.

महाराष्ट्रातील किल्ले - ताहुली | Tahuli fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Tahuli Killyachi mahiti

 

Tahuli fort in Marathi

किल्ल्याची उंची:- 3487  फुट
 किल्ल्याचा प्रकार: -  गिरिदुर्ग
 डोंगररांग:-  माथेरान
 जिल्हा:-  ठाणे
 श्रेणी:-  मध्यम

 कल्याण,  कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे.  ताहुली ला किल्ला किंवा गड म्हणणे तसे आयोग्यच.  हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे.   उंच,  बेलाग कडे जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षित आहे.

 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-    ताहुली च्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे.  वाटेत आणखी दोन आश्रम लागतात.  पठाराच्या सर्वात वरच्या भागाला '  दादिमा ताहुली'  म्हणतात.  येथे पाच पीर आहेत.  समोरच एक छोटेसे घर देखील आहे.  याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण   ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो.  एकास  सुळक्याचे नाव '  दाऊद'  असे आहे  तर दुसऱ्याचे नाव '  बामन'  आहे.

 गडावर जाण्याच्या वाटा: -   ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

 अंबरनाथ वरून - दुसरी वाट अंबरनाथ वरून जाते.  अंबरनाथ करून बाहेर पडून बदलापूरचा रस्ता ओलांडावा.  थोड्याच वेळात काकुली नावाचा तलाव लागतो.  या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावर एक डोंगराची सोंड वर ताहुली च्या तीन सुळक्यांवर पोहोचते.  या वाटेने ताहुली पठार गाठण्यास चार तास लागतात.

 कुशिवली वरून -   कल्याण मंगलगड रोडवर कुशिवली गावाच्या स्टॉप वर उतरणे.  गावाच्या  बाहेरून थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी  वाट   ताहुली ला गेली आहे.  ही वाट दोन डोंगरांच्या बेचक्यात मधून वर चढते.  कुशिवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.

 राहण्याची सोय:-  गडावर राहण्याची सोय नाही.

 जेवणाची सोय:-  गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही.

 पाण्याची सोय:-  गडावर पाण्याची सोय नसल्याने पाणी सोबत घेऊन जाणे.

 जाण्यासाठी लागणारा वेळ:-  अडीच तास कुशिवली मार्गे,  चार तास काकोली  तलावामार्गे

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post