.

महाराष्ट्रातील किल्ले - आजोबागड किल्ला | Ajobagad fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Ajobagad Killyachi mahiti

Ajobagad

 

किल्ल्याची उंची:-
 किल्ल्याचा प्रकार:- गिरिदुर्ग
डोंगररांग:-
 जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगडा यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजापर्वत उर्फ आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो.  घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी एक आगळे वेगळे लक्षच ठरला आहे.  या गडाची तीन हजार फुटांची भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक मोठे आव्हान आहे.


इतिहास:- गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे.  याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी रामायण हा धर्मग्रंथ लिहिला.  

याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला आणि कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत म्हणूनच या गडाचे नाव आजोबा असे पडले अशी कथा सांगितली जाते.  येथे गडावर वाल्मिकि ऋषीचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.


 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-  पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. 

 येथे गडावर राहण्यासाठी एक कुटी  आहे.  जवळच पाण्याचा झरा आहे जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते.  

आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर एक गुहा लागते येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत.  

येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे.  या  गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्या देखील लावल्या आहेत याच मार्गाने आश्रमात परतावे.  अशाप्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य दुर्गयात्राच ठरते.  गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष काहीच नाही.  

अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा ते पाच दिवसांचा टेक करतात.


गडावर जाण्याच्या वाटा:- मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर गडावर जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे मुंबईहून आसनगाव  रेल्वे स्थानकावर यावे.  येथून शहापूर या गावी रिक्षेने अथवा एसटीने यावे. येथून पहाटेच एस.टी . ने अथवा जीप ने  डोळखांब साकुर्ली  मार्गे डेणे या गावी यावे.  

गावातून जाताना मध्ये एक पठार लागते पठारावर तीन वाटा एकत्र येतात यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते.  दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे कुमशेत  गावात जाऊन मिळते.  तिसरी वाट मात्र जंगलात जाते या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.


कल्याण - मुरबाड- माळशेज- डोळखांब:-  या मार्गाने कल्याण मुरबाड माळशेज या मार्गाने सुद्धा डेणे

 गावी पोहचता येते.  कसारा - घोटी -राजूर -कुमशेत मार्ग :- गडाचा माथा पाहण्यासाठी या  मार्गे जाता येते.

 राहण्याची सोय:-  गडावरती रहाण्यासाठी आश्रम आहे या तेवीस जणांना राहता येते.


 जेवणाची सोय:-  येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतः घेऊन यावे.


 पाण्याची सोय:- येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.

जाण्यासाठी लागणारा वेळ:- एक तास.


 सूचना:-  गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post