.

महाराष्ट्रातील किल्ले - वसई चा किल्ला | Vasai fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Vasai Killyachi mahiti

 

Vasai Fort


किल्ल्याची उंची:-
 किल्ल्याचा प्रकार:-  सागर किनाऱ्यावरील किल्ले
 डोंगर रांग:-  उत्तर कोकण
 जिल्हा:-  ठाणे
 श्रेणी:-  सोपी

 सिंधुसागर किनाऱ्याचे प्रादेशिक विभागणी नुसार दोन भाग पडतात.  उत्तर कोकण कोकण.  उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई,  याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले गेले.  

त्यापैकी प्रमुख म्हणजे वसईचा किल्ला.  वसई बंदर हातात असले म्हणजे मुंबई बेट ,  ठाणे,   साष्टी हा सर्व परिसर, समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे.  भौगोलिक दृष्ट्या वसईचा किल्ला फार महत्त्वाचा ठरतो.  

पोर्तुगीजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने 1737  ते1739  मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण हा परिसर फिरताना आजही येते.  हे सागरी किल्ले पावसाळ्या शिवाय इतर सर्व ऋतुत फिरता येतात.

 इतिहास:-  इसवीसन 1414  मध्ये   भडारी-  भेंगाळे  नावाच्या सरदाराने हा किल्ला उभारला.  1530  मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्या कडून घेतला.  

पुढे 1534  मध्ये पोर्तुगीजांनी याचे महत्त्व जाणून पुनर्बांधणीसाठी घेतला.  वसईचा किल्ला जेव्हा पोर्तुगीजांनी बांधायला सुरुवात केली तेव्हा या कामाला दहा वर्षे लागली.  किल्ला  दशकोणी  आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे.  

त्याची लांबी रुंदी एक एक किलोमीटर आहे तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे.  या बुरुजांची बाहरी बुर्ज,  कल्याण बुर्ज,   फत्ते  बुर्ज,  कैलास बुर्ज  आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत.  तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे.  

किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे शिवाय चोर दरवाजेही आहेत.  किल्ल्यावर पाणी मुबलक प्रमाणात आहे.  हा किल्ला जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो.  एका बाजूला अथांग सागर व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत.   

सोपर व गोखरावा येथे पूल आहेत,  असे या किल्ल्याचे वर्णन केलेले आहे.  मुंबई जवळील साष्टी म्हणजे सहासष्टी नावाचा प्रदेश होता.  त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला महत्त्वाचा होता.  इस 1737 सालि  मराठ्यांनी वसईचा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र ते व्यर्थ गेले. 

 त्यानंतर बाजीरावाने वसईची मोहीम चिमाजी आप्पांच्या हातात सोपवली आणि    इसवीसन 1738  मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखली.  चिमाजी आप्पाने किल्ल्यावर दलदलीच्या बाजूने हल्ला करायचे ठरवले.  मराठ्यांनी लढवून तटाच्या उत्तर भागाला खिंडार पाडले व सारे सैन्य हर हर महादेवाच्या गर्जना करत आत घुसले.

   दुर्दैवाने  सुरुंग उशिरा उडाले.  त्यामुळे भरपूर मनुष्य हानी झाली.  तुंबळ हातघाईची लढाई झाली.  2  मे 1739  रोजी सुरु झालेली लढाई दोन दिवस चालली.  लढाईत पोर्तुगिजांची 800 माणसे मारली गेली.  दारुगोळा संपला आणि पोर्तुगीज शरण आले.  मराठ्यांनी किल्ला सर केला.  किल्ल्यातील बायकामुलांना सुखरूप जाऊ दिले.  पुढे 1780  मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा मिळवण्यासाठी बेत आखण्यास सुरुवात केली. 

 त्यावेळी विसाजी कृष्ण लेले किल्ल्याचा  किल्लेदार होता.  सुरतेचा कर्नल गोडार्डला वसईच्या मोहिमेचा सेनाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.  समुद्र मार्ग आणि भुमार्ग या दोन्ही बाजूंनी किल्ल्यावर हल्ला करायचे सिद्ध झाले.  कर्नल हार्टले कल्याण वरूनच हल्ला करणार होता तर  गोडार्ड समुद्रमार्गे हल्ला करणार होता.  

वसईला वेढा देण्याचे काम गोडार्ड करणार होता. पुण्याहून शत्रूला कुमक पोहचू नये याची काळजी सुध्दा घेण्यात आली.  नाना फडणीसांनी आनंदराव रास्ते या स  वसईच्या 8  आठ किलोमीटरवर असलेल्या गोखरावा या गावी धाडले. 23  ऑक्टोबर रोजी चिमाजी पानसे,  भवानी शिवराम  यांची   फौज  तोफखाना घेऊन तळेगाव मार्गे वसईला निघाले. 

 वसईच्या किल्ल्यावर आता अन्नधान्याची टंचाई भासू लागली.  खजिना पण रिता झाला होता.  लोक गावे सोडून गेले होते.  गोडार्डने तोफांचा मारा सज्ज केला होता. 28  तारखेला तोफांची गोळीबारी सुरू झाली.  मराठ्यांनी सुद्धा बुरुजावरून गोळीबारी सुरु केली.  इंग्रजांनी गोखरावा  व सोपार पूल उडवले.  सात डिसेंबरला किल्ल्यात दारुगोळा पडला आणि भयंकर स्फोट झाला.  

त्यामुळे सगळे जण घाबरुन गेले. 9-10  डिसेंबरला तो खाण्याचा मारा चालू ठेवला. 10  डिसेंबरला 200  मराठ्यांच्या एका तुकडीने गोखरावा खाडी पार करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फसला आणि 12 डिसेंबरला किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-  गावापासून किल्ल्याच्या तटापर्यंत पोहोचण्यास 15  मिनिटे लागतात.  उजवीकडे प्रवेशद्वार आहे.  त्यातून आत शिरल्यावर समोरच तटावर चढण्यासाठी पायर्‍या आहेत.  त्यावरुन सर्व किल्ल्याची रचना लक्षात येते.  तटाची उंची 30 ते 35 फूट आहे.  

किल्ल्याला दहा बुरुज आहेत.  त्यांची नावे    नोस्सा, सिन्होरा, दोरेमेदिया, रैस, मागो, सेंट, गोंसोले, चवथा माद्रद दीय.  चौथ्या बुरुजाच्या अलीकडे तटात चोरवाटा आहेत.  पाचवा सेंट जॉन,  या   बुरुजा नंतर दर्या दरवाजा आहे.  येथून बंदरावर जाणारा रस्ता आहे.   सहावा  एलिफंट,  सातवा सेंट पेद्रू,  आठवा सेंट पॉल्स,  9वा सेंट सेबस्तियन,  आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो  बुरुज.  

येथून नंतर आपण बालेकिल्ल्याकडे जातो.  बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत तीन चर्च लागतात.  बालेकिल्ल्याच्या जवळ गेल्यावर डावीकडे वळावे.  समोरच न्यायालयाची इमारत दिसते आणि पलीकडे हॉस्पिटल आहे.  तिथून दोन कमानी असलेला टाऊन हॉल आहे.  

त्याच्या पुढे कारागृह आणि वज्रेश्वरी मंदिर आहे.  पुढे चिमाजी आप्पांची विजय मिळवल्याबद्दलचे प्रतीक उभारलेले आहे.  हे सर्व पाहून मागे फिरायचे आणि बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा.  

बालेकिल्ल्यात दारु कोठार सैनिकांची वसतिस्थाने आणि वाड्यांचे अवशेष आहेत.  एका दगडावर कोरलेला शिलालेख सुध्दा आहे.  बालेकिल्ल्याच्या बाहेरील पटांगणावर एक विहीर आहे.  प्रवेशद्वाराच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला महादेवाचे व वज्रेश्वरीचे मंदिर आहे.  दोन तासात सर्व गड पाहून होतो.

 गडावर जाण्याच्या वाटा:- किल्ल्यावर जाण्यासाठी जुने वसई गाठावे.  नवी वसई ते जुना वसई अशी एसटी सेवा आहे.  नवी वसई ते किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या बसेस सुद्धा उपलब्ध आहेत.  वसई स्टेशन हुन किल्ल्यात टमटम रिक्षा अथवा साध्या रिक्षा नही जाता येते.  स्टेशन पासून किल्ला सहा किलोमीटरवर आहे.

राहण्याची सोय:-  किल्ल्यात राहण्याची कोणतीही सोय नाही.

जेवणाची सोय:-  वसई गावात अनेक चांगली हॉटेल्स आहेत.

पाण्याची सोय: -  काही विहीरी किल्ल्यात आहेत.

जाण्यासाठी लागणारा वेळ:-  गावापासून पंधरा मिनिटे.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post