.

हमखास वजन कमी करण्याचा नवीन उपाय | Weight loss Marathi | Weight loss trick in Marathi | Weight loss diet, exercise in Marathi

 
weight loss marathi

वजन कमी करण्याचा घरगुती उपाय

वजन कमी करून आकर्षक दिसायचं? रोगांपासून मुक्ती मिळवायचीय? आपल्या मनाप्रमाणे कपडे घालायचेत? या प्रश्नांची उत्तरे जर हो असतील तर हा लेख तुमच्याच साठी आहे.

मित्रानो आजकाल वजन वाढण्याची समस्या खूपच तीव्र रूप धारण करत आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना हि समस्या भेडसावत आहे. 


जास्त वजनामुळे विविध प्रकारचे रोग सुद्धा वाढीस लागत आहेत ज्या मध्ये हृदयविकारापासून ते कॅन्सर पर्यंतच्या रोगांचा समावेश आहे. म्हणून आपले वजन मापात ठेवणे हे खूपच महत्वाचे आहे. आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात पण वजन काही केल्या कमी होत नाही. 


पण मित्रानो, आपल्या साठी एक खुशखबर आहे. आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि हमखासवजन कमी कसे  करायचे. 


वजन वाढण्याची कारणे

वजन वाढण्याची बरीच करणे असू शकतात पण त्यातली काही करणे येथे दिली आहेत. 

  • अनुवंशिकता
  • जंक फूड 
  • चुकीची जीवन पद्धती 
  • काही आजार 
  • व्यायामाचा अभाव 
  • संतुलित आहाराचा अभाव 
  • ताण तणाव 
  • मद्याचे अति सेवन 
  • अति कार्बोहैड्रेट्स युक्त आहार 
  • मांसाहाराचे अति सेवन 


वजन कमी करण्याचा एक सोपा मंत्र आहे आणि तो म्हणजे कॅलरी व्यस्थापन . आपण जे जे खातो त्या सर्वांची कॅलरी म्हणजेच ऊर्जा बनते जी आपले शरीर आपल्या दैनिंदिन हालचालीसाठी वापरते. 


आपल्या प्रत्येक हालचालीसाठी चालण्यासाठी,बोलण्यासाठी कॅलरी खर्च होत असते. एवढेच काय पण ज्या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते त्यासाठी सुद्धा कॅलरी खर्च होत असते. जसे श्वास घेणे किंवा अन्न पचणे इत्यादी. 


जर आपण शारीरिक हालचाल जास्त प्रमाणात केली तर कॅलरी खर्च होण्याचे प्रमाण वाढते पण जर आपण बैठे काम करत असाल तर कॅलरी खूपच कमी प्रमाणात खर्च होते. 


जेवढ्या कॅलरी ची गरज आपल्या शरीराला दिवसभरात असते त्यापेक्षा जास्त कॅलरी जर आपण घेतलीत तर शरीरात ती चरबीच्या स्वरूपात साठून राहते आणि आपले वजन वाढू लागते.


 ज्या ज्या पदार्थांमध्ये कार्बोहैड्रेट्स असतात त्या पदार्थापासून जास्त कॅलरी आपल्या शरीरास मिळत असते जसे सर्व प्रकारचे धान्य म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ इत्यादी. 


वरील सर्व पदार्थ म्हणजे कॅलरी चा एक मोठा स्रोत आहेत. काही अन्न  पदार्थांमध्ये कमी कॅलरी असते जसे कि फळे, कच्चा भाजी पाला, गाजर काकडी इत्यादी. 


या मध्ये कॅलरी चे प्रमाण खूपच कमी असते. कॅलरी प्रमाणे आपण अन्नाची खालील प्रमाणे वर्गवारी करू शकता. 


कमी कॅलरी चे पदार्थ - काकडी, गाजर, मुळा, बिट, कोबी, फूल आणि सर्व प्रकारच्या भाज्या (अर्थात कच्च्या)

मध्यम कॅलरी चे पदार्थ - सफरचंद, द्राक्षे, केळी, आंबे, चिकू, फणस, संत्रे, मोसंबी (सर्व प्रकारची फळे)

जास्त कॅलरी चे पदार्थ - गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी (सर्व प्रकारची धान्ये)

अतिजास्त कॅलरी चे पदार्थ - पिझ्झा, बर्गर, बाजारात मिळणारे सर्व पॅकिंग चे खाद्य पदार्थ, सर्व तेलकट पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड इत्यादी. 


आपण जर जास्त कॅलरी चे पदार्थ खात असाल आणि त्या प्रमाणात आपली हालचाल नसेल किंवा आपण पुरेसा व्यायाम करत नसाल तर याच कॅलरी चे रूपांतर चरबी मध्ये होते जी आपल्या पोट, मांड्या, नितम्ब, छाती, चेहरा या वर साठत जाते. 


या पदार्थांमुळे फक्त अंगावरील चरबीचं नाही तर रक्तातील चरबी सुद्धा वाढू लागते जी कालांतराने हृदयविकाराचे कारण बनते. म्हणून अशी चरबी साठू न देणे किंवा साठली असेल तर ती कमी कशी करता येईल या कडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 


जेवढ्या कॅलरी ची आवश्यकता आपल्या शरीरास आहे तेवढीच कॅलरी जर आपण घेतली तर आपले वजन संतुलित राहील आणि अतिरिक्त कॅलरी चे चरबीत रूपांतर होण्याचा प्रश्नच उरणार नाही. या साठी आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. 


मित्रानो आपल्या बऱ्याच जणांना वाचून धक्का बसेल पण, शरीरातील चरबी वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे धान्य जसे गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी इत्यादी. 

हि धान्य कार्बोहैड्रेट्स चा मुख्य स्रोत आहेत. आपण कितीही व्यायाम करा, कितीही चाला, कितीही उपाय करा पण जो पर्यंत आपण धान्य कमी किंवा बंद करणार नाही तो पर्यंत आपली चरबी कमी होणार नाही. 


विश्वास बसत नसेल तर करून बघा. बरच जण वजन कमी करण्यासाठी अगदी जीवाचा आटापिटा करतात पण तरीही वजन कमी होत नाही आणि या मागचे कारण आहे आपण खात असलेली चपाती, भाकरी किंवा भात.


 व्यायाम करून आपण जेवढी कॅलरी जाळतो त्यापेक्षा कितीतरी अधिक कॅलरी आपण या धान्यांवाटे आपल्या शरीरात घालत असतो आणि म्हणून आपले वजन कमी होत नाही. 


मग धान्य पूर्णपणे बंद करायचे का? 

जर आपल्याला खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आपण धान्य कमी किंवा बंद केले पाहिजे. पण धान्य बंद केले तर मग खायचे काय? 

मित्रानो धान्याऐवजी आपण कमी किंवा मध्यम कॅलरी असणारे पदार्थ खाऊ शकता ज्यांची यादी वर दिली आहे. या पदार्थांमुळे आपल्या शरीरास आवश्यक असलेली कॅलरी ची गरज पूर्ण तर होईलच पण चरबी वाढण्याचा धोका सुद्धा कमी होईल.


 धान्याऐवजी जर आपण काकडी, गाजर, बिट, कोबी, फ्लॉवर, फळे असे पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीरास असा पदार्थ सुद्धा मिळेल जो आपली पचनसंस्था निरोगी राखण्यास मदत करतो आणि तो पदार्थ म्हणजे फायबर. 


वरील पदार्थांमधूल आपल्याला प्रथिने, खनिजे, मिनरल्स, जीवनसत्व हि विपुल प्रमाणात मिळतात ज्यामुळे आपली स्फूर्ती आणि प्रतिकारशक्ती कित्येक पटींनी वाढते. आपण नेहमी ताजे तवाने राहता आणि लवकर थकवा येत नाही.


 शरीरातील महत्वाच्या अवयवांचे पोषण झाल्यामुळे त्यांची क्षमता सुद्धा वाढते जसे गाजराच्या सेवनाने अ  जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळते ज्या मुळे  डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि लवकर चष्मा लागत नाही. 


हा उपाय किती दिवस करायचा?

हा उपाय आपण कमीत कमी एक महिना करून बघा. या उपायांमुळे आपले वजन एका महिन्यात ५  किलो पर्यंत कमी होते. जर आपण कमीत कमी एक तास व्यायाम करत असाल (जसे चालणे, जॉगिंग, जोर, बैठका , सूर्यनमस्कार इत्यादी) ते १० किलो पर्यंत सुद्धा कमी होऊ शकते. 


नेमके काय करायचे?

  • सकाळी उठल्यानंतर कमीत कमी एक तास व्यायाम करावा. 
  • चहा, कॉफि किंवा तत्सम गोड  पदार्थ टाळावेत त्याऐवजी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे (साखर घालू नये). जर मध असेल तर २ चमचे मध घालावा. 
  • नाश्त्यामध्ये फक्त फळे आणि जूस घ्यावा. कोणत्याही प्रकारचे धान्य जसे पोहे, उपमा इत्यादी कटाक्षाने टाळावे. नाश्ता पोटभर करावा. 
  • दुपारच्या जेवणामध्ये ग्रीन सलाड, उकडलेल्या भाज्या (तेल न घालता) फळे यांचा समावेश करावा. जेवण पोटभर करावे. सुरुवातील जड  जाते पण नंतर सवय होते. 
  • सायंकाळी जर भूक लागली तर, एखादे फळ खावे. त्या जोडीला सुकामेवा सुद्धा घेऊ शकता. 
  • रात्रीच्या जेवणामध्ये भिजवलेल्या डाळी, मोड आलेली मटकी, हुलगे, चवळी किंवा भिजवलेले हरभरे यांचा समावेश करावा. कच्चा कोबी किंवा काकडी, गाजर यांचा समावेश करावा. 
  • प्रत्येक जेवणानंतर गरम पाणी प्यावे ज्या मुळे पचनसंस्थेचे आरोग्य सुधारून शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर टाकण्यास मदत होते. 
  • साखरेचे पदार्थ विषाप्रमाणे  टाळावेत. गूळ  सुद्धा वर्ज करावा. एक चमचा साखरे मध्ये एवढ्या कॅलरी असतात कि आपण एक कप  चहा जरी घेतला तरी आपली पूर्ण दिवसभराची मेहनत वाया जाते. 


हा उपाय किती दिवस करायचा?

हा उपाय आपण एक महिन्यापर्यंत करून बघा. पण या मध्ये सातत्य पाहिजे तरच आपल्याला परिणाम दिसतील. या उपायांच्या जोडीला जर आपण व्यायाम करत असाल तर एक महिन्यात साधारणपणे ७ ते  १० किलो पर्यंत वजन कमी होऊ शकते आणि बऱ्याच जणांचे झाले देखील आहे. 


एक महिन्यानंतर आपण दुपारचे जेवण पहिल्या सारखे चालू करू शकता म्हणजे आपण भात, चपाती, भाकरी खाऊ शकता पण रात्रीच्या जेवणामध्ये फक्त कमी कॅलरी असणाऱ्या पदार्थांचाच समावेश केला गेला पाहिजे. 


मित्रानो वजन कमी करणे हि सुद्धा एक तपस्या आहे आणि ती जर मनापासून केली तर आपल्याला त्याचे निश्चितच फळ मिळते. माझ्या माहितीतल्या बऱ्याच मुली ज्या खूपच जाड होत्या आणि ज्यांची लग्ने  सुद्धा जमत न्हवती त्यांचे जीवन फक्त एक महिन्याच्या या उपायाने बदलले आहे. त्या पाहिल्यापेखा कितीतरी तरुण आणि आकर्षक दिसू लागल्या आहेत. 


त्या आता आपल्या मनाप्रमाणे कपडे घालू शकतात आणि विविध प्रकारच्या फॅशन सुद्धा करू शकतात. 


बऱ्याच जणांना थायरॉईड चा त्रास असतो आणि त्यामुळे त्यांचे वजन वाढत असते. त्यापैकी बरेच जण आपले वजन केवळ थायरॉईड ने वाढले आहे आणि ते कमी होणार नाही असे म्हणून प्रयत्न करतच नाहीत. 


पण हा गैरसमज आहे. थायरॉईड मुळे थोडेफार वजन वाढते हे जरी खरी असले तरी वरील उपायांमुळे ते निश्चित कमी होते असा बऱ्याच जणांचा अनुभ आहे. त्यामुळे कृपया थायरॉईड ची ढाल पुढे करून वरील उपाय टाळू नयेत, कारण यात नुकसान तुमचंच आहे. 


तर मित्रानो, आशा आहे कि आपण वजन कमी करण्याचा हा रामबाण उपाय नक्कीच कराल आणि आपले वाढलेले वजन कमी कराल. या लेख बद्दल आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला नक्की कळवा आणि कंमेंट करायला विसरू नका. 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post