.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनपरिचय | Laxmikant Berde wiki Marathi | Laxmikant Berde biography in Marathi | Age, birthdate, career, wife, childern, love affairs, death

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जीवनपरिचय| Laxmikant Berde biography in Marathi

sample47

लक्ष्मीकांत बेर्डे

अभिनेता , 1954 - 2004

नाव - लक्ष्मीकांत बेर्डे


जन्म दिनांक - 26 ऑक्टोबर १९५४


मृत्यू दिनांक - १६ डिसेंबर २००४


जन्म स्थान - रत्नागिरी, महाराष्ट्र , भारत


ओळख -चित्रपट अभिनेता


वडिलांचे नाव - उपलब्ध नाही


आईचे नाव - उपलब्ध नाही


जीवनसाथी - रुही बेर्डे आणि प्रिया अरुण 


मुले - अभिनय आणि स्वानंदी  


निवासस्थान -मुंबई


शिक्षण - भवन्स महाविद्यालयातून B.A ची पदवी

 

मराठी आणि हिंदी चित्रपट श्रुष्टीमधे साधारण २ दशके आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्या. 


विनोदाचं उपजात कौशल्य आणि अचूक टाईमिंग हे लक्ष्याचं वैशिष्ठ्य. लक्ष्मीकांत बेर्डे हे विनोदी अभिनेते म्हणून जरी जास्त प्रसिद्ध असले तरी कित्येक चित्रपटांमधून त्यांनी अगदी गंभीर भूमिका सुद्धा अगदी तंतोतंत वठवली आहे. विनोदी भूमिकांमध्ये त्यांनी महारथ प्राप्त केली होती म्हणून आयुष्यभर ते विनोदी अभिनेता म्हणूनच ओळखले गेले. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुरुवातीचे दिवस (Laxmikant berde initial days)


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला रत्नागिरी येथे झाला. लक्ष्या हा त्याच्या ५ भावंडांपैकी एक. आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने लहानपणी लॉटरी ची तिकिटे सुद्धा विकली आहेत. 


 खेरवाडी येथील युनियन  हायस्कूल या शाळेतून त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर भवन्स या महाविद्यालयातून त्यांनी आपली B.A ची पदवी मिळवली. 


आपल्याला विश्वास बसणार नाही पण, मोठं झाल्यावर आपण बस कंडक्टर व्हायचं  असा त्यांचं स्वप्न होतं कारण कंडक्टर जवळील पैशाने भरलेली बॅग पाहून त्यांना अस वाटत  होतं कि हे सगळे पैसे त्याचेच असतात. नंतर त्यांनी अभिनयात गोडी वाटू लागली. 


लकमीकांत बेर्डे यांची अभिनयाची सुरुवात (Laxmikant Berde acting career)

 गणेश उत्सवातील कार्यक्रमातून अभिनयाचा एक छोटासा प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला आणि ते आपल्या भूमिका साकारू लागले. त्यानंतर शाळा आणि कॉलेज मधून त्यांनी बऱ्याच नाटकात कामे केली आणि बरीच बक्षिसे सुद्धा मिळवली. 


मुंबई मराठी साहित्य संघ्यात सामील होण्याचा मान त्यांना मिळाला आणि त्याच बरोबर त्यांना मिळाली व्यावसायिक रंगभूमीवर आपली कला दाखवण्याची संधी. अर्थात हि संधी मिळवण्यासाठी त्यांना खूपच कष्ट घ्यावे लागले. सुरुवातीला त्यांना वॉचमनची  सुद्धा नोकरी करावी लागली होती. 

नाटकांमधून काम करत असताना, पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" या नाटकातून त्यांनी भूमिका केली आणि ती महाराष्ट्रभर गाजली. याच नाटकाने अभिनयाच्या क्षेत्रात त्यांना एक नवीन ओळख मिळवून दिली.


 त्यानंतर "करायला गेलो काय, उलटे झाले पाय", शांतेचं कार्ट चालू आहे, कार्टी प्रेमात पडली, अबब ! विठोबा बोलू लागला अश्या अनेक गाजलेल्या नाटकांमधून त्यांनी रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. नाटकांमध्ये सगळे व्यस्थित चालू असले तरी ते समाधानी न्हवते. त्यांना चित्रपटात काम करण्याची तीव्र इच्छा होती. 


लवकरात त्यांची चित्रपटात काम करण्याची इच्छा पूर्ण झाली ती "लेक चालली सासरला" या चित्रपटाच्या रूपात. हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यांचा पहिलाच चित्रपट तितकेसे व्यावसायिक यश मिळवू शकला नाही त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांची प्रसिद्धी मर्यादितच राहिली. 


दूरदर्शन वरील गजरा या मालिकेतून वेगवेगळे आवाज काढून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात


प्रसिद्ध निर्माता/दिग्दर्शक महेश कोठारे यांनी लक्ष्याचा अभिनय पाहून आपल्या "दे दणादण" या चित्रपटामधून त्याला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका करण्याची संधी दिली. 


मिळालेल्या  संधीचं  सोनं  करणार नाही तो लक्ष्या कसला! हा चित्रपट आणि लक्ष्या दोघेही सुपरहिट ठरले. पुढे महेश कोठारे यांच्या धूम धडाका या चित्रपटात त्यांनी अशोक सराफ आणि स्वतः महेश कोठारे यांच्या बरोबर भूमिका केली आणि अभिनयाचे बरेच दरवाजे त्यांच्या साठी उघडले गेले. 


या चित्रपटाने एक अभूतपूर्व यश मिळवले. एक धमाल विनोदी अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे जनमानसात ओळखले जाऊ लागले. लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत सर्वच जण त्यांचा अभिनय पाहून अगदी पोट  धरून हसत होते. सचिन पिळगावकर दिग्दर्शित "अशी हि बनवाबनवी" या चित्रपटातील त्यांची साडी नेसून साकारलेली विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडून गेली. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांची दिवसेंदिवस वाढत असलेली लोकप्रियता पाहून महेश कोठारे यांनी त्यांना आपल्या बऱ्याचशा आगामी चित्रपटात विनोदी भूमिका करण्याची संधी दिली. या मध्ये धुमधडाका, धडाकेबाज, थरथराट, झपाटलेला इत्यादी यशस्वी चित्रपटांचा समावेश होतो. 


मराठी चित्रपटसृष्टी वर त्यानंतर राज्य केल ते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने. या जोडीचे बरच चित्रपट आजही आवर्जून पहिले जातात. "हमाल दे धमाल" या चित्रपटातील वैशिष्ट्य पूर्ण भूमिकेमुळे त्यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. 


त्यांची जबरदस्त अभिनय क्षमता आणि प्रचंड लोकप्रियता पाहून ते मराठी चित्रपट सृष्टीतील महानायक म्हणून ओळखले जाऊ लागले. 

लक्ष्मीकांत बेर्डे  यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच अभिनेत्रींनसोबत चित्रपटात काम केले असले तरी त्यांची विशेष जोडी जमली होती ती वर्षा उसगावकर सारख्या कसलेल्या अभिनेत्रींबरोबर. वर्षा लक्षा ची जोडी प्रेक्षकांनी खूपच पसंत केली. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हिंदी चित्रपस्त सृष्टीत प्रवेश (Laxmikant Berde debut in Hindi movies)


धुमधडाका च्या यशानंतर त्यांना हिंदी चित्रपटाच्या सुद्धा ऑफर येऊ लागल्या. त्यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणजे "मैने प्यार किया" ज्याने लोकप्रियतेचे शिखर गाठले होते. या चित्रपटातील लक्ष्याच्या विनोदी भूमिकेचे विशेष कौतुक झाले.


 या चित्रपटाद्वारे त्यांची हिंदी चित्रपट सृष्टीत कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर त्यांनी "हम आपके है कौन", "साजन" या सारख्या चित्रपटांमध्ये अजरामर भूमीका साकारल्या. 


एक होता विदूषक चे अपयश 


आपण फक्त विनोदी अभिनेता म्हणूनच ओळखले जाऊ  नये तर अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जावे अशी त्यांची इच्छा होती. त्याची पु. ल. देशपांडे लिखित एक होता विदूषक या महत्वाकांक्षी चित्रपटात एक गंभीर भूमिका साकारली. 


या चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. पण विनोदी अभिनेता अशी ओळख असलेल्या लक्ष्याची गंभीर भूमीका प्रेक्षकांना रुचली  नाही आणि हा चित्रपट अपयशी ठरला. 


या चित्रपटाकडून अपेक्षाभंग झालेला हळव्या मनाचा लक्ष्या यातून लवकर सावरू शकला नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या विनोदी भूमिकांवरच लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शिस्तबद्धपणा 


लक्ष्मीकांत बेर्डे हे एक शिस्तबद्ध अभिनेते होते. रात्री कितीही जागरण झाल तरी सकाळी सात वाजता ते न चुकता उठत असत आणि शूटिंग साठी तयार होत असत. सेट वर त्यांनाही कधीही उशीर केला नाही. 

त्यांच्या शाब्दिक कोट्या, हजरजबाबी पणा, आणि विनोदी अभिनयावर प्रेक्षक भलतेच खुश होते. चेहऱ्याच्या अभिनयावर त्यांची विशेष पकड होती. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा विवाह (Laxmikant Berge marriage)


हा विनोदी अभिनेता बोहल्यावर चढला तो अभिनेत्री रुही  बेर्डे यांच्याबरोबर १९८५ साली . लक्ष्याच्या यशात रुही  बेर्डे यांचा सिंहाचा वाटा आहे. पण नियतीला हा विवाह जास्त काळ मान्य न्हवता आणि लक्ष्या आणि रुही यांची कायमची ताटातूट झाली ती रुहीच्या  निधनाने. १९९८ मध्ये रुही  बेर्डे यांचे निधन झाले.


त्यानंतर त्यांनी लग्न केले ते चतुरस्त्र अभिनेत्री प्रिया अरुण यांच्या बरोबर. लक्ष्या आणि प्रिया यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये बरोबरच काम केले आहे. लक्ष्या आणि प्रीया हि जोडी त्या वेळच्या काही प्रसिद्ध जोड्यांपैकी एक.  ८० ते ९० च्या दशकात या अभिनेत्याने मराठी चित्रपट सृष्टीवर निर्विवादपणे वर्चस्व गाजवले. 


लक्ष्मीकांत बेर्डे याना अभिनय आणि  स्वानंदी नावाची दोन मुले सुद्धा आहेत. त्यांचा मुलगा अभिनय हा सुद्धा चित्रपट अभिनेता आहे. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मृत्यू (Laxmikant Berde death)


पण या अभिनेत्याला नियतीची नजर लागली आणि तो किडनीच्या विकाराने त्रस्त  झाला. या आजारातील गुंतागुंत वाढून मराठी चित्रपट सृष्टीचा हा विनोदाचा बादशाह अखेर १६ डिसेंबर २००४ रोजी आपल्यातून कायमचा निघून गेला. 


त्यांच्या अंत्ययात्रेला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. त्यात सचिन, महेश कोठारे आणि अशोक सराफ याना तर अश्रू आवरणे कठीण झाले होते. 


त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका हि आजही रसिकांच्या मनात अजरामर आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या मुलाच्या नावाने अभिनय आर्टस् प्रॉडक्शन सुरु केल होत. 


त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहताना प्रेक्ष्यांच्या मनात एकच भावना येते कि लक्ष्या आज असायला हवा होता आणि त्याची आठवण नकळत डोळ्याच्या कडा पाणावून गेल्याशिवाय राहत नाहीत. 


लक्ष्मीकांत बेर्डे यांची गाजलेली नाटके 


थांब लक्ष्या  भांग  पाडतो 

टूर टूर 

अबब ! विठोबा बोलू लागला 

घरात हसरे तारे 

पंडित आता तरी शहाणे व्हा 

शांतेचं  कार्ट चालू आहे (१९८९)

बिघडले स्वर्गाचे दार (१९९१ )

अश्वमेध 

सर आली धावून 

कार्टी प्रेमात पडली 

लेले विरुद्ध लेले 

नंदा सौख्य  भरे 


लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मराठी चित्रपट (Laxmikant Berde movie list)


तुझ्याच साठी ( २००४)

पछाडलेला (२००४)

चिमणी पाखरं (२००३)

आधारस्तंभ (२००३)

मराठा बटालियन (२००२)

देखणी बायको नाम्याची (२००१)

खतरनाक (२०००)

नवरा मुंबईचा (२०००)

धांगड धिंगा (२०००)

कमाल माझ्या बायकोची (२०००)

आई थोर तुझे उपकार (१९९९)

माणूस (१९९९)

आपला लक्ष्या (१९९८)

जनता जनार्दन (१९९८)

जमलं हो जमलं (१९९५)

धमाल जोडी (१९९५)

सुना येति घरा (१९९५)

टोपि वर टोपि (१९९५)

बजरंगाची कमल  (१९९४)

चिकट नवरा (१९९४)

माझा छकुला (१९९४)

सोनियाची मुंबई (१९९४)

प्रेमाच्या सुलट्या बोंबा (१९९४)

तू सुखकर्ता (१९९३)

झपाटलेला (१९९३)

सारेच सज्जन (१९९३)

एक होता विदूषक (१९९२)

 जिवलगा (१९९२)

हाच सुनबाईचा  भाऊ (१९९२)

जीवा सखा (१९९२)

देधडक बेधडक (१९९२)


Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post