.

काय आहे काळी बुरशी? त्या पासून संरक्षण कसं करावं ? | What is Mucormycosis? | Symptoms of Mucormycosis| Mucormycosis treatment

Symptoms of Mucormycosis


 मागील काही आठवड्यांपासून कोविड १९ शी संबंधित एक नवीन रोग समोर आला आहे जो कोविड  मधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आढळून येत आहे. 


मुकर मिकॉसिस (Mucormycosis) म्हणजेच काळी  बुरशी हे रुग्णाच्या सायनस मध्ये, फुफ्फुसामध्ये, नाकामध्ये, डोळ्यामध्ये आणि कधी कधी तर मेंदूमध्ये सुद्धा आढळत आहे ज्यामुळे आंधळेपण किंवा मृत्यूची शक्यता जास्त आहे. 


खरंतर काळी  बुरशी हा एक क्वचितच आढळणारा रोग आहे पण मागील काही दिवसांपासून याचे प्रमाण वाढत आहे आणि हि नक्कीच चिंतेची बाब आहे. 


काय आहे मुकर मिकॉसिस किंवा काळी बुरशी? त्यापासून संरक्षण कसं  कराल? (What is Mucormycosis? How to treat Mucormycosis?)


या आजारामध्ये ज्या रुग्णाची प्रतिकारशक्ती खूपच कमजोर आहे त्याच्या शरीरामध्ये  बुरशी किंवा फंगस चा शिरकाव होतो. कालांतराने हि बुरशी आपली व्याप्ती वाढवते आणि ज्या पेशींमध्ये तिने शिरकाव केला आहे त्या पेशींना नष्ट करत जाते. 


हि प्रक्रिया खूप वेगाने वाढत जाते आणि जर ती वाढली तर तिला थांबवणे खूप अवघड होते. सामान्यपणे हि बुरशी आपल्या नाक किंवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करते. 


त्या नंतर आपल्या सायनस मध्ये (हाडांमधील पोकळ्या) तो चिकटून राहतो आणि त्याची वेगाने वाढ होत राहते. त्यामुळे नाक, तोंड, डोळे या अवयवांना त्याचा धोका जास्त असतो. 


नाकावाटे आणि तोंडावाटे प्रवेश केल्यानंतर तो डोळ्यापर्यंत आणि कधी कधी मेंदू पर्यंत सुद्धा पसरतो आणि खूपच प्राणघातक होऊ शकतो. जर तो मेंदूपर्यंत पोहोचला तर मृत्युदर हा ५०% पर्यंत सुद्धा जाऊ शकतो. 


कोविड  मधून बरे झालेल्या लोकांमध्येच हा ब्लॅक फंगस किंवा काळी  बुरशी का आढळते?


साधारणपणे निरोगी शरीरात बुरशीचा शिरकाव खूपच क्वचित होतो कारण आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता बुरशी विरुद्ध लढ्यासाठी तत्पर असते. 


पण जेंव्हा शरीराची प्रतिकार क्षमता कमी होते तेंव्हा हा बुरशीचा शिरकाव सहजगत्या होऊ शकतो. तसं  पाहायला गेल तर बुरशीचे कण  हे हवेमध्ये, जमिनीच्या पृष्ठभागावर सामान्यपणे आढळून येतात. 


जसं  आपण पाहिलं असेल कि ब्रेड किंवा भाकरी जर २ दिवस तशीच राहिली तर त्यावर बुरशी जमा होऊ लागते. पण शरीरावर जमा होऊ लागलेला बुरशीपासून शरीराची प्रतिकारशक्ती आपलं  रक्षण करते.


 कोविड १९ रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते किंवा उपचाराच्या दरम्यान डॉक्टरांनां  अशी औषधे वापरावी लागतात कि जी त्या वेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी महत्वाची असतात. जसं  कि स्टिरॉइड. 


पण त्याचा एक साईड  इफेक्ट असा होतो कि त्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळेच कोविड  १९ मधून बरे झाल्यावर रुग्णाला बुरशीची बाधा होण्याची शक्यता जास्त असते. 


दुसरी गोष्ट अशी आहे कि, बऱ्याच कोविड  रुग्णांना ऑक्सिजन ची गरज भासते. त्यामुळे नळीवाटे नाकापर्यंत किंवा कधी कधी फुफ्फसांपर्यंत ऑक्सिजन चा पुरवठा करावा लागतो. ऑक्सिजन च्या नळीमधील  आर्द्रतेमुळे त्यात बुरशी वाढू लागते आणि तेथून ती शरीरात प्रवेश करू शकते. या कारणामुळे सुद्धा कोविड  रुग्णांमध्ये काळ्या बुरशीचा आजार वाढीस लागला आहे. 


तिसरे कारण असा आहे कि, कोविड च्या विषाणूंमुळे आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशींची क्षमता खूपच कमी होते. पांढऱ्या पेशींची संख्या जर कमी झाली तर त्याचा परिणाम थेट रुग्णाच्या प्रतिकार शक्तीवर होतो आणि त्यामुळे सुद्धा तो काळ्या बुरशीचा शिकार होऊ शकतो. 


काळ्या बुरशीची लक्षणे काय आहेत ?(Symptoms of Mucormycosis in Marathi)


काळ्या बुरशीचे धागे शक्यतो रुग्णाच्या नाक किंवा तोंडातून त्याच्या  शरीरात प्रवेश करतात त्यामुळे सुरुवातीला नाकामध्ये काहीतरी अडथळा असल्याची भावना रुग्णांमध्ये तयार होते. जर आपले नाक ब्लॉक होत असेल (नोस  ब्लॉक) तर आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे. 


नाकावाटे हि बुरशी सायनस मध्ये प्रवेश करते आणि तेथे ती वाढीस लागते. त्यामुळे त्याभागात सूज येते आणि त्यावरील त्वचा हि लाल होऊ लागते. त्या ठिकाणी वेदना सुद्धा वाढीस लागतात. 


जर आपल्या डोळ्यांच्या आसपासच्या भागात जर वेदना होत असतील तर आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 


बुरशीच्या इन्फेकशन मुले तिच्या संपर्कात आलेल्या पेशी सडू  लागतात आणि नष्ट होऊ लागतात. त्यामुळे तेथील रक्त पुरवठा करणाऱ्या शिरा/नसा  सुद्धा सडू लागतात. 


ज्या ठिकाणी हि बुरशी वाढू लागते त्या ठिकाणच्या त्वचेची संवेदना नष्ट होऊ लागते आणि रुग्णास तापाची लक्षणे जाणवतात. त्यामुळे जर कोविड  मधून बरा झालेल्या रुग्णामध्ये जर जास्त प्रमाणात ताप असेल तर ती सुद्धा काळ्या बुरशीची लक्षणे असू शकतात. 


या व्यतिरिक्त नाकातून स्त्राव येणे, खोकला येणे हि सुद्धा सामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. 


बुरशीच्या इन्फेकशनचं आणखी एक लक्षण म्हणजे तोंडाच्या आतील भागात काळे चट्टे पडणे. हे चट्टे तो भाग बुरशीच्या संपर्कात आल्यामुळे पडतात याचाच अर्थ त्या भागाच्या पेशींचे बुरशीच्या इन्फेकशन ने खूपच नुकसान केले आहे आणि त्या पेशी सडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. 


जशी जशी बुरशीची तीव्रता वाढते तसं तसं  ती रुग्णांच्या डोळ्यावर सुद्धा पसरते. नंतर हि बुरशी डोळ्यांच्या खोबणीत जाते आणि तेथील पेशींचा नाश करण्यास सुरुवात करते.


 या मुळे  डोळ्यांना प्रचंड सूज येते. डोळ्याच्या आसपासची त्वचा खूपच लाल होते आणि डोळे बाहेर आल्यासारखे वाटू लागते. 


या मुळे  डोळ्यात प्रचंड वेदना होऊ लागतात आणि डोळ्यांची उघडझाप करणे सुद्धा अशक्य होऊन जाते. इन्फेकशन जर जास्त असेल तर रुग्णास अंधत्व येण्याची शक्यता सुद्धा असते कारण हि बुरशी डोळ्याच्या पेशींना नष्ट करते. 


जर काळ्या बुरशीवर जर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर पुढे जाऊन त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. 


हि बुरशी जर मेंदू पर्यंत पोहोचली तर रुग्ण दगावू शकतो. आता पर्यंत च्या पाहणी नुसार अश्या रुग्णांचा मृत्युदर ५०% पर्यंत आहे. वेळीच औषध उपचार मिळाले नाही तर हि बुरशी रक्तामार्फत संपूर्ण शरीरात पसरते. 


त्यामुळे रुग्णाचे विविध अवयव निकामी होण्याचा तसेच शरीरात पू  होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे मृत्युदर सुद्धा वाढतो. 


वरील लक्षणे आढळून आल्यानंतर काय करावे?(How to treat Mucormycosis?)


जर काळ्या बुरशीची लक्षणे आढळून आली तर, आपल्या नजीकच्या नेत्ररोग तज्ज्ञाला त्वरित दाखवणे गरजेचे आहे त्यामुळे या रोगाचे लवकर निदान होण्यास मदत होईल. लक्षणे दिसल्यास, रुग्णास, चेहरा, मेंदू यांच सिटी स्कॅन करावं लागतं  त्यामुळे बुरशीचा फैलाव कुठपर्यंत झाला आहे हे समजण्यास मदत होते. 


निदान निश्चित करण्यासाठी बायोप्सी सुद्धा केली जाते म्हणजे त्वचेचा एक तुकडा मिक्रोस्कोप खाली पहिला जातो त्यामुळे बुरशीची बाधा झाली आहे किंवा नाही ते समजण्यास मदत होते. 


काळ्या बुरशीचे एकदा निदान झाल्यानंतर उपचार सुरु केले जातात त्यामध्ये प्रामुख्याने बुरशीरोधक औषधे दिली जातात. हि औषधे इंजेकशन द्वारे रुग्णाच्या शरीरामध्ये सोडली जातात. 


अशी इंजेकशन बराच वेळपर्यंत घ्यावी लागतात कारण बुरशीची बाधा कमी करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे जेवढ्या लवकर उपचार चालू केले जातात तेवढ्या लवकर रुग्ण लवकर बरा  होऊ शकतो. 


काळ्या बुरशीमुळे ज्या पेशी बाधित होतात त्यांना पुनर्जीवित करणे हे खूपच कठीण काम आहे. रुग्णाचा  जीव वाचवण्यासाठी किंवा ज्या पेशी अजून बाधीत नाहीत त्यांना वाचण्यासाठी शस्त्रक्रिया सुद्धा करावी लागते. 


बऱ्याच वेळा फक्त शस्त्रक्रिया हा एकाच पर्याय शिल्लक राहतो जेणे करून रुग्णाची दृष्टी किंवा निरोगी पेशी वाचवतात येतील. 


कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या प्रत्येक रुग्णास या आजारास घाबरण्याचे कारण नाही. कारण ज्यांची प्रतिकार शक्ती खूपच कमी आहे तेच रुग्ण या रोगाला बळी  पडू शकतात. 


ज्यांना खूप जास्त प्रमाणात मधुमेह आहे आहे किंवा ज्यांना खूपच जास्त प्रमाणात स्टिरॉइड दिले गेले आहेत किंवा जे ऑक्सिजन वर होते आणि ऑक्सिजन च्या नळ्या  साफ करण्यासाठी दूषित/बाधित पाणी वापरले गेले असेल तर अशा रुग्णांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. 


हा आजार जर वेळीच लक्षात आला आणि त्यावर वेळीच उपचार झाले तर या मध्ये शंभर टक्के रुग्ण बरा  होऊ शकतो त्यामुळे या रोगाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. 


या रोगाला माध्यमांमधून अवास्तव प्रसिद्धी देण्यात आली आहे त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पण हा रोग तास क्वचितच होणार रोग आहे आणि तो सर्वाना होत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या रुग्णास वेळेवर उपचार मिळत नाहीत तेच रुग्ण या आजारास बळी  पडण्याची शक्यता जास्त असते. 


वेळेत उपचार मिळाले तर हा आजार पूर्णपणे बरा  होऊ शकतो. 


रक्ताची WBC चाचणी करून सुद्धा आपण या आजाराचं निदान करू शकता. जर  WBC संख्या  सामान्य असेल तर आपल्याला हा आजार होण्याची शक्यता कमीच. 


पण जर हि संख्या खूपच कमी असेल तर आपल्याला सावध होण्याची गरज आहे. जर हि संख्या एका आठवड्यात जर सामान्य रेंज मध्ये आली तर काळजी करण्याची गरज नाही. 


WBC संख्या कमी असेल तर आपणास नाक, तोंड, डोळे आणि चेहऱ्याची निगा राखणे आवश्यक आहे. त्यासाठी, हा भाग मिठाच्या पाण्याने स्वच्छ करावा त्यामुळे आपण या आजारातून वाचू शकता. 


या आजारास घाबरण्याची मुळीच गरज नाही. योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा  होऊ शकतो. 


Disclaimer:-

या लेखात देण्यात आलेली माहिती हि फक्त सामान्यज्ञानासाठी दिलेली आहे. कोणत्या आजारावर कोणते  औषध घ्यावे याचा सल्ला मराठी Wiki कधीही देत नाही . कोणत्याही रोगावर उपचार घेताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. या लेखामध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार जर कोणी परस्पर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याविना  औषधे घेत असेल तर झालेल्या नुकसानीस मराठी Wiki जबाबदार नाही याची नोंद घ्यावी. आजारा बद्दल अधिक माहिती आणि उपचारांसाठी कृपया आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा . 

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post