.

महाराष्ट्रातील किल्ले - गोरखगड किल्ला | Gorakhgad fort in Maharashtra | Forts in Maharashtra in Marathi | Gorakhgad Killyachi mahiti

Gorakhgad fort

 किल्ल्याची उंची:- २१३७  फूट

 किल्ल्याचा प्रकार:-  गिरिदुर्ग
डोंगररांग:- कर्जत
 जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
गोरखगड हा मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे.  गोरखगड आणि मच्छिंद्रगड आला तसा ऐतिहासिक वारसा नसला तरी त्यांच्या  सुळक्यांमुळे प्रस्तरारोहकांसाठी  ते नेहमीच एक आकर्षण ठरले आहे.  

गोरखगड आणि मच्छिंद्रगड याच्या आजुबाजूचा परिसर प्रसिद्ध आहे तो म्हणजे येथील घनदाट अभयारण्यामुळे.  गोरखगडाचा विस्तारही तसा मर्यादितच आहे.  शहाजी राजांच्या काळात या गडाला महत्त्व होते मात्र येथे कोणत्याही प्रकारच्या लढाईचा उल्लेख नाही. 

 शिवकालात गडाचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे.  पूर्वी नाणेघाट मार्गे जुन्नर ला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणुन वापर करत असत.  मर्यादित विस्तार असूनही मुबलक पाणी निवार्‍याची योग्य जागा मात्र या गडावर उपलब्ध आहे.  गोरक्षनाथांच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून त्याचे नाव गोरखगड.

 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-  दरवाज्यातून वर चढून गेल्यावर वर दोन तीन पाण्याची टाकी लागतात.  समोरची वाट पुन्हा थोड्याशा चढणीवर घेऊन जाते पुढे पायर्‍यांच्या मदतीने थोडे खाली उतरल्यावर आपण गोरखगडाच्या  सुळक्यात खोदलेल्या  अतिविशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. 

 समोरच प्रांगणाखाली भयाण दरीत झुकलेले दोन चाफ्याचे डेरेदार वृक्ष आणि समोरच असणारा मच्छिंद्रगड निसर्गाच्या भव्य अदाकारीचे असीम दर्शन घडवतो.  गुहेच्या आजूबाजूला पाण्याची तीन टाकी आहेत.  गोरखगडाच्या पठारावरून एकूण चौदा पाण्याची टाके आहेत पण त्यापैकी गुहे  जवळील पाण्याच्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे.  

गोरखगडाचा ट्रेक हा त्याच्या माथ्यावर गेल्याशिवाय पूर्ण होत नाही.  गुहेसमोर तोंड करून उभे राहिल्यास उजव्या बाजूने जाणार्‍या वाटेने पुढे यावे थोडे अंतर चालून गेल्यावर सुळक्यावर चढण्यासाठी डाव्या बाजूला कातळात पन्नास पायऱ्या कोरलेल्या आहेत.  

पन्नास पायर्‍यांच्या मार्गावर ऊन जरा जपून चालावे लागते.  गडाचा माथा फारच लहान आहे.  वर एक महादेवाचे मंदिर आहे आणि समोरच एक नंदी.  आहे माथ्यावरून समोर मच्छिंद्रगड, सिद्धगड, नाणेघाटाजवळील जीवधन, अहुपे घाट  असा सर्व रमणीय परिसर न्याहाळता येतो.

 गडावर जाण्याच्या वाटा:- 
१. म्हसा फाट्या मार्गे:- गोरखगडावर येण्यासाठी मुंबईकरांनी कल्याण मार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे.  मुरबाड वरून  म्हसा फाट्यामार्गे  धसईगावात  यावे. 

 येथून दहेरी पर्यंत खाजगी जीप अथवा एसटी सेवा उपलब्ध आहे.  दहेरी गावातून समोरच दोन सुळके दृष्टिक्षेपात येतात.  लहान सुळका मच्छिंद्रगडाचा तर मोठा सुळका गोरखगडाचा आहे. गावातील विठ्ठलाच्या मंदिरात मुक्काम करता येतो.  

मंदिराच्या मागच्या जुने जंगलात जाणारी एक पायवाट एक ते दीड तासात गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी घेऊन जाते. या वाटेने गड गाठण्यास दोन तास पुरतात.

२. मुरबाड:-  मिले मार्गाने दहेरी गावी यावे.  या गावातून अतिशय सोप्या वाटेने गडावर जाता येते.

३. सिद्धगडावरून :- गोरखगडावर येण्यासाठी  सिद्धगडावर ऊनही एक वाट आहे अनेक ट्रेकर्स सिध्दगड ते गोरखगड असा ट्रेक करताना या वाटेचा उपयोग करतात या वाटेवर एक घनदाट जंगल लागते चित्त गडावर जाण्यासाठी मुरबाड नारिवली मार्गे यावे.  

नारीवली  हे पायथ्याचे गाव आहे सिद्ध गडावर एक रात्र मुक्काम करून  पहाटेच सिध्दगड उतरावा.  वाटेत असलेल्या  ओढ्या बरोबर  एक वाट जंगलात शिरते.  या वाटेने थोडे उजवीकडे गेल्यावर आपण धबधब्याच्या वाटेला जाऊन मिळतो.  या वाटेने वर आल्यावर आपण एका छोट्याशा पठारावर येऊन  पोहोचतो.  

पठारावर महादेवाचं छोटे मंदिर आहे.  दोन समाध्या देखील आहेत.  येथून पुढे गेल्यावर लागणारी वाट ही उभ्या कातळातील असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते.  आपण कातळात खोदलेल्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो.  या मार्गाने गड गाठण्यास तीन तास पुरतात.

 राहण्याची सोय:-  गडावर असलेल्या एका गुहेत वीस-पंचवीस जणांना आरामात राहता येते.

 पाण्याची सोय:-  गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत.

 जाण्यासाठी लागणारा वेळ:-  दोन तास दहेरी मार्गे.

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post