.

महाराष्ट्रातील किल्ले - अर्नाळा किल्ला | Arnala fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Arnala Killyachi mahiti

 

Arnala fort in Marathi

किल्ल्याची उंची:- किल्ल्याचा प्रकार:- सागर किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग:- उत्तर कोकण जिल्हा:- ठाणे श्रेणी:- सोपी अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या पाणकोटावरुननजर ठेवता येत असे.
इतिहास:- चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा जलदुर्ग 1561 मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी 1530 सालि हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली.

सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांनी प्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी 1817 मध्ये हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.



गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे: - अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेश द्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत.

या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखामधील बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!

या ओळींवरून या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्यांनी केली हे लक्षात येते. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे.

किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालीमातेचे मंदिर आहे. समुद्रकिनाऱ्यावरून किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणाऱ्या किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे.

संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे सभोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवट्यावर बसले असता संपूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो.

गडावर जाण्याच्या वाटा:- पश्चिम रेल्वेच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे 10 किलोमीटरवर आहे. तेथे जायला एसटी बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते.

ही बोट सकाळी 6.00 ते दुपारी 12.30 व संध्याकाळी 4.00 ते 7.00 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनाऱ्यावरून समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर बोटीने जायला 5-10 मिनिटे लागतात. राहण्याची सोय:- गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण गड अर्धा पाऊण तासात बघून बोटीने किनाऱ्यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही. जेवणाची सोय:- गडावर जेवणाची सोय नाही. जेवण बरोबर घेऊन जावे. पाण्याची सोय:- गडावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ:- एक तास विरार पासून.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post