक्रिय होत चालले होते आणि त्यांनी शिवसेनेवर आपलं पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं.  2002 च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या आणि यावेळीसुद्धा 1997 चा पाढा गिरवला गेला. 


 तिकीट वाटपामध्ये उद्धव ठाकरे यांनी वर्चस्व मिळवल आणि या निवडणुकीत शिवसेना पुन्हा एकदा जिंकली. राज ठाकरे यांच्या  लोकांना यावेळीसुद्धा तिकीट नाकारण्यात आलं.  त्यामुळे राज ठाकरे हे खूपच नाराज झाले आणि पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाला. आता उद्धव ठाकरे हे पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरले होते.  


या निवडणुकीतील यशानंतर हे सिद्ध झाले की उद्धव ठाकरे हे सुद्धा तितकेच समर्थ आहेत आणि तेसुद्धा स्वतंत्रपणे पक्ष  चालवू  शकतात. 


बिंदुमाधव ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांचे निधन 

त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे अशा चेहऱ्याच्या शोधात होते जो  त्यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे हाती घेऊ शकेल.  पण दरम्यानच्या काळात त्यांचा मोठा मुलगा बिंदूमाधव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाले.  


बिंदु माधव ठाकरे यांनी अग्निसाक्षी सारख्या  चित्रपटाची निर्मिती सुद्धा केली होती पण त्यांच्यावर अचानक काळाने झडप घातली.  तो काळ होता 1996 सालचा.  त्यांचा मधला मुलगा जयदेव ठाकरे यांना शिवसेना चालविण्यात रस होता पण पण बाळासाहेब ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचे फारसे पटत न्हवते. 

मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूनंतर जयदेव ठाकरे यांच्या पत्नी स्मिता ठाकरे यांनी त्यांचे राहते घर मातोश्री वरील सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली.  मातोश्री च्या पहिल्या मजल्यावर  स्मिता ठाकरे या राहत होत्या तर  दुसर्‍या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे हे इतर कुटुंबीयांबरोबर राहत होते. 


राज ठाकरे आणि राजकारण 


त्या वेळी राज ठाकरे यांचे नाव सुद्धा बरेच चर्चेत होते. राज ठाकरे हे बाळासाहेबांचे भाऊ श्रीकांत ठाकरे यांचे पुत्र राज ठाकरे हे सुरुवातीपासूनच आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जात. 


राजकारणासाठी लागणारे जवळपास सर्व गुण राज ठाकरे यांच्यात भरभरून होते.  राज ठाकरे यांचे आक्रमक शैली स्फूर्ती बर्‍यापैकी बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखीच  होती.  त्यामुळे माध्यमांना राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा वारस दिसू लागला होता


 स्मिता ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त आणखी एका माणसाने शिवसेनेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती आणि त्यांचे नाव होते नारायण राणे नारायण राणे हे शिवसेनेच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पैकी एक होते.  


मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर साडेआठ महिन्यांसाठी नारायण राणे 1999 साली  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.  नारायण राणे यांनी बाळासाहेब  ठाकरे यांचे सुरुवातीपासूनच अगदी छान होते.  हा तो काळ होता ज्या  वेळी राज ठाकरे स्मिता ठाकरे आणि नारायण राणे शिवसेना वाढविण्यास हातभार लावत होते.  पण त्यानंतर दुर्दैवाने या तिघांनाहि  पक्षा बाहेर जावे लागले. 


उद्धव ठाकरे यांची  कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती

सन 2003 साली  महाबळेश्वर मध्ये पक्षाचे अधिवेशन झाले.  याच्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार होता की पार्टीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? चर्चा  सुरू झाली आणि एक प्रस्ताव समोर आला आणि तो प्रस्ताव होता उद्धव ठाकरे यांच्या नावाचा.  हा प्रस्ताव आणला होता स्वतः राज ठाकरे यांनी.  तेच राज ठाकरे जे  या पदाचे सर्वात मोठे दावेदार .  आणि बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार मानले जात होते.  त्यानंतर सर्वांच्या संमतीने उद्धव ठाकरे यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आलं.  उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झाले. 


पक्षांतर्गत नाराजी 

त्यानंतर एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की हा माझ्या जीवनातला सर्वात चुकीचा निर्णय होता.  आता उद्धव ठाकरे हे स्मिता ठाकरे आणि  नारायण राणे यांना बरोबर घेऊन पक्षांतर्गत निर्णय घेत होते आणि येथे राज ठाकरे यांना थोडेसे झुकते माप मिळत होते.  


असं म्हटलं जातं की कार्यकारी अध्यक्ष होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि नारायण राणे यांना टाळायला  सुरुवात केली होती त्यामुळे नारायण राणे यांनी नाराजी प्रकट केली. त्याचं  अजून एक कारण असं होतं  कि  बाळासाहेब ठाकरे यांची भेट ही आता पहिल्यासारखी सोपी राहिली नव्हती.  


जर उद्धव ठाकरे यांची इच्छा असेल तरच बाळासाहेब ठाकरे  यांना भेटता येत होतं.  यामुळे नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेचे बरेच दिग्गज नेते नाराज होते कारण  या आधी ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर केव्हाही   चर्चा करू शकत होते पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यावर काही प्रमाणात निर्बंध आले.


त्या वेळी  राज ठाकरे हे नाशिक आणि पुणे या सारख्या दोन मोठ्या शहरात शिवसेनेचे काम पाहत होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना विश्वासात न घेता पुणे आणि नाशिक येथील नेते आणि पदाधीकार्यांबरोबर  चर्चा चालू केली.  राज ठाकरे यांना ही गोष्ट खटकली पण त्यांनी गप्प राहणे पसंत केले.  


सन 2004 रोजी स्मिता ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांचा घटस्फोट झाला पण स्मिता ठाकरे यांनी मातोश्री सोडण्यास नकार दिला.  त्यानंतर आलेल्या वृत्तानुसार मातोश्री मधून त्यांना बाहेर काढले गेले.  त्यानंतर 2005 सली नारायण राणे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली गेली.  


यादरम्यान त्यांच्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत कुरबुरी चालू होत्या. आपल्या अधिकारांची होणारी गळचेपी राज ठाकरे पाहत होते. 


राज ठाकरे यांची शिवसेनेला सोडचिट्ठी 

2006 मध्ये राज ठाकरे यांच्याबरोबर आणखी काही नेत्यांचा भाव कमी झाला होता आणि पक्षावर उद्धव ठाकरे यांची पकड मजबूत झाली होती.  त्यामुळे 2006 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि  महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नवीन पक्षाची स्थापना केली. 


 याच दरम्यान शिवसेनेचे सर्वात मोठे आधारस्तंभ स्मिता ठाकरे नारायण राणे आणि राज ठाकरे शिवसेने बाहेर गेले आणि राहिले फक्त उद्धव ठाकरे.एवढ्या सर्व घडामोडीनंतर सुद्धा शिवसेनेने निवडणुकीत यश मिळविले.  त्यानंतर या निवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरे यांचा सर्वत्र जयजयकार होऊ लागला आणि त्यानंतर राज ठाकरे यांच राजकारण संपलं असं मानलं जाऊ लागलं. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धडाका 

पण  त्यानंतर 2008 झाली राज ठाकरे यांनी युपी बिहारी विरुद्ध मराठी या आंदोलनाला सुरुवात केली.  या आंदोलनाला मराठी माणसाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि त्याचा परिणाम 2009 साली  झालेल्या निवडणुकीत स्पष्ट दिसून आला.  अवघ्या तीन वर्षे वयाच्या या पक्षाने 2009 साली  विधानसभेच्या 13 जागा पटकावल्या आणि उद्धव ठाकरे यांचा खराब काळ सुरु झाला. 


उद्धव ठाकरे यांचा वाईट काळ 

याच निवडणुकीत शिवसेनेने आपले आतापर्यंतचे सर्वात खराब प्रदर्शन केले होते कारण या निवडणुकीत त्यांना 17 जागांचे नुकसान सहन करावे लागले आणि विरोधी पक्षनेता हे पद सुद्धा त्यांना गमवावे लागले. त्यानंतर  हे पद मिळाले भारतीय जनता पक्षाला ज्यांची उमेदवार संख्या होती शिवसेना पेक्षा फक्त १ ने जास्त.  


त्यानंतर सन 2010 ते २०11 दरम्यान  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आरोग्य बिघडत चालले चालले होते.  बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या कडून खूप अपेक्षा होत्या.  एका सभेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी अशी घोषणा केली की ते  आता शिवसेनेचा कारभार अधिक काळ सांभाळू शकणार नाहीत त्यामुळे आता मुंबईच्या जनतेने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्यावे.  

त्यानंतर २०१२ मध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी अखेरचा श्वास घेतला.  


भाजप बरोबर युती आणि पुन्हा सुकाळ 

त्यावेळेस असे वाटले की उद्धव ठाकरे यांच्यासाठी पुढचा रस्ता हा कठीण आहे पण 2013 साली भारतीय जनता पक्षाने त्या काळी  गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी घोषित केले आणि त्या नंतर मोदी लाटेला सुरवात झाली. त्या आधी काही वर्षांपूर्वी घडलेल्या गोध्रा हत्याकांडामुळे नरेंद्र मोदींचे नाव आधीच चर्चेत होते.


त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी समविचारी असलेल्या भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली आणि त्याचा फायदा त्यांना 2014 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत झाला.  या निवडणुकीत शिवसेनेने आपल्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात जास्त १९ जागा जिंकल्या.  पण शिवसेनेने जिंकलेल्या जागा हा मोदी लाटेचा परिणाम असल्याचे भारतीय जनता पक्षाने कधीच ओळखले होते.


शिवसेनेची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न 

2018 साली उद्धव ठाकरे  त्यांनी आयोध्याचा दौरा केला त्यावेळी पूर्ण भारतातून शिवसैनिक अयोध्या मध्ये आले होते. त्यावेळी असं मानण्यात आलं की उद्धव ठाकरे आहे आता  शिवसेनेला फक्त प्रादेशिक पक्ष असे मर्यादित न ठेवता राष्ट्रीय पक्ष बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.  त्यानंतर 2019 साले त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर विधानसभेच्या निवडणुका लढविल्या. 


मुख्यमंत्री पदावरून वाद आणि महाराष्ट्र विकास आघाडीची स्थापना 

या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले पण त्यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून खडाजंगी सुरू झाली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत न जाण्याचा निर्णय घेतला.  उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार  मुख्यमंत्रीपद हे अडीच अडीच वर्ष वाटून घ्यावे असे ठरले होते परंतु भाजपने त्या स्पष्ट नकार दिला.  


त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर घरोबा साधला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.  शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महा विकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.  


त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना उद्धव ठाकरे यांनी एका सभेत केली होती. या निवडणुकीत त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे सुद्धा विजयी झाले होते आणि त्यांच्या कडे महाराष्ट्राचा सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याची संधी होती पण पक्षातील काहीजणांनी त्याला आक्षेप घेतल्याने मुख्यमंत्री पदाची माळ  उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात पडली. 


काय ठाकरे कुटुंबीय मूळचे बिहारी आहेत? 

 याविषयी बरेच विविध तर्क वितर्क असले तरी एका पुस्तकानुसार ठाकरे कुटुंब हे मूळचे बिहारीआहेत.  पुस्तकाचे नाव आहे The cousins Thackeray. 


  या पुस्तकाचे लेखक आहेत  प्रसिद्ध पत्रकार  धवल कुलकर्णी.   या पुस्तकांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या पुस्तकांचा देखील उल्लेख आढळतो.  केशव सीताराम ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पिता होते म्हणजेच उद्धव ठाकरे यांचे आजोबा. 


या पुस्तकांमध्ये केशव सीताराम ठाकरे यांनी ठाकरे कुटुंब आहे  चंद्रसेनि कायस्थ प्रभू समुदाया शी संबंधित आहे (Uddhav Thackeray caste) असा उल्लेख आढळतो. हा समुदाय  मगध जे सध्या बिहार मध्ये आहे तेथील आहे.  हा समुदाय तिसऱ्या आणि चौथ्या शतकापर्यंत मगध येथे राहत होता त्यानंतर वारंवार होणारे युद्ध आणि इतर कारणास्तव हा समुदाय मगध च्या बाहेर पडला आणि त्यातील बरेच जण हे महाराष्ट्रात स्थायिक झाले त्यामुळे ठाकरे कुटुंबीय हे मूळचे बिहारी असल्याचा दावा केला जातो. 


महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा 

आजही बऱ्याच मराठी माणसांची अशी प्रामाणिक इच्छा आहे कि  शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेवा यांनी एकत्र यावे. हे दोन पक्ष जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात ते निर्विवाद वर्चस्व सिद्ध करू शकतात. पण सध्या तरी अशी शक्यता धूसर वाटते. 


उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत पण  बहुमत मिळवून सुद्धा भाजप ला विरोधी बाकावर बसावे लागत आहे याचे शल्य त्यांना आहेच पण विश्वासघात झाल्याची भावना सुद्धा त्यांच्या मनात आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यात शिवसेना यशस्वी झाली असली तरी भाजप सारखा एक चांगला मित्र त्यांनी नक्कीच गमावला आहे. 


पण राजकारणाचा तसा काही भरोसा नाही. भविष्यात हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात. ते एकत्र येतात कि नाही हे पाहण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागेल. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post