.

निळू फुले यांचा जीवनपरिचय | Nilu Phule wiki Marathi | Nilu Phule biography in Marathi | Nilu Phule birthdate, spouse, childern, career, death

निळू फुले यांचा जीवनपरिचय| Nilu Phule biography in Marathi

sample47

निळू फुले

अभिनेता , 1930 - 2009

नाव - निळू फुले


जन्म दिनांक - १६ मे १९३०


मृत्यू दिनांक - १३ जुलै २००९


जन्म स्थान - पुणे , महाराष्ट्र , भारत


ओळख -चित्रपट अभिनेता


वडिलांचे नाव - कृष्णाजी  फुले 


आईचे नाव - उपलब्ध नाही


जीवनसाथी - रजनी फुले 


मुले - गार्गी फुले 


निवासस्थान -पुणे


शिक्षण - मॅट्रिक

 

बाई वाड्यावर या! हा संवाद ऐकला कि डोळ्यापुढे उभे राहते एक विशेष  व्यक्तिमत्व जे कधी सरपंच बनून तर कधी खलनायक बनून तर कधी मायाळू सासरा बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होतं. 


मराठी चित्रपट सृष्टीत असा अष्टपैलू कलाकार क्वचितच झाला असेल पण प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला तो त्यांच्यातला  खलनायक किंवा सरपंच. त्यांच्याशिवाय एके काळी मराठी चित्रपटसृष्टीची कल्पना सुद्धा केली जात न्हवती असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच निळू फुले. 


निळु फुले यांचे सुरुवातीचे दिवस (Niluphule initial days)


त्यांचे पूर्ण नाव नीलकंठ कृष्णाजी फुले किंवा निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे झाला.(Nilu Phule's birthdate, Nilu Phule's birth Place) त्यावेळी भारत देश हा पारतंत्र्यात होता. निळू फुले यांचे बालपण अत्यंत हलाखीच्या परीस्थित गेले. त्यांचे वडील कृष्णाजी राव हे भाजी विकून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. 


घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पुढचे शिक्षण निळूभाऊंना परवडण्यासारखे न्हवते म्हणून नाईलाजाने त्यांना मॅट्रिक नंतर आपले शिक्षण थांबवावे लागले. (Nilu Phule's education) आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यांनी वानवडी पुणे, येथील लष्करी महाविद्यालयात आपले पारंपरिक माळी काम करण्यास सुरुवात केली.


 निसर्गाची आणि माळी  कामाची पहिल्यापासूनच आवड असलेल्या निळूभाऊंचं मन तिथे खूपच रमलं. लष्करी महाविद्यालयात काम करताना त्यांनी स्वतःची नर्सरी उघडण्याच स्वप्न उराशी बाळगलं पण घरचं दारिद्रय आणि खांद्यावर असलेला कुटुंबाचा भार या मुळे त्यांचं स्वप्नं कधीच पूर्ण होऊ शकलं नाही.


 वाचनाची आवड असल्यामुळे ते माळीकामातून  सवड  मिळाली कि पुस्तके वाचायचे. (Nilu Phule's hobbies) माळीकामातून त्यांना महिन्याला अवघा ८० रुपये पगार मिळत होता पण देशभक्तीची जाणीव असलेले निळूभाऊ त्यातून दहा रुपये न चुकता राष्ट्र सेवा दलाला देत होते. 


वगनाट्य आणि नाट्य सृष्ठीत प्रवेश (Nilu Phule Drama)


१९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्रा साठी चळवळ चालू होती. याच दरम्यान त्यांच्यातील कलाकार जागा झाला आणि त्यांनी सेवादलासाठी एक वगनाट्य लिहिले त्याचे नाव होते "येऱ्या गबाळ्याचे काम न्हवे".(Yerya gabalyache kaam nhave)


हेच वगनाट्य त्यांचं आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. या वगनाट्याने त्यांना खूपच लोकप्रियता मिळवून दिली. स्वतः मध्ये लपलेल्या कलाकाराची जाणीव झाल्यानंतर त्यांनी माळी काम सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल  ठेवण्याचा निर्णय घेतला. 


पु. ल. देशपांडे (P. L. Deshpande)लिखित एका नाटकांमधील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रियता मिळवून गेली. त्यानंतर राम नगरकर लिखित "कथा अकलेच्या कांद्याची" (Katha aklechya kandyachi) या नाटकाने तर अक्षरशः धिंगाणा घातला. प्रत्येकाचा तोंडी राम नगरकर (Ram Nagarkar)आणि  निळूभाऊ यांचेच नाव होते. 


मराठी चित्रपट  सृष्ठीत प्रवेश (Nilu Phule entry in Marathi film industry)


मराठी चित्रपट सृष्टीचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला तो अनंत माने यांच्या " एक गाव बारभानगडी " या तमाशापटाद्वारे. त्यानंतर त्यांना एका मागोमाग एक असे चित्रपट मिळत गेले आणि त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. आपल्या विशिष्ट भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची माने जिंकली. 


त्यांची "सखाराम बाइंडर " मधली भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि निळूभाऊंनी यशस्वीतेकडे वाटचाल सुरु झाली. यशस्वी खलनायक म्हणून त्यांचे नाव मराठी चित्रपट सृष्टीमध्ये कोरले गेले ते "सामना" या विजय तेंडुलकर यांच्या चित्रपटात. 


त्यांनी साकारलेल्या हिंदुराव पाटलांमुळे. नायका  इतकाच खलनायक सुद्धा महत्वाचा असतो हे निळूभाऊंनी या चित्रपटात दाखून दिले आणि खलनायकी भूमिका करणाऱ्या कलाकारांचे  दिवस पालटले. सामना चित्रपटात अभिनेते श्रीराम लागू यांच्या बरोबर त्यांनी केलेला अभिनय प्रेक्षकांची दाद मिळवून गेला आणि श्रीराम लागू आणि निळू फुले अशी नवीन जोडगोळी मराठी चित्रपट सृष्टीला मिळाली. 


या चित्रपटातील खलनायकी भूमिका तंतोतंत वटवल्यामुळे त्यांना याच प्रकारच्या भूमिकेसाठी बऱ्याच ऑफर येऊ लागल्या. आपल्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध भूमिका ते चित्रपटात साकारत असत. त्यांच्या भूमिका पाहून लोकांच्या मनात प्रचंड चीड उत्पन्न होत असे. एकदा एका महिलेने त्यांना चप्पल सुद्धा फेकून मारली होती आणि हीच त्यांच्यातील कलाकाराला मिळालेली मोठी दाद होती. 


बाई वाड्यावर या अस म्हणत स्त्रीलंपट आणि चीड उत्पन्न करणाऱ्या भूमिका साकारणाऱ्या निळूभाऊंनी काही चांगल्या भूमिका सुद्धा साकारल्या आहेत आणि त्यांना सुद्धा प्रेक्षांकाची मनापासून दाद मिळाली आहे मग ती "सिंहासन" मधील पत्रकाराची भूमिका असो किंवा जब्बार पटेल यांच्या " जैत रे जैत " मधील भगताची  भूमिका किंवा मग एक होता विदूषक मधील भूमिका असो या साऱ्या भूमीका प्रेक्षांच्या पसंतीस उतरल्या.


 "पिंजरा" या चित्रपटामधील त्यांनी साकारलेली तमाशातील तुणतुणे वादकांची भूमिका सुद्धा प्रेक्षकांना मनापासून आवडली. 


हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनय (Nilu Phule in Hindi movie)


मराठी मध्ये तब्बल १४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या निळूभाऊंनी हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा आपले योगदान दिले आहे. 


मग तो अमिताभ बच्चन यांच्या कुली  या चित्रपटही त्यांचा अभिनय असो किंवा सारांश मध्ये त्यांनी साकारलेला खलनायक असो, त्यांच्या या भूमिका प्रेक्षांकाच्या कायम स्मरणात राहतील. पण हिंदी चित्रपटात त्यांचे मन फार काळ रमले नाही आणि ते मराठी चित्रपटांकडे परत वळाले. 


निळू फुले याना मिळालेले पुरस्कार (Nilu Phule Award)


मकरंद अनासपुरे यांच्या बरोबर त्यांनी केलेला "गोष्ट छोटी डोंगराएवढी" हा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील अखेरचा चित्रपट ठरला. मराठी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या भरीव योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्य संगीत अकादमी पुरस्कार तब्बल तीन वेळा मिळाला आहे. 


तसेच सूर्यास्त या तुफान गाजलेल्या नाटकासाठी नाट्यदर्पण पुरस्कार सुद्धा त्यांनी पटकावला आहे. जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कारने देखील ते सम्मानित आहेत. 


निळू फुले यांचा मृत्यू (Nilu Phule Death)


वाढत्या वयानुसार त्यांना अन्न नलिकेच्या कर्करोगाने ग्रासले होते. (Nilu Phule cause of death) त्यामुळे ते शेवटची काही वर्ष अंथरुणाला खिळून होते. अखेर १३ जुलै २००९ रोजी त्यांनी वयाच्या ७८  व्या वर्षी (Nilu Phule's age at death)अखेरचा  श्वास घेतला आणि मराठी चित्रपट श्रुष्टीतील हा दिग्गज तारा निखळला तो कायमचाच. 


त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्यांच्या निधनानंतर साधारणपणे २ वर्षांनी त्यांच्या अर्धांगिनी रजनी फुले या सुद्धा हे जग सोडून गेल्या.(Nilu Phule's wife)  त्यांना  एक कन्या आहे त्यांचं नाव गार्गी फुले - थत्ते असे आहे. (Nilu Phule's daughter)


निळू फुले यांचे गाजलेले चित्रपट 


अजब तुझे सरकार

आई (नवीन)

आई उदे गं अंबाबाई

आघात

आयत्या बिळावर नागोबा

एक गाव बारा भानगडी

एक रात्र मंतरलेली

एक होता विदुषक

कडकलक्ष्मी

कळत नकळत

गणानं घुंगरू हरवलं

गल्ली ते दिल्ली

चटक चांदणी

चांडाळ चौकडी

चोरीचा मामला

जगावेगळी प्रेमकहाणी

जन्मठेप

जिद्द

जैत रे जैत

दिसतं तसं नसतं

दीड शहाणे

धरतीची लेकरं

नणंद भावजय

नाव मोठं लक्षण खोटं

पटली रे पटली

पदराच्या सावलीत

पायगुण

पिंजरा

पुत्रवती

पैज

पैजेचा विडा

प्रतिकार

फटाकडी

बन्याबापू

बायको असावी अशी

बिन कामाचा नवरा

भन्नाट भानू

भालू

भिंगरी

भुजंग

मानसा परीस मेंढरं बरी

मालमसाला

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी

राघुमैना

राणीने डाव जिंकला

रानपाखरं

रावसाहेब

रिक्षावाली

लाखात अशी देखणी

लाथ मारीन तिथं पाणी

वरात

शापित

सतीची पुण्याई

सर्वसाक्षी

सवत

सहकारसम्राट

सामना

सासुरवाशीण

सोबती

सोयरीक

सिंहासन

सेनानी साने गुरूजी

सोंगाड्या

हर्या नार्‍या जिंदाबाद

हळदी कुंकू

हीच खरी दौलत

थापाड्या .

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post