.

चष्म्याचा नंबर कसा घालवायचा? | How to remove spectacles in Marathi | How to improve the health of eyes in Marathi

 

How to remove spects in Marathi


चष्मा कसा घालवायचा? चष्मा घालवण्याचा घरगुती उपाय.  


आज-काल चष्म्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी लहान मुलापासून ते तरुणांपर्यंत बऱ्याच जणांना अकाली चष्मा लागत आहे. पूर्वी चष्म्याला चाळीशी असं म्हटलं जायचं म्हणजेच ज्यांनी आपल्या वयाची चाळिशी पार केले आहे त्यांना चष्मा लागायचा पण आजकाल अगदी चार पाच वर्षे वयाच्या मुलांना सुद्धा चष्मा लागतो आणि याचं कारण म्हणजे शरीराला व्यवस्थित न मिळालेलं पोषण.


यामध्ये काही अनुवंशिक कारणे सुद्धा समाविष्ट आहेत. बऱ्याच वेळा आपण दृष्टीतून बदलाकडे दृष्टी तील बदलाकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे चष्म्याचा नंबर हा वाढत जातो त्यामुळे आपली दृष्टी जर कमजोर झाली असेल तर कृपया दुर्लक्ष करू नका. 


चष्मा हा घालवणे सहज शक्य आहे आपण फक्त खाली दिलेले उपाय करून आपला चष्मा कायमचा घालवू  शकता आणि आपली दृष्टी सुधारू शकता.  

  • दृष्टी कमी होण्याची मुख्य कारणे
  • अनुवांशिकता 
  • प्रमाणापेक्षा जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहणे
  • कॉम्प्युटर वर जास्त वेळ बसणे
  •  संतुलित आहार न घेणे 
  • डोळ्यांशी संबंधित आजार 
  • धुराच्या संपर्कात अधिक काळ राहणे
  •  विनाकारण डोळे चोळणे

चष्मा घालवण्यासाठी घरगुती उपाय


 मित्रांनो खालील उपायांमुळे आपण आपला चष्मा कायमस्वरूपी घालवू शकता किंवा चष्म्याचा नंबर कमी करू शकता.चष्म्याचा नंबर घालविण्यासाठी डोळ्यांना पौष्टिक असणारा अ जीवनसत्त्वयुक्त आहार घेणे गरजेचे आहे.

गाजर


गाजरामध्ये बऱ्याच प्रकारचे विटामिन्स आणि मिनरल्स असतात गाजरामध्ये  अ जीवनसत्व विपुल प्रमाणात आढळते त्यामुळे आपल्या डोळ्यांचे स्नायू बळकट होतात.

 

आपण गाजराचा ज्युस करून सुद्धा  पिऊ शकता  पण जर गाजर कच्चे खाल्ले तर या सर्व विटामिन्स बरोबरच आपल्या शरीराला आवश्यक असणारे फायबर्स सुद्धा मिळतात.

 

गाजराचा रस करण्यापूर्वी गाजरे स्वच्छ धुऊन घ्यावीत ज्यामुळे त्यावर लागलेली माती पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर गाजराचे छोटे छोटे तुकडे करून ते मिक्सर मधे लावावेत या ज्यूस मध्ये आपण चवीसाठी थोडसं लिंबू पिळू  शकता किंवा थोडंसं मीठ घालू शकता. 


चष्मा घालविण्यासाठी गाजराचा रस नियमित पणे पिणे गरजेचे आहे जर सकाळी उपाशीपोटी आपण गाजरांचा ज्यूस घेतला तर त्याचा फायदा अधिक प्रमाणात होतो

आपण गाजर कच्ची सुद्धा खाऊ शकता ज्यामुळे आपल्या शरीरास आवश्यक असलेले फायबर्स आपल्याला मिळू शकतील जे आपल्या पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे आपल्याला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण गाजर ग्रहण करू शकता.

कोथिंबिरीचा रस

कोथिंबिरीचा रस हिरव्या कोथिंबिरीचा रस हे एक अद्भुत रसायन आहे आयुर्वेदामध्ये कोथिंबिरीचा बराच वापर केला जातो कोथिंबीर  ही बऱ्याच  रोगांवर गुणकारी सिद्ध झालेली आहे डोळ्यांसाठी सुद्धा कोथिंबीर फायदेशीर आहे कोथिंबीर खाण्याबरोबरच कोथिंबिरीचा रस एक ते दोन थेंब डोळ्यात घातला तर डोळ्यांसाठी ते फायदेशीर  ठरते.


कोथिंबिरीचा रस साधारणपणे दिवसातून दोन वेळा डोळ्यात घालावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनी डोळे धुऊन टाकावेत हा उपाय रोज केल्याने आपल्या या दृष्टीमध्ये खूपच फरक पडलेला आपल्याला आढळून येईल. हा उपाय केल्याने चष्मा लागण्याची शक्यता सुद्धा बऱ्याच प्रमाणात कमी होते. 


हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे


 हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक गुणकारी घटक असतात ज्यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारक्षमता कित्येक पटीने वाढते आणि आपलं शरीर रोगांना सहजासहजी बळी पडत नाही हिरव्या पालेभाज्या मधील घटकांमुळे शरीरातील प्रत्येक अवयवाचे पोषण होते आणि तो अवयव आणखी मजबूत होण्यास मदत होते. जर आपण हिरव्या पालेभाज्या खाऊ शकत नसाल तर आपण त्यांचं सूप करून सुद्धा पिऊ शकता.


 आवळा


आवळ्याला आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाचं स्थान आहे. बऱ्याच आयुर्वेदिक औषधांमध्ये आवळ्याचा वापर केला जातो. आवळ्यामध्ये सी जीवनसत्व विपुल प्रमाण प्रमाणात मिळते ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपल्या शरीराचे वेगवेगळ्या व्याधींपासून संरक्षण केले जाते.


आवळ्याचं सेवन कुठल्याही रुपात केले जाऊ शकते जसं की आवळा सुपारी, आवळा कॅन्डी, आवळ्याचा मुरंबा,आवळा पावडर इत्यादी.


आवळा हा आपल्या डोळ्यांचे आरोग्य व्यवस्थित राखतोच पण केसांच्या समस्येवरही आवळा हे रामबाण औषध आहे.जर आपले केस गळत असतील तर रोज आवळ्याचा ज्युस घेतल्याने या समस्येपासून आपली सुटका होऊ शकते.

सी जीवनसत्व युक्त फळांचे  सेवन


फळांमध्ये एंटीऑक्सीडेंट ची मात्रा भरपूर प्रमाणात सापडते जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.


फळांमध्ये जीवनसत्व आणि मिनरल्स सुद्धा सापडतात जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच हितकारक असतात यामुळे डोळ्यांच्या पेशींना फायदा मिळतो आणि ते आपले काम व्यवस्थित करू लागतात ज्यामुळे चष्मा घालवण्यासाठी आपल्याला मदत मिळते.


फळांमध्ये खास करून पपई, द्राक्ष आणि संत्री ही फळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायक आहेत  तसेच सर्व प्रकारची सी जीवनसत्व युक्त फळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असतात. 


बदाम, खडीसाखर आणि बडीशेप


बदाम खडीसाखर आणि बडीशेप यांचे मिश्रण डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. बदाम खडीसाखर आणि बडीशेप यांचे बारीक पावडर करून ठेवावे ठेवावी आणि रोज रात्री ती दुधाबरोबर घ्यावी यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. बदामामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहते. खडीसाखर आणि बडीशेप मुळे पोटातील कृमी कमी होण्यास मदत होते.


सुकामेवा 


डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी सुकामेवा हासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतो. यांमध्ये काजू बदाम मनुके आणि अक्रोड यांना विशेष स्थान आहे. ज्यांना डोळ्यांची समस्या आहे त्यांनी सुक्या मेव्याचे सेवन केले पाहिजे.


पालक सूप


 पालक हा ही पालेभाजी म्हणजे विटामिन आणि कॅल्शियम चे भांडार आहे.  पालक हा प्रत्येक रोगावर गुणकारी आहे.  विशेषतः एखाद्या आजारानंतर झालेली शरीराची झीज भरून काढण्यासाठी पालकाचा वापर प्रामुख्याने केला जातो.  नियमित पालक सूप घेतल्याने आपली दृष्टी सुधारते आणि आपला चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत मिळते तसेच ज्यांना चष्मा लागला नाही त्यांनाही तो लवकर लागण्याची शक्यता नसते. 


मासे


 जर आपण मांसाहारी असाल आणि मासे खाणे आपल्याला आवडत असेल तर ते जरूर खावे कारण माशांमधून मिळणाऱ्या प्रोटीनमुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. माशांमुळे बुद्धीसुद्धा तल्लख होते.


पण जर आपणास मासे खाणे आवडत नसेल तर आपण माशांच्या तेला पासून बनवलेल्या आणि बाजारात सहज मिळणाऱ्या कॅप्सुल्स चे सुद्धा सेवन करू शकता. 


डोळ्यांचे व्यायाम


 डोळ्यांचे व्यायाम केल्याने आपल्या डोळ्यांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो आणि त्यामुळे आपला चष्मा घालविण्यास त्याची मदत मिळते. डोळ्यांच्या व्यायामामध्ये प्रामुख्याने त्राटक हे विशेष लाभदायक आहे.


त्राटक केल्याने आपली नजर वाढते आणि नजरेमध्ये एक प्रकारची धार निर्माण होते. त्राटक म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे पापणी न पाडता पहात राहणे. त्राटकासाठी प्रामुख्याने पेटलेली मेणबत्ती किंवा एखादा बिंदू यावर लक्ष केंद्रित केले जाते.


सुरुवातीला त्राटक है कमी कालावधीसाठी केले जाते आणि हळूहळू हा कालावधी वाढविला जातो.

 सर्व प्रकारचे योगासने हीसुद्धा डोळ्यांच्या आरोग्यासाठी विशेष लाभदायक आहेत.


त्यात शीर्षासन हे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी विशेष आसन मानले जाते कारण त्यामुळे मेंदूचा आणि डोळ्यांचा रक्त प्रवाह सुधारतो. 


चारही दिशांना डोळे फिरविण्याचा व्यायाम केल्यामुळे सुद्धा डोळ्यांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो आणि त्यांचे आरोग्य सुधारते.


थंड पाण्याने डोळे धुणे


 आपण आपले डोळे रोज थंड पाण्याने धुतल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांमधील कचरा निघून जाऊन डोळ्यांच्या पेशींवरचा ताण हलका होतो. 


यासाठी आपल्या ओंजळीमध्ये साधे पाणी घेऊन त्यामध्ये डोळ्यांची उघडझाप करावी त्यामुळे आपला चष्म्याचा नंबर बऱ्याच अंशी कमी होतो.


एकमेकांचा चष्मा न वापरणे


 आपण फक्त आपलाच चष्मा वापरला पाहिजे. दुसऱ्याचा चश्मा वापरणे कटाक्षाने टाळावे कारण प्रत्येकाचा नंबर हा वेगवेगळा असू शकतो आणि त्याचा आपल्या डोळ्यांवर घातक परिणाम होऊ शकतो. 


तर मित्रांनो वरील प्रकारांनी आपण आपल्या चष्म्याचा नंबर निश्चितच कमी करु शकता किंवा तो कायमस्वरूपी आहे घडवू शकता असे बरेच लोक आहेत ज्यांनी वरील उपायांनी आपल्या चष्म्याचा नंबर घालवला आहे.


वरील उपाय अमलात आणताना आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा असे आम्ही आपल्याला सुचवतो. 


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post