“मला लागलाय खोकला, मधाचं बोट कोणी चाटवा” हे गाणं आपल्यापैकी प्रत्येकाने ऐकलं असेल आणि खोकल्यावरचा उपचार सुद्धा याच गाण्यात दिला आहे आणि तो म्हणजे मध.
खोकल्या चे बरेच प्रकार आहेत त्यापैकी वातावरणातील बदलामुळे होणारा खोकला आणि त्यावरचा उपाय या लेखात दिलेला आहे. बऱ्याच वेळा आपल्याला सर्दी होते आणि सर्दी बरी होत आल्यावर खोकला चालू होतो त्यावेळी असे वाटू लागते की एक वेळ सर्दी परवडली पण खोकला नको.
खोकला जर कोरडा असेल तर तो बऱ्याच वेळा एक सामान्य खोकला असू शकतो पण खोकला जेवढा कोरडा तितकाच तो त्रासदायक सुद्धा असतो चला तर पाहूया या खोकल्यावरचे घरगुती उपाय.
खोकला होण्यामागील कारणे
- वातावरणातील बदल
- विषाणु ची बाधा
- सिगारेट ओढणे
- दूषित हवेच्या संपर्कात जास्त काळ येणे
- काही असाध्य रोग जसे टीबी, दमा, ब्रोंकाइटिस किंवा फुफ्फुसाचा कॅन्सर
वरील कारणामुळे आपण खोकल्याचे शिकार होऊ शकतो. खोकल्याचे प्रमाण जास्त असेल तर आपला घसा आणि छातीत दुखू लागते. खोकल्यामुळे रुग्ण बेजार होतो आणि रुग्णांमध्ये चिडचिडेपणा वाढतो.
खोकल्यामुळे ऑफिस मिटींग्स किंवा पार्टी जॉईन करण्यास अडचणी येतात त्यामुळे खोकला कधी बरा होतो आहे असं प्रत्येकाला वाटू लागतं कारण त्याचा त्रास स्वतःबरोबर दुसऱ्यांनाही होतो.
खोकताना जर तोंडापुढे रुमाल धरला नाही तर खोकल्या वाटे बाहेर पडणारे विषाणू निरोगी माणसाच्या शरीरात शिरकाव करून त्यालासुद्धा बाधित करू शकतात त्यामुळे खोकला आलेल्या माणसापासून प्रत्येक जण स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो कारण हा एक संसर्गजन्य आजार आहे.
खोकला आलेल्या प्रत्येकाने आपल्याजवळ एक रुमाल ठेवणे गरजेचे आहे. खोकताना किंवा शिंकताना आपल्या तोंडापुढे रुमाल धरावा म्हणजे विषाणूंचा हवेत फिरायला होणार नाही आणि आजार पसरणार नाही.
बाजारात खोकल्यासाठी बरीच औषधे उपलब्ध असली तरी त्यातील जवळजवळ सर्व औषधांमध्ये केमिकल्सचा वापर केला जातो त्यामुळे बरेच जण खोकल्यावर आयुर्वेदिक उपचार घेणे पसंत करतात कारण आयुर्वेदी उपचारांमुळे खोकला हा फक्त वर वर बरा न होता तो मुळापासून बरा होतो.
कोरडा खोकला बरा व्हायला साधारणपणे एक आठवडा ते एक महिन्यापर्यंतचा सुद्धा कालावधी लागू शकतो. बऱ्याच जणांना खोकल्यावरील औषधांचे साईड इफेक्ट जाणवतात तर बर्याच जणांचा खोकला औषध देऊन सुद्धा बरा होत नाही अशा रुग्णांना आयुर्वेदिक इलाज फायद्याचा ठरतो.
आयुर्वेदिक उपायांचे कोणतेही साईड इफेक्ट नसतात. खोकल्या मध्ये कामी येणारी बरीच औषधे ही आपल्या किचनमध्येच असतात. आणि ही औषधे बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या तुलनेत बरीच स्वस्त असतात.
मध
जसा पण वर उल्लेख केला त्याप्रमाणे मध खोकल्यावर खूपच गुणकारी आहे.
मला मध्ये जिवाणू विरोधक गुणधर्म असतात खोकल्याच्या जंतूंना नष्ट करतात आणि खोकला बरा करण्यास मदत करतात जर आपल्याला खोकल्याची उबळ आली तर फक्त थोडासा मध चाटल्याने उबळ थांबते आणि मध हा स्वादिष्ट असल्यामुळे बऱ्याच जणांना तो खायला देखील आवडतो.
दिवसातून तीन वेळा एक चमचा मध घेतल्याने खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. खास करून झोपण्यापूर्वी मध घ्यावा आणि त्यावर पाणी पिऊ नये म्हणजे झोपेत येणारी खोकल्याची उबळ कमी होण्यास मदत होईल.
हळद
आयुर्वेदामध्ये हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे. हळदी मध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत त्यातील काही गुणधर्म हे खोकल्यावर खूपच गुणकारी आहेत.
हळद टाकून केलेला काढा बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड औषधांपेक्षा कितीतरी पटींनी गुणकारी आहे. चला तर पाहूया हा साधा सोपा काढा कसा बनवायचा ते.
एक कप पाण्यामध्ये एक चमचा हळद एक दालचिनीची काडी, थोडीशी काळीमिरी, आणि आल्याचा तुकडा ठेचून घालावा. यामध्ये आपण एक ते दोन वेलदोडे सुद्धा घालू शकता.
आता हे मिश्रण अर्धा कप होईपर्यंत गरम करावे आणि आणि गाळून घ्यावे. हा प्रयोग दिवसातून कमीत कमी तीन वेळा केल्याने खोकला लवकर बरा होण्यास मदत होते.
आले
सर्दी आणि खोकल्यासाठी खूप पूर्वीपासून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आले. आल्या मधील औषधी गुणधर्मामुळे सर्दी खोकल्या बरोबरच बाकीचे बरेच आजार बरे होण्यास मदत होते.
आले किसून किंवा ठेचून एक कप पाण्यामध्ये पंधरा मिनिट उकळावे त्यानंतर ते पाणी थोडे थोडे पीत राहावे. आपण आल्याचे तुकडे सुद्धा तोंडात ठेवून चघळू शकता यामुळे आपला खोकला लवकर बरा होण्यास मदत होते.
या उपायामुळे आपल्या घशा मधील जास्तीचा म्युकस कमी होण्यास मदत होते आणि आपला घसा नेहमीच साफ राहतो त्यामुळे आपल्या आवाजाची गुणवत्ता सुधारते.
बरेच गायक हा उपाय करत असतात. पण आले हे गुणधर्माने उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता असते म्हणून याचा वापर मर्यादितच करावा. आल्याच्या अतिवापराने मुळव्याधा सारखी समस्या सुद्धा उद्भवू शकते.
मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
मिठ जंतुनाशक म्हणून वापरले जाते. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून गुळण्या केल्यास आपल्या घशा मधील जंतुसंसर्ग कमी होण्यास मदत होते आणि आपल्याला लवकर आराम वाटू लागतो. मिठाच्या पाण्यामुळे आपल्या घशामधील म्युकस कमी होण्यास मदत होते आणि आपल्या आवाजाचा दर्जा देखील सुधारतो.
लसुन
थोडासा लसुन आणि आले एकत्र करून ते एक कप पाण्यामध्ये पंधरा मिनिटांसाठी उकळावे त्यानंतर ते गरमच प्यावे. यामुळे खोकला कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये लसणाचे खूप सारे फायदे सांगितले आहेत.
उच्च रक्तदाब मध्ये तर लसुन खूपच चांगल्या प्रकारे काम करतो. काही प्रकारच्या कॅन्सरला सुद्धा थोपवण्याची ताकत लसणामध्ये आहे. खोकल्यासाठी आपण लसणाच्या एक दोन पाकळ्या सुद्धा चघळू शकता.
लसुन हा त्याच्या जंतुविरोधी गुणांमुळे प्रसिद्ध असल्यामुळे खोकल्यावर तो खूपच गुणकारी आहे.
तुळस
आपण जर गावाकडे गेलात तर आपल्याला घरोघरी तुळस आढळून येईल. तुळशीला फक्त धार्मिक महत्त्व नसून आयुर्वेदामध्ये तिचे स्थान महत्त्वाचे आहे. बरेच विकार हे फक्त तुळशीच्या पानांचा सेवनाने बरे होतात.
अशीही गुणकारी तुळस खोकल्या मध्ये सुद्धा बरीच लाभदायक आहे. तुळशीच्या पानांचा रस जर मधाबरोबर चाटला तर खोकला लवकर बरा होण्यास मदत मिळते.
तुळशीमुळे रक्त शुद्ध होण्यास हातभार लागतो. त्यामुळे तुळशीचा उपयोग हा दररोज केला गेला पाहिजे.
अडुळसा
अडुळसा हे खोकल्यावरील रामबाण औषध आहे. बऱ्याच जणांचा खोकला फक्त अडुळशाच्या पानांचा काढा पिल्याने बरा होतो. चवीला थोडासा कडवट असलेला अडुळसा खोकल्यावर मात्र चांगलाच प्रहार करतो.
अडुळशाची पाने चांगली धुऊन तिचा रस करावा. यामध्ये थोडा आल्याचा रस घालून त्याचे सेवन करावे. हा उपाय खोकल्यावर खूपच गुणकारी आहे.
लवंग
मसाल्याच्या पदार्थांमधील सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे लवंग. लवंग हा खोकल्यावरील हमखास गुण देणाऱ्या उपायांपैकी एक. थोडेसे लवंग भाजून त्याची पूड करून ठेवावी.
थोडीशी लवंग पूड मधाबरोबर चाटल्याने खोकला लवकर बरा होण्यास मदत होते. जर आपल्याला खोकल्याची उबळ येत असेल तर लवंग आणि मध हे मिश्रण हे मिश्रण जास्त फायदेशीर ठरते.
आपण नुसत्या लवंग सुद्धा चघळू शकता पण याचा अति वापर टाळायला पाहिजे कारण लवंग हा उष्ण गुणधर्मीय असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढण्यास किंवा पित्त वाढण्यास तो कारणीभूत ठरू शकतो म्हणूनच त्याचा वापर मर्यादितच करावा.
वरील उपाय आपण नक्कीच करून पहा त्यामुळे आपला खोकला लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत पण यातील एखाद्या पदार्थाची जर आपल्याला ऍलर्जी असेल तर आपण तो पदार्थ टाळायला पाहिजे. वरील उपाय हे लहान मुलांसाठी सुद्धा केले जाऊ शकतात. या उपायांनी जर आपला खोकला एक आठवड्यामध्ये कमी झाला नाही किंवा वाढला तर मात्र आपल्याला आपल्या डॉक्टरचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.
Post a Comment